१०८ बाळमित्र. की, तो परकी गृहस्थ जसा त्या मुलीस घालून पाडून बोलला, तसे लोक आपणाला बोलतील; ह्याहून दुःख दुसरे नाही, त्यापेक्षां मरण बरें, ह्यासाठी अगोदरच वडिलांची आज्ञा मानन मुख पावावें हे चांगले पर- क्याचे बोलण्यापर्यंत वाट पाहूं नये. खोंक. काशिनाथ नामें मुलगा फार सदय, हास्यमुख, व गुणाचा होता; ज्याची वत्ति सदा आनंदित असे. फारतर काय सांगावें, पण त्याची आकृति आणि उत्तम रीति पाहून सर्व लोकांचे मनांत त्याविषयी प्रीति उत्पन्न व्हावी, इतके गुण त्याचे अंगी होते; पण त्याला एक माण वाईट खोड होती, ती हीच की, स्वल्प कारणाव- रून त्याला मनस्वी क्रोध येई. त्यामुळे त्याचे मित्र फार खेद पावत असत. एखादे वेळेस काशिनाथ आपल्या सोबत्यां संग. ती काही खेळत असतां, त्यांत जर दुसरा कोणी का- ही बोलला तर त्या मुलाला असा अतिशयित राग यावा की, त्यांने रक्तासारखे डोळे करून भुईवर हात पाय आदळावे, शेवटीं वेड्या सारखे होऊन मोठ्याने ओरडावें देखील. एके दिवशी बापाने त्यास सांगितले की, तूं आप. ले बहिणी करितां कळासूत्राचा खेळ करिव, अशी खोक. १०९ अपाची आज्ञा झाली त्यावरून तो मुलगा तमाशाचे विचारांत पडला असतां, आपले खोलीत फिरता फिरतां त्याविषयींचा मनसोबा आपले मनांत करीत होता; इतक्यामध्ये त्याचा जिवलग मित्र, गोविंदा, हा काही त्यास विचार विचारावयास आला. काशिनाथ तमाशाचे विचारांत निमग्न होता, ह्मणून त्याने गोविंदाकडे पाहि- ले नाही. गोविंदाने तीन चार वेळां काशिनाथ, काशि- नाथ, ह्मणून हाका मारल्या, तरी त्याने पाहिले नाही; तेव्हां जवळ जाऊन त्याचे आंगरख्याचा पदर ओढ- ला. अगोदर त्याचे चित्त श्रमामध्ये पडलेच होते, त्यां- त आंगरख्याला हिसका बसताच झटकन मागे वळला, तो त्या फिरण्याने त्याचा धक्का गोविदास लागून तो जिन्याच्या पायऱ्यांवरून गडबडत गडबडत खाली आ• ला, आणि अचेतन होऊन पडला. जिन्यांतून गडबडते. वेळेस कानशिलापाशी पायरीचा कांठ लागून खोंक पडली; तीतून भडभडां रक्त वाहूं लागले, श्वासोच्छास बंद झाले आणि डोळे पांढरे करून मृतप्राय झाला. हा अनर्थ क्या काशिनाथाने पाहतांच त्याची बोबडी वळ. ली, तोंडचे पाणी पळाले, हातपाय गळाले, आणि हा. य हाय अनर्थ झाला, असा मोठ्याने शब्द करून हं. बरडा फोडला. तो सद्गुणी सुकुमार मुलगा, आपल्या मित्रासाठी प्रसंगी प्राणही खर्चणार, त्याला आपल्या हाताने आणलेलें असें संकट प्राप्त झाले, अशी गोष्ट ११७ बाळमित्र. आपल्याकडून घडेल ह्याची त्याला अगाही नव्हती. इतक्यांत अशी त्या मुलाची आरड ऐकताच त्या- चा बाप गलबलन धांवन आला. आणि तत्काळ त्या- ने गोविंदास उचलून त्याचे डोळ्यांस पाणी लावलें, व आंगावर शिंपडून थोडेसे तोंडांत घातले, आणि आंगा. वर थंड वारा घातला, तेणेकरून गोविंदा अंमळ सा. वध झाला; नंतर काही अवकाशाने शुद्धीवर आला, मग लागलेच वैद्यास बोलावून आणून ती जखम न्या- ला दाखविली, तेव्हां वैद्य परीक्षा करून ह्मणाला की, निभावले ह्मणून निभावलें, नाही तर अमळ गहूंभर पलीकडे जर ही जखम लागली असती, तर कानशील फुटून भलतेच झाले असते. मग औषध पाणी करून त्या गोविंदाला त्याचे घरी पोहोंचतें करून दिले. तो घरी पोहोचतो तंव त्या मुलाचे आंगांत मनस्वी ताप भरून बरळू लागला. अशी त्याची अवस्था झाली, त्यावेळेस हा काशिनाथ त्याचे पलंगा जवळून एक क्षणभर देखील इकडे तिकडे हालला नाहीं; लोकांनी त्याला उदंड सांगितले की, तं जा आतां बाहेर; पण तो कोमळ दृदयाचा मुलगा, ज्याचे अंतःकरणास गोष्ट लागली, तो तेथून नाहीच हालला. गोविंदा बरळतां बरळतां असें बोले, अरे काशि- नाथा, अरे काशिनाथा माझ्या प्राणसख्या, त्वां माझी अशी अवस्था करावी काय ? त्वां असें करावयाजोगें म्यां काय केले होते ९ कारणावांचून माझे डोक्यास खोक. १११ खोक पाडली; असो, पण मला दुःख झाले हाणून तूंही दुःखित झाला असशील, हे योग्यच आहे, तथापि तूं दुःखित होऊ नको, मी तुला माफ करितों, आणि मी तुला रागें भरविलें ह्मणून तूंही माझे अपराधाची क्षमा कर; तुला उपद्रव द्यावा असे काही माझे मनांत नव्ह- ते, आणि तुझ्याही मनांत नसेल, पण होणाऱ्यासार- ख्या गोष्ण झाल्या. गोविदानें काशिनाथाचा हात धरला होता, पण तापाचे झापडीमुळे काशिनाथाकडे न पाहतां वारंवार असे बोलत असे; ते मृदुशब्द ऐकून काशिनाथाचे दुःख दुप्पट झाले. गोविंदाचे शब्द मैत्रीचे होते, परंतु ते का- शिनाथाचे दृदयास बाणांसारखे रुतले. ईश्वर कृपेंकरून त्याचा ताप शांत होऊ लाग- ला त्याकाळचा काशिनाथाचा आनंद काय वर्णावा ! आपल्या हाताने मित्राचा अपघात झाला असतां त्या अपघातापासून मित्र वांचला, असा जो का हर्ष त्या हषांचा उपभोग त्या सुकुमार मलाने मात्र घेतला. काशिनाथाचा आनंद जो गुप्त झाला होता तां गोविंदा चांगला बरा झाल्यावर पुन: प्रगट झाला. आ- पणापासून अनुचित घडलेल्या कर्माचे स्मरण धरून विचारानें क्रोध जिंकू लागला. गोविंदाला त्या अवस्थेची दुसरी कांही खूण राहिली नव्हती, पण तेवढा खोके. चा वण मात्र राहिला होता. त्या वणाकडे पाहून काशिनाथ लाजिरवाणा होई. उभयतांचा स्नेह उत्त