बालमित्र भाग २/दाष्ट मुलगी
१०१ बाळमित्र. च जाग्यांत त्याजकडून उड्या मारवाव्या. तथापि गुल्याचा तो दुर्गण गेला नाही; मोगया. चा सत्कार त्या द्वाडाने कधीच केला नाही; मोगऱ्या जवळ आला असतां भोकल्यावांचून बापडा कधी उ. गा राहिलाच नाहीं; असें होता होतां कांहींका दिव. "सांनी मृत्यूने त्याचे गा-हाणे ऐकून त्यास नेले. हे मुलांनो, ही गोष्ट वाचन ध्यानांत आणा की, दुष्ट चालीने चालणे व दुसऱ्याचा हेवा करणे ह्याचा परिणाम चांगला होत नाही, हेव्याने व पापाचरणाने आयुष्याचा नाश मात्र होतो. अशा आचरणांत लाभा. ची जात देखील नाही, केवळ शरिरास दुःख दाटणी मात्र आहे; ह्यासाठी द्वैत भावाकडे लक्ष्य न ठेवितां सर्वत्र समान दृष्टीने आचरण करावे ह्यांत कल्याण. दाष्ट मुलगी. काय, तूं माझें ऐकत नाहीस ९ बरें, आतां ऐकतोस की नाही ? जर ऐकत नाहीस तर मी कधी तुझें तोंड पाहणार नाही; ह्याप्रमाणे उमा नामें एक दाष्ट मुलगी होती ती आपले भावास वारंवार बोलून गांजीत असे, आणि सर्वकाळ आपले वर्चस्व त्याजवर ठेवीत असे. तिचे मनांत माझा भाऊ जे काय करतो ते नीट करीत नाही, वारंवार चुकतो; तो मजप्रमाणे करीत नाही; मी यथा योग्य चालीने चालतें; सर्व लोकांनी दे. दाष्ट मुलगी. खील माझें शाहणपणाचा कित्ता घ्यावा _भावानें कांहीं एक खेळ खेळावयाचें नांव घेतले ह्म णजे तिने त्या खेळाची अगदी हेटाळणी करून टा. कावी; मग दुसरे दिवशी तोच खेळ खेळावयास पुन्हां भावाला बोलवावें; असा तिचा हेकड स्वभाव भावाला मानणे प्राप्त झाले. एखादे वेळेस त्याने तिचे मणणे नऐकिलें तर तिने बोलबोलून त्याला पुरेपुरेसें करावें. कदाचित् भावाने त्रासून, तझें बोल0 रीतीचें नाहीं, असें झटले असतां लागलेच तिने इंगळा सारखें लाल होऊन आदळ आपटीवर यावे; मग त्याला एखादे कोपयांत जाऊन उगीच बसावे लागे. हा तिचा स्वभाव घालविण्याकरितां आईबापांनी तिला फार छडिलें, तथापि गेला नाहीं; न्यांत बापापे- क्षां आईने फारच यत्न केला; ती वारंवार तिला बोध करौ, अगे, तूं मुलीची जात, तुझ्या आंगी जर असा दाटपणा व उद्दामपणा राहील तर तुला कोणी पाय- पोसा जवळ देखील उभे राहू देणार नाही. नम्रपणाने सर्वांशी राहून मृदुभाषण बोलत जावें, सीपेक्षां आपण शाहणी, असें मानून उगीच आपले जागी आढयता आणतीस, हे फार वाईट; ह्यांत कांही चांगुलपणा ना- ही; अशी शिकवणीची गोष्ट आई सांगे, पण ती ति- च्या मनांत कधीच ठसली नाही. तिचा भाऊतर अशी तिची जाचणूक नित्य सोसतां सोसतां त्रासला; शेवीं तिजवरची प्रीति पहिल्यापेक्षा त्याची कमी होऊ लाबाळमित्र. गली, तथापि तिचा कांहीं दाष्टपणा गेला नाही, दिवसें दिवस अधिकच झाला. एके दिवशी उमाचे आईने एके गृहस्थास जेवाव- याचे आमंत्रण करून घरी बोलाविलें; तो गृहस्थ मो. ख्या कोटीतला संभावित, परंतु मोठा कडकडीत व स्प- ष्ट बोलणारा होता, आणि उमाचे आईच्या मनांतील जो अर्थ न्यासारखें बोलून उमाचा कान टोंची असा होता; त्याने ते दिवशी उमाची ती चाल पाहिली. ती भावाशी व आईबापांशी फारच गर्वाने व दांडगेपणाने वागते असे पाहून तो परका पुरुष, त्या वेळेस तिची कांही मर्यादा ठेवावी ह्मणून, अंमळ उगाच बसला, कां- ही बोलला नाही; पण त्याचे त्याला सहन होईना; मग थोडक्या वेळानंतर तो तिचे आईस ह्मणूं लाग- ला, तुमचे मुली सारखी जर मला मल असती, तर फार चांगले होते. कांहीं एक उपाय करून म्यां ति- ला मोठीशी पदवी दिली असती. मग ती प्रणाली, ते कसे काय ९ तेव्हां तो बोलू लागला की, मला शिपायांची कवाईत पाहण्याचा फा. र छंद आहे; जेव्हां जेव्हां मला अवकाश सांपडतो तेव्हां तेव्हां मी कवाईत पहावयास जात असतो; हा मी आतां तिकडून लश्करांतूनच आलों, तेथे मी कि- तीएक शिपाई असे पाहिले की, ज्यांला मिशा भल्या मोठमोठ्या व जे उंच धिप्पाड, ज्यांचे स्वरूप उग्र, ज्यां- वा स्वभाव अतिक्रूर, व ज्यांचा उद्धटपणा तर फारच १०७ दाष्ट मुलगी. होता; ह्मणून आतां मला असे वाटते की, जर तुमच्या । उमा सारखी मुलगी मला असती तर लागलेच तिच्या तोंडावर मिशा चिकटवून, विजार घालन, हातांत ढाल तरवार देऊन, त्या शिपायांचा सुभेदार तिला केले अ. सते; मग ती फारच शोभती आणि तिच्या मनास य. ईल तितका उद्धटपणा मिरवावयास तिला आज्ञा दिला असती. असे त्या गृहस्थाचे बोलणे ऐकतांच उमा मनांत फारच खजील झाली; तिचे तोंड अगदी उतरलें; शेव- टी रडू देखील लागली, आणि तिच्या मनांत पक्के बि- बले की, हा माझा स्वभाव फारच वाईट आहे, ह्याचा परिणाम ठीक नाही, आतां चांगला स्वभाव धरावा. असा बुद्धीचा निश्चय करून त्या दिवसापासून ती मु- लगी आईबापांचे शिकवणीप्रमाणे मुस्वभावाने वागू लागली. आईबापांचा उपदेश ऐकन तिने अगोदरच जर आ पली वाईट चाल सोडली असती, तर फार चांगले हो- ते; कांतर परकी गृहस्थाने उपरोधीक भाषण केले का, साडीचोळी याकून, ढाल तरवार बांधून, पुरुषाचा वेष घेतला ह्मणजे फार शोभा येईल, अशा भाषणापेक्षा वडिलांची शिकवी फार चांगली होती; परंतु ता तिच लक्षांत प्रथम आली नाही. कोणाला ही वाईट खोड असली तर त्याने वडि- + लांचे शिकवणी वरून ती सत्वर टाकून द्यावी; कारण