२७२ बाळमित्र. आचरण करून जे दुसरे कोणी दुर्गुणी असतील न्यांसही सद्गुण शिकवील. असेच राजपुत्रही सर्व- गुण संपन्न असावे, ह्मणने जसा राजा तशा प्रजा होतात. दयावंत व नीतिमंत जे राजे आणि ज्या प्रजा आहेत त्यांस सर्वदा आनंद मिळतो, व कोण- त्या ही गोष्टीचे संकट पडत नाही मग असें होतें की त्या राजाचे प्रजेचा कित्ता इतर राज्याच्या प्र. जेनें घ्यावा. ह्यास्तव तूं आतां माझी शिक्षा ऐकून सर्वांभूती दया करीत जा, आणि पुढे आपले पुत्रांस ही असेंच शिकीव, येणेकरून मला आणि तुला- ही फार आनंद होईल. भागीरथी. भागी०- ( आपले बाहुलीशी बोलते.) कांगे, तूं म. जकडे पाहत नाहींस १ आणि आपली मान कां उ. चलीत नाहीस १ मी चांगली थोपडून तुला निज- विते, तरी आपण इकडे तिकडेच डोके हालविते. आज तुला झाले तरी काय ९ जा बाई, मला ना. ही असें आवडणार. आतां तूं मला रागें भरवितेस, तर खबरदार, मघां जशी आई कुत्र्यास मारतांना पाहून रागें भरली तशी मीही तुजवर रागें भरेन, आई- (हे शेवटचे शब्द ऐकून आंत येऊन बोलते.) भागीरथी. २७३ काय झालें : माझे बयेला कोणी रागें भरविलें । तूं अशी कां खिन्न झालीस १ काय, ही बाहुली तुझे ऐकत नाहीं भागी०- मी हिला रोज शिकविते की, बाई, आपण आपले हातपाय आवरून राहावें, तर ते तिच्या कांहींच गांवी नाही, काय करावे आई- अशी चांगली बुद्धि तूं तिला शिकवीत अस- तां तिचे गांवींच नाही तर तुझें शिकविणे व्यर्थ झाले खरे, ह्मणून तुला खेद वाटला ९ असो, पण तूं आतां कायशी रागाची गोष्ट बोललीस असें वाटते. भागी०- नाही, नाहीं, आई, मी हिला अंमळ उ- गीच जाचीत होते इतकेंच. त्वां माझें सारे बोलणे ऐकले वाटते. आई- ते म्यां कांहीं ऐकिलें नाही, पण तूं तिला काय ह्मणत होतीस ते सांग, एवढीशी लहान गो- ष्ट मला सांगितल्यावांचून तूं गुप्त ठेवणार नाहीस, अशी माझी खातरी आहे. भागी०- खरेंच आहे. लहान मुलांनी कोणतीही गो- ष्ट आईस सांगितल्या वांचून चोरून ठेवू नये, हे मला ठाऊक आहे. आई- बेटा, खरेंच बोललीस, सांग तर आतां, तूं बाहुलीशी काय काय बोललीस, ते सर्व सांग मला ऐकू दे. २७४ बाळमित्र. भागी०- सांगते, ऐक. मघां मी हिला अंमळ डोके नीट ठेवावयास सांगितलें तें हिने माझें ऐकिलें नाहीं, ह्मणून हिला मी झटले की, जर नऐकशी- ल तर जशी मला कुत्र्यास मारतांना पाहून आई रागें भरली तशी मीही तुजवर रागें भरेन, इतकेंच मात्र हटलें. आई-एकून तुला वाटले की, मी तुजवर रागें भरलें। भागी०- तसे नव्हे, जेव्हां मी तुझे तोंडाकडेस पाहि. लें तेव्हां तुझ्या मुखश्रीवरून मला वाटले की तु. ला राग आला. आई- मला काही राग आला नाहीं, बरें: तूं एखा- दी कुत्र्यास निर्दयपणाने मारावयास जाशील आ. णि तो तुला चावेल, ह्मणून मला भय वाटले. ह्या मुळे मी तुला बोलले, ही शिकवणीची गोष्ट तुला सांगितली ह्मणून काय राग आला असें झालें! आणि तूं माझें सांगणे ऐकत नाहीस असें मला वाटले, हणून जे मला दुःव झालें तेणेकरून मा. झ्या डोळ्यांवाटे पाणी येऊ लागले, ते पाहून तुला वाटले की आईस राग आला; पण तसे कसे होईल . भागी०- पण, आई मी आतां बाहुलीशी बोलत हो- तें तें ऐकून तूं रागे भरलीस ना? आई- बाहुलीची गोष्ट असूंदे, ते काय, पण तूं आ- रशांत पाहून नटत मुरडत होतीस न्याविषयी कां. २७५ भागीरथी. ही तुला सांगावयाचे आहे. भागी०- आहा ! ते तर मला फार चांगले आवडते, आणि ते मला गोपाळाच्या मुलीने शिकविले आहे. आई- गोपाळाचे मुलीपेक्षा मला दोन कांकणे अधि. क कळते. तिचें माझें सांगणे एक सारखें पडणार नाहीं खरेंच. भागी.- कालरात्री मी हिला घेऊन आरशांत पाहू- न नटू लागले तेव्हां मला असे वाटले की मी फा. रच चांगली दिसते. आई- काय, तुला असे वाटले की साधेपणानें अ. • सण्यापेक्षां नटणे मुरडणे फार चांगले आहे १ पण ह्याचा परिणाम काय होईल हे तुला माहीत नाही मला, बाई, वाटने की साधेपणाने असावे हे चांगले. भागी०- पुढे ह्याचा परिणाम काय होईल बरें १ . आई- परिणाम हाच की अशी तुला रोज रोज सं- वय लागून हेच करावे असे वाटत जाईल. मग लोक नांवें ठेवितील, आणि ज्या कुलीन स्त्रिया आहेत त्या तुझी संगत धरणार नाहीत. भागी०- काय आई १ तूं ह्मणतेस असे होईलना १ ही गोष्ट त्वां मला आतांच सांगितली ह्मणून बरे झालें, नाही तर मला तोच चटका लागला असता. आई- माझे मनांत तं भोळी आहेस, मणन मी तुला सांगितले; तूं पुनः जर असे ढंग करशील तर म. ग कधीच मी तुझें तोंड पाहणार नाही. ह्यावरून. २७६ बाळमित्र. च पहा की भलत्याचे ऐकून किंवा पाहून केल्या. में केवढा अनर्थ होतो तो! आपणाला चांगले अ. सावे असे जर तुझ्या मनांत आहे तर मला वि. चारीत जा. भागी०- आई, मी तुला वचन देते की आजपासून तुझ्या आज्ञेशिवाय काही करणार नाहीं; तूं सां- गशील ते माझ्या बऱ्याचेच सांगशील, हे मला प. के समजते. तूं एखादे वेळेस लहानशा अपराधा- करितां सर्व मंडळी देखतां माझा कान गचितेस, तसें जर ह्यागोष्टी करितां सगळ्यां देखत मला फ. जीत करितीस तर मी लाजेने मरून गेले असते. आई- माझे बोलणे तुझ्या मनांत पक्के ठसावें ह्मणून मी चौघांत तुला बोलतें, पण आतां एक दुसरा उपाय आहे तो असा की, जेव्हां चौघां देखत कां. ही बोलावयाचे आहे तेव्हा मी तुला खूण करीत जाईन त्याप्रमाणे तूं वागत जा; कदाचित् ती खूण तुझ्या लक्षांत नआली तर मला वेगळ्या वाटेनें विचारीत जा, झणजे मी तुला उमजून सांगेन. भागी०- आई, त्वां फार चांगले शिकविलें; ही यु- क्ति खाशी आहे. याप्रमाणे मी वागले तर माझें कल्याणच होईल. त्या दिवसापासून कोणतेही बरे वाईट करणें तें भागीरथी आपले आईस विचारून करीत गेली. थोड- क्याच दिवसांत आईच्या झाडून साऱ्या खुणाखाणा