सीताराम २२१ तारामास त्या दुःखाची आठवण होई, आणि त्याचे मनांत असें वागत असे की, जे मला दुःख प्राप्त झालें होते त्याचा परिहार मी उत्तम रीतीने वागलों ह्मणून झाला; तर, असेंच सुरीतीनें निरंतर वर्तावे, ही बुद्धि त्याला त्या दु:खानेच शिकविली. लहान गोपाळ. कांही संस्कृत शब्द पाठ करून संवत्सर प्रतिपदेचे दिवशी गोपाळा खोलीतून बाहेर आला, आणि आप- ले आंगी मोठी प्रौढता आणून बापापुढे बोलूं लागला. अहो दादा, जसे लोक एकमेकांशी संस्कृत भाषण बोलतात तसा मी तुह्मांशी बोलतों; पहा, आरोग्य, सौख्य. इतके बोलून अटकला, पुढे काय बोलावे त्याची त्यास स्मात होईना; तेव्हां तो इकडे तिकडे पाहून आं- गरख्याचे पेशकळीस पीळ घालूं लागला, परंतु त्याचा तो पीळ व्यर्थ झाला. त्याला संस्कृत शब्द पुढे आठ. वतना ह्मणून तो खिन्न होऊन अंमळ सा रडकुंडी झा- ला; त्याची ती अवस्था पाहून बापास मोह उत्पन्न झा- ला, आणि तो त्याशी बोलू लागला. शाबास बेय, बरेंच मजेचे संस्कृत भाषण बोलला. स, ही कल्पना तुझीच असेल असे वाटते. गोपा.- नाहीं नाहीं, दादा, तुझी मला शाबासकी २२२ बाळमित्र. दिली, बरें मी कसे खासे उंच उंच शब्द बोलि. लों ! हे मला माझे भावाने लिहून दिले आहेत, हे तुझी पहा मी आणखी एक वेळ वाचतों; आणि आईपाशी भाषण कसे बोलावे तेही मला येते. बाप- नको नको, गोपाळा, ते बोलून दाखवावयाचे कांही कारण नाहीं; जरी त्वां कांहीं न झटलें त. री तुझी आणि तुझ्या भावाची परस्पर प्रीति पा- हून मी व तुझी आई उभयतां आमी संतोषी झालों. गोपा०- मी खरोखरी सांगतो, ते शब्द पाहून पाहून जोडावयास माझे भावाला पंधरा दिवस लागले, आणि मला शिकावयाला तर काय फारच दिवस लागले. पण ते मी विसरून गेलों, बोलावयाचे वेळेस आठवत नाहीत. आणि कालरात्री म्यां बागांत तुमचे पागोट्या पढ़ें येवढी चुक न येतां चांगले मटले होते की हो ! बाप- तेव्हां तर मी डाळिंबीचे झाडाखाली बसलों हो. तों; आतां तुला संतोष व्हावा ह्मणून सांगतो, तें _म्यां सर्व ऐकिलें. गोपा०-(आनंद पावून. ) खरे काय, दादा ९ तर मला आतां भारी संतोष झाला; पण दादा, म्यां चांगले झटले ना बाप० वाव्हा ! चांगले शुद्ध मटले. गोपा.- पण त्यांतला अर्थ फार चांगला होताना ? लहान गोपाळ २२३ बाप- होय, पण तें तर तुझ्या भावाने योजून योजून काढले होते; तसे तूं होऊन जर आपले तोंडाने बोलतास तर मला आनंद होता. गोपा.- दादा, पण एवढी मोठी गोष्ट मी हलक्या शब्दांनी बोलतों तर मग वाईट दिसते, नव्हे १ बाप- तूं उगीच निरुपयोगी शब्द बोललास त्यापेक्षा यंदां अमुक पदार्थ भोगावयाची माझी इच्छा आहे हा विचार का नाही केला ९ मा गोपा- ते तर काहींच नव्हे. तुमचे मनांत असें आहे की पोरांबाळांनी खुशाल असावें, आणि आपणास व मित्रांस आनंद असावा. बाप- बरे तर, आपल्या तीर्थरूपास हे मुख असावें हे तूं इच्छितोस की नाहीं ९ : गोपा०- हे तर माझ्या मनापासून आहे. बाप- बरे, तूं आपल्या भावाच्या साहाय्यावांचून आपल्याआपणच कां बोलला नाहीस ? गोपा.- मी कसे बोलूं १ मी काही मोठग शाहाणा नव्हे, असे मला वाटले; आतां तुझी सांगितले तर ज्याशी ह्मणाल त्याशी बोलेन. बाप- अरे, पण सर्व लोकांस एक सारखेच बोलूनये. लोकांची स्थितिरीती व उदमिधंदा पाहून त्यासार. खें बोलत जावें. जो कोणी मुखी आहे त्याला असें ह्मणावें की, अक्षय मुखीच असा, जो कार- भारी असेल त्यास असें ह्मणावें की, तुमचा कार. २२४ बाळमित्र. भार असाच ईश्वर निरंतर चालवो, आणि तुहां- कडून हाताखालचे जे लोक आहेत त्यांचे कल्याण होवो; जे मातारे आहेत त्यांशी अशारीतीने बो- लावें की, तुह्मी आणखी फार दिवस वांचा, आणि तो पावेतों तुमचे हातपाय धडसे खडसे राहोत; आणि ईश्वरापुढे आपले अपराध कबूल करून न्याचे चिंतनानें भवसमुद्र उतरून जा. गोपा.- वाव्हा दादा, तुही मला फार चांगले शिकवि- लें, आतां मी सर्वांपुढे असेंच बोलेन; पण, दादा, गुढीच्या पाडव्याचे दिवशीच लोकांशी असे भाषण कां करावें, बरें? बाप-- बाबा,संवत्सर प्रतिपदाही काही एक कालमा- नाचा अवधि आहे. प्रत्येक वर्ष त्या कालमाना- च्या एक एक पायरीसारखे आहे; त्यांत आपण वांचणार आहों, आणि एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जात आहों; ह्याकरितां आपले इष्टमित्र असतील त्यांनी येऊन एकमेकांस भेटावे आणि ह्या वर्षारंभापासून पुढल्या वर्षारंभापर्यंत काळ आ. नंदाने जावा ह्मणून परस्परें कल्याणप्रद मंगळरूप भाषण करावे. हे बोलणे तुझ्या मनांत भरलेंना पण गोपा.- होय, दादा, हे मी समजलों. बाप- तुला मी दुसऱ्या दृष्टांता वरून ध्यानांत याव- यासारखें सांगतो. किती एक दिवसांमागे आपण लहान गोपाळ२२५ सिंहगड किल्ल्यावर गेलो होतो, तेथून पुणे शहर दृष्टीस पडत होतें तें तुला आठवतें ९ आणि येथून पुणे शहर लांब आहे हे मनांत न आणितां ति- कडेस चला ह्मणून त्वां भारी छंद घेतला होता, ठाऊक आहे ? गोपा०- होय, दादा, खरी गोष्ट; पण मी ते दिवशी थकल्यावांचून तेथवर पायी चालत गेलो नाही बरें ? बाप- तें खरेंच; ते दिवशी तूं बराच चाललास; पण आठवण कर की कोसा कोसावर खुणांसाठी जे चिरे पुरलेले होते त्यात्या ठिकाणी म्यां तुला वि. सांव्यासाठी बसविले होते. गोपा०- खरेंच, दादा, मला असे वाटते की ज्यांनी ते दगड रोविले त्यांनी ती कल्पना फार चांगली काढली, त्यावरून आपण किती कोस आलों, व कितीकोस पुढे लांब जावयाचे राहिले हे सम- जतें. बाप- तर ह्याप्रमाणेच काळमानाची गणना आहे, तं आपल्या तोंडानेच बोललास की त्या रोवलेल्या दगडांवरून किती आलों व पुढे किती जावयाचें आहे हे समजतें; तर ह्याचेही तसेंच आहे; आज पावेतों आयुष्याचे कालमान किती झाले व पुढे किती राहिले हे समजते; तें निहें मान एकसारखेच आ- हे, त्यावाटेंत जे काय झाले ते सांग ह्मणजे त्या२२६ बाळमित्र. वरून आणखी एक तुला दृष्टांत देतो. गोपा... दादा ते मला सारे अझून आठवते. पहि- ल्याने माझा नवा दम होता ह्मणून मी धावू ला. गलों, तो मला वारंवार ठेचा लागू लागल्या; ते. व्हां तुही सांगितले की, अझून रस्ता फार लांब आहे ,ह्याकरितां हळू चाल. मग तुमच्या झटल्या- प्रमाणे हळ चालू लागलों, तेणेकरून माझेच हित झाले. मला वाटेने जे नसमजलें तें तुमी समजावू- न सांगितले, आणि जेव्हां विसांवा घ्यावया जो. गी चांगली जागा आढळे तेव्हां आपण त्याठिका- णी बसूं; तुही पोथींतल्या मोठ मोठ्या कथा मला सांगितल्या, आणि वाटेने चालता चालतां नानाप्र- कारच्या गोष्टी सांगून मला हांसविले; त्यामुळे म- ला वाटेंत कांहीं अवघड वाटले नाही. मग आपण तेथे पोहोचल्यावर पक्वान्नाचे खासें मजेचे जेवण जेवलो. बाप- त्वां बहुतेक सर्व सांगितले पण त्यांतील एक दोन गोष्टी तशाच ठेविल्या; त्यांचा मला फार संतोष झाला, त्या ह्याच की एक आंधळा खाड्यांत पड. ला होता त्यास त्वां हातांत धरून वाटेस लावलें आणि एके गरीब मातारीचे गांठोडे बैलावरून खाली पडले होते ते त्वां धांवत जाऊन तिचे ति. ला नेऊन दिले, आणि भिकाऱ्यांस त्वां कांहीं पैसेही दिले. लहान गोपाळ. २२७ गोपा.- दादा, तें मी काही विसरलों नाही; पण आपली बढाई आपण आपल्या तोंडाने बोलूंनये, असें तुह्मींच मला शिकविले होते, ह्मणून बोललों नाही. बाप- तुजमध्ये इतका समज आहे, हे पाहून मला फार आनंद झाला. आता मी सांगतो तें तें चित्तदे ऊन ऐक, पुण्यास जाण्याचे कूच आणि हे कूच सार- खेंच आहे; तूं तेथून निघतेसमयी मी थकेन ह्याचा विचार नकारतां धूम पळत सुटलास, आणि ठेचा खाऊ लागलास; त्यावेळेस मी जवळ होतो म. णून बरे झाले. तसें ह्या आयुष्यमार्गात तारुण्या- चे दमाने अविचारेकरून जो चालूं लागतो त्याला सुरीतीने वागवावयास जर कोणी सन्मित्र मिळा- ला तर तो उत्तम चाल व चांगल्या गोष्टी शिकवी- ल, तेणेकरून जसे त्या वाटेचे श्रम तुला वाटले नाहीत तसे ह्या संसार मार्गाचे क्लेश होणार नाहीत. वाटेने गरबि लोकांवर उपकार करून पुण्यास पो- होंचल्यावर जसे आपणांस मिष्टान्न भोजन मिळाले तसें ह्या नरदेहांत येऊन पुण्यकर्म केल्याने येथू. न कच करून ईश्वरापाशी गेल्यावर सुख प्राप्त होते. गोपा.- होहो, दादा, दृष्टांत तर खासा मिळाला; आ. तां मला दिसते की यंदां फार सुख प्राप्त होईल. बाप- आतां तुला आणखी एक त्यांतीलच दृष्टांत सांबाळमित्र. गतों, ऐक. रस्त्याने चालता चालतां आपण मागे पाहूं त्याचे तुला स्मरण आहे ? केव्हां केव्हां आ- पण उंच जागेवर उभे राहून मागून किती आलों हे पहात असूं ह्यामुळे सर्व आपल्या लक्ष्यांत येई. गोपा.- होय, मी इतका लांब चालत आलों हे पा. हून मला आनंद होई. बाप- आतां तुझी जी वर्षे मागे लोटली त्यांकडे पा. हिल्यावर तसा संतोष वाटणार नाही की काय ? तूं ह्या जगांत नग्न उपजलास तेव्हां तुझे आईने तु- ला स्तनपान करवून जिवविलें, आणि आतां तुझा सांभाळ व विद्याभ्यास मी करवितों आहे, हा आ- मचा उपकार त्वां कोणत्या रीतीने फेडावा ते ऐक; तूं उत्तम रीतीने वागन नांवा लौकिकास चढ ह्मणजे झाले, हीच आमची इच्छा आहे; येणेकरून तुझेंच हित होईल ज्यांत तझेंच कल्याण अशारीतीने वागवि- णार जे आईबाप त्यांचे पोटीं तुला ईश्वराने जन्मास घातले ह्यासाठी त्यांचेठायीं लक्ष्य ठेवून त्यांची व गुरुची सर्वदा मर्यादा ठेवीत जावें; बहीण भाऊ यांची निरंतर ममता करीत असावें, आणि जे आपले सेवक- जन असतील त्यांचे कधी मन दुखवू नये, व ध. न्याशी व वडिलांशी उद्दामपणे वागं नये. फारका- य सांगू ९ थोडक्यात सांगतों; जे तुला आमी नि. त्यनित्य - उत्तमाचरण शिकवीत आलों तें मनांत ( ठेवून त्याप्रमाणे वागत जा, झणजे त्यांत सर्व आहे.