बालमित्र भाग २/सीताराम
सीताराम. २१५ जडली. उपकाराने इतकी ममता वाढेल हे प्रथम त्या गवळणीचे मनांत आले नव्हते. सीताराम. सीताराम ह्मणून एक पांचां वर्षांचा मुलगा होता; तो आई बापांचा एकुलताएक होता. त्याची मातोश्री मरण पावली ह्मणून तो मुलगा आईची अतिशयित खंती करूंलागला, आणि रात्रंदिवस त्याने असा छंद घेतला की, मला आईजवळ न्या. हे दुःख पाहून त्या. चे बापाने फारच हयबत घेतली, तेव्हां आतेने त्या मुलास आपले घरी नेलें; तथापि ती दिवसांतून एकदो. नवेळ त्या मुलास बापाकडे घेऊन जात असे; असे होता होतां आईस मरूल वर्ष लोटल्यावर सीताराम अंमळसा आतेचे नादी लागून सुखाने राहूं लागला होता. बापाचे मनांत वारंवार हेच येई की. बायको मेली, मी झातारा झालों, एक मूल तोही झुरणीस लागला, आतां पुढे काय करावे ह्या गोष्टीची रात्रांदिवस त्या- स चिंता लागली, ह्यामुळे त्याचे दिवसें दिवस अन्नपा- णी तुटत चालले. तेव्हां लोकही कल्पना करीत की, हा हाय हाय घेऊन एखादे दिवशी मरून जाईल, म. ग पोरास आपंगावयास कोणी नाही असे होईल... २१६ बाळमित्र. तो जेव्हां फार दुखण्यास पडला तेव्हां पंधरा दिव- स पर्यंत आतेनें सीतारामास नित्याप्रमाणे बापाचे भे- टस नेलें नाहीं, सीताराम प्रतिदिवशी आपल्या आते. स ह्मणे की, मला बाबाकडे ने; तेव्हां ती त्या बाळास कांहीं तरी निमित्त सांगून चाळवा चाळव करी. चा. ळविण्याचे कारण हेच की, त्याचा बाप अगदी मर- णोन्मुख झाला होता, आणि त्यानेच सांगितले होते की, मुलास आतां माझे भेटीस आणं नको, कांकी तो माझी अशी अवस्था पाहून प्राणच टाकील. ह्याकरितां आतेने तिकडे नेला नाही. असें करितां करितां दस- याचा दिवस आला तों अदले दिवशी रात्री तो मृत्यु पावला. दुसरे दिवशी सीताराम नित्याप्रमाणे पहांटेस उठून आतेस ह्मणाला, आज दसऱ्याचा दिवस आहे, ह्याक- रितां आज तरी मला बाबाकडे घेऊन चल; न नेशी. ल तर मी अन्न घेणार नाही, असा त्या मुलानें बा. पाच्या भेटीचा फारच छंद घेतला; शेवटी आतेने त्या. स तिकडे न्यावयाचे कबूल केलें, परंतु ती इकडे ति- कडे स्पर्श करूं नदेतां त्यास स्नान घालावयास प्रवर्त. ली, हे पाहून तो बाळ बोलला, आत्याबाई, तूं मला इकडे तिकडे शिवू देत नाहींस, आणि आंघोळही घा- लितेस, तर आतां कोण मेलें बरें ? ह्यास समजले अ. सतां हा एकच आकांत करील ह्या भयाने ती काही न बोलतां उगीच स्तब्ध राहिली. तेव्हां सीताराम ह्मणसीताराम २१७ तो, जर तूं सांगत नाहीस तर मी आपले बाबास वि. चारीन. हे ऐकतांच तिच्या नेत्रांतून खळखळां अश्रु. धारा वाहूं लागल्या, आणि मोठ्याने हंबरडा फोडून मणाली, बाबा, तोचरे मेला. त्याकाळी सीताराम मो. ठा आक्रोश करून ह्मणाला, अरे देवा, माझा बाप क- सा मेला १ माझी आई मेली आणि बापही मेला आतां मी कसे करूं ९ असें ह्मणून जो दुःखाचा हुंदका आला तो उरांत दाटून तेणेकरून तो बाळ अचेतन होऊन पडला. त्यासमयी आतेस त्या मुलाला देहावर आणि- तो फार कठीण पडले. नंतर तिने त्याचे तोंडांत तोंड घालून झटले, अरे सीतारामा, हे तुझे आईबाप आले आहेत ? सीता- ( गडबडून उठून ) माझे आईबाप १ कोठे आहेत. आत- ते देवाजवळ गेले आहेत, आणि तूं जर चांग- ला वागलास तर देवाजवळ प्रार्थना करून देवाक- डून तुजवर कृपा करविणार आहेत; देवही तुझा सांभाळ खचीत करील, कारण की, मरते समयीं बापाने तुला देवाचे स्वाधीन केले आहे. सीता०- काल मी मनांत झटले होते की, उद्या मी बाबाबरोबर शिलंगण खेळावयास जाईन, आणि आतां तूं असें सांगतेस. अझून त्यास पुरले नसेल, तर त्याकडे मला घेऊन चल; एकदा मला त्यास बाळमित्र. पाहूं दे. मला दुःख होईल ह्मणून त्याने बोलावि- लें नाही. मजकडूनच त्यास दु:ख अधिक झाले असते, पण आतां मी काही त्यास दु:ख देणार नाही. हा शेवटचा दिवस आहे ह्यासाठी आत्याबा- ई मला बाबाकडे ने. आत- बरे तर, मी नेते, पण तूं रडूं नको, तूं पहा ब- रे, मला केवढे दु:ख आहे तें; मला खावयास तोच घालीत होता, आता त्यावांचून मला कोणी रा. हिले नाही, मी फार गरीब बायको. एकतर तो माझा भाऊ, दुसरे नातें अन्नदाता, तो जेव्हां मा- झा नाहीसा झाला तेव्हां आज मजवर केवढा दुःखाचा डोंगर पडला आहे ? आतां म्यां सर्व भार ईश्वरावर ठेविला आहे तसा तंही ठेव; आणि ज- शी म्यां दगडाची छाती केली आहे तशी तूहा कर. सीता०- होय होय, आतां दगडाची छाती केली पा. हिजे, पण, आत्याबाई, मला माझे बाबाकडे ने; त्याची तिरडी तरी एकवेळ मला पाहूं दे, मग सीताराम आतेचा हात धरून तेथून जो नि. घाला तो बापाचे घराजवळ पोहोंचला, आणि पाहतो तो त्याचे तिरडी भोंवताली शेजारी पाजारी, ओळखी दे- खीची माणसें, उभी आहेत, आणि सर्व लोक दुःखित होऊन त्या पुण्यपुरुषाची प्रशंसा करिताहेत; इतक्या- मध्ये सीताराम पुढे लगबगीने धावून जाऊन बापाचे सीताराम २१९ तोंडांत तोंड घालून त्या प्रेतावर पडला. त्यासमयीं त्या- चे डोळ्यांतून पाण्याचा लवलेश देखील ननिघतां त्या- चे शरीराची कोरड वळून गेली. मग काही अवका. शाने बोलूं लागला. बाबा, तूं मला टाकून चाललास, आतां मी कोणाकडे पाहूं, मला कोण सांभाळील! म- ला केवढे दु:खाचे डोंगर झाले! जेव्हां माझी आई मे- ली तेव्हां तूं तर भारीच रडलास, पण माझें समाधान केले, तूं मेलास आतां माझे समाधान कोण करील १ मग, अहो बाबा, अशी मोठ्याने हाक फोडून निपचेत पडला, आणि दु:खामुळे तोंडाची कोरड वळ- ली, व मुखांतून एक शब्द ननिघतां त्या लेकरानें चि. मणी सारिखा आ वासला; त्यासमयीं त्या मुलास प्रेता- वरून उठवावयाचे त्या आतेस फार कठीण पडले. मग त्याचे आतेने विचार केला की, जर ह्या मु. लास स्मशानांत नेलें तर हा काय करील नकळे ह्या भयाने ती सीतारामास शेजारणीचे घरी ठेवून त्याचे बापास पुरावयास गेली. प्रेत खळीत घालतेसमयी जी. का स्मशानांत एकच आरडा आरड झाली ती सीता- रामानें ऐकतांच तो घरधनिणीची दृष्टि चकवून निघा- ला तो स्मशानभूमीस आला; तेथें सर्वलोक पुरण्याचे गडबडीत होते, इतक्या संधीत त्याने अकस्मात जाऊ- न, मला बाबा बरोबर पुरा, असें ह्मणून धाडकन ख- ळीत उडी टाकिली. त्या बाळाची इतकी ममता पा. हून जवळच्या लोकांची अंतःकरणे कळवळली; आ. २२० बाळमित्र. णि त्यांनी सीतारामास मोठ्या बळाकाराने बाहेर का. ढिले. पुढे तीन दिवसपर्यंत बापाचे स्मरण करून वे. ड्यासारखा इकडे तिकडे धांवे, आणि त्याचे डोळ्यांतून पाण्याचे लोट चालले असत, अशी त्याची अवस्था फार कठीण झाली. अनंतर त्या मुलाचे रडणे तर रा. हिले, परंतु त्यास उदासीनता फारच झाली. ही गोष्ट एक्या रुपावंत सावकारास कळली; तो सीतारामाचे बापास ओळखीत होता, ह्याकरिता तो त्या मुलास पहावयास त्याचे आतेचे घरी आला, आ- णि सीतारामाचे दुःख पाहून फार दुःखित झाला. मग तो सीतारामास आपले घरी नेऊन त्यावर पुत्रासारखी ममता करूं लागला, तेणेकरून त्याचे रडणे व उदासी. नता दिवसें दिवस कमी होत चालली. तेव्हां सीतारा. माचे मनांत इतका निश्चय झाला की हा सावकारच आतां माझा खरा बाप. सावकाराचीही प्रीति त्यामु. लावर त्याचे उत्तमगणेकरून उत्तरोत्तर अधिक होत गेली. पुढे सीताराम वीस वर्षांचा झाल्यावर तो आप. ल्या मानलेल्या बापाचा कारभार बहुत खबरदारीने करूं लागला. पुढे सावकाराने सीतारामास आपली कन्या व कांहीं द्रव्य देऊन वेगळे ठेविले. ह्यापूर्वी सीताराम आपले आतेचा समाचार यथा शक्ति घेत असे. पढें संपन्न झाल्यावर त्याने तिला दारिद्यापासून सोडविले. प्रतिवर्षी विजया दशमीचा दिवस आला ह्मणजे सी