भोंडल्याची गाणी/शिवाजी आमुचा राजा
शिवाजी आमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
विहिरीमधे सात कमळे
एक एक कमळ तोडिलं
भवानी मातेला अर्पण केलं
भवानी माता प्रसन्न झाली
शिवाजी राजाला तलवार दिली
तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला
हिंदूंचाऽऽ राजा तो झाला
हिंदूंनी त्यांचे स्मरण करावे
भोंडल्या दिवशी गाणे म्हणावे
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |