देखावे.
---------------

 महाबळेश्वर क्षेत्र सोडून महाबळेश्वर किंवा मालकमपेठेकडे येऊ. नहर ऊर्फ हवाखाण्याचें महाबळेश्वर हें क्षेत्रापासून सुमारे ३ मैलावर आहे व हल्ली हें हवापाण्यासंबंधीने फार प्रसिद्धीस आलें आहे, असें पूर्वी सांगितलेंच आहे. क्षेत्राच्या बाहेर पडतांच जिकडे पहावें तिकडें डोंगर व झाडे यांशिवाय कांहींच दिसत नाहीं. उजवे हातास कोंकण प्रांतांतील अनेक डोंगरांच्या रांगा नाटकगृहांतील प्रेक्षकांकरितां केलेल्या जागाप्रमाणें दिसूं लागतात. पहिल्यानें खुर्च्यांच्या रांगाप्रमाणें लहान लहान डोंगरांच्या रांगा झाल्यावर पलीकडे प्रतापगड व सॅॅडल बॅक हिलचे डोंगर हे नाटकगृहांतील ग्यालरी सीटप्रमाणणें ऊंच दिसतात. सावित्री नदीचें पाणी प्रतापगडाचें पायथ्याजवळून वाहत चाललेलें दिसतें, त्याचीं वळणें रुप्यासारखी स्वच्छ पांढरी दिसून जणू कांहीं रुपेरी सापच पसरला आहे कीं काय असें वाटतें. उन्हाचेवेळी टेकड्यां 

चा रंग अगदी जांभळा दिसतो तो झाडांच्या गालीच्यास फार शोभाप्रद होतो. या टेकडयांचीं शिखरें एका उंचीची व इतकीं जवळ जवळ दिसतात कीं एका टेकडीवरून दुसरीवर, दुसरीवरून तिसरीवर जाणेस दोन तीन ढांगेचें काम आहे असा भास होतो! आपले समोर पूर्वेकडे पाहिलें म्हणजे एखाद्या बागेतील सुरूचा ताटवा छाटून सारखा केल्याप्रमाणें सर्व झाडी कोणी करून ठेविली आहे कीं काय असें दिसतें. लहान झाडे व मोठे वृक्ष यांतील भेद तर मुळींच नजरेत येत नाहीं. असा हिरवागार गालिच्या जमिनीवरून चढत चढतां आकाशापर्यंत जाऊन अधांतरी कसा राहिला आहे हें समजण्याचें मोठं गूढ पडतें. झाडांचीं निरनिराळ्या प्रकारचीं पानें वरून एक सारखीं दिसतात. तेव्हां त्या कारागिराची असा चित्र विचित्र आकृतीचा गालिच्या काढण्यांत किती कुशलता असेल, असें वाटून मन अगदी थक्क होऊन जातें; पुढें पुढे गेलेवर मागे पाहिलें आणि पुढें पाहिलें तर नुसती दाट झाडी दिसते, यांतून पुढें जाण्यास वाट तरी असेल किंवा नाहीं याचीही शंकाच येते. मधून 

मधून ठिकठिकाणीं पांढरे ठिपके दिसतात त्याठिकाणी आकाश खालीं उतरलें आहे कीं काय असा भास होतो. परंतु हे पांढरे ठिपके म्हणजे येथील पत्र्याचीं घरें आहेत. एकंदरींत महाबळेश्वरास पाहिजे त्या ऋतूंत जा, तें स्थान आपलें सदा रमणीय आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीँ. पण छत्र्यांवर पावसाळा काढणा-या घांठावरील लोकांनीं पावसाळयांत येथें येण्याचें धाडस करूं नये. महाबळेश्वरीं पाहण्यासारखी सारी मौज जो कोणी आक्टोबरच्या प्रारंभापासून जूनच्या मध्यापर्यंत आठ साडे आठ महिने येथें येऊन राहील त्याला दिसेल.

विशेषतः आक्टोबर महिन्यांत सह्याद्रीचा हा बाहू फारच रमणीय दिसतो. या महिन्यांत या पर्वतावरील सारी सपाट जागा हिरव्यागार गवतानें किंवा नानाप्रकारच्या रान फुलांनी आच्छादून गेलेली असते. जिकडें पहावें तिकडें गुलाबांचे झुबके सर्व कुंपणावरून भरून गेलेले दिसतात. प्रत्येक कड्यावरून शुभ्र ऐरावताच्या शुडादंडासारखे स्वच्छोदकाचे प्रवाह खालच्या दऱ्यांंत धडाधड उड्या 

येत असल्यामुळे त्यांच्या आघातापासून उत्पन्न होणारा प्रचंड स्वर कर्णविवरांत एक सारखा भरत असतो व कोठे कोठे गिरणींतील कापसाच्या ढिगासारखी तुषारांची शोभा दिसत असते; उभ्या पावसाळाभर अतोनात पाऊस अंगावर घेऊन शेवाळलेली जांभळीचीं व पिशाचीं झाडें, आपले शरीरांत मावेनासें झालेलें पाणी बाहेर टाकीत आहेत की काय असें वाटतें; व त्या पाण्यांत हात घातला तर तत्क्षणीं ते बधिर होईल, व ते तोंडांत घातले तर अंगावर शहारे येतील इतके पाणी गार असतें. असाच प्रकार पावसाळयांत जो कोणी पुण्याहून मुंबईस गेला असेल त्यास खंडाळयाचे घाटांत आगगाडीतून जात असतांना चांगला दृष्टीस पडतो. तसेंच वेण्या तलावाचे बाजूस जाऊन पाहिलें, तर, तें सरोवर व त्याचे भोंवतालची गर्द झाडी, ही इतकीं रमणीय दिसतात कीं ती पाहिल्यावर पुराणांतरींच्या पंपासरोवराचें स्मरण होतें. नेच्या ( फर्नस ) च्या नुकत्या उगवून आलेल्या झाडांना नुसतीं पानें येऊन वळण आलेलें असतें, तें फारच मौजेचे दिसतें. मैदानावर 

बालांकुर येऊन हरित पटल परिधान करून आनंदांत असलेल्या पृथ्वीवरून चालतांना मऊ गालिच्यावरून चालल्याचे सुख अनुभवतोंसें वाटतें. सर्व नदी किनारे व त्यांवरील दगड आणि टेंकडयांवरील कडे गवतानें आणि शेवाळीनें अगदी हिरवेचार दिसत असतात. नद्याचें पाणी अगर्दी दोन्हीं थडया भरून धांवा घेत असतें.

 मार्चपासून पुढें पावसाळा येईपर्यत फुलें व गवत नाहींशीं होऊन झरे व धबधबे चोहीकडे शुष्क होऊन जातात. हवेमध्यें धुरानें दाटपणा आल्यामुळे देखावे स्पष्ट दिसत नाहीत व उन्हाच्या कडकपणानेंही एकसारखी नजर लागत नाहीं. तथापि या वेळींही टेंकड्या या विलक्षण सुंदर दिसतात. सदैव हिरवे जंगलांतील झाडांस पालवी फुटू लागते आणि रान जिकडें तिकडें टवटवीत दिसतें, में महिन्याच्या अखेरीस प्रातःकाळीं जमिनीवर धुके येऊ लागतें त्यावेळीं जिकडे तिकडे आकाशावांचून कांहीं देिसत नाहीं, रस्त्यावरून चार दोन हातावरील माणसांची चाऊल ऐकूं येत नसली तर मनुष्यें आहेत 

असें सुद्धां वाटत नाहीं. खोऱ्यांंतून धुकें भरून तें जसजसे वर येऊं लागतें तसतसें तें पाहून टेंकडयांच्या शिखरापर्यंत टेकड्यांना रुप्याचा मुलामा दिला आहे कीं काय असें वाटते. धुके जेव्हां दरीतून वर चढूं लागतें तेव्हां कोणी विशाल प्राण्याचें धूड नाचत असून भूतचेष्टा चालल्यासारखे दिसते. ऊन पडून सूर्य वर येऊं लागला ह्मणजे पिंजा-याच्या कापसाप्रमाणें त्या धुडाची असंख्य शकलें होत जाऊन शेवट कांहींच नाहींसे होतें.

 पुढें पावसाळ्यांत घराबाहेर जाण्याची तर सोयच नाहीं, व घरांत राहण्याचीही सोय नसते. चार महिने सूर्यदर्शन तर मुळींच होत नाहीं. पावसाच्या पाण्यानें आकाशाला मोठमोठाले भोंके पडल्यासारखे आकाश गळत असल्यामुळे छत्री किंवा घोंगडयाची खोळ घेऊन बाहेर पडण्याची गोष्ट तर मुळींच मनांतसुद्धां येणार नाहीं. बाहेर गेलेंच तर पानाचीं केलेंलीं विरलीं डोंकीवर घेऊन गेलें पाहिजे. ते घेतलें कीं मानेवर कोणी धोंडा ठेविल्यासारखें झाल्यामुळे व चोहीकडून पावसाचा मार लागत असल्याबालांकुर येऊन हरित पटल परिधान करून आनंदांत असलेल्या पृथ्वीवरून चालतांना मऊ गालिच्यावरून चालल्याचें सुख अनुभवतोंसें वाटतें. सर्व नदी किनारे व त्यांवरील दगड आणि टेंकडयांवरील कडे गवतानें आणि शेवाळीनें अगदीं हिरवेचार दिसत असतात. नद्याचें पाणी अगदीं दोन्हीं थडया भरून धांवा घेत असतें.

 मार्चपासून पुढें पावसाळा येईपर्यंत फुलें व गवत नाहींशीं होऊन झरे व धबधबे चोहोंकडे शुष्क होऊन जातात. हवेमध्यें धुरानें दाट पणा आल्यामुळें देखावे स्पष्ट दिसत नाहींत व उन्हाच्या कडकपणानेंही एकसारखी नजर लागत नाहीं. तथापि या वेळींही टेंकड्या विलक्षण सुंदर दिसतात. सदैव हिरवे जंगलांतील झाडांस पालवी फुटू लागते आणि रान जिकडें तिकडें टवटवीत दिसतें. मे महिन्याच्या अखेरीस प्रातःकाळीं जमिनीवर धुकें येऊं लागतें त्यावेळीं जिकडे तिकडे आकाशावांचून काही दिसत नाही. रस्त्यावरून चार दोन हातावरील माणसांची चाऊल ऐकू येत नसली तर मनुष्ये आहेत असे सुद्धा वाटत नाही. खोऱ्यांतून धुकै भरून ते जसजसे वर येऊ लागते तसतसे ते पाहून टेकडयांच्या शिखरापर्यंत टेकड्यांना रुप्याचा मुलामा दिला आहे की काय असे वाटते. धुके जेव्हां दरीतून वर चढूं लागते तेव्हां कोणी विशाल प्राण्याचे धूड नाचत असून भूतचेष्टा चालल्यासारखे दिसते. ऊन पडून सूर्य वर येऊ लागला ह्मणजे पिंजाऱ्याच्या कापसाप्रमाणे त्या धुडाची असंख्य शकले होत जाऊन शेवटी कांहींच नाहीसे होते.

 पुढे पावसाळ्यांत घराबाहेर जाण्याची सोयच नाही, व घरांत राहण्याचीही सोय नसते. चार महिने सूर्यदर्शन तर मुळीच होत नाही. पावसाच्या पाण्याने आकाशाला मोठमोठाली भोंके पडल्यासारखें आकाश गळत असल्यामुळे छत्री किंवा घोंगडयाची खोळ घेऊन बाहेर पडण्याची गोष्ट तर मुळीच मनांतसुद्धा येणार नाही. बाहेर गेलेच तर पानाची केलेली विरली डोंकीवर घेऊन गेले पाहिजे. ते घेतलें की मानेवर कोणी धोंडा ठेविल्यासारखे झाल्यामुळे व चोहोंकडून पावसाचा मार लागत असल्या. . 

मुळे इकडें तिकडें पाहण्याची फार उपाधी वाटते, आणि योजिलेलें काम करून केव्हां माघारी येऊन निवाऱ्यांंत शेंकीत बसेन असें होतें. दिवसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे १२ तासांची लांबलचक संध्याकाळच झाली आहे असें वाटतें, यामुळे घरांत उजेड कोठून असणार? त्यांतून घराला रेनकोट घातला असल्यामुळे तर घरांत दिवसाची रात्र होते. धुकें तर घरांत शिरण्यास चोहीकडून वाटा धुंडीत असते आणि झरोक्यांतून शिरकाव होईल तर पहात असतें, यामुळे घरांतील धूर बाहेर जाण्यास अनमान करूं लागतो तेव्हां तो माणसें, त्यांचीं चिरगुटे आणि इमारतीची आंतील बाजू यांना आत्मवत् वर्ण आणून सोडतो. घरांत रात्रंदिवस शेकण्याच्या आगटया किंवा शेगड्या सर्व माणसें घेऊन बसलेली असतात. त्याचा धूर, स्वयंपाकाचा धूर आणि धुके मिळून माणसांना अगदीं बेजार करितात.


---------------