महाबळेश्वर
Mr. Dattatraya Kamalakar Dikshit’s book on Mahableshwar, which he has submitted for my perusal and opinion, is interesting and instructive.
It contains a good deal of useful information about this sanitarium and ought to prove a valuable addition to Marathi literature.
I have read with interest Mr. Dixit’s Mahableshwar Varnan. The book no doubt
supplies a long-felt want and is a very useful guide to visitors to Mahableshwar. The information embodied therein is as varied as it is accurate and the descriptions of the charming scenes for which the Sanitarium is noted possess considerable literary merit. The Historical and Mythological accounts of the place and a short description of its flora, have added largely to the usefulness of the book.
Kolhapur,
10th October, 1902.
I read Mr. Dixit’s account of Mahableshwar with some care. The variety and copiousness of the matter unquestionably shows that the author has been at great pains to collect his materials. Visitors to the hills are sure to find the compilation very useful inasmuch as a glance at the Index will enable them readily to decide how to make the most of the limited time and means at their disposal. As, in addition to this, abundant information is given relating to weather, water-supply, house accommodation, provisions, and such other particulars as a visitor to a strange place stands in need of, the book will prove to be an invaluable vade mecum and should therefore be owned by all those who are bent upon enjoying the hills with the least possible inconvenience. The book has in fact supplied a long-felt want.
- Poona
2nd October, 1902.
[ आबाजी विष्णु काथवटे. बी. ए. माजी प्रोफेसर एलफिन्स्टन कालेज, मुंबई ]
पुणे, ता० ९ आक्टोबर सन १९०२ इसवी रा० रा० दत्तात्रय कमलाकर दीक्षित यांचें 'महाबळेश्वर' पुस्तक मीं पाहिलें. हे त्या ठिकाणचे राहणार आहेत; व ह्यांनीं पुस्तक लोकांस उपयोगीं पडेल असें करण्याकरिता श्रम पुष्कळ केले; त्यामुळे पुस्तक सर्व प्रकारें उपयोगीं झालं आहे. ह्यांत राहण्याचीं आणि पाहण्याचीं ठिकाणें, मोठे मोठे रस्ते, आणि पायवाटा, धर्मसंबंधीं आणि ऐतिहासिक महत्वाचीं ठिकाणें, झाडपाले आणि वनस्पती, वगैरेंबद्दल सर्व माहितीचा चांगला संग्रह केला आहे. महाबळेश्वरास जाऊं इच्छिणा-या लोकांस व ज्यांना जाणें अशक्य आहे त्या लोकांसही ह्या पुस्तकापासून सहाय्य आणि आनंद झाल्याखेरीज
राहणार नाही. महाबळेश्वरास जाणारे गृहस्थासही पुष्कळ पुस्तकें पाहिल्याशिवाय व स्वतः डोंगरांतून अवघड अवघड ठिकाणी जाऊन ज्या लोकांशी बोलणे देखील कठीण पडतें अशा लोकांशी सहवास केल्याशिवाय ज्या गोष्टींची आणि झाडपाल्यांची माहिती मिळणे अशक्य आहे ती माहिती ह्या पुस्तकापासून अनायासाने मिळणार आहे.
या पुस्तकाचे सहाय्याने महाबळेश्वर पाहणार आणि त्यावांचून महाबळेश्वर पाहणार ह्याजमध्ये जमीन अस्मानचें अंतर राहणार आहे. ह्याजकरितां हे पुस्तक सर्वांचे आश्रयास पात्र आहे, असें मी मोठ्या संतोषाने म्हणतों.
[नामदार गोपाळ कृष्ण गोखले, बी. ए., फर्ग्युसन कालेजचे प्रोफेसर, लोकल व सुप्रीम लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे मेंबर व पुणे म्युनिसिपालिटीचे प्रेसिडेंट. ]
रा. रा. दत्तो कमलाकर दीक्षित यांनी केलेले “महाबळेश्वरवर्णन." मी वाचून पाहिले. महाबळेश्वरास जाणाऱ्या गृहस्थांस या पुस्तकाचा चांगला उपयोग व्हावा ह्मणून रा० दीक्षित यांनी फार परिश्रम केले आहेत यात शंका नाही. दंतकथा ऐतिहासिक माहिती, पहाण्याची ठिकाणे, राहण्याचे बंगले, तेथे मिळणाऱ्या वनस्पती. वगैरेंबद्दलची माहिती इत्यादि अनेक उपयुक्त व मनोरंजक गोष्टींचा रा दीक्षित
यांनीं या पुस्तकांत समावेश केला आहे. पुस्तक लोकाश्रयास पात्र आहे. तो मिळून रा० दीक्षित यांनी केलेल्या श्रमाचें चीज होईल अशी आशा आहे.
पुणें, ता० १८ आक्टोबर, सन १९०२ इ०
- [ चिंतामण गंगाधर भानू बी. ए. प्रोफेसर आणि लाईफ मेंबर, फर्ग्युसन कालेज, पुणें. ]
सा० न० वि० वि० आपले पुस्तक बरेंच वाचलें, पुस्तक सर्वोपयोगी, व मनोरंजक असें झालें आहे. असल्या माहितीनें भरलेलीं पुस्तकें आपल्या भाषेत फारच थोडीं आहेत. तेव्हां आपलें हें पुस्तक मराठी वाङमयाला भूषण देणारें होणार आहे. आपलें वनस्पतीसंबंधीं पुस्तक केव्हां वाचण्यास मिळेल याची मी वाट पाहत आहे. प्रयत्न फार चांगला आहे. उत्तम सिद्धीस गेला आहे. कळावें, लोभ असावा, हे विनंती.
आपल्या उदात्त आणि परोपकारी अंगस्वभावास अनुसरूनच आमचे सन्मित्र, लोकप्रिय व सज्जन गृहस्थ, रा० रा० हरि नारायण आपटे, कादंबरीकार व करमणूक पत्राचे कर्ते, यांनीं आपला अत्यंत अमोलिक वेळ खर्च करून आमच्या या पुस्तकाची हस्ताक्षरी प्रत साद्यंत तपासण्याची व त्यासंबंधी योग्य आणि उपयुक्त सूचना देण्याची मनःपूर्वक तसदी घेतल्यामुळे मी त्यांचा फार फार ऋणी आहे. अशा लोकोपयोगी सद्गृहस्थांच्या उपकृतिऋणाचे जें मजवर ओझें झालें आहे त्याची जागृति नेहेमीं माझे अंत:करणांत राहील.
न्यायाश्रयकर्ते व सार्वजनिक सभेचे माजी सेक्रेटरी रा० रा० शिवराम हरि ऊर्फ आबासाहेब साठे महाबळेश्वरीं दर साल येऊन सुमारे ३०|३५ वर्षांचे हे पूर्ण अनुभवी असल्यामुळे त्यांच्याकडून वेळों
वेळीं मिळालेल्या माहितीच्या सूचनांबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहें. मुख्य गोष्ट ही आहे कीं, हें पुस्तक करण्याची प्रेरणा माझें मनांत होण्यास त्यांच्या उपदेशाची मजवर मोठी कृपा झाली आहे.
राजेश्री नरहर गोविंद टोळ यांनीं या पुस्तकासंबंधी व छपाईचे कामीं मदत केली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहें.
या संसारांतल्या आनंदांत सृष्टीच्या अतिरम्य, भव्य व उदात्त स्वरूपाचे प्रेक्षण हा एक महानंद आहे. तो महानंद पूर्णपणें जेथें लाभतो अशी स्थळे थोडीं, व त्या थोडयांच्या मालिकेत महाबळेश्वर हें बरेंच वरचें स्थान व्यापील असें आहे. येथे सृष्टीचें उदार रमणीय स्वरूप दिसतें; हवा थंड परंतु कोरडी असल्यामुळे आरोग्य लाभते; पाणी रुचिकर व गुणकारी असल्यामुळे हुशारी देतें. सारांश, सृष्टिदेवीनें आपला वरदहस्त या स्थानावर ठेविला असल्या कारणाने या स्थानीं येणाराच्या मनास आल्हाद, व शरीरास आरोग्य यांचा लाभ होतो.
महाबळेश्वरीं दर्शनीय प्रदेश अनेक, तेव्हां त्यांची माहिती देणारे पुस्तक अवश्य आहे, असें मनांत आणून व प्रवासी मंडळीस भासलेली अवश्यकता त्यांच्या उद्गारांवरून जाणून प्रस्तुत पुस्तक तयार केलें आहे. अनेक पुस्तकांतून मिळालेल्या माहेि
तींत स्वतःच्या माहितीची पुष्कळ भर घालून पुस्तक लिहिलें आहे. माहिती आज तागाईतपर्यंतची देण्याचा यत्न केला आहे. किती विषय आले आहेत तें विषयानुक्रमणिकेवरून व शेवटल्या सूचीपत्रावरून वाचकांचे ध्यानांत येणार आहे. शेवटीं नकाशा जोडला आहे. महाबळेश्वर म्हणजे औषधोपयोगी वनस्पतींचें भांडार होय. तेव्हां ब-याच वनस्पतींची माहिती यांत दिली आहे. शिवाय येथल्या वनस्पतींच्या सविस्तर वर्णनाचें एक पुस्तक तयार करून तें लवकरच प्रसिद्ध करण्याचा विचार आहे. भिषग्वर भाऊ दाजी व नारायण दाजी यांनीं येयील वनस्पतींचा शोध केला त्यावर तसा प्रयत्न कोणीच केल्याचें आढळत नाहीं. प्रस्तुत पुस्तकर्ता महाबळेश्वरचा कायमचा रहेिवासी व त्यास वनस्पतींचा शोध करून गुणावगुण जाणण्याची फार उत्सुकता, यामुळे त्यानें तो व्यासंग करून यांतील वनस्पतींचीही माहिती मिळविली आहे.
पुस्तक करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे त्यांत प्रमाद होण्याचा किंवा माहिती देण्याची राहणेचा संभव असल्यामुळे कदाचित् तसें झालें
असल्यास त्याजबद्दल आमचे सुज्ञ वाचक माफी करतील अशी आशा आहे. या पुस्तकांत घालण्यासारख्या ज्या कांहीं गोष्टी कोणाच्या लक्षांत येतील त्या कळविण्याची कृपा झाल्यास पुढील आवृत्तींत आभारपूर्वक देण्याची तजवीज करूं.
आतां प्रस्तावना अधिक लांबवीत न बसतां वाचकांस महाबळेश्वरीं जाण्याच्या रस्त्यांवरच नेऊन सोडतों.
देखे महाप्रचंड गिरी । विशाळ पर्वतांचिया दरी ।
जळें तुंबिलीं सरितांसरीं । समुद्रतुल्य अगाध ॥ १ ॥
तेथें आम्र निचोल बेल । कवंट कदंब मधु पिंपळ |
सिरस पलाश विशाळ। न्यग्रोधवृक्ष वाढिन्नले ॥ २॥
ताळ हिंताळ शाळ सरळ । मंदार कांचन तमाळ निर्मळ ।
पिचुमंद देवदार धवळ । अर्जुनवृक्ष अपार ॥ ३ ॥
बदरी श्लेष्मातकी आंवळी । शाल्मली करवंदी जांबुळी ।
चारी वल्लातकी गुग्गुळी। शमी वेरुकळी चिचणिका ॥ ४ ॥
ऐसिया वृक्षांचीं अचाट । डांगें लागलीं घनदाट ।
माजी निर्झरोदकाचे पाट । सैरावैरा धांवती || ५ ||
मस्तके उचलोनि दिनकर । छायें रक्षिला अंधकार ।
माजी श्वापदगणांचे भार । सुखावले सुखवस्ती ॥ ६ ॥
हरिण करी सिंह शार्दूळ । चित्ते चितेळ तरस तरळ ।
रिक्ष रोही गवे मांसाळ । अरण्य सारें माजलें ॥ ७ ॥
महाबळेश्वर हें बरेंच पुरातनचें क्षेत्र असून याची महती पूर्वी मुळींच नव्हती असें नाहीं. या क्षेत्राची पौराणिक माहिती वाचकांस पुढें दिलेलीच आहे
हें अत्यंत रमणीय स्यान मृष्टिसैौंदर्याच्या व आरोग्याच्या दृष्टींनीं स्पृहणीय आहे. माथाळ्यावर दिलेल्या कविवर्य मुक्तेश्वराच्या सृष्टिवर्णनात्मक उता-यांत वर्णिल्याप्रमाणे खरोखरच येथें स्थिति आहे. या स्थानीं आजमित्तीस अनेक ठिकाणांहून व प्रांतांतून उन्हाळ्याच्या सुटींत अनेक श्रीमंत लोक येऊन राहतात. त्या ठिकाणीं आज वाचकांस नेऊन सोडण्याचा आमचा विचार आहे. इलाख्यांतील अनेक ठिकाणांहून अनेक रस्त्यांनीं लोक येथें येतात. परंतु मुंबई हें आजकाल पश्चिम हिंदुस्थानाचें केंद्र स्थान होय. त्या स्थानापासूनच आपण निघालों अशी कल्पना करूं. मुंबईपासून वाटारापर्यंत आगगाडीचा रस्ता आहे. मुंबईस सुमारें दुपारी अडीच वाजतां गाडींत बसलें म्हणजे सायंकाळीं पावणे सात वाजतां आपण पुण्यास येतों. तेथून सदर्न मराठा रेल्वेनें सवासात वाजतां निघून वाटारास मध्यरात्रीनंतर थोडया वेळानें पोंचतों. तेथें भाडोत्री तांगे, किंवा बैलगाडया यांची सोय असते. परंतु चांगल्या फैटण गाड्यांची सोय पुण्याच्या मेल कंत्राटदाराकडे आगाऊ लिहूनच करावी लागते. फैटणीत बसून निघालें ह्मणजे उजाडण्याचे
सुमारास वांई गांठली जाते. नंतर पुढें पसरणीचा घाट लागतो त्या घाटांतील निरनिराळ्या वळणांनीं वर चढून चाललो असतांना कृष्णा नदीचें खेोरें व महाबळेश्वरशैलाचे फुटलेले अफाट फरगडे यांची गर्दी उडालेली दिसते. एक दोन ठिकाणी समुद्रपृष्ठापासून (४६०५) फूट उंच असलेला तोरणा किल्लयाच्या व (३९९२)फूट उंच असलेल्या राजगड किल्ल्याच्या शिखरांचा भास होतो. आणि सर्वांत उंच असलेल्या अशा एका कडा तुटलेल्या पाईंंटावरून चोहीकडून जंंगलानें लपेटून गेलेलें महाबळेश्वरचें देऊळ व गांव हीं हळूच आपआपलीं डोकीं वर करताहेतशीं दिसतात. पुढें रस्ता वळल्याबरोबर तीं अदृश्य होऊन पुन्हां तोंडें दाखवीत नाहींत. आणि मग कृष्णेचीं वळणें व त्यांच्या भोवतालची कीरें झाडी यांची कंटाळवाणी लांबण लागते. कांहीं कांहीं ठिकाणीं टेंकडयांच्या घसरत्या बाजूवर धान्य पिकविण्यास जागा काढलेल्या दिसतात. बाकीचा डोंगर काळा खडकाळ दिसत असतो.
ही चढण पार पडल्यावर पांचगणीच्या लहान वसाहतीचा आनंददायक देखावा दृष्टीस पडतो. त्यांत उंच सुरूच्या व बांबूच्या झाडांच्या रांगांमधून
लहानशी टूमदार घरें व बाजार हीं वर उगवून आल्यासारखीं दिसतात. अशा दुतर्फा लागलेल्या जंगली पर्णकुटिकांच्या पलीकडे जाऊन पोहोंचेपर्यत एक मैलभर आपण उंच डोंगरावर आहों असें दिसत नाहीं. परंतु पुढे डावे हातास खोल दऱ्या व पलीकडे यवतेश्वर, सातारचा किल्ला वगैरे उंच स्थळे दृष्टीगोचर होतात.
पांचगणीचे खालील खो-यांतून वाहणा-या प्रवाहाचे पाणी गहू व भाताच्या लहान लहान पट्टयांस पाट बांधून नेलेलें दृष्टीस पडतें. तसेंच भात व नाचणी पावसाळा अखेर कापून काढल्या नंतर त्यांत गहूं करितात, त्याचे शेतांत उभे राहिलेले सड येथे पिके असल्याची साक्ष देत असतात. ठिकठिकाणी चढ उतार लागून जात जात हा रस्ता महाबळेश्वर गिरिशिखरावर जाऊन पोहोचला आहे. या अंगास दाट उगवलेलीं काटेरीं झाडे व रानोमाळ पसरलेले कर्दळीसारखे आरारोटचे वर आलेले कांदे पाहून पावसानें आपली शिकस्त केली असावी असें वाटतें. वेण्या नदीचें खोरें पुढें लागतें त्याच्या बाजूची बागाईत कृत्रिम केली असतांही ती भोंवतालच्या खुरटया जंगलाप्रमाणेच स्वभावसिद्ध
असल्यासारखी दिसते. पुढें वेण्या सरोवर व त्याचे कडेची दाट झाडी हीं पाहून गजेंद्रमोक्षाच्या वेळीं ज्या चंपा सरोवराच्या कांठीं जंगलांतून हत्ती येऊन तो चमत्कार घडला, तसाच या सरोवरांत अरण्य कुंजर येऊन होतो कों काय असें वाटतें.
- पुण्यापासून (रेलवे मार्गानें) वाटार-६८१४ मैल
- वाटारपासून वांई .....................२०
- वांईपासून पांचगणी·..................८
- पांचगणीपासून महाबळेश्वर-.......१२
- अशा त-हेचा या रस्त्यानें प्रवास होतो.
- पुण्याहून शिरवळ ................३०१२
- शिरवळापासून सुरूळ ...........१६१२
- सुरूळपासून वांई ..................७
बैलगाडीनें दोन दिवस व टांग्यांतून १० किंवा बारा तास , या दोन्हीं रस्त्यांनीं प्रवास करण्यास लागतात.
पुण्याहून गाडीरस्त्यानें जाणा-या लोकांनी एक तर कातरज व खंडाळा हें लहानसें दोन, घांट वलांडून सुरूळाहून वांई पहावी, हाही प्रवास वाईट नाहीं. पण कसेंही केलें तरी इकडून जाणा -या पथिकास वांईपाशीं कृष्णा उतरल्याबरोबर लागणारा आठ मैलाचा घांट चढल्यावांचून गत्यंतर नाही. यास पसरणीचा घाट म्हणतात.
कोंकणपट्टीनें मुंबईकडून् मुंबईहून् कार्नाक बंदरांतून सकाळी साडेसहाच्या बोटीन निघून सायंकाळी साडेचार वाजतां बाणकोटास उतरावें; व पुढे लहान होडींत बसून सावित्रीच्या खाडीनें तीन तासांत दासगांवास यावें. बाणकोटाहून दासगांवास येतांना दैवयोगानें चांदणे पडलें असले तर वाटेनें सभोंवार दिसणा-या वनश्रींचें अनिवार कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाहीं. दासगाव बंदराजवळ धर्मशाळा व रहदारी बंगला आहे त्यांत रात्र गुदरावी किंवा आगबोटीनें नागोठण्यास उतरून तेथून दासगावास यावें. दासगांवाहून पहाटें उठून बैलगाडीनें निघून पोलादपुरास १६ मैलाचा पल्ला मारून जरा आराम घ्यावा. येथें बंगल्यांत व कोठेही उन्हाच्या रखरखीनें आलेला शीण परिहार करून संध्याकाळबरोबर आंबेनळी किंवा वाडा गांवचे घांटचढणीस लागावें. पोलादपुरापासून निघाल्यावर ५ मैलावर जुना किणेश्वर रस्ता लागतो. तो सोडून देऊन पुढें झुकावें. ह्मणजे डावीकडे पुनः एक रस्ता फुटतो, तिकडे
वळून प्रतापगडाची शोभा पहात पहात वाडागांववर येऊन वाटल्यास तळ देऊन रहावें. इतके येण्यास पांच तास लागतील. वाडयापासून १० मैल फिटझर्ल्ड घाटाची लांबण संपल्यावर मुंबई पाइंटाजवळ लोक पोहोंचतात, व मग प्रवासाच्या दगदगींतून पार पडतात. इकडून येणा-या लोकांजवळ मुंबई सोडल्यापासून निदान २ | ३ दिवस पुरण्यासारखें फराळाचें सामान शिल्लक पाहिजे. ह्या रस्त्यानें येण्यांत येवढाच फायदा आहे कीं उत्तम त-हेचे देखावे दृष्टीस पडतात. ऐन उन्हाळ्यांत मात्र रस्त्यावर अगदीं धुराळा उधळून जातो. टांगा पाहिजे असल्यास मेल कंत्राटदाराला आगाऊ वर्दी दिली म्हणजे वदींप्रमाणें आगाऊ टांगा मिळतो.
बेळगांव धारवाड कडील वाचकांस प्रवास करून जावली पेटयांतील मेढें खो-यानें केळघर नांवाचा घाट चढून या रम्य शैलावर येणें सोईचें वाटेल.
साता-याहून मेढें १४ मैल आहे. येथें एक रहदारी बंगला असून सर्व सोयी आहेत. मेढयाहून निघून एकदम एकोणीस मैलांची मजल करून कित्येक लोक महाबळेश्वरी येतात. केळघर आणि मेढ्यास घोड्याचे दोन टप्पे ठेविले म्हणजे टांग्याने
येथे येण्यास सात तास पुरतात. या रस्त्यानें येण्याजाण्यास सातारा व महाबळेश्वर येथे टांगे व फैटणी मिळतात.
सदर्नमराठा रेलवे कंपनीचें एक आफिस महाबळेश्वरास आक्टोबरपासून जून अखेर पावेतों ठेविलेलें असतें. त्यामुळे रेलवेने येणारा जाणारा माल गुङ्स किंवा पार्सलनें येथून बाहेर व बाहेरून येथें खुशाल आणितात व नेतात. त्यास गुड्सचें दर मणास १० आणे व पार्सलचें दर पौन्डास एक आणाप्रमाणे हंशील पडते.
जावली, वांई व महाड या तीन ठिकाणांहून महाबळेश्वरीं येऊन दाखल होणा-या तिन्हीही सडका आपल्या परी फार उत्तम आहेत; पण त्यांतल्या त्यांत महाडचा रस्ता विशेष रमणीय आहे, येवढे येथें म्हटल्यावांचून राहवत नाहीं. कारण, त्या रस्त्यानें वनश्री फारच मनोहर आहे.
प्रस्तावना | १--३ |
उपोद्घात. | १--८ |
१ | महाबळेश्वर( सामान्य वर्णन ). | १--३ |
२ | मूळ महाबळेश्वर श्रीशंकराचें | |
स्थान व पंचगंगा. | ३--१६ | |
३ | ब्रह्मारण्य | १६--२१ |
४ | महाबळेश्वर गांव | २१--३३ |
५ | देखावे | ३४--४० |
६ | मालकमपेठ उर्फ नहर. | ४१--४७ |
७ | भूगर्भपदार्थ. | ४७--५१ |
८ | हवा | ५१--६९ |
हवेचे गुण | ५९ | |
९ | पाणी. | ६९--७६ |
१० | झाडी | ७७--१०८ |
नेचे व आर्चिड | ८४ | |
परदेशांतील झाडे. | ८७ |
वनस्पति. | ८९ | |
११ | शेतांतील पिकें. | १०९--१३६ |
चिनी बंदिवान व | ||
बागाईत. | ११८ | |
मध. | १२३ | |
जंगलखाते | १३२ | |
कोयनेलची झाडे. | १३६ | |
१२ | जनावरे. | १३७--१४८ |
पक्षी | १४१ | |
सर्प. | १४२ | |
कृत्रिम व्यवस्था | ||
१३ | साहेबलोकांची व्यवस्था. | १४९--१५४ |
१४ | महाबळेश्वरी येणारे लोकांच्या | |
वेळाचा व्यय. | १५५--२११ | |
घोड्यावरून अगर गाडीतून | ||
फिरावयास जाण्याची ठि- | ||
काणे व पादचारी लोकांना | ||
रपेटीस किंवा व्यायाम कर- | ||
ण्याची ठिकाणे:-- | १६० | |
बाबिंगटन पाइंट. | १६४ | |
लाडवुइक पाइंट. | १६५ |
एलस्फिन्स्टन पाइंट | १७१ | |
आर्थर सीट. | १७७ | |
मुंबई पाइंट. | १८८ | |
कारनॉक व फाक- | ||
लंड पाइंट. | १९१ | |
सासून पाइंट. | १९३ | |
क्यानॉट शिखर. | १९४ | |
गव्हरमेंट हौस किंवा | ||
प्रास्पेक्ट पाइंट. | १९५ | |
केट्स पाइंट. | १९७ | |
बेकवुइथ साहेबाचे | ||
थडगे. | १९९ | |
दि लेडी नार्थकोट | ||
राइड व दि | ||
नार्थकोट पाइंट | २०२ | |
मालकम टेकडी. | २०५ | |
चिनी धबधबा. | २०६ | |
धोबी धबधबा. | २०६ | |
वेण्णा धबधबा. | २०८ | |
१५ | लोकसंख्या. | २१२-२२८ |
चरितार्थ. | २१५ |
धावड, कोळी वगैरेंच्या | ||
चालीरीती. २२३ | ||
१६ | बाजार. | २२८--२३५ |
१७ | हॉटेलें. | २३६--२४३ |
१८ | बंगले. | २४४--२६३ |
१९ | पाहण्यासारखीं प्रसिद्ध ठिकाणें. | २६४-२९८ |
प्रतापगड. | २६५ | |
मकरंदगड. | २८४ | |
कमलगड. | २८७ | |
चोराची घळ. | २९० | |
दुतोंडी घळ. | २९२ | |
पारूत | २९२ | |
चंद्रगड. | २९२ | |
पांडवगड | २९२ | |
राजपुरी. | २९४ | |
गायदरा किवा गु- | ||
लेरा घळ. | २९६ | |
२० | म्युनिसिपालिटी. | २९९--३१० |
कान्सरव्हन्सी टॅक्स. | ३०५ | |
लेडी रे स्कूल. | ३०९ | |
हास्पिटल | ३१० |
२१ | चावडी व फौजदारी कचेरी. | ३१२--३१७ |
२२ | नेटिव जनरल लायब्ररी. | ३१८--३२४ |
रे गार्डन. | ३२३ | |
२३ | पोष्ट ( आफिस ) व तार | |
( अIफिस ) | ३२५-३३२ | |
तार आफिस. | ३२८ | |
घरें पाहणारे एजंट. | ३२९ | |
लष्कर उतरण्याचीं | ||
ठिकाणें. | ३३१ | |
२४ | स्मशानें. | ३३३-३३७ |
२५ | सार्वजनिक भक्तीचीं ठिकाणें. | ३३८-३४२ |
२६ | पांचगणीं. | ३४३-३५२ |
व्यवस्थT. | ३४७ | |
नरसरी. | ३५० | |
गाडयांचे टप्पे. | ३५२. |