मानूस मानूस मतलबी रे मानसा
मानूस मानूस मतलबी रे मानसा,
तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा,
तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध मतलबासाठीं मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं कुत्रा शेंपूट हालये मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |