युगान्त
युगान्त
इरावती कर्वे
संस्थापक :
रा. ज. देशमुख
डॉ. सुलोचना देशमुख
© जाई निंबकर
प्रकाशक :
देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.,
४७३ सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०.
किंमत :
३००/- रुपये
अक्षर रचना :
एस. एम. इंटरप्रायसेस
श्री. सुरेश माने
गोकुळनगर, कोंढवा रोड, पुणे ४८.
मुद्रक :
रमेश पाटील
श्री जे प्रिंटर्स प्रा. लि., पुणे ३०.
संपादकीय
'युगान्त’ मधील लेखांत सर्वत्र लेखनाच्या दृष्टीने एकरूपता रहावी, यासाठी लेखिकेची सर्वसाधारण प्रवृत्ती लक्षात घेऊन पुढील धोरण अनुसरले आहे :
- 'हा (ही, हे)' या सर्वनामाच्या प्रथमेतर विभक्तींच्या रूपांत 'ह्' हा घटक राखून येणारे अंग स्वीकारले आहे. जसे : 'ह्याला, ह्याने, ह्यांना’ इत्यादी. ('याला, याने, यांना' इत्यादी नाही.)
- प्रयोजक रूपांत 'इ’ आगम केलेला नाही. जसे ‘बसवला, कळवतो. (-वि- नाही.)
- '-आयला, -आयचा' हे अंत असलेली कृदन्ते स्वीकारली आहेत. जसे : 'करायला, करायचा’ (‘करावयाला, करावयाचा' नाही.)
- अवतरणे शुद्ध केली आहेत : 'वासुदेवोऽस्मि' (-ऽहम् २०६.६) 'पुराणः' (प्रमाणम् २२६.१६ ); 'त्वयोपास्यानि' (ग्रहीतव्यानि २७०.६), 'यो मे' (यो मां २७६.१०)
- व्याकरण दृष्टीने जी स्वतंत्र 'पद' आहेत, ती- जेथे जोडून लिहिण्याची रूढी आहे तेथेही- एकमेकांपासून अलग लिहिली आहेत.
पुणे / २०.४.१९७१ कृश्रीअ
टीप :- याखेरीज अन्य काही बदल अर्जुनवाडकरांनी केले होते.
या किरकोळ बदलांची यादी या आवृत्तीमध्ये समाविष्ट केलेली नाही.
निवेदन
एच.डी.चे विद्यार्थी श्री. डिंगरे ह्यांनी बऱ्याच लेखांची नक्कल केली. टीकाकारांनी व लेख प्रसिद्ध झाल्यावर शंका काढणाऱ्यांनी विचाराला चालना दिली, व लेख परत तपासून त्यांतील चुका काढून टाकण्यास मदत केली. घरची मुले जाई, रजनी, गौरी व आनंद ह्यांच्या, इतरांच्या मानाने जरा जादा निर्भीड मतप्रदर्शनामुळे लेख लिहिताना जास्त खबरदारी घेतली गेली. यजमानांनी मदत केली. व्याकरण तपासले, इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग तपासले-टीका मात्र मुळीच केली नाही. ज्या अनेक मित्रांनी हे पुस्तक प्रसिद्धीस आणण्यात मदत केली, त्यांत प्रा. अरविंद मंगरुळकर ह्यांचा आवर्जून उल्लेख करावयास पाहिजे. त्यांनी अनवधानाने राहिलेल्या व इतरही कित्येक चुका दाखवून दिल्या व हस्तलिखित सुधारण्याची मला संधी दिली. देशमुख पतिपत्नींची मदत सर्वच बाजूंनी झाली. लेख तपासणे, टीका करणे, नकला करणे व मी अगदी कावून गेले असले, म्हणजे मला संभाळून घेणे ही सर्वच कामे त्यांच्यावर पडली. ही सर्वांची मदत, चालना व टीका नसती, तर लेख लिहूनच झाले नसते.