वनस्पतिविचार/उपपुष्पपत्रे व मोहोर

प्रकरण २१ वें.
---------------
उपपुष्पपत्रें ( Bracts ) व मोहोर, ( Inflorescence ).
---------------

 उपपुष्पपत्र ( Bract )-=ज्या पानासारख्या भागांतनु फुलांची दांडी उगवते, त्या भागास उपपुष्पपत्र ( Bract ) म्हणतात. ही उपपुष्पपत्रें पुष्कळ फुलात वेगवेगळ्या तऱ्हेची व वेगवेगळ्या रंगाची असतात, कधी ती अगदी साध्या पानासारखी असतात. जसे, विष्णूनीळ. मात्र त्यांचा आकार पानापेक्षा लहान असतो. मक्याचे कणसावरील आवरणे उपपुष्पपत्रे आहेत, केवड्याचे कणसांतील सुवासिक पिवळी लहान आवरणे सुद्धा उपपुष्पपत्रेच होत. असली आवरणे एक झाल्यावर एक येऊन नंतर अंतर्भागी लहान लहान फुले लोंबत्या दांडीवर येतात. केळीमध्ये प्रत्येक फणावर एक एक तांबडी संरक्षक पारी असते. ही पारी केळ्यांतील उपपुष्पपत्र होय. घुंंया,

२१ वे ].   उपपुष्पपत्रे (Bracts) व मोहोर (Inflorescence).   १७७
-----
अळु, सुरण वगैरेमध्ये अशाच प्रकारचे उपपुष्पपत्र फुलाच्या मोहोराभोंवतीं असते. प्रथम उपपुष्पपत्र फुटून त्यांतून फुलांचा गुच्छ बाहेर दिसू लागतो. पिंपळ, वड, अंजीर वगैरेमध्ये लहान आवरणे फळाच्या अग्रावर असतात. पानशेटियामध्ये उपपुष्पपत्रे तांबड़ीं अगर पिवळी असतात. बोगनवेलीमध्यें तीं गुलाबी रंगाची असतात. ही पुष्कळ वेळा फुलें आहेत, असे वाटते, पण एक एक उपपुष्पपत्राच्या आंत एक एक फूल चिकटलेले आढळते. झेंडू, कॉसपॉस वगेरे, फुलांत उपपुष्पपत्रे परस्पर चिकटून त्यास पेल्यासारखा आकार येतो. सूर्यकमळ कुसुम वगैरेमध्ये सुद्धा उपपुष्पपत्राच्या एकावर एक रांगा फुलाच्या बुडी येतात. गाजर, धने, शोपा वगैरेमध्ये उपपुष्पपत्रे सुतासारखी बारीक असतात, अॅॅकाॅॅर्न नांवाच्या फळाचे बुडी उपपुष्पपत्राचा कांहीं भाग पेल्यासारखा फळांवर वाढतो. ओकवृक्षाची फळे ह्याच प्रकारची असतात. गहू, जव, वगैरेमध्ये नावेसारखी उपपुष्पपत्रें आढळतात. गव्हांची ओंबी पाहिली म्हणजे, वर दिसणारी आवरणे सारी उपपुष्पपत्रेच आहेत असे वाटते. प्रत्येक गुच्छामध्ये तीनपासून सहापर्यंत उपपुष्पपत्रे असतात. आंतील पांढऱ्या रंगाच्या उपपुष्पपत्रांत एक एक फूल असते. ज्याप्रमाणे पानाचे पोटांत कळी उमलून फांदी वाढते, अथवा जेथे म्हणून पानाचे अस्तित्व त्या ठिकाणी कळीचेही अस्तित्व असून ती कळी उमलो अगर जळून जावो, त्याप्रमाणे उपपुष्पपत्राचे पोटांत पुष्पकळी असून तिजपासून फूल उमलते अथवा गळूनही जाते. भेंडी, जासवंदी वगैरेमध्यें पुष्पकोशाखाली उपपुष्पपत्र वर्तुळ असते, असे मागें सांगितले आहेच. कापसाच्या बोंडाखालीं तीन उपपुष्पपत्रे असतात.  एकंदरीत उपपुष्पपत्रे वेगवेगळ्या आकाराची, निरनिराळ्या रंगाची व कमी अधिक जाडीची असतात. उपपुष्पपत्रे पानांप्रमाणेच कमी अधिक दिवस पुष्प दांडीवर राहतात. मोहोर अगर पुष्पगुच्छ ह्यास एक साधारण उपपुष्पपत्र असून प्रत्येक व्यक्तिमात्र फुलासही वेगळे उपपुष्पपत्र असते. जो संबंध पानांचा व फांद्याचा असतो तोच संबंध उपपुष्पपत्रे व मोहोर ह्यांमध्ये असतो. ज्या प्रकारची मांडणी पानांत असते, तशीच मांडणी उपपुष्पपत्रामध्येंही असते. विशिष्ट उपपुष्पपत्रामध्ये विशिष्ट मांडणी असते, व त्याप्रमाणे मोहोराची मांडणी विशिष्ट प्रकारची होते. कारण मोहोर उपपुष्पपत्राच्या रचनेवर अवलंबून आहे.
१७८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
 मोहोर:–मोहोर म्हणजे व्यक्ती फूल नव्हे, तर पुष्कळ फुलांचा एकत्र असलेला गुच्छ अगर एकच पुष्पदांडीवर पुष्कळ फुलांचा क्रम, असा अर्थ होतो. फुलांची कल्पना क्षुद्वर्गीय व उच्च वर्गीय वनस्पतींत वेगळी असते. क्षुद्रवर्गांत दांडीवर जनन पेशी उत्पन्न होतात त्या रचनेस मोहोर म्हणतात, तसेच सपुष्पवर्गात ज्या दांडीवर फुले येतात त्या रचनेंस मोहर म्हणतात. पांकळ्या अगर सांकळ्या हीं संरक्षक आवरणे आहेत. परागपिटिका व बिजाण्डांची नाळ ह्या सारखी चिन्हें क्षुद्वर्गीय जननपेशी (Spores ) वरही असतात, जसे उच्चवर्गात विशिष्ट प्रकारचे मोहोर आढळतात, तद्वतच क्षुद्रवर्गात सुद्धा वेगवेगळी मोहोरसंबधी रचना असते.

 मोहर ज्या डहाळीवर येतो, त्याचा विचार करणे प्रथम जरूर आहे. जसा पानास देठ असतो, तसा फुलासही देठ असतो; पण कांहीं फुलांत देंठ न येतां तशीच ती फुले त्या डहाळीवर चिकटलेली असतात. जसे-अघाडा, बालकंद, वगैरे. पुष्कळ वेळां एक साधारण दांडी असून, त्यापासून व्यक्तीमात्र फुलास लहान दांड्या येतात. काही ठिकाणी पुष्पदांडी जमिनीतून निघून त्यावर फुले येतात. जसे-कांदा, गुलछबू, भुईकमळ वगैरे. केळ, सुपारी, नारळ, वगैरेमध्ये मोहोराची दांडी मोठी असून लोंबती असते. झेंडू, सूर्यकमळ, झिनिया वगैरेमध्ये ती दांडी आखूड असून तिचा जोर खुंटला असतो. तिचे अग्र निमुळते न होतां बोथट व रुंद होते. त्या पसरट भागावरच झेंडूंतील लहान फुलें चिकटली असतात, व हा भागच पुष्पाधार होतो.

 फांदीची रचना जशी नियमित अगर अनियमित असते, तसेच मोहोरहीं नियमित व अनियमित असतात. जी कल्पना नियमित फांदीची असते तीच कल्पना नियमित मोहोराविषयी लागू पडते. म्हणजे अग्राकडील वाढ खुंटून बाजूस नवीन वाढ सुरू होते. प्रथम अग्रावरील फुल उमलून त्यांत बीज़ तयार होते. मागाहून बाजूकडील फुले उमलतात, व त्यांत बीजे उत्पन्न होतात. ह्यांत मुख्य पुष्पदांडीचे नियमन होते म्हणून त्यास नियमित Definite म्हणतात, जसे-जवस, एरंडी, पानशेठिया वगैरे.

 ज्या मोहोरांत पुष्पदांडी ( Peduncle ) ची वाढ न खुटतां अग्राकडे ती सारखी वाढत राहते, तसेच जुनी फुलें खाली बुड़ाकडे येत जाऊन वरचे
२१ वे ].   उपपुष्पपत्रे (Bracts) व मोहोर (Inflorescence).   १७९
-----
बाजूस कोंवळ्या कळ्या येत असतात, त्यास अनियमित Indefinite मोहोर असे समजतात. तंबाखू, लिंबू, ड्युरान्टा, आंबा वगैरेमध्ये असला अनियमित मोहोर आढळतो.

 कधी कधी एकाच झाडावर दोन्ही नियमित व अनियमित मोहोर आढळतात. वास्तविक एका झाडावर एकच प्रकारचा पुष्पमोहोर असावा असा साधारण नियम असतो; पण जेव्हां दोन्ही प्रकारचे मिश्रण आढळते, तेव्हां ते प्रकार ह्या नियमास अपवादच आहेत. सूर्यकमळ, तुळस, गुलाब, वगेरेमध्यें असले मिश्र प्रकार आढळतात.

 नियमित मोहोरांमध्ये फुलांची वाढ मध्यबिंदूपासून बाहेर परीघाकडे असते व अनियमित प्रकारांत उलट परिघाकडून मध्यबिंदूकडे असते. नियमित प्रकारांत फुलांची वाढ उतरत असते. प्रथम टोंकावरील फुलांची वाढ पूर्ण होऊन नंतर खालील फुलांची वाढ होत असते. कधी कधी अग्राकडे एकच फूल असते. अथवा प्रत्येक पानाचे पोटी एक एक फूल येते. हे दोन्ही प्रकार नियमित (Definite) च आहेत, अनियमित प्रकारांत फुलांच्या वाढीची दिशा चढती असुन फुलें खालून वर वाढत असतात. अग्राकडे नेहमी कळ्या असतात अथवा अगदी कोवळी फुले असतात. साधारणपणे समोरासमोर (Opposite) व वर्तुळाकृती (Whorled ) पानांची मांडणी ज्या वनस्पतींत असते त्यामध्ये नियमित मोहोर अधिक आढळण्याचा संभव असतो. तसेच जेथे पाने ' एक झाल्यावर एक ' ( Alternate ) असतात, त्या ठिकाणी पुष्कळ अंशी अनियमित मोहोर आढळतो.

 पुष्पदांडी लांब अगर आखूड तसेंच रुंद अथवा मांसल असते. अंतरकांड्यांच्या कमी अधिक वाढीप्रमाणे फुलें एकमेकांपासून कमी अधिक अंतरावर येतात. अंतरकांडी संकुचित असली तर, फुलांचे गुच्छ बनतात.

 आतां आपण अनियमित मोहोरामध्ये आणखी कांहीं पोटभेद आहेत, तिकडे लक्ष्य देऊ. मुळे, मोहरी, ड्युरांन्टा, वाटाणे, हरभरे, वगैरे फुलांत एक साधारण पुष्पदांडी असून त्यावर लहान देंठ आलेले असतात. हे लहान देंठ व्यक्तिमात्र फुलांचे होत. अग्राकडे कळ्या असून बुडाकडे जुनी फुले असतात, हा अनियमितापैकी पहिला प्रकार आहे. ह्यास मंजिरी (Raceme) ही संज्ञा योग्य आहे.
१८०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
 फुलगोभी, मोहरीची पहिली फुलें, आळीव, वगैरेमध्ये फुलांचा झुपका बनतो. येथेही साधारण एक दांडी असून त्यावर प्रत्येक फुलाची उपदांडी असते. उपदांड्या कमी अधीक लांबीच्या असतात. बुडाकडे उपदांडी अधिक लांब असून वरवर उपदांड्या आंखुड आंखुड येत जातात. त्यामुळे त्यावरील सर्व फुले एकाच रांगेला येतात. त्यास बृहन्मंजिरी ( Corymb ) म्हणतात. जशी जशी ती अधिक जुनी होत जाते, त्याप्रमाणे ती पुष्पदांडी (Peduncle) अधिक वाढून फुलें खाली राहत जातात. अशावेळी त्यास अगदीं मंजिरीसारखा ( Raceme ) आकार येतो. म्हणजे बृहन्मंजिरी व मंजिरी हे दोन्ही बहुतेक एकच प्रकार आहेत.

 धने, गाजर, सोवा, शोपा, जिरे, ओवा वगैरेमध्यें, फुले पुष्पदांडीच्या एका सांध्या पासून निघून प्रत्येक फुलास वेगवेगळी उपपुष्पदांडी असते. ह्या उपदांड्यांस जणू छत्रीच्या काड्यासारखा आकार असतो. ह्या काल्पनिक छत्रीच्या आकारावरून त्यास छत्रस्तबक ( Umbel ) म्हणतात. सांध्यापाशी सुतासारखी उपपुष्पपत्रे ( Bracts ) असतात. एखादी दुसरी उपपुष्पदांडी अधिक वाढून त्यावर पुनः पहिल्याप्रमाणे पुनः छत्रस्तबक ( Umbel ) होते. जसे-गाजर, धने, वगैरे.

 बृहन्मंजिरी व छत्रस्तबक ह्या दोन्ही प्रकारांत मुख्य फरक म्हणजे, पहिल्यांत उपदांड्या वेगवेगळ्या जागेपासून उत्पन्न होतात, व दुस-यांत उपदांड्या एकाच सांध्या (Node ) पासून उत्पन्न होतात.

 वरील तिन्ही प्रकारांत फांद्यावर फांद्या येऊन त्या प्रकारांचे द्विगुणित भाव झाले असतात. तंबाखू, बटाटे, फुटाणे ( Tecoma ) वगैरेमध्ये मुख्य मोहोर, तसेच पोट मोहोर, हे दोन्ही मंजिरीचे प्रकार आहेत. अशीच स्थिति फुलगोभीमध्ये असते. त्यामुळे त्यास संयुक्त बृहन्मंजिरी ( Compound Corymb ) म्हणतात. संयुक्त छत्रस्तबक ( Compound Umbel ) धने, गाजर वगैरेमध्ये असते, हे वर सांगितलेच आहे.

 वरील तिन्ही प्रकारांमध्ये फुलांस लहान देठ असतात. पण आणखी एक प्रकार असा आढळतो की, तो अनियमित असून व्यक्तिमात्र फुलांस देंठ असत नाहींत. जसे-केवडा, मका, वुइलो, ओक, अॅकॅलिफा वगेरे. केवडा 
२१ वे ].   उपपुष्पपत्रे (Bracts) व मोहोर (Inflorescence).   १८१
-----
अगर मका यांमध्ये फुलें केवळ पुंकेसर (Staminate ) अगर केवळ स्त्रीकेसर (Pistillate ) असतात. मुख्य पुष्पदांडीवर फुले येऊन ती भाराने लवू लागते. सुपारी, ताड, नारळ, केळी, अळू, घुंयां, सुरण वगैरेमध्ये मुख्य पुष्पदांडी जाड व मोठ्या उपपुष्पपत्रां (Spathe ) तून बाहेर पडून येथे वरीलप्रमाणेच केवळ एकलिंगीफुले असतात. गहू, जव, बाजरी वगैरेमध्येंसृद्धां फुलांस देठ असत नाहींत. फुलें उपपुष्पपत्रांनी वेष्टित असून ती मुख्य दांडीस चिकटलेली असतात.

 झेंडू, सूर्यकमळ, करडे, झिनिया, वगैरेमध्ये फुले एका पुष्पाधारावर असून ती सर्व मिळून एक फूल असावे असे वाटते. उपपुष्पपत्रे ( Bract ) खाली परस्पर चिकटून त्यास पेल्यासारखा आकार येतो. ह्या उपपुष्पपत्रास(Bracts पुष्पकोश ( Calyx ) समजण्याचा संभव आहे. पण हा समज चुकीचा आहे. येथे सांकळ्या पूर्णावस्थेस पोहोंचल्या नसून त्यांचे दोन केसाळ पुंजके व्यक्तिमात्र फुलावर आढळतात. पाकळ्या व इतर वर्तुळे प्रत्येक फुलांत असतात, ह्या प्रकारास गुच्छ ( Capitulum ) असे म्हणतात. हे गुच्छ पसरट व रुंद असतात. जसे-सूर्यकमळ. कधी ते वाटोळे होऊन त्यास चेंडूसारखा आकार येतो. जसे-कदंब, बाभूळ, शमी, लाजवंती, वगैरे.

 अंजीर, उंबर, पिंपळ, वड, नांद्रुक वगैरेमध्ये ज्यास आपण फळ समजतो, ते वास्तविक तसे नुसून फुलाचा एक विशिष्ट प्रकारचा मोहोर आहे. कच्चे अंजीर आडवे कापून पाहिले असतां आंत शेकडों फुले दृष्टीस पडतील. हीं अपूर्ण फुलें केवळ स्त्रीकेसर ( Pistillate) अगर केवळ पुंकेसर (Staminate) असतात. चोहोंबाजूंनी खालील पुष्पाधार वाढून ती सर्व फुले एकेजागी जमून त्याचा एक वाटोळा गोळा बनतो. आंतील फुलांची गर्भधारणा घडवून आणण्यास एक प्रकारच्या माशा उपयोगी पडतात. अग्राकडून माशी आंत घुसून फुलांतील बीजाण्डांत आपली अंडी घालते, त्यामुळे फळ पिकलें म्हणजे आंत शेंकडों लहान लहान किडे उत्पन्न होतात. माशा परागकण एकांतून दुसरीकडे पोहोंचवितात, पुष्पाधार फळ पिकलें म्हणजे मांसल होऊन त्यांत गोड रुची उत्पन्न होते. फळांत बारीक खरीं बीजें ही असतात. ही बीजें मात्र स्त्रीपुरुषतत्व-संयोग होऊन उत्पन्न होतात. 
१८२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
 अनियमित प्रकारांत झाडाच्या कमी अधिक वाढीप्रमाणे तसेच कांहीं आगंतुक कारणांनीं फरक होऊन मोहोर चमत्कारिक दिसतात; पण ते नेहमीचे नसून विशिष्ट कारणांनी उत्पन्न झाले आहेत हे लक्ष्यात ठेवावे.

 नियमित मोहोराचे प्रकारांत फुलांची वाढ नियमित असते, हे वर सांगितलेंच आहे. कांहीं वेळां अग्राकडे एक फूल येऊन नंतर खाली दुसरी फुलें येतात. अथवा नुसते एकच फूल अग्रांवर येऊन वनस्पतीची वाढ ख़ुटते, अथवा उपपुष्पपत्राचे पोटीं एक एक फूल येत जाते. त्यामुळे तेथून वाढणाऱ्या मोहराची वाढ ख़ुटते. गुलाब, लिंबू, चकोत्रा, वगैरेमध्ये फुलें नियमित असतात. दांडीवर पहिले फूल प्रथम उमलून त्याचेच प्रथम फळ होते. आयक्झोरा, कॉपी, मंजिष्ठ, वगैरेमध्ये फुलांची मांडणी नियमित असते. आयक्झोरामध्यें फुलांचा आकार झुपकेदार असून प्रत्येक झुबक्यांत तीन फुले असतात. पैकी मधले फूल प्रथम फुलून त्यांचे बी तयार होते. मुख्य दांडीवर शाखा, पोटशाखा येऊन एकंदर आकार नियमित झुपकेदार असतो.

 फांद्याचे नियमित द्विपाद अगर बहुपाद वगैरे प्रकार पूर्वी सांगितले आहेत. तसेच प्रकार येथे मोहोरांत आढळतात. जवसामध्ये मुख्य दांडीच्या अग्रावर एक फूल आल्यावर खाली दोन उपदांड्या वाढून प्रत्येकी तसेच अग्रावर फुलें येतात. नंतर पुनः पूर्वी प्रमाणे त्या प्रत्येक फुलांचे खाली दोन लहान उपदांड्या निघून प्रत्येकांवर टोकास पूर्वीसारखें फूल असते. अशा प्रकारास ' नियमित दिपाद (Cymose dichassium) म्हणून समजतात. आरेनॅॅरिया Arenaria नांवाचे वनस्पतींत वरीलप्रमाणेच नियमित द्विपाद आढऊतो. मोतिया नांवाचा बागेत एक रोपा आढळतो. त्याची फुले मोत्यासारखी पांढरी वाटोळीं व लहान असतात. येथे मोहोर नियमित द्विपाद असतो.

 पानशेटिया नांवाचे वनस्पतींत दोन्हीपेक्षा अधिक उपदांड्या एका जागेपासून निघून फुलांची साधारण रचना नियमित असते. अशा ठिकाणी नियमित बहुपाद (Cymose Poly chassium ) म्हणतात.

 हॅमेलिया नांवाचे झाडांत मोहोर ' एकमार्गी नियमित,' (Sympodium) असतो. म्हणजे एकाच बाजूकडे फुले येत जाऊन प्रत्येक फुलाचें स्थान लहान उपदांडीच अग्रावर असते. ह्या ठिकाणी लहान उपदांड्या मिळून सर्व 
२१ वे ].   उपपुष्पपत्रे (Bracts) व मोहोर (Inflorescence).   १८३
-----
साधारण एक पूर्ण दांडी बनते. विशेषेकरून उपपुष्पपत्रे ( bracts ) लवकर गळून गेल्यामुळे पुढे हा नियमित प्रकारच आहे किंवा नाहीं, ह्याची शंका चाटू लागते. पण जेव्हा कोंवळेपणीं उपपुष्पपत्रे गळून जात नाहीत, त्यावेळेस उपपुष्पपत्र फुलाचे समोर एक एक असते, म्हणूनच ते फूल अग्राकडे आहे अशी खात्री पटते. जर उपपुष्पपत्राचे पोटी फूल येते, तर मात्र ते अग्रावर आहे असे वाटणार नाही. शिवाय त्यासमोर येणाऱ्या उपपुष्प पत्राच्या पोटी दुसरी कळी वगैरे नसते. जी दांडी वाढत पुढे गेली असते, तीच त्या उपपुष्पपत्रांतून उगम पावते असे समजावे. नाहीं तर हा प्रकार साध्या मंजिरीसारखा (Raceme ) समजला जाईल. भोंकर व जवस वर्गात वरील प्रकारचे मोहोर पुष्कळ ठिकाणी आढळतात.

 मिश्रित मोहोर पुष्कळ वेळा पाहण्यांत येतात. झाडांवर शेकडों फुले निरनिराळ्या फांद्यावर असल्यामुळे सर्वसाधारण मोहोर एक प्रकारचा व व्यक्तिमात्र फांदीवर दुसऱ्या प्रकारचा. असे मिश्र प्रकार पुष्कळ वेळां दृष्टीस पडतात. जसे सूर्यकमळ, झेंडू, वगैरे. सूर्यकमळाचे पसरट व रुंद फूल झुपकेदार असून त्यांत व्यक्तिमात्र लहान फुलें परिघाकडून मध्यभागांकडे उमलत असतात, त्यामुळे तो अनियमित प्रकार होतो. पण येथे विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, प्रथम फूल अगर गुच्छ अग्रांवर येऊन नंतर खालील फांद्यावर दुसरी फुले येत जातात. तसेच अग्राकडील गुच्छ तयार होऊन प्रथम त्यांत बीजें तयार होतात. मागाहून खालील गुच्छांत ती उत्पन्न होतात; म्हणजे व्यक्तिमात्र प्रकार अनियमित असून साधारण प्रकार नियमित असतो. म्हणूनच येथे दोन्ही प्रकारांचे मिश्रण होते. अशा प्रकारांचे मिश्रण असल्या गुच्छवर्गात नेहमी असते. तुळसी वर्गातही असले मिश्रण आढळते. तुळसी मध्ये मुख्य मंजिरी अनियमित असून व्यक्तिमात्र गुच्छांत त्यांची मांडणी नियमित असते. म्हणजे जी स्थिति सुर्यकमळांत, त्याचे उलट येथे असते.

 केशवर्गांत (Scrophularaceae ) अशाच प्रकारची मिश्रित मांडणी असते. येथे फुलें सर्व साधारणपणे अनियमित असून पोटमोहोर नियमित असतात. उपदांडीच्या अग्राजवळ, तसेच बुडाकडे फुलांचे घोस चिंचोळे असून मध्यभागी फुलें अधिक खेचिल्यामुळे तो भाग रुंद व मोठा होतो. द्राक्षामध्ये 
१८४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
-ह्याच प्रकारची रचना आढळते. कधीं प्रथम नियमित व पुढे अनियमित

अथवा कधी दोन्हीचे जागजागी थोडे थोडे मिश्रण होते.

 एकंदरीत फुले उपपुष्पपत्राप्रमाणे त्यांचे पोटीं येऊन फुलांची मांडणी वेगवेगळी तयार होते. ज्या वनस्पतींत ज्या प्रकारच्या फांद्या आढळतात, त्याप्रमाणे त्या वनस्पतींच्या मोहरामध्ये तीच व्यवस्था आढळते. म्हणून पूर्वी आम्हीं जें-फांद्या, पाने, उपपुष्पपत्रे व मोहोर ह्यांचा परस्पर निकट संबंध असतो, असे म्हटलें, ते खोटे नाही. समोरासमोर (Opposite ) पाने असली तर फांद्या समोरासमोर असून मोहोरही नियमित प्रकारची असतो. अथवा वर्तुलाकृति ( Whorled) पानांचे ठिकाणी बहुतकरून बहुपाद (Poly chassium ) मोहोर आढळतो. एक झाल्यावर एक ( Alternate ) पाने असतांना फांद्या व मोहोर अनियमित आढळतात.

 क्षुद्र वर्गात ज्या फांदीवर जननपेशी (Spores ) उत्पन्न होतात, त्या फांदीसच मोहोर म्हटले पाहिजे. क्षुद्रवर्गातही एका विशिष्ट ठिकाणीच जननपेशी (Spore ) उत्पन्न होतात, सार्वत्रिक होत नसतात, हे विशेष लक्ष्यांत ठेविण्यासारखे आहे. जननपेशीदलें ( Sporophylls ) उच्चवर्गाप्रमाणे क्षुद्र वर्गांतही आढळतात. बहुतेक त्यांचा आकार पानासारखाच असतो. उच्च वर्गात ही दलें एकवटल्यामुळे त्यास आपण फूल असे समजतो. पण क्षुद्रवर्गात जेथे जेथे म्हणून जननपेशी आढळतात, त्या भागासचे फूल ही संज्ञा लावणे योग्य आहे. कारण फुले म्हणजे जननेंद्रियें; मग ती पुरुषव्यंजक असोत अगर स्त्रीव्यंजक असोत.

---------------