वनस्पतिविचार/बीजाण्ड व गर्भधारणा--बीजाण्ड, गर्भधारणा

२० वे ].    बीजाण्ड व गर्भधारणा.    १६९
-----
प्रकरण २० वें.
---------------
बीजाण्ड व गर्भधारणा.
---------------

 अण्डाशयामध्ये बीजाण्डे (Ovules) नाळेशी (Placenta) चिकटली असतात. ज्या प्रकारचा परागपीटिकेचा व परागकणांचा संबंध असतो, तोच संबंध नाळ व अण्डे ह्यामध्ये असतो. परागकणांमध्ये पुरुषतत्त्वजननपेशी, (Male spore) तसेच बीजाण्डामध्ये स्त्रीजननपेशी (Female Spore) असतात. क्षुद्रवर्गामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या जननपेशी असून त्यांपासूनच उत्पत्ति होत असते. प्रत्येक जननपेशीस स्वतंत्र वाढ करण्याची शक्ति असून ती उच्चवर्गामध्ये फार अस्पष्ट अगर बहुतेक गुप्त असते असे म्हटले असतां चालेल. क्षुद्रवर्गामध्ये पुष्कळ वेळां सर्व वनस्पतिशरीर असल्या जननपेशीपासून उत्पन्न होते. पुढे एखादे वेळी पुनः त्या प्रकारच्या दोन्ही जननपेशी उत्पन्न होऊन परस्परसंयोग पावून गर्भधारणा होते. गर्भधारणेमुळे त्यांचे विशिष्ट बीज तयार होते. उच्च वर्गामध्ये जननपेशींची (Spore ) स्वतंत्रपणे उगवण्याची शक्ति नष्टप्राय असल्यामुळे परस्परसंयोग होऊन बीजोत्पादन करणे भाग असते. बीजापासून वृक्ष तयार झाल्यावर पुनः फुलें येऊन त्यामध्ये पूर्वीसारख्या जननपेशी उत्पन्न होतात, व त्या जननपेशींचा संयोग होऊन पुनः बीजोत्पत्ति होते. येणेपमाणे हे रहाटगाडगे चालले असते. कारण जननपेशींपासून वनस्पतिशरीर वाढून पुनः त्यावर पुरुष व स्त्रीव्यंजक निराळ्या जननपेशी उत्पन्न होऊन त्यांचा परस्पर संयोग होतो, व त्या संयोगामुळे गर्भधारणा घडून बीज उत्पन्न होते. हे बीज योग्य परिस्थितीमध्ये वाढून पूर्वीप्रमाणे वनस्पतिशरीर तयार होते, व त्यावर पुनः पूर्वीप्रमाणे जननपेशी उत्पन्न होतात. मात्र क्षुद्रवर्गामध्ये पुष्कळ वेळां पुष्कळ दिवस स्त्री-पुरुष संयोगशिवाय जननपेशी स्वतंत्रपणे वनस्पतीची वाढ करितात, हाच काय ते मुख्य फरक असतो.

 बीजाण्ड:-- हे वाटोळे असून त्यावर एक रंध्र (Micropyle) असते, हे रंध्र परागकण आंत शिरण्यास उपयोगी पडते, ह्यासही परागकणाप्रमाणे दोन 
१७०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
संरक्षक आवरणे असतात. आवरणानंतर आतील भागीं खोबऱ्यासारखा पोषक बलक ( Nucellus ) असून त्या बलकांत गर्भकोश ( Embryo-Sac ) वाढत असतो. केवळ हा बलक संपेपर्यंत तो वाढतो असे नाही, तर कधी कधी बाह्य आवरणापर्यंत त्याची वाढ होते. कोशांत एक केंद्र असून त्यापासन गर्भधारणा होण्याचे पूर्वी आठ केंद्रे उत्पन्न होतात. मध्यभागी दोन केंद्रे एकमेकांश मिलाफ पावून त्याचे एकच केंद्र होते. हे केंद्र पहिल्या केंद्रापासून ओळखण्याकरितां त्यास द्वितीयक केंद्र म्हणतात. उरलेल्या सहा केंद्रांपैकी तीन केंद्रे वरील बाजूकडे व तीन केंद्रे खालील बाजूकडे जातात. खालील भाग असणारी केंद्रे गर्भधारणक्रियेस उपयोगी पडत नाहीत. मध्यभागी असणारे द्वितीयक केंद्र ( Secondary Nucleus) ही ह्याच प्रकारचे असते. मात्र वरील तीन केंद्रापैकी, एका गर्भाण्ड ( Egg-cell ) असून दोन त्यास मदत करणारी असतात. म्हणजे गर्भकोशांतील सर्व केंद्रांमध्ये एक गर्भाण्डच मुख्य असून ह्यांत खरें स्त्रीतत्त्व असते. ह्याच तत्वाचा पुरुषतत्त्वाशी मिलाफ होऊन बीजोत्पादन होत असते. तूर्त आपण अण्डाच्या बाह्यांगाचे वर्णनाकडेच वळू. मागाहून पुनः गर्भधारणेचा विचार करण्यात येईल.

 बीजाण्डाची दोन्ही आवरणे एकाच जागी परस्पर संलग्न झाली असतात. तेथूनच नाळेतून येणारे पोषक अन्न गर्भकोशांत अगर आंतील बलकाकडे पोहोंचविले जाते. निरनिराळ्या फुलांतील बीजाण्डांत रंध्र व अन्न येण्याची जागा वेगवेगळी असते. कुटूच्या फुलांत रंध्र अग्रांकडे असून बुड़ाकडे ही जागा असते. तसेच नाळेशी संबंध दाखविणारी खूण रंध्राजवळ असते, मुळे, मोहरी, आळीव, वगैरे फुलांतील अण्डांत रंध्र, नळीची खूण, व आवरणांची संयुक्त जागा ही तिन्ही जवळ जवळ असतात. जासवंद, भेंडी, कापूस, वगैरेमध्ये अशाच प्रकारची रचना असते. काहींमध्ये रंध्र व नाळेची खूण, एका बाजूस असून दुसऱ्या बाजूस आवरण-संयुक्त जागा असते. असली अण्डे पुष्कळ फुलांत आढळतात. जसे काकडी, खिरे, सफरचंद वगैरे.

 अण्डाशयांत बीजाण्डांची संख्या अमूकच असते, असें कांहीं निश्चित नाही. एकापासून पुष्कळ अण्डे एका अण्डाशयांत असू शकतात. झेंडू, सूर्यकमळ, झिनिया, करडैै वगैरे फुलांतील स्त्रीकेसरदलांत एकच बीजाण्ड असते. धने 
२० वे ].    बीजाण्ड व गर्भधारणा.    १७१
-----
ओवा, सोपा, जिरे वगैरेमध्ये अण्डे दोन असतात. कापूस, वांगे, पेरू, टोमॅटो, मिरच्या वगैरे फुलांत ती पुष्कळ असतात. जितक्या अण्डास परागकण मिळतात, तितकीच बीजे होतात. पुष्कळ परागकण वाया जाण्याचा संभव असतो, म्हणून त्यांची संख्या अधिक करण्याची नैसर्गिक तजवीज असते.

 जेव्हां अण्डाशयांत एकच अण्ड असते तेव्हां ते बुडास चिकटून सरळ उभे असते. जेव्हां ती दोन असतात त्यावेळेस ती परस्पर संलग्न होतात. पण अधिक संख्या असतांना, नाळेच्या कमी अधिक जाडीवर तसेच अण्डाशयाच्या लहान मोठ्या पोकळीवर त्यांची रचना पुष्कळ अंशी अवलंबून असते. मोहरी, वाल, अळसुंदी वाटाणे वगैरेमध्ये अण्डाशय दीर्घ असल्यामुळे अण्डे एकाजागी गर्दी न करितां वेगवेगळी राहतात. अण्डाशय लहान असून त्यांची संख्या पुष्कळ असेल तर ती परस्पर खेचून राहतात. आता आपण गर्भधारणेकडे वळू.

 गर्भधारणा:-परागकण परागवाहिनीवर पडल्यावर आंत वाढू लागतो, व त्याची एक लांब नळी बनते. ही नळी परागवाहिनींतून अण्डाशयांत शिरते व तेथून मार्ग शोधीत बीजाण्डापाशी येते, अण्डावरील रंध्र ह्यावेळी आयते उपयोगी पडून त्यांतून ती नळी घुसत गर्भकोशांत (embryose) शिरते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे गर्भकोशांत मुख्यकेंद्राचे आठ भाग होऊन तीन अग्राकडे, तीन बुडाकडे व दोन मध्यभागी जातात. पैकी मध्यभागी दोन्हींचे एकच द्वितीयक केंद्र बनले, व खालील केंद्रे गर्भक्रियेस उपयोगी नसून वरील उरलेल्या तिन्ही पैकी एक गर्भाण्ड म्हणून जे असते, तेच मुख्य पुरुष-तत्त्वांशी मिळणारे केंद्र आहे. परागनळीत असणाऱ्या पुंतत्व केंद्राचे दोन भाग होऊन एक भाग वरील दोन केंद्रांतून गर्भाण्डाकडे जातो. त्या दोन केंद्रांत कांहीं आकर्षण द्रव्य असल्यामुळे त्यांतून ते पुंतत्त्वकेंद्र प्रथम शिरून नंतर गर्भाण्डाशी भिडते. गर्भाण्डात, तयार असणारे स्वीतत्त्वकेंद्र हे नवीन आलेले पुरुषतत्त्वकेंद्र ह्या दोन्हींचा एक मिलाफ होऊन दोन्ही एकजीव होतात. ह्या क्रियेस गर्भधारणा ( Fertilisation ) असे म्हणतात. पुंतत्व केंद्राचा दुसरा भाग खाली सरकत द्वितीयक केंद्राकडे (Secondary nucleus ) येऊन त्याशी मिलाफ पावतो. म्हणजे ह्या ठिकाणी तीन केंद्रांचे एकीकरण होते. ह्या एकीकृत केंद्रापासून पुढे पोषक द्रव्य उत्पन्न होते. ह्या द्रव्यावर गर्भ वाढू लागतो.

१७२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
गर्भधारण झाल्याबरोबर गर्भाची वाढ होण्यास सुरुवात होते. पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत गर्भाण्डावर नसलेली पेशीभित्तिका उत्पन्न होते. साध्या पेशीस भित्तिका असतात, पण गर्भकोशांतील ( Embryo-sac ) तसेच परागकण नळीमध्ये असणाऱ्या जनन-पेशीस भित्तिका नसतात. जेव्हां स्त्रीतत्त्व व पुरुषतत्त्व-केंद्राच्या मिलाफ होतो, त्यावेळेस तीं परस्पर एकजीव होतात. भित्तिका जर जनन-पेशीवर असती, तर मिलाफ होण्यास अडचण पडती, म्हणूनच ही नैसर्गिक व्यवस्था गर्भक्रिया सुलभ-रीतीने घडवून आणण्यास जास्त उपयोगी पडते. पेशीचे विभाग होणे हे आंतील सर्व चैतन्यशक्तीवर अवलंबून असते. आतां ती पेशी गर्भाण्ड केवळ न राहतां गर्भ अगर बीज-स्थितित पोहोचली असते. तो गर्भ द्विधा होऊन त्याचे दोन भाग होतात. त्या दोन्ही भागांचे पुनः दोन दोन विभाग होतात, म्हणजे त्याचे भाग चार होतात. आठ आठाचे सोळा या प्रमाणे नवीन नवीन पेशी तयार होत जातात. प्रथम द्विधा झालेल्या भागांपैकी खालील भाग जास्त मोठा होत असतो, व वरील भाग लांबट वाढतो. या रीतीने गर्भाची वाढ होत असतां मध्य भागीं असणारे पोषक केंद्रही द्विधा होत असते. विभाग होत होतां पुष्कळ पेशी उत्पन्न होऊन त्या पोषक अन्नांनी भरत असतात. वाढत्या गर्भाकरितां पोषक अन्नाचा सांठासुद्धा प्राथमिकस्थितीत तयार असतो.

 बीजदलें ( Cotyledons ) आदिमूळ ( Radicle ) प्रथम खोड (Plumule ) हीं खालील वाटोळ्या पेशीसमुच्चयापासून तयार होतात. वरील पेशींपासून आदिमुळांचा काही भाग तयार होतो, जसे अग्र.

 ही गर्भाची वाढ द्विदल-धान्य-वनस्पतींत आढळते; पण एकदल-धान्य वनस्पतींत वरील लांबट पेशीसमुच्चयापासून गर्भाचा बहुतेक भाग तयार होऊन खालील पेशीसमुच्चयापासून एकच पण मोठे बीजदल बनते. आदिमूल व प्रथम खोड हीं एका बाजूकडे असतात. प्रत्येक गर्भाभोंवती मग तो गर्भ एकदल वनस्पतीपैकी असो अगर द्विदल वर्गापैकी असो, तथापि हा प्राथमिक अन्नाचा सांठा असतोच, द्विदलगर्भांतील पण पुष्कळ बीजांत तो अन्नाचा सांठा बाहेर न राहतां आंत शोषिला जाऊन गर्भामध्ये समाविष्ट होतो. गर्भाची दले मोठी वाढून सात्त्विक अन्नामुळे ती फुगतात. ह्यांसही अपवाद असतात. जसे, 
२० वे ].    बीजाण्ड व गर्भधारणा.    १७३
-----
एरंडी, गाजर, वगैरे. एरंडीमध्ये दले पातळ असून गर्भाभोंवती अन्नाचा साठा असतो. एकदल वनस्पतींत अन्नांचा सांठा एका बाजूस असून गर्भही एका बाजूस असतो. एकदल वनस्पतींत सर्व पोषक अन्नाचा साठा गर्भ वाढत असतां शोषिला जात नाही. जसे-गहूं, बाजरी कांदा, लसूण इत्यादि. मागें आपण मक्याच्या दाण्याचे परीक्षण केले आहेच. तो एकदल वर्गापैकी असून त्यांत पोषक अन्नाचा सांठा एका बाजूस असतो. आर्किडमध्ये बीज एकदल वर्गापैकी असून अन्नांचा सांठा गर्भाभोंवतीं न राहतां आंत शोषिला असतो. ह्या बाबतीत तो द्विदल वर्गासारखा असतो. मगजवेष्टित ( Abuminous } बीजें म्हणून मागें सांगण्यात आले आहे, त्यांचा उगम ह्याच अन्नाच्या साठ्यांपासून असतो. गर्भ पक्व होऊ लागला म्हणजे, अण्डावरील बाह्य आवरणे वाळून तीच बीजावरील फोल अगर गर्भकवची ( Testa ) बनते. येणेप्रमाणे गर्भअण्डापासून बीजोत्पत्ति होते. खरोखर बीज म्हणजे पक्व झालेलें गर्भीकृत गर्भाण्ड होय. ह्यांत गर्भ असल्यामुळे हा बाल रोपा आहे.  येथे एक गोष्ट सांगणें जरूर आहे की, बीजाण्डावरील छिद्र ( Micropyle ) नेहमी परागनळीस आंत शिरण्यास उपयोगी पडते, असें नाहीं. बीजाण्डांतील दोन्हीं पडदे व गर्भकोशाभोंवती असलेला पोषक बलक, ह्यांचा एकाच जागी निकट संबंध येऊन त्या जागेतून ( chalaza ) गर्भास पोषक द्रव्ये बाहेरून पोचविली जातात. ही जागा नेहमी अण्डाच्या बुडाशी असते. अग्राकडील छिद्राचा उपयोग जेव्हां परागकण नळीस होत नाही, त्या वेळेस ह्या बुडाकडील बाजूंतून ( chalaza ) परागकण नळी आंत शिरते. कॅसअॅरिना ( Casuarina ) नांवाच्या झाडावर केवळ स्त्रीकेसर अगर केवळ पुंकेसर फुले असून स्त्रीकेसर फुलांतील अण्डाशयांवर परागकण पड़तात, तेव्हां परागकणांची नळी नाळेतून वाढत वाढत बीजाण्डाच्या खालील बुडांतून वर शिरत जाते. तेथूनच पुढे सरकत सरकत गर्भकोशांत जाऊन आंतील गर्भाण्डास ( Egg-cell) पूर्वीप्रमाणे गर्भीकृत करते. नळीतून येणाऱ्या पुंतत्त्व पेशीचे दोन विभाग होऊन एक भाग गर्भाण्डाशी एकजीव होतो. एकजीव होणे म्हणजे गर्भधारणा होणे. अशाच प्रकारची उदाहरणे पुष्कळ आढळतात. पूर्वी पुष्कळ दिवस असा समज असे की, पराग-नळी केवळ छिद्रांतूनच बीजाण्डांत शिरते व त्यास दुसरा मार्ग बिलकुल
१७४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
नाहीं. पण अलीकडील शोधांती असे ठरत आहे की, अग्ररंध्रच परागकणाच्या आंत शिरण्याचा रस्ता, असे नसून इतर भागांतूनही परागकण शिरू शकतो. रंध्रांतून परागकण शिरला म्हणजे त्यास वरून खाली यावे लागते; पण रंध्रांतून न शिरतां तो बीजाण्डाचे बुडाकडून शिरतो, तेव्हां प्रथम तो खाली येऊन नंतर पुनः वर जातो, एवढाच काय तो फरक.  बहुदलधान्य-वनस्पतीत बीजाण्डांची गर्भधारणा मुख्य बाबतीत वरीलप्रमाणे असते. बहुदलधान्य-वनस्पतींत अण्डाशय पूर्ण झांकलेला नसून बीजाण्डे दलावर उघडी असतात. पुंकेसरापासून परागकण गळू लागले असतां, परागवाहिनी नसल्यामुळे ते परागकण पुष्कळ वाया जाण्याचा संभव आहे. बीजाण्डे दलावर उघडी असल्यामुळे त्यावरील रंध्र परागकण पकडण्यास उपयोगी पडते. परागकण वाऱ्याने रंध्रापाशी नेले जातात. रंध्रावर डिंकासारखा एक बिंदु असतो. त्यामुळे परागकण तेथे चिकटून राहतात. जेव्हा तो चिकट बिंदु वाळू लागतो, तेव्हां परागकणही रंध्रामध्ये संकुचित होतात. रंध्रात शिरल्यावर परागकणांच्या लांब नळया बनतात. परागकण गळण्याचे दिवसांत हे रंध्र मोठे व रुंद होऊन रंध्रावर डिंकाचे बिंदु चमकत असतात. पुष्कळ वेळां हें बिंदु दंवाचे बिंदु असावेत, असा समज होण्याची संभव आहे, पण हे दंवाचे बिंदु नसून परागकण पकडण्याकरिता ही नैसर्गिक व्यवस्था असते. ह्या व्यवस्थेशिवाय परागकण सहसा पकडले जाणार नाहींत व पुढील बीजही त्यापासून तयार होणे शक्य नसते. तो बिंदू गळू लागला म्हणजे परागकण रंध्रांत अडकला जाऊन पुनः बाहेर जाईल अशी भीति नसते. परागकण रंध्रांत सांपडला म्हणजे लागलीच गर्भधारणेस सुरवात होते, असे नाहीं. कित्येक वेळां ते परागकण सहा सहा महिने आंत राहू शकतात, तोपावेतों बीजाण्डांतही फरक होत असून आंतील गर्भाण्ड पक्वदशेत येत असते, पक्वदशा आल्यावर गर्भधारणेस उशीर लागत नाही. रंध्रांत सांपडल्यावर परागकणाचे वेगवेगळे विभाग होतात. पैकीं कांहीं विभाग लहान व कांहीं मोठे असतात. लहान भागांपैकी एक भाग पुंतत्वजननपेशी असतो. मोठ्या भागापासून परागनळी उत्पन्न होऊन त्यांतून जननपेशी जातांना तिचे दोन भाग होऊन एकच भाग गर्भधारणक्रिया उरकतो. ज्युनिअरमध्ये ते द्विधा होणारे दोन्ही भाग गर्भधारणेस उपयोगी पडतात. एवढेच नव्हे तर जास्त जरूरी असेल तर 
२० वे ].    बीजाण्ड व गर्भधारणा.    १७५
-----
पुनः त्याचे अधिक विभाग होऊन उरलेल्या सर्व गर्भाण्डास गर्भीकृत करतात, सुरूचे झाडांत पुष्कळ गर्भांडे एका ठिकाणी गर्भकोशांत जमून ती परागकणांची वाढ पहात असतात. अशावेळेस परागनळीतून जी जननपेशी येते, तिचे प्रथम विभाग न होता त्या नळीचे टोंकास पुष्कळ लहान नळ्या उत्पन्न होतात. नंतर त्या जननपेशीपासून जितक्या जननपेशीची जरूरी असेल तितक्या जननपेशी उत्पन्न होऊन त्या लहान लहान नळ्यांतून एक एक पेशी प्रत्येक गर्भाण्डाकडे जाऊन त्यांचा मिलाफ होतो, व गर्भधारणा परिपूर्ण होते. देवद्वार, पाईन, वगैरेमध्ये प्रथमपासूनच परागकणापासून निराळ्या नव्या उत्पन्न होऊन प्रत्येक गर्भाण्डाजवळ भिडते, व त्यातूनच जननपेशी बाहेर येऊन त्या गर्भाण्डाशी एकजीव होते. एकजीव झाल्यावर गर्भधारणा परिपूर्ण झाली, असे समजावे.

 ह्याठिकाणी एक गोष्ट लक्ष्यात ठेवण्यासारखी आहे की, जरी निरनिराळ्या परागकण नळ्या असतात, तरी गर्भाण्ड व नळी ह्यामध्ये थोडे अंतर राहते. ह्या मध्यभागी पाण्यासारखा पातळ रस असल्याने जननपेशीस पोहून गर्भाण्डकडे जावे लागते. पोहण्यास सुलभ व्हावे म्हणून पेशीत थोडी वल्ह्यासारखी व्यवस्था असते. खरोखर क्षुद्रवर्गात ह्याच प्रकारची व्यवस्था आढळते. त्यामध्ये पुरुषतत्त्वाचा स्वीतत्त्वांशी मिलाफ होण्यास पुरुषजननपेशीस अशाच प्रकारे पाण्यांतून पोहून जावे लागते. क्षुद्रवर्गासंबंधाने तूर्त आम्ही जास्त विचार करीत नाही, तथापि बहुदलधान्य वनस्पतींत व क्षुद्रवर्गात गर्भधारणेसंबधी व्यवस्था कांहीं बाबतीत अगदी सारखी असते, ह्यांत संशय नाही. म्हणूनच बहुदलधान्यवर्ग हा उच्च पुष्पवर्ग व क्षुद्रवर्ग ह्या दोहोंमधील मध्यम वर्ग आहे, अथवा उच्च पुष्पवर्ग व क्षुद्रर्ग ह्या दोहोंस जोडणारा सांखळीचा मध्य दुवा आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. -

 गर्भधारणा घडून येण्यांत किती गोष्टी घडतात, व कोणतें फरक होतात, ह्याचा विचार वर झालाच आहे. परागकण कशा रीतीने परागवाहिनींतून आंत घुसतात. पुंतत्व बिंदूचे कसे विभाग होतात व गर्भकोशांत शिरल्यावर गर्भाण्डांशी त्याचा कसा मिलाफ होतो; वाटेत असणाऱ्या दोन केंद्रांकडून तो पुतत्त्वबिंदु कसा आकर्षिला जातो व पुढे त्यांमधून गर्भाण्डास कसा
१७६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
मिळतो, तसेच, पुंतत्त्वबिंदूचा दुसरा भाग मध्यभागी असणाऱ्या द्वितीय केंद्राशीं (Secondary nucleus ) मिळून त्याचे कसे पोषक केंद्र उत्पन्न होते, वगैरे गोष्टी आम्हीं वर्णन केलेल्या आहेत. शिवाय गर्भधारणा झाल्यावर पाकळ्या, पुंकेसर दलें, वगैरे आपोआप वाळून गळू लागतात, व गर्भ जोराने वाढू लागतो. बीजदलें ( Cotyledons ) गर्भासंभोवती असणाऱ्या अन्नाचे शोषण करू लागतात. जेथे पूर्ण शोषण होते, तेथे गर्भासभोवती अन्नाचे आवरण रहात नाही. पोषक अन्ने दलांस सांठविल्यामुळे दले मोठी होतात, अगर मांसल बनतात. जेथे पूर्ण शोषण होत नाही, तेथे दलें लहान व पातळ राहतात. अन्नाचे आवरण गर्भाच बाह्यांगी राहते; ही गोष्ट खरी की, अन्न शोषण होणे जरूर आहे. मग ते शोषण गर्भ वाढून बीजदले पक्व होत असतांना होवो, अथवा बीजें जनन होत असतां दलांकडून मगज वेष्टणांतील अन्नाचे शोषण मागाहून होवो. ह्या अन्नाचा उपयोग बीजास जनन ( Germination ) होण्याचे वेळी व्हावा अशी नैसर्गिक तरतूद असते, पण उपयोग होण्यास त्या अन्नाचे अंतरशोषण होणे अशक्य असते. ही तरतूद नसती तर बीज रुजून वाढले नसते.
---------------