वनस्पतिविचार/पारिभाषिक शब्दांचा कोश



पारिभाषिक शब्दाचा कोश.
---------------

      अ.

अस्थानोद्भूत मुळे Adventitious roots आगंतुक मुळे, योग्य जागी न येणारी मुळे.
अनियमित Indefinite ( मुख्य वाढीचे ) नियमन न होणारे, हा फांदी व मोहोर यांचा एक प्रकार आहे.
अंतर कांडे Internode पेर.
अग्र Apex टोंक.
अनेंद्रिय Inorganic निरिंद्रिय.
अंतरत्वचा Endodermis.
अधस्त्वचा Hypodermis.
अधस्थ Inferior.
अण्डाशय Embryo.
अंतर्वर्धिष्णु Endogenous.

     आ.

आकाश Space पोकळी
आदिमूळ Radicle पहिले मूळ.
आगंतुक मुळे Adventitious roots
अस्थानोद्गत मुळे. आम्ल Acid

     उ.

उत्क्रांती Evolution संक्रमण.
उपपर्ण Stipule पानाच्या बुडाजवळील आवरण.
उपपुष्पपत्र Bract फुलांत पुष्पकेशाखाली असणारे आवरण.
उत्तेजन Stimulation.

उत्तर Response.

२१२     वनस्पतिविचार.
-----

उच्चस्थ Superior.
उपपुष्पवर्तुळ epicalyx.

     ए.

एकदली Monocotyledonous एक डाळिंबी असणारें.
एकपाद् Monopodial हा एक फांदीचा प्रकार आहे.
एकमार्गी नियमित Sympodial मोहोर अथवा फांदी त्यांचा एक विशिष्ठ प्रकार आहे.
एक झाल्यावर एक alternate.
एक स्तंभी Monostelic.

     क.

केंद्रोत्साारणी Centrifugal मध्यवर्ती केंद्रापासून उत्पन्न होऊन परिघाकडे नेणारी.
केंद्र Nucleus पेशींत केंद्र असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. केंद्र पेशींत नेहमीं मध्यभागी असते असे नाहीं.
किंकरी मूळ Tap-root किंकऱ्याप्रमाणे जमीनीत भोंक पाडीत घुसत जाणारे मूळ.
कंद Bulb कांद्यासारखे खोड.
कंदक Bulbil लहान कांदा.
कंटक कोष्ठ Thorn कांट्या सारखे खोड.
कंटकपर्ण Spine कांट्या सारखे पान.
कांडे Node ज्या जागेपासून पाने उगवतात ती जागा.
कडा Margin.
केंद्रबिंदु Nucleolus केंद्रांतील मध्य बिंदू.
कळी सोडणे Budding.
काष्ठ Xylem.
केशाकर्षक क्रिया Capillary action.

कारबन-संस्थापन Carbon-fixation.
    पारिभाषिक शब्दांचा कोश.    २१३
-----


केसर Filament.
केवल-पुंकेसर Staminate.
केवल-स्त्रीकेसर Pistillate.
कुर्णिका Disc.
कवच Testa.
किण्व Yeast.
कुवच Bark.

     ख.

खांचेदार Pitted खांचा असणारा.

     ग.

ग्रंथीकोष्ठ Tuber गठिीसारखे दिसणारे खोड.
गर्भकोश Embryo-Sac ज्यांत गर्भ असतो तो कोश.
गर्भ Embryo स्त्री पुरुष तत्वांचा संयोग होऊन गर्भ बनतो. गर्भ हा संकुचित स्थितीत असणारा रोपा आहे.
गर्भधारणा Fertilisation.
ग्रंथ्यतराल पदर Medullary ray मध्य रश्मी पदर ( पुष्कळ स्नेह्यांनी ग्रंथ्यंतराल पदरा ऐवजीं मध्य रश्मी पदर सुचविला आहे. हा शब्द पहिल्यापेक्षा चांगला आहे. )
गुच्छ Capitulum हा एक फुलांच्या मोहोराचा प्रकार आहे.

     छ.

छत्रस्तबक Umbel हा एक फुलांच्या मोहोराचा प्रकार आहे.

     ज.

जनन Germination उगवणे, बीज-जनन-बीज उगवणे अगर रुजणे.
जडस्थान Vacuole शून्य स्थान. जडस्थानांत सजीवतत्वाचा अभाव असतो पण त्यांत पेशी रस Cell-sap पूर्णपणे भरलेला असतो.
जोडीदार Pinnate जोड्या असलेले.

जडवे बांधणे Layering दाबाचे कलम करणे.

२१४     वनस्पतिविचार.
-----

     झ.

झुड Shirub लहान वृक्ष.
झुडुप Bush तुळशी सारखी लहान ठेंगणी झाडे.
झांकणी Cover slip.

     ड.

डोळे भरणे Budding चष्मे करणे, कळ्या फांदींत बसवून कलम करणे.

     त.

तरुण होणे Rejuvenescence.
तंतुकाष्ठ Phloem
तैलोत्पादक पिंड-तैल पिंड Oil gland.

     द.

द्विदली Dicotyledonous दोन डाळिंब्या असणारे.
द्विपाद Dichotomous हा एक फांदीचा प्रकार आहे.
द्विवर्षायु Biennial दोन ऋतू अथवा दोन वर्षे टिकणारे.
दुग्धरस Lates.
दुग्घरस वाहिनी Laticiferous vessel.
द्वार रक्षक पेशी--Guard-cell.
दाबाचे कलम करणे Layering जडवे बांधणे.

     ध.

धावती फांदी Runner हा एक फांदीचा प्रकार आहे.

     न.

नायट्रोजन युक्त पौष्टिक द्रव्ये Proteids ही द्रव्ये सात्विक द्रव्या प्रमाणें पौष्टिक असून त्यांत विशेष द्रव्य ‘ नायट्रोजन' हे आहे. सात्विक द्रव्यांत नायट्रोजन द्रव्यांचा अभाव असतो. पण ह्या ठिकाणीं सात्विक द्रव्याची सर्व मूलतत्वे असून नायट्रोजन, गंधक, व फॉस्फरस् हीं द्रव्यें विशेष आहेत.

निरिंद्रिय Inorganic जी द्रव्ये इंद्रियजन्य नव्हेत तीं. मीठ, सोरा, खडू, वगैरे द्रव्यें निरिंद्रिय आहेत. ह्यांची उत्पात अवयवा पासून होत नसते.

    पारिभाषिक शब्दांचा कोश.    २१५
-----

नियमित Definite ( मुख्य वाढीचे ) नियमन होणारे. हा एक मोहोर अथवा फांदीचा प्रकार आहे.
नियमित द्विपाद Dichassium मोहोर अथवा फांदी ह्यांचा एक प्रकार आहे.
नाळ Placenta.

     प.

पेशी Cell वनस्पति अगर प्राणी यांच्या शरीराचा एक सूक्ष्म घटक भाग.
प्रथम खोड Plumule पहिलें खोड, बीजांतून पहिला वर उगवणारा कोंब अथवा अंकुर.
पवनोपजीवी Aerial अगर Epiphytic हवेत लोंबणारी.
परान्न भक्षक Parasitic वृक्षादनि.
पेशी रस Cell-sap पेशींत आढळणारा रस.
पोटीं In the axil पानाचे पोटीं वगैरे, पोट अगर पुट म्हणजे पानाकडून स्कंदावर साधिलेला कोन.
पर्णकोष्ठ Phylloclade पानासारखें खोड.
पत्र Lamina देंठानंतर पानाचा पातळ भाग.
पेशीं भित्तिका Cell-wall पेशीचे वेष्टण.
पेशीजाल Tissue पेशीसमुचय.
पेशी--द्रव्ये Cell-contents पेशींतील द्रव्ये.
परागवाहिनी Style ज्या नळींतून पराग कण बीजाण्डाकडे जातात ती नळी.
परिवेष्टण पदर Periblem.
परिवर्तुळ पदर Pericycle.
पिंडजाल Glandular tissue.
पाचक रस enzime.
पेशीघटक द्रव्य Cellulose
पुष्प कोश Calyx हरित दल वर्तुल.
पुष्प मुकुट Corolla पीत दल वर्तुळ.

प्रत्युत्तर Response.

२१६     वनस्पतिविचार.
-----

पराग Pollen.
पराग पिटिका Anther
पुंकेसर Stamen.
पाकळी Petal पुष्प मुकुटाचा एक भाग.
परस्पर दलसंयोग Cohesion.
परस्पर वर्तुळसंयोग Adhesion.
पुंकोश Androecium.
पुष्पाधार Thalamns.
पुष्पपरिकोश Perianth.
पुष्पदंड Peduncle.
पदर भेदीद्वार Lenticel.
प्रथम काष्ठ Protoxylem.

     फ.

फाटे Cuttings कलमें.

     ब.

बीज छिद्र Micropyle बीजा वरील छिद्र.
बीजदल Cotyledon डाळिंबी.
बहुदली Poly-cotyledonous बीजांत पुष्कळ डाळिंब्या असणारे.
बुंधा Stem खोड.

बहुवर्षायु Perennial पुष्कळ वर्षे टिकणारे.
बाह्यत्वचा Epidermis बाहेरील कातडी.
बीजाण्ड Ovule गर्भधारणे नंतर ह्या पासून बीज तयार होते.
बाष्पीभवन 'Transpiration.
बहुस्तंभी Poly-stelic.
बहिवर्धिष्णु Exogenous.

बृहन्मंजिरी Corrymb हा एक मोहोराचा प्रकार आहे.

    पारिभाषिक शब्दांचा कोश.    २१७
-----
     भ.

भेड Pith.
भित्तिका Wall वेष्ठण.
भ्रामक Spurrious भ्रमदायक, खोटें.
भूछत्र Mushroom.

     म.

मगज वेष्ठित Albuminous गर्भासभोंवती मगज असणारें.
मूलावरण Root-Cap मुळावरील वेष्ठण.
मांसल मुळे Fleshy roots लबलबित मऊ मुळे.
मुगारा Bud कळी.
मूलकोष्ठ Root-stock मुळासारखे दिसणारे खोड.
मळसूत्राकृति Spiral फिरकीदार.
मध्य पदर Plerome.
मध्य रश्मीपद Medullary ray दोन ग्रंथी मध्ये असणारा पदर, ग्रंथ्यंतराल पदर.
मूल जनित शक्ति Root-pressure.
मध्यशीर Mid-rib पानांतील मोठी शीर.
मोहोर Inflorescence.
मंजिरी Raceme.

     ल.

लंबवर्धक पेशीजाल Prosenchyma.

     व.

वृक्ष Tree मोठे झाड.
वृक्षादनी Parasitic परान्न भक्षक, दुसऱ्या झाडावर उगवून त्यापासून अन्न शोषण करणारे.
वर्षायु Annual एक ऋतु अथवा एक वर्ष टिकणारे.

त्वक्कंटक Prickle त्वचेवरील कांटे

२१८     वनस्पतिविचार.
-----

वर्तुलाकृती Whorled
वलयाकृति Annnlar वळ्यासारखे.
वाहिनी Vessel रस ने आण करणारी नळी.
त्वचा पदर Dermatogen
वाहिनीमय ग्रंथी Vascular bundle.
वाहिनीमय ग्रंथी जाल Vascular tissue.
वस्तू आंबणे Fermentation फसफसणे आंबट होणे.
वळीं बांधणे Ring Budding.
त्वचा रंध्र Stoma
विघटी करण Decomposition.

     श.

शिरांची मांडणी Vanation.
शुभ्रवर्णी शरीर Leucoplasts पांढऱ्या रंगाचे शरीर.
श्वासोश्वास क्रिया Respiration
शिरा रज्जू Vein-strand.
शैवाळतंतू Spirogyra,

     स.

सजीव तत्व Protoplasm जीवन तत्व. हे तत्व प्रत्येक सजीव वस्तूत असते. वस्तूच्या जिवंत स्थितींत ह्या तत्वाचे रासायनिक पृथक्करण बरोबर रीतीनें करिता येत नाहीं. मृतस्थितीत कारबन, हायड्रोजन, आक्सिजन, नायट्रोजन, गंधक व फॉस्फरस, हीं मूलतत्वे त्यांत आढळतात.
सपुष्पवर्ग Phanerogam फुले दृश्य स्थितीत घारण करणारा वनस्पतींचा वर्ग. ह्याचे उलट ६ पुष्प विरहित ' 'Cryptogam ' म्हणून एक दुसरा वर्ग आहे. ह्या वर्गात फुले मोठी व डोळ्यांस सहज दिसण्याजोगीं असत नाहींत.

सत्व Starch गहू, ज्वारी वगैरे धान्यांत जो पिठूळ पदार्थ सांपडतो यास सत्व म्हणतात. सत्वाची मूलभूत द्रव्ये कारबन, हायड्रोजन व आक्सिजन हीं होत.
    पारिभाषिक शब्दांचा कोश.    २१९
-----


सात्मीकरण Assimilation स्वतःच्या शरीराप्रमाणे करणे. आत्मरूप देणे.
सेंद्रिय Organic इंद्रिय जन्य, अवयवापासून उत्पन्न झालेलें.
सात्विक पोषक अन्न Carbohydrates सत्वासारखी मूलभूत द्रव्ये असणारी अन्नें. सत्व, साखर, तेल, सेल्युलोज ( पेशी वेष्ठन द्रव्य ), इन्युलिन् वगैरे पदार्थ सात्विक पौष्टिक अन्नंच आहेत.
स्कंद Stem खोड.
सकंद कोष्ट Corm हा एक खोडाचा प्रकार आहे.
सूत्र काष्ठ Tendril सुताप्रमाणे दिसणारे खोड.
सूत्रपर्ण Tendril सुतासारखे पान.
साधे पान Simple leaf.
संयुक्त Compound संकीर्ण.
समांतर Parallel सारख्या अंतराचे.
समोरासमोर Opposite.
सम परिमाण पेशीजाल Parenchyma.
साल Cortex.
संवर्धक पदर Cambium.
स्तंभ Stele
समगामी पेशी Companion cell.
स्त्रीकेसर दल Carpel.
सांकळी Sepal हरित दल, पुष्प कोशाचा एक भाग.
स्फटिकमय Crystaline स्फटिकासारखे.
स्त्रीकोश Gynoecium.
स्त्रीकेसराग्र Stigma.
स्वस्तिकाकृति Cruciform
स्तंभ बाह्य Extra-stelar.
स्तंभांतरगत Intrastelar.
संयुक्त जाल Conjunctive tissue.

संयुक्त छत्रस्तबक Compound Umbel

२२०     वनस्पतिविचार.
-----

संयुक्त बृहन्मंजिरी Compound corymb.
संयुक्त मंजिरी Panicle, Compound Raceme.

     ह.

हरितवर्ण पदार्थ Chlorophyll हरितरंजक. ज्या पदार्थाने पानांस हिरवा रंग येतो तो पदार्थ. पुष्कळ ठिकाणीं हरितवर्ण पदार्थाचे जागी नुसता हरितवर्ण शब्द चुकून पडला आहे. कांहीं लोक हरितरंजक व हरितवर्ण पदार्थ हे दोन्ही शब्द सन्मानार्थी उपयोजितात.
हवेत लोंबणारी मुळे Aerial roots पवनोपजीवीं मुळे.
हस्तसादृश Palmate हातासारखा.
हरितवर्ण शरीर Chloroplast हिरव्या रंगाचे शरीर, हरितरंजीत शरीर.
हरितदल वर्तुल Calyx पुष्पकोश.
इरितदल Sepal सांकळी, पुष्पकोशाचा एक भाग.





---------------


शुद्धिपत्र
----------
पान प्यारा. ओळ अशुद्ध शुद्ध
केंद्रा सारिणी केंद्रोत्सारिणी
१३ शोधितां शोषितां
१२ Vacuols Vacuoles
१४ अन्न अग्र
१६ १० मिळविण्याची मिळण्याची
२० बिग्नोनिचा बिग्नोनिया
३१ उभें डोकें उभी डोकीं
३७ १० इंगाडारसिस् इंगाडलसिस्
३७ अकॅशिमा अकॅशिया
४० रुलिया रुबिया
४३ Carved Curved
४३ वनस्पती शब्द झाल्यावर एकदल वाचावा
४८ त्रिकोणी त्रिकोनी
५० कणसूक्ष्म सूक्ष्मकण
५१ २२ Chlorophll Chlorophyll
५२ १२ Slipr Slip
५४ पण ह्या शब्दापुढे 'ते' हा शब्द वाचावा
६० पेशीजात पेशीजाल
६४ अंतराल पदर ( Periblem ) परिवेष्टण पदर ( Periblem )
६४ १४ अंतराल पदर परिवेष्टण पदर
६८ Exodermis अंतरालत्वचा (Hypodermis) अधस्त्वचा
७० ग्रंथ्यंतरालपदर मध्यरश्मीपदर
७० Pleome Plerome
२      शुद्धिपत्र.
पान प्यारा. ओळ अशुद्ध शुद्ध
७० ग्रंथ्यंतरालपद मध्यरश्मीपदर
७२ Combium Cambium
७४ सूक्ष्मदर्शक यंत्रातून दर्शक••••• दर्शक शब्द
अधिक पडला आहे
७५ स्तंभ (Stete ) स्तंभ ( Stele )
७५ १४ Cnojunctive Conjunctive
७८ Bark ह्या शब्दापुढे कवच हा शब्द वाचावा
७९ ग्रंथ्यंतरालपदर मध्यरश्मीपदर
७९ अंतरालपदर मध्यरश्मीपदर
७९ अंतरालपदर मध्यरश्मीपदर
७९ अंतरालपदर मध्यरश्मीपदर
७९ अंतरालपदर मध्यरश्मीपदर
७९ अंतरालपदर मध्यरश्मीपदर
७९ १४ अंतरालपदर मध्यरश्मीपदर
८१ १२ अंतरालसंवर्धकपदर मध्यरश्मीसंवर्धकपदर
८३ अंतरालपदर मध्यरश्मीपदर
८४ अंतरालसंवर्धकपदर मध्यरश्मीसंवर्धकपदर
८५ १३ गडबडित खरबरित
८७ Combium Cambium
९७ विरोध विराधी
९९ आपल आपल्या
१०१ पेशीमध्ये पोकळ्या पेशीमध्य-पोकळ्या
१०९ Nucleius Nucleus
११० Plents Plants
११३ वळविलेली वळलेलीं
११३ परावर्तन त्याचे पृथक्करण
११३ " परावर्तनामुळे पृथक्करणामुळे
११३ " परावर्तन पृथक्करण

   शुद्धिपत्र.     
पान प्यारा. ओळ अशुद्ध शुद्ध
११४ * परावर्तन पावणाच्या पृथक्करण झालेल्या
११४ " ओळ शेवटची लहरीप्रमाणे लांब आखूड, वरील शब्द नको आहेत
११५ १८ बाह्यवस्तूंत बाह्यवस्तूंतून
११६ १३ खेन्द्रिय सेंद्रिय
११७ अडकवले अडकविले
१२० समपेशी परिमाणी समपरिमाण पेशीजालाचे
१२० ग्रंथ्यंतरालपदर मध्यरश्मीपदर
१२० ग्रंथ्यंतरालपदर मध्यरश्मीपदर
१२२ श्वास-क्रिया श्वासोच्छवास-क्रिया
१३० हरिद्वर्णक हरित्वर्ण पदार्थ
१३० Chlorfbyll Chlorophyll
१३० निघटीकरण विघटीकरण
१३१ म्यास त्यास
१३७ ' एक झाल्यावर ' ह्यापुढे एक असा शब्द वाचावा
१३८ बिग्रोनिया बिग्नोनिया
१४० Teudril Tendril
१४० उत्तेजनगति उत्तेजनगति
१४१ डुसरे दुसर
१४१ १० आमलाचा आम्लाचा
१४३ पेशीमित्तिका पेशीभित्तिका
१४३ अजूनि अजून
१४६ Androcium Androecium
१४६ स्त्रीकेसर-दल स्त्रीकेसर-दलें
१४६ Corpel Carpel
१४९ १२ म्हणन म्हणून
१५० १८ सुई रुई
१५२ पुष्पाकार पुष्पाधार
४      शुद्धिपत्र.
पान प्यारा. ओळ अशुद्ध शुद्ध
१५२ वाटोळ्या वाटोळा
१५७ १० वीज तजवीज
१६१ आंब्याचे हा शब्द चुकून प्रथम पडला आहे तो 'असतात' ह्या शब्दापुढे वाचावा
१६२ एकदांच एक खांच
१६२ Snyne Style
१६३ खण कण
१६३ अग्रवाटून अग्र वाढून
१६८ राहतात धरितात
१७१ embryose embryo-Sac
१७२ embryo-sae embryo-sac
१७२ केंद्राच्या केंद्राचा
१७४ आग्ररंध्रच बीजरंध्रच
१७६ द्वितीय द्वियक
१७६ गर्भाच गर्भाच्या
१७६ १४ अशक्य अवश्य
१७७ कास्पास् कॉस्मॉस्
१७८ लग्नाकडे अग्राकडे
१८९ २८ उपयोगीं शब्दापुढे ‘पडणाऱ्या ' हा शब्द वाचावा.

 सूचना:—सहज समजण्यासारख्या अशुद्ध शब्दांचा येथे समावेश केला नाहीं. वरील शुद्धीपत्राप्रमाणे प्रथम पुस्तक शुद्ध करून नंतर ते वाचावे, अशी वाचकवर्गास विनंति आहे.

---------------