वनस्पतिविचार/पुनरुत्पत्ति

प्रकरण २४ वें.
---------------
पुनरुत्पत्ति.
---------------

 वनस्पतिवर्गाची वंशपरंपरा चालू राखणे हे त्यांच्या आयुष्यक्रमांतील एक मोठे महत्त्वाचे कार्य असते. आपल्या चरित्रांतील संकटांचा विचार केला असतां वंश कायम राखण्यास किती अडचणी येतात, याची कल्पना सहज होईल. तसेच त्यांचा जीवनकलह मोठा प्रतिस्पर्धेचा असून, त्यांतून ज्या वनस्पति टिकतात, त्याच पुढे आपलें वंशवर्धन करू शकतात. शिवाय पूर्वी ज्या वनस्पति अस्तित्वात होत्या, त्या हल्ली दिसत नाहीत. पूर्वीच्या वनस्पतींना त्यांची परिस्थित प्रतिकूल होत गेल्यामुळे हळूहळू त्यांचा वंश अजिबात नाहीसा झाला म्हणजे परिस्थितीस योग्य व जीवनकलहांत हार न जाणाऱ्या वनस्पति केवळ अडचणी सोसूनही उत्पत्ति करू शकतात. उच्च प्राणी क्षुद्र प्राण्यास खाऊन


२०४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
टाकण्याची नेहमीं भीती असते. तसेंच सशक्त वनस्पति जीवनकलहांत क्षुद्रवनस्पतीस मागे टाकतात. सशक्त वनस्पतीसही वृक्षादनी ( Parastic ) क्षुद्रुवनस्पतिवगांकडून अथवा आळंबीवर्गाकडून भीति असते. लहान कीटक रोपे उगवतांना ते नाहींसे करून टाकतात. पुष्कळ प्राणी वनस्पतीस आपले भक्ष्य समजतात. इतक्या अडचणीमध्ये परिस्थित्यनुरूप ज्या वनस्पति वांचतील तेवढ्याच पुढे वंशवर्धन करितात. ' योग्यायोग्य ' व योग्याचीच संगोपना हीं तत्त्वें वनस्पतिजीवनोत्कांतीमध्येसुद्धा आढळतात.

 उत्पत्तिकार्य स्त्रीपुरुषसंयोगामुळे उत्पन्न होणाऱ्या बीजाकडून होते; अथवा क्षुद्रवर्गातील विशिष्ट जननपेशींकडून ( Spore ) होते. तसेच वनस्पतीच्या शरीरातील काही भागांकडून म्हणजे कलमादिकांकडून उत्पत्ति होते. दुसऱ्या दोन्ही प्रकारांत स्त्रीपुरुषतत्वसंयोगाची जरुरी नसते. एकंदरीत उत्पत्तिकार्य फार महत्त्वाचे असुन, जड़पदार्थ व सजीव पदार्थ ह्यांमध्ये स्पष्ट भेद दर्शविणारे परमेश्वरी सत्य आहे असे समजले पाहिजे. जड़पदार्थापासून कधीही उत्पत्ति होत नाही. पण सजीव पदार्थात ' उत्पत्ति ' हे अंतिम साध्य असते.

 कांहीं क्षुद्रवनस्पतींमध्ये उत्पत्तिकार्य साधे असते. किण्व ( Yeast ) वनस्पति एकपेशीमय असून ती वाढत वाढत मोठी होते, तिची एक बाजू ज्यास्त फुगून तीस दोन वाटोळ्या पेशींसारखा आकार येतो. हा आकार येणे म्हणजे उत्पत्तिकार्यास सुरुवात होणे होय. ही वाटोळी नवीन पेशी पूर्वीसारखी होऊन मूळ पेशीपासून अलग होते. वाढ व उत्पत्ति हीं सारखीच असतात, पण जेव्हां पेशी वेगळी होऊन स्वतंत्ररीतीने जीवनकार्ये करू लागते, तेव्हां उत्पत्ति झाली असे म्हणतात. कधी कधी ह्या वनस्पतींमध्ये सुद्धा स्त्रीपुरुषतत्वसंयोग होऊन उत्पत्तिकार्य घडत असते. पण अशी स्थिती विशेषेकरून पोषक द्रव्ये कमी असतांना दृष्टीस पडते. नाही तर साधारणपणे येथे ‘कळी सोडून ' च ( Budding ) उत्पत्तिकार्य घडते.

 प्लूरोकोकस ( Pleurococcus ) नांवाची एक हिरवळ एकपेशीमय वनस्पति आहे. तिचा जीवनक्रम किण्व ( Yeast ) वनस्पतीपेक्षा अगदी वेगळा असतो. हवेतून कॉर्बन वायु शोषण करण्याची शक्ति, हरितरंजकामुळे तिजमध्ये असते, येथे पेशीमध्यें, आडवा पडदा उत्पन्न होऊन एका पेशीचे

२४ वे ].    पुनरुत्पत्ति.    २०५
-----
दोन विभाग होतात, व पुढे याचप्रमाणे दोन्हींचे चार, चारांचे आठ, आठांचे सोळा असे ते वाढत जातात. तयार होणाऱ्या पेशींत मूळ पेशीप्रमाणे केंद्र व पेशीमय द्रव्येही आढळतात. ह्या पेशी कांहीं काल एकाच साधारण भित्तिकेंत राहून पुढे आपोआप वेगळ्या होऊन आपला स्वतंत्र व्यवहार सुरू करितात. येथे स्त्रीपुरुषतत्वसंयोगयुक्त उत्पत्ति आढळत नाहीं. ही वनस्पति हिरवळ शैवालवर्गांपैकी आहे.

 शैवालतंतूंत ( Spirogyra ) पुष्कळ पेशी एकास एक लागून त्यास सांखळीसारखा आकार येता. प्रत्येक पेशीत फिरकीदार हिरवे पट्टे असून, मधून मधून चमकणारी विशिष्ट जीवनशरीरें (Pyrenoids ) असतात. येथे उत्पत्तिकार्य स्त्रीपुरुषतत्त्वसंयोगजन्य असते. दोन विशिष्टतंतु एकमेकांजवळ असल्यास परस्पर पेशींत उत्पत्तिभावना सुरू होऊन, परस्पर पेशींतून नळ्यांसारखे रस्ते उत्पन्न होऊन एकमेकांस भिडतात. ह्या वेळेस एका पेशीतील सर्व पेशितत्वें संकुचित होऊन त्यांचा जणु गोळा बनतो. हा गोळा अथवा संकुचित जीवनभाग त्या रस्त्यांतून खाली जाऊन तेथील केंद्राशी संयोग पावतो. वरील पेशी त्या वेळेस अगदी रिकामी होते, व खालील पेशीत दोन्हींची पेशीद्रव्ये एकजीव होतात. येथेही पेशद्रव्यें गोळ्यासारखी दिसतात. गर्भीकृत भाग कांहीं वेळ विश्रांति घेऊन पुनः पूर्ववत वाढून त्यापासून धागे सुरू होतात. शैवालतंतूस दोन तंतूची जरूरी उत्पत्तिकार्यास लागते असे नाही, तर कधी कधी एकाच तंतूतील जवळच्या पेशीमध्ये हे स्त्रीपुरुषसंयोगकार्य घडते.

 शैवालतंतूंपैकी प्रत्येक पेशी खरोखर स्वतंत्र वनस्पति आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण तंतूच्या पेशी अलग अलग जरी केल्या, तरी त्यांपासून वाढ होते. तसेच प्रत्येक पेशी दुसऱ्या जवळच्या पेशीस कोणत्याही प्रकारची मदत करीत नसते. इतर बहुपेशीमय वनस्पतींत प्रत्येक पेशी सर्वसाधारण वनस्पतीच्या जीवनकार्याकरिता आपला सर्व व्यवहार करते. उच्च वनस्पतीमध्ये सर्व अवयवांचा उपयोग व्यक्तीच्या कल्याणाकरितां असतो. प्रत्येक अवयव स्वतंत्र कार्य करून त्याचा अंतिम हेतु एकजीवाप्रित्यर्थ असतो. ही गोष्ट शैवालतंतूंमध्ये विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. ह्याच वर्गात मात्र अशाच प्रकारच्या काहीं तंतुमय वनस्पति आहेत. 
२०६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
- दमट हवेमुळे उत्पन्न होणारी बुरशीसुद्धां आळंबी ( Fungus )वर्गापैकी आहे. हवेतून बुरशीच्या जननपेशी (Spore) नेहमीं उड़त असतात. योग्य दमट परिस्थिति मिळाली म्हणजे ताबडतोब त्यांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. हृळूहळू त्यांपासून पांढऱ्या नळ्या उत्पन्न होऊन पुढे त्यांचे एक जाळे बनते. ह्या जाळ्यांपैकी कांहीं नळ्या हवेत वाढून त्यांची अग्रे वाटोळी होतात. ह्या वाटोळ्या भागांत जीवनकण पुष्कळ जमून, त्यांपासून जीवनपेशी तयार होतात. योग्य वाढ होऊन पक्वस्थिति झाली असता त्यांची बाह्यभित्तिका फुटून आंतून शेकडों स्वतंत्र जननपेशी बाहेर पडतात. ह्या जननपेशी हवेतून उडू लागतात, व पुनः पूर्वीसारखी दमट परिस्थिति मिळाली असता त्यांची उत्पत्ति होते. ह्या उत्पत्तीमध्ये स्त्रीपुरुषत्वसंयोग होत नसतो; पण काही वेळा येथेही स्त्रीपुरुषतत्त्वसंयोग होऊन उत्पत्ति होते. बुरशीच्या दोन विशिष्ट नळ्या परस्पर भिडून त्यांतून जीवनतत्त्वें परस्परांशी संलग्न होतात. संलग्न होण्याचे पूर्वी नळ्यांचे अग्रांजवळ आडवा पडदा येऊन त्यांपासून संयोगपेशी तयार होते. ह्या संयोगपेत जीवनकण एके जागी साठून पडदा आल्यामुळे ते कण दुसरे जागी जाण्याची भीति नसते. पेशींचा बाह्य पडदा फुटून एकांतून सर्व जीवनकण दुसऱ्यांत शिरून तेथील कणांशी संयोग पावतात. ह्या वेळेस त्या नळ्यांचा इतर भाग रिकामा असून, फक्त संयुक्त झालेल्या पेशींतच द्रव्याचा भरणा होतो, व त्या भागास काळसर रंग येतो. कांहीं काल ह्या मुग्ध दशेंत ती पेशी राहून पुढे आपोआप तिची बाह्य कवची फुटून आतील गर्भ वाढू लागतो, उगवल्यावर पुनः त्यावर जीवनपेशी तयार होतात. ह्या वेळेस बुरशीचे तंतुमय शरीर जाळीदार बनत नाही. ह्या संयोगांत दोन्ही संयोगपेशींतील तत्वे एकाच प्रकारची असून त्यांत स्त्री व पुरुष असा भिन्नभाव नसतो.  कधी कधी प्रथम वनस्पतीची उत्पात्त जननपेशी (Spore ) पासून होऊन पुढे कांहीं कालाने त्याच वनस्पतीत संयोगास योग्य अशी अवयवें उत्पन्न होतात. अवयवें एकत्र येऊन आंतील संयोगतत्वांचा एकजीव होतो व त्या एकजीव झालेल्या वर्गापासून पुनः पूर्ववत् वनस्पति उत्पन्न होते. म्हणजे एका वनस्पतीचे जीवनचरित्रांत कांहीं साध्या जननपेशी ( Spore ) पासून उत्पत्ति व पुढे स्त्रीपुरुषतत्व संयोगउत्पत्ति अशा दोन्ही तऱ्हा आढळतात. असला मिश्र प्रकार दुय्यम प्रकारच्या शैवालवर्गांत नेहमी आढळतो.
२४ वे ].    पुनरुत्पत्ति.    २०७
-----
कळी सोडणे ( Budding), पेशीविभाग ( Cell-Division), स्वतंत्र पेशी घटना ( Free-cellformation), स्त्री-पुरुषतत्वसंयोग ( conjungation ), अथवा तरुणावस्था (Rejuvenescence ), वगैरे प्रकार उत्पत्तिसंबंधी पूर्वी सांगितलेच आहेत.

 फर्न नांवाच्या वनस्पतीची पाने तपासून पाहिली असतां, पानाच्या खालील पृष्ठभागांवर फोडांसारखे लहान फुगवटे आढळतात. फुगवट्यांचे बाह्यावरण काढिले असतां आंत जननपेशींचे ( Spore ) पुष्कळ समुदाय अथवा संघ सांपडतात. येथील जननपेशी ( Spores ) भुरक्या रंगाच्या असतात. जननपेशी जमिनीवर पडून योग्य परिस्थिति असल्यास उगवू लागते. ही उगवती पूर्वस्थिति (Prothallas ) अस्पष्ट असून जमिनीबाहेर कळण्यासारखी नसते, ह्या स्थितीत पाने वगैरे असत नाहींत. वरील भाग हिरवा असून, खालील भागांवर लहान लहान मुळ्या येतात. मुळयांकडून अन्नद्रव्ये शोषण होऊन वरील हिरव्या शरीरामुळे कार्बनसंस्थापन व सेंद्रिय अन्न तयार करण्याची तजवीज होते. पुढे काही दिवसांनी ह्या फर्नच्या पूर्वशरीरांवर स्त्रीपुरुषव्यंजक अवयवें उत्पन्न होऊन त्यांतील तत्त्वे परस्पर मिलाफ पावतात. संयोग झाल्यावर जमिनीवर फर्नचा रोपा दिसू लागतो. रोग्यास पूर्ववत् पाने येऊन पानांचे मागे वरील फुगवटे येतात, म्हणजे फर्न वनस्पतीच्या आयुष्यक्रमांत स्पष्ट व अस्पष्ट अशी दोन स्थित्यंतरे आढळतात.

 बीजस्थिति फर्न वनस्पतीमध्ये असत नाही; पण तात्त्विकदृष्टया विचार केला असतां फर्नची जमिनीवरील हिरवी स्थिति ही बीजस्थिति म्हणण्यात हरकत नाहीं. संयोगानंतर बीजस्थिति उत्पन्न होत असते, तद्वतच फर्नच्या अस्पष्ट स्थितीवर (Prothallus ) दोन अवयवें उत्पन्न होऊन त्यांतील जननतत्वांचा संयोग झाल्यानंतर फर्न वनस्पतीस ही बाह्य हिरवी स्थिती मिळते. ह्याच स्थितीत संकीर्ण रचना सुरू होते. बीजे म्हणजे छोटी मुग्ध स्थितीतील झाडे होत, बीजांमध्ये बीजदलें, आदिमूळ, प्रथम कोंब असतात, म्हणूनच बीजे व फुले येण्याचे पूर्वीची झाडे ह्यांत फरक कांहीं नसून, फक्त लहान मोठ्या आकारांमुळे त्यांस भिन्नत्व आले आहे. अस्पष्ट स्थितीतील येणारी अवयवें वेगळी असून, त्यांतील जननतत्व आपली मूळ जागा सोडून पाण्याचे साहा
२०८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
य्याने पहिल्या जननतत्वापाशी येते. तेथे एकत्र आल्यावर त्यांचा परस्पर एकजीव होतो. दुसऱ्या जननतत्त्वास आकर्षण करण्यास पहिल्या अवयवांत सांखरेची सांठवण असते. निरनिराळ्या वनस्पतींमध्ये आकर्षक द्रव्ये वेगवेगळी असतात. मॅलिकआम्ल, पातळ डिंक, वगैरे द्रव्ये आकर्षक आहेत.

 फर्नहून उच्चवर्गीय स्थिति म्हणजे पुष्पवर्गाची होय. पैकी बहुदलवनस्पति हीं पुष्पविहित व संपुष्पवर्ग ह्यांची सांगड घालणारी मधली साखळी आहे. ह्या वर्गात जननेंद्रियें उच्चवर्गीय असून, कांहीं लक्षणांत पुष्पाविरहिताप्रमाणे त्यांची स्थिति असते. फर्नमध्ये पुरुषजननतत्व पाण्यातून स्वीतत्त्वाकडे जाऊन गर्भसंस्थापना होते. एकदल व द्विदलवनस्पति ह्यांहून वरच्या दर्जाच्या आहेत. त्यांत बीजोत्पादन नेहमी होऊन त्यांचेच योगाने वंशपरंपरा राखिली जाते. बीज दोन परस्पर भिन्नतत्त्वांचा मिलाफ होऊन तयार होते. ती तत्त्वें स्त्री व पुरुष असून त्यांचा संयोग म्हणजे गर्भधारणा होय. गर्भधारणा झाल्यावर बीजाण्डास बीजस्वरूप प्राप्त होते. गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्री व पुरुषजननपेशी दोन्हीही आपआपल्यापरी संयोगासंबंधी तयारी करीत असतात. बीजाण्डांतील गर्भकोशांत केंद्रविभाग होऊन मुख्य गर्भाण्ड उत्पन्न होते, परागकण परागवाहिनीतून बीजाण्डांत शिरतात, परागकणांची नळी आंत तयार होत असते. वास्तविक नळी उत्पन्न होणे ही पूर्वतयारी आहे. नळीमध्ये खरे पुरुषजननतत्त्व असते. गर्भ कोशांत ( Embryosac ) आल्यावर पुरुषतत्त्व, केंद्राचे दोन विभाग होऊन एक गर्भाण्डाशी संयोग पावते, व दुसरे खालीं असणाऱ्या द्वितीयक केंद्रांशी ( Secondary nucleus ) मिळते. बीजदलें, उगवते कोंब, ह्यांचा गर्भामध्ये अंतरभाव होतो. द्वितीयक अथवा पौष्टिक केंद्रापासून बीजान्न तयार होते. पुष्कळ वेळां ते अन्न् बीजदलां ( Coty-ledon ) मध्ये शोषिलें जाऊन तेथे सांठविले जाते; पण कांहीं ठिकाणीं बीजदलांबाहेर अथवा गर्भाबाहेर अन्नाचा थर राहतो. असल्या बीजांस मगजवेष्टित बीजें म्हणतात, व पहिल्यास मगजविरहित बीजें असे नांव आहे.

 जसे फर्नच्या अस्पष्ट उगवत्या ( Prothallus ) स्थितीत दोन अवयवे उत्पन्न होऊन प्रत्येकांत निराळे जननतत्व आढळते, त्याचप्रमाणे सपुष्पवर्गाच्या परागकणांत व अण्डांंत प्रत्येक निराळी जननतत्त्वे असतात. जसा परागकण अगर बीजाण्ड उत्पत्तीस कारणीभूत असते, त्याचप्रमाणे फर्नचा



२४ वे ].    पुनरुत्पत्ति.    २०९
-----
भुरका कण उत्पत्तीस कारण होतो; संयोगापूर्वी परागकण अथवा बीजाण्डांतील गर्भकोश आपआपल्यापरी उगवून वाढू लागतात. परागकणांपासून परागकण नलिका तयार होऊन त्यांत पुरुषतत्त्व उत्पन्न होते व गर्भकोश उगवून त्यांत गर्भाण्ड उत्पन्न होते, तसेच फर्नच्या भुकटीचा कण उगवून फर्नची पूर्व अस्पष्ट स्थिति उत्पन्न होते व त्यावर स्त्री व पुरुषव्यंजक अवयवें उत्पन्न होतात. स्त्री व पुरुष तत्त्वे उत्पन्न होण्यापूर्वी जशी फर्नच्या कणापासून अस्पष्ट स्थिति उत्पन्न होते, त्याप्रमाणे उच्चवर्गातसुद्धां जननपेशीं (Spore ) उगवून अस्पष्ट स्थिति तयार होते. परागकणनलिका ही पुरुषतत्व येण्यापूर्वीची अस्पष्ट स्थिति आहे. म्हणजे बीजोत्पादन होण्यापूर्वी जननपेशीची दोन स्थित्यंतरे होतात, हीं स्थित्यंतरें वनस्पतीच्या एकजीवनक्रमांत होत असतात, हे विशेष आहे.

 जेव्हां जननतत्त्वे भिन्न स्वभावाची आहेत असे सांगता येत नाही, अशा वेळेस त्यांच्या मिलाफास केवळ ' संयोग ' ( Conjugation ) हा शब्द योजितात. पण जेव्हा ती तत्त्वें स्त्री व पुरुष अशी भिन्न असून त्यांचा मिलाफ होतो, त्यास गर्भधारणा अगर गर्भसंस्थापना ( Fertilisation ) हा शब्द लाविला जातो. बुरशी, शैवालतंतु, वगैरेमध्ये जन्नतत्त्वांचा संयोग (Conjugation ) होतो; पण आंबा, फणस, गहूं वगैरे उच्चवर्गामध्यें, जननतत्वे एकजीव होऊन गर्भसंस्थापना ( Fertilisation ) होते.

 उच्चवर्गात जेव्हा एका फुलांत दोन्ही स्त्री व पुरुष अवयवे आढळत नाहींत. फक्त एकच स्त्री अगर पुरुष अवयव असते, अशा ठिकाणी त्या स्त्री-अवयवांचा दुसरीकडून परागकण मिळाल्याखेरीज कांहीं फायदा नसतो. जसा केवल स्त्रीअवयवांचा अशा ठिकाणी उपयोग नसतो, त्याप्रमाणे केवल परागकणांचा कोणी तरी उपयोग करून घेतल्याशिवाय त्यांचा असून नसून कांहीं फायदा नाही. म्हणून केवळ स्त्री-केसर फुलें, केवळ पुंकेसर फुलांचा नेहमी उपभोग करून घेत असतात. कांहीं फुलांत स्त्री व पुरुष अवयवे एके जागी असूनसुद्धां तीं परस्पर फायदा करून घेत नाहीत. त्यांतील बीजाण्डास दुसऱ्या फुलांतील परागकण ज्यास्त सुखकर वाटतात. त्यापासून उत्पन्न होणारे बीज अधिक पुष्ट व सुंदर असते. फुलांतील पुंकेसरदलें कापून जर दुसऱ्या चांगल्या सजातीय फुलांतील 
२१०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
परागकण आणून पहिल्या बीजाण्डास दिले, तर त्या कणांचा उत्तम उपयोग होऊन त्यांपासून बीजें सुधारत जातील, व वरील प्रयत्नाने रोगांस न हार जाणाऱ्या वनस्पति तयार करता येतील.

 परागकण कृत्रिम रीतीनें परस्पर एकत्र आणण्याऐवजी आपोआप त्यांची नैसर्गिक व्यवस्था होते, व त्या योगाने एका फुलांतील परागकण दुसऱ्या फुलांकडे पोहोंचविले जातात. असल्या फुलांत जरूरीपेक्षा जास्त परागभुकटी असते. कारण वाऱ्याने ती उडून निरुपयोगी होण्याचा संभव असतो. ही उणीव भरून काढण्याकरितां निसर्गदेवतेने अशा फुलांत पुष्कळ परागकणांचा परागपीटिकेंत सांठा ठेविला असतो. वाऱ्याप्रमाणेच किडे, कीटक अथवा मधमाशा पराग पोहोचविण्याचे काम करीत असतात. अशा वेळेस फुलांतील रचना मनोवेधक व दिखाऊ असते. पांकळ्यांस निरनिराळे रंग असून कधी कधी त्यांस उत्तम सुवासही येत असतो. पुंकेसरांची ठेवण वर बसणाऱ्या किड्यांच्या सोयीनुरूप बनली असते. तसेच मध उत्पन्न करणारे पिंड पाकळ्यांच्या बुडाशी असतात. माशा अगर कीटक मध पिण्याकरिता फुलांत घुसून त्यांचे शरीर परागधुळीने भरून जाते. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर माशा जात येत असल्यामुळे केवळ स्त्रीफुलांस परागकण मिळून त्यांचे गर्भसंस्थापनेचे काम होते.

 कित्येक फुलांत पुंकेसरदलें अति लांब अगर अति आखूड असल्यामुळे अथवा परागवाहिनी ज्यास्त वाढून पुंकेसरदलांच्या आटोक्याबाहेर असेल, तर तेथील बीजाण्डास दुसरीकडील परागकणांवर अवलंबून रहावे लागते. पाण्याचे कांठी उगवणाऱ्या झाडांच्या फुलांचें गर्भीकरण पुष्कळ वेळा पाण्यातून वाहत येणाऱ्या परागकणांकडून होत असते. कांठावरील फुलांतून परागकण पाण्यात पडून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाटू लागतो व जेथे त्याच जातीची केवल स्त्रीकेसर फुलें असतील, त्यांस त्यांचा उपयोग होत असतो. एकंदरीत निसर्ग तजवीज असल्यामुळे पुष्कळ फुलांचे गर्भसंस्थापन होऊन त्यांपासून बीजोत्पादन होते. नाहीतर सर्व केवल स्त्रीकेसर फुलें बीजोत्पादनाशिवाय सुकून जाती. तसेच केवल पुंकेसर फुलांतील परागकण वाया गेले असते, व त्यामुळे वंशवर्धनास बराच आळा पडला असता.

समाप्त.