या प्रकल्पाच्या प्रगतीसाठी स्थानिक पातळीवर काही अधिकारांची आवश्यकता सतत लागेल, नविन सदस्य येत राहतील आणि जुने नव नविन गोष्टी शिकत राहातील, त्यामुळे सध्या एकतर साधा सदस्य आणि त्यापुढे एकदम प्रचालक अधिकार अशी दरी निर्माण होते. ही दरी घालवण्यासाठी आणि नविन सदस्यांना तसेच जुन्या सदस्यांना प्रचालक अधिकारातील काही भाग वेगळे काढून जसे इतर अनेक विकींवर केले जाते तसेच, चार पाच अधिकार संचाच्या रुपात तोडून देण्यात यावे असा या धोरणाचा हेतू आहे. यातील खाते विकसक आणि पेट्रोलर सर्व जुन्या मराठी सदस्यांना भरपूर उपयोगाचे ठरतील. शिवाय साचे संपादक अधिकारातून आपल्याला साचे व अनेक पाने जी प्रचालकांसाठी सुरक्षित केलेली आहेत ती संपादीत करता येतील. त्यामुळे मुख्य पानासकट अनेक पाने जी‌ संरक्षित आहेत त्यांना अद्यतनीत करायाला प्रचालकाची गरज भासणार नाही. स्थानिक पातळीवर ती कामे करू शकणारे सदस्य असू शकतील. शिवाय आयातदार अधिकारही वापरून अनेकदा अडकलेली कामे, साचे, पाने नव्याने आणून पुढे नेता येतील.

अधिकार आवशक्यता
अधिकार तांत्रिक अधिकार कामाचे स्वरुप पात्रता अपात्रता
साचे संपादक विकिस्रोत:Template editors

Edit protected templates (templateeditor) Edit the content model of a page (editcontentmodel) Enable two-factor authentication (oathauth-enable) Override the disallowed titles or usernames list (tboverride)

फ़क्त प्रचालकास अनुमती असलेले साचे संपादन करण्याचे अधिकार, मुख्य पान आणि संरक्षित साचे इतर सदस्यांना संपादित करता येतील अशी व्यवस्था.
  • २००० पेक्षा जास्त संपादने असलेल्या कोणत्याही सदस्यास हे अधिकार दोन सक्रिय सदस्यांच्या पाठींब्याने दिले जातील. (कमीत कमी 1500 पेक्षा जास्त संपादने असलेल्या योग्य सदस्यास) किंवा इतर प्रकल्पांवर समान अधिकार असणाऱ्या होतकरू सदस्यांना कमी संपादने असतानाही हे अधिकार काही काळासाठी दिले जाऊ शकतात
  • समुदायाच्या विनंतीवरून, दोनापेक्षा जास्त सक्रिय सदस्यांच्या विनंतीवरून व गैरवापर, उत्पात झाल्याचे सिद्ध झाल्यास.
पेट्रोलर विकिस्रोत:Patrollers

Have one's own edits automatically marked as patrolled (autopatrol) Mark others' edits as patrolled (patrol) Not create redirects from source pages when moving pages (suppressredirect) Quickly rollback the edits of the last user who edited a particular page (rollback)

दुसऱ्याची संपादने आणि स्वत:ची संपादने तपासण्याचे अधिकार, इतरांची संपादने उलटवण्याचे अधिकार, तसेच स्वतची संपादने तपासली गेली आहेत असे नोंदवले जाईल.
  • २००० पेक्षा जास्त संपादने असलेल्या आणि उत्पात, प्रताधिकार, विकीच्या मुलभूत ध्येयधोरणांची जाण असलेल्या कोणत्याही सदस्यास दोनापेक्षा जास्त सक्रिय सदस्यांचा दिले जाऊ शकतात. (कमीत कमी 1500 पेक्षा जास्त संपादने असलेल्या योग्य सदस्यास) किंवा इतर प्रकल्पांवर समान अधिकार असणाऱ्या होतकरू सदस्यांना कमी संपादने असतानाही हे अधिकार काही काळासाठी दिले जाऊ शकतात
  • समुदायाच्या विनंतीवरून, दोनापेक्षा जास्त सक्रिय सदस्यांच्या विनंतीवरून व गैरवापर, उत्पात झाल्याचे सिद्ध झाल्यास.