विकिस्रोत:मदतकेंद्र
मराठी विकीस्त्रोत
संपादनमराठी विकीस्रोतसाठी मदतीचे आवाहन
- मराठी विकिस्रोत हा बंधूप्रकल्प येथे निर्मित केला जात आहे. येथे यासाठी किमान चाळीस ऑनलाइन स्वयंसेवक मराठी मावळ्यांची गरज आहे.
- मराठी विकिस्रोत हा बंधूप्रकल्प संस्कृत विकिस्रोताप्रमाणे स्वतंत्र अस्तित्वात उपलब्ध होण्या करीता/ अस्तीत्वात येण्याकरता करीता १, २, ३,४ या याद्यातील अनुवाद महिनाभरात पूर्ण करून हवे आहेत; कृपया अनुवादांचे काम पूर्ण होई पर्यंत अनुवाद सहभाग चालू ठेवावा.सोबतच कॉपीराइट फ्री अधिकाधीक मूळ मराठी ग्रंथ युनिकोडात या प्रकल्पात उपलब्ध करावेत.
List of Online Resources
संपादन१) http://www.new.dli.ernet.in/ 2) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html ३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html ४) http://sanskritdocuments.org/scannedbooks 5) Modi documents 6) [१]
मराठी विकिस्रोत स्वॉट SWOT analysis
संपादनवैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
वैशिष्ट्य | ऊपयोग | *ऑनलाईन पॉवरपॉईंट सादरीकरण पहा |
- सामर्थ्य
- दुर्बलता
- संधी
- जोखीम
परिघ आणि मर्यादा/स्कोप आणि लिमीटेशन्स
संपादनगट
संपादन- विकिस्रोत लोगोचे मराठीकरण
- टेम्प्लेट सपोर्ट
- हेल्प पेजेस आणि प्रेझंटेशन्स ची इंग्रजी विकिस्रोतातून अनुवाद
- हेल्प पेजेस आणि प्रेझंटेशन्स ची नव निर्मिती
- मुखपृष्ठ, सुची आणि दालनांची निर्मिती
- ऑफलाईन कंटेंट सपोर्ट:कंटेंट मिळवण्याकरिता संपर्क करणे , कॉपीराईट्मुक्ततेची छाननी अथवा कन्फरमेशन्स मिळवणे, कंटेंट आणणे कंटेंट चढवणे
- ऑनलाईन युनिकोडात नसलेला कंटेंट टाईप करवून घेणे
- ऑनलाईन विकिस्रोत धोरणांनुसार कंटेंटची सफाई आणि नीट लावणे वर्गीकरण इत्यादी
- ऑनलाईन विकिपीडिया आणि विकिबुक्स तसेच इतर विकिस्रोत प्रकल्पांशी दुवे
करावयाच्या गोष्टी
संपादन- करावयाच्या गोष्टींची यादी
- ऑनलाईन
हवे असलेले ग्रंथ हवे असलेले लेखक
- ऑफलाईन
करावयाचे अनुवाद
संपादनइंग्रजी विकिपीडिया ते मराठी विकिपीडिया Wikisource, Digital_library,Free content, Source_text,Wikipedia:Wikisource,Template:Cite wikisource,Wikipedia:WikiProject Wikisource
इंग्रजी विकिस्रोत ते मराठी विकिस्रोत Help:Contents ,Wikisource:Protection policy,Wikisource:Copyright policy,Help:Public domain,Wikisource:Possible copyright violations
हवे असलेले ग्रंथ
संपादन- हवे असलेलेविकिस्त्रोतःसमस्त लेखक
- हवे असलेले विकिस्त्रोतःसर्वग्रंथ
समस्त लेखक
संपादनमराठी लेखकांची यादी समस्त लेखक येथे तयार करत आहे. सध्या अकारविल्हे क्रमानुसार नाही, ते नंतर करता येईल. सुसुत्रितपणासाठी इथल्या प्रथेप्रमाणे Author: हा प्रत्यय जोडत आहे. स्वतंत्र मराठी डोमेन झाल्यावर त्यास लेखक/लेखिका वगैरे करता येईल, पण त्यावर चर्चा करावी लागेल. १९५२ पुर्वी मृत्यु पावलेल्या लेखकांचे बहुतेक सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त आहे, त्यामुळे आपणांस माहित असलेल्या अशा लेखकांची नावे त्या यादीत जोडता आली तर बघावीत. तद्नंतर हयात असलेल्या लेखकांची नावे सध्याच जोडण्यात काही अर्थ नाही, त्यांचे साहित्य प्रताधिकारमुक्त असणार नाहीच,त्याबाबत आधीपासुनच स्ट्रीक्ट असलेले बरे, नाहीतर पुन्हा साफसफाईत बराच वेळ व शक्ती वाया जाते.
तांत्रिक बाबतीत (भाषांतर वगैरे) काही जनांचे योगदान दिसत आहे, साहित्य जोडण्यात कुणी मिळेल का ते बघावे. देवनागरी लिपीसाठी OCR कितपत काम करते याची मला माहिती नाही, तरीही ज्यांच्याकडे स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध आहे अश्यांनी जुनी पुस्तके स्कॅन केलीत तर इतर सदस्य टाईप करू शकतात. आपणांस दिवसाला एक पान टाईप करणारे आठदहा सदस्य मिळाले तरी सुरु करायला भरपूर होईल. आपल्याकडे अकराव्या-बाराव्या शतकापासून १९५२ पर्यंतचे अमाप साहित्य उपलब्ध आहे, पण ते कसे आणि कितपत उपलब्ध होईल ते पहावे लागेल. साहित्याशिवाय विकिस्त्रोत होणे शक्य नाही. आपले मत कळवावे. Ganesh Dhamodkar 14:25, 31 December 2011 (UTC)
- देवनागरी लिपीसाठी OCR सध्यातरी वापरण्याच्या स्थितीपर्यंत आलेला नाही(इश्वर करो तेही व्हावे) .बाकी आपल्या वरील सर्वच मतांशी सहमत.
- साहित्य मिळवणे , स्कॅन करणे आणि आंतरजालावर चढवणे , तीसरे टाईपकरणे अशा तीनह गटात स्वयंसेवकांची आवश्यकता असेल.
>>मराठी लेखकांची यादी समस्त लेखक येथे तयार करत आहे.
- हि अत्यंत स्तुत्य सुरवात केलीत . सोबत मृत्यूचे वर्षाचा कॉलम जोडावा किंवा कसे म्हणजे खातरजमा करणे सोपे होईल.
Mahitgar 03:30, 1 January 2012 (UTC)
- लेखकांच्या नावासमोर कंसामध्ये जन्मवर्ष व मृत्युवर्ष जोडले आहेत. आपली यादी ही अजून अंतीम नाही, किंबहुना ती कधीच संपुर्ण नसेल, त्यामुळे ती कॉलममध्ये करणे जरा किचकट होईल. त्यापेक्षा कंसात वर्ष टाकून कुठल्यातरी मार्गाने जर ही यादी अकारादि क्रमाने करता आली तर ती कायमस्वरुपी योजना होईल. याबाबत वर्गवारी, defaultsort वगैरे चा वापर करून जाणकार मंडळी ते करू शकतील असे वाटते.
- मागेपुढे हे पान समस्त लेखक वरून विकिस्त्रोतःसमस्त लेखक इथे हलवावे लागेल असे वाटते.
- या यादीमध्ये शक्य तितकी नावे जोडण्याचा प्रयत्न या टप्प्यावर करता येईल, त्यानंतर त्यात वार्षिक भर पडत जाईल.
- या यादीतील लेखकांची नावे पाहुनच कल्पना येते की यांचे साहित्य फार दुर्मिळ असेल. कित्येकांच्या आता आवृत्त्याही निघत नसतील. त्यामुळे हे साहित्य मिळवणे फारच कठीण काम आहे. अशा परिस्थितीत यापैकी एखादे पुस्तक मिळाल्यास शक्यतोवर त्यास स्कॅन करूनच टाकावे. टाईप करायचे नंतर करता येईल. विकिस्त्रोताचा हाच उद्देश आहे की एका प्रतीच्या हजार प्रती व्हाव्यात आणि या साधनांचा दुष्काळ राहू नये. त्या दृष्टीने हे विश्वकोष लिहिण्यापेक्षाही महत्वाचे काम आहे. हवी असलेली माहिती एकदा इंग्रजीतही मिळवता येईल, पण मुळ स्त्रोत साहित्य मात्र अस्सल तेच हवे. स्कॅनर हा प्रकारही कित्येकांकडे उपलब्ध नाही (उदा. मी), त्या बाबतीत एकमेकांचे ऑफलाईन साहाय्य घेता येईल किंवा कसे तेही पहावे लागेल.
- अजून कित्येक कल्पना निघतील. बघुया कितपत जमते ते. आपली मते व नवनवीन कल्पना मांडाव्यात.
Requesting help
संपादननमस्कार, मी भाषांतर प्रकल्पासाठी काम करू इच्छितो. कृपया मला किमान इतके सांगा कि काय भाषांतर करायचे आहे. मी या प्रकल्पासाठी आर्थिक मदत सुद्धा करू इच्छितो. आणि एक विनंती अशी आहे कि नवीन सदस्याला, जो मावळा किंवा स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छितो, त्याला नक्की काय करायचे आहे ते पटकन कळू द्या, मला १५ मिनिटे लागली हे शोधायला. User:मनोज कुंभकर्ण चे संपादन
- नमस्कार मनोज,
>>जो मावळा किंवा स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छितो, त्याला नक्की काय करायचे आहे ते पटकन कळू द्या, मला १५ मिनिटे लागली हे शोधायला.
- खरे आहे. अजूनही बहुसंख्य सहाय्य पाने उपलब्ध नाहीत. प्रकल्पाचे स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीने http://en.wikisource.org या इंग्रजी,जर्मन,संस्कृत इत्यादी विकिस्रोत प्रकल्पासही भेट देऊन पहावी.अर्थात इंग्रजी विकिस्रोताचे सर्व नियम मराठी प्रकल्पात जसेच्या तसे लागू झाले पाहिजेत असे नाही पण मूळ गाभा जपणे अभिप्रेत आहे.
>>भाषांतर प्रकल्पासाठी काम करू इच्छितो.
- विकिस्रोत:अनुवाद भाषांतर प्रकल्पाचे दोन भाग आगे पहिला भाग इंग्रजी विकिस्रोतावरील सहाय्य पानांचा मराठी अनुवाद करणे .
- दुसरा भाग इतर भाषी विकिस्रोत प्रक्ल्पातून उपलब्ध इतर भाषी साहित्याचे मराठी अनुवाद.उदाहरणा दाखल यात आपण इंग्रजी विकिस्रोतावरील शेक्सपियर अथवा संस्कृत विकिस्रोतावरील कालिदासाच्या ग्रंथाचेही अनुवाद करण्यास घेऊ शकता अर्थात अगदीच एवढे हायफाय जाण्याची आवश्यकता आहे असेही नाही इतर विषयातील ग्रंथांचाही उपयोग करू शकाल.
- ग्रंथ भाषांतरातील प्राथमिकता म्हणालतर माझ्या दृष्टीने व्याकरण आणि भाषाशास्त्रा संबधित ग्रंथ,विज्ञान .तंत्रज्ञान ,अभियांत्रिकी, साहित्य क्षेत्राशी संबधीत अनुवादात रस असेल तर नाटय क्षेत्रातील अनुवादांना प्राधान्य दिल्यास अनुवाद करताना रसास्वादाचा आनंदही मिळेल सोबत व्यक्तिगत पातलीवर कमर्शियल जगतातील सबटायटलिंग इत्यादी क्षेत्रातील अनुवादाच्या संधी सुलभ होतील सोबत नकळत मराठी भाषा तंत्रज्ञानालाही हातभार लागेल. आपले येथे होणारे सर्व लेखन प्रताधिकारमुक्तस्वरूपात होते याची नोंद घ्यावी.
मदत
संपादनमला विकिस्रोतामध्ये मदत करायची आहे.मार्गदर्शन करावे ही विनंती. --SANKET SANJAY PATIL 17:52, 7 February 2012 (UTC)
- नमस्कार संकेत ,
- उत्तर देण्यात विलंबाबद्दल क्षमस्व.आपण या प्रकल्पाकरिता आपली आवड आणि सवड यानुसार अनेक पातळींवर काम करू शकता.
बहुधा आपल्याला कल्पना असेल मराठी प्रकाशन व्यवसायात एखाद्या पुस्तकाच्या २००० प्रती खपल्यातरी डोक्यावरून पाणि गेले असे समजले जाते. अती लोकप्रीय पुस्तकाची ३ पुर्नमुद्रणे झालीतरी ६००० एक पुस्तक ऍव्हरेज दहा माणसांनी वाचलतरी एका मराठी पुस्तकाची वाचक संख्या साठ हजारांच्या पलिकडे जात नाही. ईंटरनेटच्या माध्यमातून त्याच कलाकृतीस कोटीहून अधिक वाचक प्राप्त होण्याची सहज संधी प्राप्त होऊ शकते. अर्थात हे करताना विकिस्रोत स्वतःचे लेखन प्रकाशित करावयाचा ब्लॉग नाही.येथे आणावयाचे लेखन पूर्व प्रकाशित असणे आणि कॉपीराईट फ्री असणे अभिप्रेत असते या विषयी अधिक माहिती सहाय्य पानातून मिळेल.
आपण येथे काय करू शकतो
- १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या साहित्यिकांची आणि त्यांच्या साहित्य/ग्रंथ कृतींची नावे मिळवणे , अशा नावांची आणि साहित्याची प्रताधिकारमुक्त असल्याबद्दल पुन्हा खात्री करणे.
- प्रताधिकारात नसलेले लेखन स्कॅनकरून उपलब्ध करणे
- स्कॅनकेलेले लेखन, जसेच्या तसे टाईप, करणे (युनिकोडीकरण)
- टाईप झालेले लेखन मुळ कलाकृतीबर हुकूम आहे का ते तपासणे
- तपासलेले लेखन सुरक्षीत करण्यास प्रचालकांना सांगणे.
- प्रताधिकारात असलेलेले लेखन प्रताधिकारमुक्त करण्याबद्दलचे संबधीतांशी पत्रव्यवहार करून प्रयत्न करणे
- जे लेखन स्कॅन कॉपींशिवाय लिहिले जाते त्यांची मूळ ग्रंथ //लेखन शोधून स्कॅन करून तुअलने करता जोडणे.
Mahitgar ०८:५१, १५ फेब्रुवारी २०१२ (IST)
विकिस्रोताचे सदस्यांशी नात्याचे स्वरूप काय ?
संपादनविकिस्रोत साहित्य आणि लेखन कृतींना पुनःप्रकाशात आणणारे ऑनलाईन ग्रंथालय आहे. इथे आपण वाचक आहात,पूर्वप्रकाशित प्रताधिकार मुक्त लेखनाचे संकलक आहात, प्रूफरिडर आणि पुनःप्रकाशक आणि जतन करणारे लायब्ररीयन आहात. संकलक आहात, प्रूफरिडर आणि पुनःप्रकाशक आणि जतन करणारे लायब्ररीयन या नात्यांनी ग्रंथातील लेखकांच्या विचारांशी तुम्हाला काहिही देणे घेणे नाही.
वाचक या नात्याने ग्रंथ आवडला वाचा नसता दुसर्या ग्रंथाच्या वाचनाकडे वळते व्हा.येथील प्रूफरिडिंग झालेल्या ग्रंथांचे आपण विकिपीडियावर ज्ञानकोशीय संदर्भ नमूद करू शकता.विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रातील पाठ्यपुस्तक निर्मिती विकिबुक्सच्या माध्यमातून करताना विकिस्रोत ग्रंथालयातील ग्रंथ मजकुराचा वापर आपण करू शकता. आपणास वाचक म्हणून व्यक्तिगत टिका टिपण्णी समीक्षण कोणत्याही विकिपरिघात बसत नाही आपल्याला विकिपरिवार सोडून उर्वरीत इंटरनेटचा उपयोग करावा लागेल असे करताना केवळ पूर्ण झालेल्या प्रूफरिडिंग झालेल्या ग्रंथांचा आधार घ्या.
त्रुटी राहणार नाहीत याची काळजी स्वयंसेवक घेत असतात पण हे काम पूर्ण स्वयंसेवी आहे. स्वयंसेवक कुणासही उत्तरदायी नाहीत. कोणत्याही त्रुटीची जबाबदारी विकिपरिवार घेत नाही मूळ ग्रंथाबर हुकूम माहिती आहे का हे मूळग्रंथात पडताळून पहाण्याची संपूर्ण जबाबदारी केवळ तुमची स्वतःची आहे विकिपरिवाराची नव्हे.त्रुटी आढळल्यास त्या सुयोग्य चर्चेद्वारे वगळण्यात वा दुरूस्त करण्यात एक स्वयंसेवक म्हणून तुमच्या सहभागाचे स्वागतच असेल.
विकिस्रोताची रचना कशी आहे ?
संपादन- प्रताधिकार मुक्त साहित्यिकांच्या आणि प्रताधिकारमुक्त ग्रंथांच्या सूची
- साहित्यिक:साहित्यिकाचे/लेखकाचे नाव असे लिहून त्या पानावर त्यांची प्रताधिकारमुक्त ग्रंथांची यादी.
- अनुक्रमणिका:ग्रंथाचे नाव असे लिहून ग्रंथांची पानक्रमांकानुसार अनुक्रमणिका
- पानक्रमांकावर टिचकी दिल्यानंतर पान:ग्रंथाचे नाव/पान क्रमांक असे ते उघडते. त्यात पानाच्या एका बाजूस टाईप केलेला मजकुर तर दुसर्या बाजूस ग्रंथाचे स्कॅनकेलेले पान दिसते.
- लेखन स्तर
- लेखन (टायपिंग) अपूर्णावस्था
- लेखन (टायपिंग) पूर्णावस्था
- प्रूफरिडिंग अपूर्णावस्था
- प्रूफरिडिंग पूर्णावस्था
- दस्तएवजाची तपासणी आणि सुरक्षीत करणे
विकिस्रोत आणि विकिबुक्स व विकिपिडिया या बन्धूप्रकल्पात नेमका काय फरक आहे
संपादन- विकिस्रोत प्रकल्प पूर्वप्रकाशित ग्रंथांकरिता आहे. रामायण ह्यामूळ महाकाव्य संस्कृतातून जसेच्या तसे संस्कृत विकिस्रोतावर त्याचा अनुवाद मराठी विकिस्रोतावर असेल (ग्रंथ शक्यतो मुळ अधिकृत प्रतीपासून घ्यावेत) .तुलसी रामायण हिंदी विकिस्रोत प्रकल्पातून असेल त्याचा मराठी विकिस्रोतावर वेगळा अनुवाद उपलध करून देता येईल. तर एखाद्या मराठी साहित्यिकाने लिहिलेले पूर्वप्रकाशित रामायण (जसेकी गीत रामायण) मराठी विकिस्रोतावर असेल.
विकिबुक्स हा प्रकल्प नवे पाठ्यपुस्तकाचे सामुहीक लेखन करण्या करिता आहे.विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी पुस्तकांचे त्यात लेखन करता येईल. एखादी पाककलाकृती, कसे करावे इत्यादी लेखन विकिबुक्स मध्ये बसते. विकिबुक्स महाकाव्य कसे लिहावे किंवा कविता कशी लिहावी या बद्दल आहे (पण स्वतःची कविता/महा काव्य कोणत्याही विकिप्रकल्पात बसत नाही) .
विकिपीडिया रामायणाची माहिती संक्षेपाने देतो,ती माहिती विकिपीडिया संपादकांच्या भाषेत असते. सोबत रामायणाचे भावानुवाद कुणी कुणी केले ,इतर समिक्षकांची मते आणि समिक्षकांनी केलेल्या टिकेची सुद्धा दखल घेतो.तर विकिस्रोत रामायण वाल्मिकींच्या/तुलसीदासाच्या/माडगूळकरांच्या स्वतःच्या शब्दात जसाच्या तसा जतन करतो.
- अभंग हा प्रकार कुठे असावा ?
अभंग या विषयावर एक ज्ञानकोशीय लेखही होऊ शकतो पण त्यात अभंग/कविता कसा लिहावा हे विकिबुक्स या सहप्रकल्पात जावयास हवे आणि एखादा विशिश्ःट अभंग/कविता लेखन मूळ लेखन असल्यास विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवे. एखाद्दा अभंगाचे/कवितेचे विवीध समिक्षकांनी रसग्रहण/समिक्षण कसेकेले त्या विशीष्ट कवितेची निर्मिती प्रक्रीया या गोष्टी विश्वकोशिय परिघात येतात पण प्रत्यक्षात कविता अभंग नाटक हे ललित साहित्य विश्वकोशिय परिघात येत नाह
- बा सी मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" नावाची कविता
हि कविता विश्वकोशाचा हिस्सा होऊ शकत नाही ती (प्रताधिकाराचे प्रश्न नसतील तर विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवी) पण या कवितेची शेकड्याने अर्थ लावले गेले रसग्रहणे झाली आणि तेवढीच पिएचडी प्रबंधही एका कवितेवर झाले.[१]त्या कवितेचा उगम कशात असला पाहिजे ते नेमका अर्थ काय या संबधीच्या लेखनाचा मागोवा विश्वकोशिय लेखन संकेतास पाळून विकिपीडियात घेता येईल.आणि असा मागोवा घेताना अशा कवितेच्या/अभंगाच्या ओळी नमूद करावयास हरकत नाही. पण "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेचा अभ्यास कसा करावा असे प्रकरण आणि कविते संदर्भात प्रश्नोत्तर पद्धतीचे लेखन विकिबुक्स मध्ये जावयास हवे
विकिस्रोताच्या परिघात अजून काय काय बसते ?
संपादनऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे.
- प्रताधिकारमुक्त दस्तऐवज :पूर्वप्रकाशित ग्रंथ, मर्यादीत प्रमाणात हयात नसलेल्या प्रताधिकारमुक्त प्रसिद्ध लेखकांची अप्रकाशित हस्तलिखीते
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
लोगो
संपादनमी मराठी लोगो करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काळीमाती हा मुक्त टंक वापरला आहे. जर सर्वांना आवडला तर तो प्रकल्पात वापरावा. - कोल्हापुरी २१:१९, १६ फेब्रुवारी २०१२ (IST)
Bot flag for GedawyBot
संपादन- Bot : GedawyBot
- Operator : M.Gedawy
- Programming Language(s) : Python (pywikipedia)
- Function Summary : Interwiki
- Contributions : see here
- Already has bot flag on : +150 wikis
I will make another request on meta. Thank you.--M.Gedawy २३:०३, १६ फेब्रुवारी २०१२ (IST)
One year Marathi Wikisource
संपादनHi there Marathi Wikisource editors,
I would like to extend a belated congratulations for the 1st anniversary of the creation of this wikis, which happened on 1 February.
As a member of Wikimedia's Language Committee, I prepared some questions to get some feedback from newer wikis about their situation. I would be delighted if you could answer them.
- How has activity developed after the subdomain's creation? (in comparision with the situation on www.wikisource.org)
- Is it now easier to be found by new users?
- Would you have done something in a better/different way in hindsight?
- Is there anything where you say 'This should have been better during the testing phase (OldWikisource, Langcom)?
Best regards, --MF-Warburg (चर्चा) ०४:१२, ६ मार्च २०१३ (IST)
मला बाळाराव सावरकरांचे मूळ पुस्तक "Who was Jesus Christ?" किंवा त्याचा डॉ. प वि. वर्तक यांनी केलेला अनुवाद " ख्रिस्त खरा कोण होता?" हवे आहे, तरी कोणी हे कोठे मिळु शकेल ते कळवेल का?
संपादनमला बाळाराव सावरकरांचे मूळ पुस्तक "Who was Jesus Christ?" किंवा त्याचा डॉ. प वि. वर्तक यांनी केलेला अनुवाद " ख्रिस्त खरा कोण होता?" हवे आहे, तरी कोणी हे कोठे मिळु शकेल ते कळवेल का? पाटणकर मोहन (चर्चा) १६:५९, २३ डिसेंबर २०२२ (IST)