मराठी विकिस्रोत समूह आणि सीआईएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १ मे ते १० मे या कालावधीत हे मुद्रितशोधन अभियान (Proofreadthon) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर पूर्णपणे प्रमाणित स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देणे याद्वारे शक्य होणार आहे. या अभियानात सामील होण्यासाठी आवाहन. प्रत्येक भाषेतील विजेत्यांना आणि देशातील सर्वात जास्त योगदान करणाऱ्या समुदायास आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
हे प्रकल्प पान येथील समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे. येथेही सर्वांनी सहभाग व आपण करणार असलेले पुस्तक नोंदवावे. तसेच मेटावर मुख्य अभियान पानावर माहिती भरावी.
मेटा या मुख्य समन्वय प्रकल्पातील महत्वाची पाने -
मजकूर पूर्ण तपासून, दुरुस्त्या करून मूळ स्कॅन पानाप्रमाणे झाला आहे याची खात्री करूनच मुद्रितशोधन झाले आहे असे दर्शवावे. म्हणजे पिवळ्या वर्तुळावर क्लिक करावे आणि प्रकाशित करावे.
मुद्रितशोधन पूर्ण झालेल्या एका पानास तीन गुण तर प्रमाणित केलेल्या एका पानास एक गुण मिळेल. अपूर्ण पाने पूर्ण झाल्याचे दर्शविल्यास तुम्हाला सूचना दिली जाईल. त्यानंतरही दुरुस्ती न केल्यास आपले बदल उलटविले जातील आणि अनुक्रमे तीन व एक गुण वगळला जाईल.
परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.
येथील समुदायात बक्षिस मिळण्यासाठी किमान ६०० गुण मिळवावे लागतील. सर्व भाषांत बक्षिस मिळविण्यासाठी किमान १००० गुण मिळायला हवेत.
मुद्रितशोधन करण्यासोबत शक्य तितके formatting करून आपले पान अचूक दिसेल असे करायचे आहे. यासाठी सर्व साचे (templates) तयार मिळाले तर फक्त क्लिक केले की हवे तसे format होईल. हे करण्यासाठी पुढील सूचना नीट समजून घेऊन आपले पान तयार करून काही लोड कराव्या लागतील. पुढीलप्रमाणे अचूक कृती करा -
कृती १ - स्वतःचे common.js पान तयार करणे : यासाठी आपल्या सदस्य नावावर क्लिक करून browser मध्ये नावासमोर /common.js असे type करा आणि एन्टर मारा.
कृती २ - नवीन खिडकीत स्क्रिप्ट्स असलेले पान उघडणे : पुढील दुव्यावर क्लिक करून पान उघडा - सदस्य:सुबोध कुलकर्णी/scripts
कृती ३ - स्क्रिप्ट्स लोड करणे: तुमच्या common.js पानाच्या संपादन मोडमध्ये जावून वरील पानावरील सर्व स्क्रिप्ट्स कॉपी करून आपल्या पानावर पेस्ट करा आणि सेव्ह करा.
कृती ४ - साचे (templates) वापरणे : आता तुम्ही ज्यावेळी संपादन सुरु कराल, त्यावेळी खालच्या बाजूस तुम्हाला सर्व proofread templates लोड झालेल्या दिसतील. योग्य त्या साच्यावर क्लिक करून तो आपण वापरू शकता.