शुक-रंभा संवाद
मार्गा-मार्गा वर नवीन आंब्याची झाडे शोभून दिसत आहेत. प्रत्येक झाडावर कोकिळा सुमधुर कूजन करित आहेत. हे कूजन ऎकून मानी स्त्रियांचे गर्वहरण होत आहे आणि गर्व नष्ट होताच पाच बाणांना धारण करणारा कामदेव मनाला बेचैन करित आहे.॥१॥
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतार ·नारायण | |
वेदांग | |
शिक्षा · चंड | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
इतिहास | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
रम्भा :
मार्गे मार्गे नूतनं चूतखण्डं खण्डे खण्डे कोकिलानां विराब: ।
रावे रावे मानिनीमानभड्गॊ भड्गे भड्गे मन्मथ: पञ्चबाण: ॥१॥
शुक :
मार्गे मार्गे जायते साधुसड्ग सड्गे सड्गे श्रूयते कृष्णकीर्ति: ।
कीर्तो कीर्तो नस् तदाकारवृत्ति: वृत्तो वृत्तो सच्चिदानंदभास: ॥२॥
तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रम्हवृन्दं वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवाद: ।
वादे वादे जायते तत्त्वबोध: बोधे बोधे भासते चन्द्रचूड: ॥३॥
हे रंभे, मार्गा-मार्गा वर मला साधुंचा सहवास लाभत आहे. प्रत्येक सहवासात भगवान कृष्णाचे गुणगान ऎकावयास मिळत आहे. ते ऐकत असताना आमची चित्तवृत्ति भगवंतात लीन होत आहे आणि ह्या ध्यानात सच्चिदानंदाचा सहवास लाभत आहे.॥२॥
तसेच प्रत्येक तीर्थावर ब्राह्मणांचा समुदाय उपस्थित आहे. हा समुदाय परमतत्त्वाविषयी विचार करित आहे. ह्या चर्चेतून आह्माला तत्त्वाचा बोध होत आहे आणि ह्या बोधामधून भगवान शंकराचा सहवास लाभत आहे.॥३॥
रम्भा :
गेहे गेहे जड्गमा हेमवल्ली वल्यां वल्यां पार्वणं चन्द्रबिंबम् ।
बिम्बे बिम्बे दृश्यते मीनयुग्मं युग्मे युग्मे पञचबाणप्रचार: ॥४॥
घराघरामध्ये जणूकाही सुवर्णवेलीसारख्या चालत्या फिरत्या युवती आहेत. ह्या युवतींचे मुख पोर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सुंदर आहे. ह्या मुखचंद्रावर नयनरूपी दोन मत्स्य दिसत आहेत आणि ह्या डोळ्यांमध्ये कामदेवाचा संचार चालू आहे. ॥४॥
शुक :
स्थाने स्थाने दृश्यते रत्नवेदी वेद्यां वेद्यां सिध्दगन्धर्वगोष्ठी ।
गोष्ठ्यां गोष्ठ्यां किन्नरद्वन्द्वगीतं गीते गीते गीयते रामचन्द्र: ॥५।
प्रत्येक ठिकाणी रत्नजडित यज्ञकुण्ड दिसत आहेत. प्रत्येक यज्ञकुण्डावर सिद्ध आणि गन्धर्वांची सभा भरली आहे. ह्या सभेत किन्नरगण किन्नरींसमवेत गीत गात आहेत आणि प्रत्येक गीतात भगवान रामचंद्राचे गुणगान करीत आहेत. ॥५॥
रम्भा :
पीनस्तनी चन्दनचर्चिताड्गी विलोलनेत्री तरूणी सुशीला ।
नालिड्गिता प्रेमभरेण येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥६॥
भरदार स्तन असलेल्या, शरीरावर चंदनाचा लेप असलेल्या, चंचल नेत्र असलेल्या अशा सुंदर स्त्रिला ज्याने प्रेमयुक्त अलिंगन दिले नाही त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥६॥
शुक :
अचिन्त्यरूपो भगवान्निरञजनो विश्वम्भरो ज्ञानमयश्चिदात्मा ।
विशोतिधो येन हदि क्षणं नो वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥७॥
ज्याच्या रूपाचे चिंतन होऊ शकत नाही, जो निरंजन, विश्वाचे रक्षण करणारा आहे; अशा ज्ञानाने परिपूर्ण चित्स्वरूप परब्रम्हाचे ज्याने हदयापासून स्मरण केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥७॥
रम्भा :
कामातुरा पूर्णशशाड्वक्त्रा बिम्बाधरा कोमलनालगौरा ।
नान्दोलिता स्वे हदये भुजाभ्यां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥८॥
भोगाच्या इच्छेने व्याकुळ, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या, कोमल ओठ असणाऱ्या आणि कोमल कमळाच्या नाळाप्रमाणे गौर वर्ण असणाऱ्या कामिनीला ज्याने आपल्या बाहुपाशांद्वारे हदयाशी कवटाळले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥८॥
शुक :
चतुर्भुजश्चक्रधरो गदाययुध: पीताम्बर: कौस्तुभमालया लसन् ।
ध्यात धृतो येन न बोधकाले वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥९॥
चक्रगदायुक्त चार हात असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कौस्तुभमणियुक्त माळेने शोभून दिसणाऱ्या भगवंताचे ज्याने जागृतावस्थेत ध्यान केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥९॥
रम्भा :
विचित्रवेषा नवयौवनाढ्या लवड्गकर्पूर सुवासिदेहा ।
नालिंगिता येन दृढं भुजाभ्यां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१०॥
विविध वस्त्र आणि अलंकारांनी युक्त, लवंग-कापूरादि द्वारे सुगंधित शरीर असलेल्या नवयुवतीला ज्याने घट्ट आलिंगन दिले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१०॥
शुक :
नारायण: पड्कजलोचन: प्रभु केयूरवान् कुण्डलमण्डितानन: ।
भक्त्या स्तुतो येन समाधितो नो वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥११॥
कमळासारखे नेत्र असलेल्या, केयूरवान, कुंडलांनी सुशोभित मुख असणाऱ्या, जगाचा स्वामी असलेल्या भगवंताची ज्याने विशुद्ध मनाने स्तुती केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥११॥
रम्भा :
प्रियम्वदा चम्पकहेमवर्णा हारावलीमण्डितनाभिदेशा ।
सम्भोगशाली रमिता न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१२॥
मधुर बोलणाऱ्या, चम्पक आणि सोन्याप्रमाणे वर्ण असणाऱ्या, हाराचा झुमका जिच्या बेंबीवर लटकत आहे आणि स्वभावतःच भोगाची इच्छा असणाऱ्या स्त्रीचा ज्याने उपभोग घेतला नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१२॥
शुक :
श्रीवत्सलक्ष्माड्कितहत्प्रदेश: तार्क्ष्यध्वजा शाडर्गधर: परात्मा ।
न सेवितो येन नृजन्मनाऽपि वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१३॥
ज्याने मनुष्यजन्मात देखिल भृगुलतेने विभूषित हदय असलेल्या, ज्याच्या पंजात गरुड आहे अशा आणि शाडर्ग धनुष्य धारण केलेल्या परमात्म्याची सेवा केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१३॥
रम्भा :
चलत्कटी नूपुरमञ्जुघोषा नासाग्रमुक्ता नयनभिरामा ।
न सेविता येन भुजंगवेणी वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१४॥
नाजूक कमर असलेल्या, नुपूरांद्वारे मंजुळ घोष करणाऱ्या, नाकात मोती जडवणाऱ्या, सुंदर नेत्र असणाऱ्या आणि सर्पाप्रमाणे अंबाडा धारण केलेल्या सुंदरीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१४॥
शुक :
विश्वम्भरो ज्ञानमयः परेशो जगन्मयोऽनन्तगुणप्रकाशी ।
आराधितो नाऽपि धृतो न योगे वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१५॥
विश्व चालवणाऱ्या, ज्ञानपूर्ण, परमात्मा, संसार स्वरूप, अनंत गुणांना प्रकट करणाऱ्या भगवंताची ज्याने आराधना केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१५॥
रम्भा :
ताम्बूलरागैः कुसुमप्रकर्षै सुगन्धितैलेन च वासितायाः ।
न मर्दितो येन कुचौ निशायां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१६॥
सुगंधित पान, उत्तम फूल, सुगंधित तेल आणि अन्य पदार्थांनी सुवासित शरीर असलेल्या कामिनीच्या स्तनाचे ज्याने रात्री मर्दन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१६॥
शुक :
ब्रम्हादिदेवोऽखिलविश्वदेवो मोक्षप्रदोऽतीतिगुणःप्रशान्तः ।
धृतो न योगे न हदि स्वकीये वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१७॥
ब्रह्म इत्यादिंचा देखिल देव, संपूर्ण जगाचा स्वामी, मोक्ष देणाऱ्या, निर्गुण, अत्यंत शांत भगवंताचे ज्याने योगाद्वारे ध्यान केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१७॥
रम्भा :
कस्तूरिकाकुंकुमचन्दनैश्च सुचर्चिता याऽगुरूधूपिकाम्बरा ।
उरस्थले नो लुठिता निशायां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१८॥
कस्तूरी आणि केशरयुक्त चंदनाचा लेप केलेल्या, चंदनगंधित वस्त्र नेसलेली स्त्री, ज्या पुरुषाच्या छातीवर रात्रभर लोळली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१८॥
शुक :
आनन्द रूपो निजबोधरूपो दिव्यस्वरूपो बहुनामरूपः ।
तपः समाधौ कलितो न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१९॥
आनन्दरूप, ज्ञानरूप, दिव्य शरीर धारण केलेल्या, ज्याची अनेक नावे आणि अनंत रुपे आहेत अशा भगवंताचे ज्याने समाधितही दर्शन घेतले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१९॥
रम्भा :
कठोरपीनस्तनभारनम्रा सुमध्यमा चंचलखंजनाक्षी ।
हेमन्तकाले रमिता न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२०॥
हेमन्त ऋतूमध्ये कठीण आणि भरदार स्तनांच्या भाराने झुकलेल्या, पातळ कमर असलेल्या, चंचल आणि खञ्जन पक्ष्याप्रमाणे नेत्र असलेल्या स्त्रीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२०॥
शुक :
तपोमयो ज्ञानमयो विजन्मा विद्यामयो योगमयः परात्मा ।
चित्ते धृतो नो तपसिस्थितेन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२१॥
तपोमय, ज्ञानमय, जन्मरहित, विद्यामय, योगमय अशा परमात्म्यामध्ये लीन होऊन ज्याने त्याला आपल्या चित्तामध्ये स्थिर केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२१॥
रम्भा :
सुलक्षणा मानवती गुणाड्या प्रसन्नवक्रआ मृदुभाषिणी या ।
नो चुम्बिता येन सुनाभिदेशे वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२२॥
उत्तम लक्षणे आणि गुणांनी युक्त, प्रसन्न मुख असलेल्या, मधुरभाषी अशा सुंदरीच्या नाभिचे ज्याने चुंबन घेतले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२२॥
शुक :
प्रीत्याजितं सर्वसुखं विनश्वरं दुःखप्रदं कामिनिभोगसेवितम् ।
एवं विदित्वा ने धृतो ही योगो वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२३॥
ज्या माणसाने नारीच्या उपभोगाने उत्पन्न होणारी सर्व सुखे नाशवंत आणि दुःखदायक आहेत, हे जाणून देखिल योगाभ्यास केला नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२३॥
रम्भा :
विशालवेणी नयनभिरामा कदर्पसम्पूर्णनिधानरूपा ।
भुक्ता न येनैव वसन्तकाले वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२४॥
ज्या पुरुषाने वसंत ऋतुमध्ये लांब केस असलेल्या, सुंदर नेत्रांनी सुशोभित आणि कामदेवाचे समस्त भांडार असलेल्या स्त्री बरोबर विहार केला नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२४॥
शुक :
मायाकरण्डी नरकस्य हण्डी तपोविखण्डी सुकृतस्य भण्डी ।
नृणां विखण्डी चिरसेविता चेत् वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२५॥
नारी ही मायेचे भांडार, नरकाची हंडी, तपोभग्न करणारी, पुण्याचा नाश करणारी आणि पुरुषाला घातक आहे. म्हणूनच ज्या पुरूषाने तिचे दीर्घकाळ सेवन केले, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२५॥
रम्भा :
समस्तश्रॄंगारविनोदशीला लीलावती कोकिलकण्ठनाला ।
विलासितो नो नवयौवनेन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२६॥
ज्या तरूणाने स्वतःच्या तारूण्यामध्ये सर्व प्रकारचा शृंगार, मनोविनोद करण्यात चतुर, अनेक लीलांमध्ये कुशल आणि कोकिळकंठी अशा कामिनीचा उपभोग घेतला नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२६॥
शुक :
समाधिहन्त्री जनमोहयित्री धर्मे कुमन्त्री कपटस्य तन्त्री ।
सत्कर्महन्त्री कलिता च येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२७॥
समाधिचा भंग करणाऱ्या, लोकांना मोहित करणाऱ्या, धर्मविनाशिनी, कपटी, सत्कर्माचा नाश करणाऱ्या नारीशी ज्याने संबंध ठेवला त्याचे जीवन व्यर्थ होय ॥२७॥
रम्भा :
बिल्वस्तनी कोमलिता सुशीला सुगन्धकुन्ता ललिता च गौरी ।
नाऽश्लेषिता येन च कण्ठदेशे वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२८॥
बिल्वफळाप्रमाणे कडक स्तन असलेल्या, अत्यंत कोमल शरीर असलेल्या, प्रिय स्वभाव असलेल्या, सुगन्धी केस असलेल्या आणि लोभात पाडणाऱ्या गोऱ्या युवतीला ज्याने आलिंगन दिले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२८॥
शुक :
चिन्ता व्यथा दुःखमयी सदोषा संसारपाशा जनमोहकर्त्री ।
सन्तापकोशा भजिता च येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२९॥
चिन्ता, पीडा तसेच सर्व प्रकारच्या दुःखाने परिपूर्ण, दोषयुक्त, संसारात बंधनरूप, लोकांना मोहित करणाऱ्या आणि संतापाचा खजिना असणाऱ्या स्त्रीचे ज्याने सेवन केले त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२९॥
रम्भा :
आनन्दकन्दर्पनिधानरूपा झणत्क्वणत्कड्कणनूपराढया ।
न स्वादिता येन सुधाधरस्या वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥३०॥
आनंद आणि कामदेवाचा खजिना असलेल्या, खणखण करणारे कंकण आणि पैजण घातलेल्या कामिनीच्या ऒठांचे चुंबन ज्याने घेतले नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. ॥३०॥
शुक :
कापटयवेषा जनवञचिका सा विण्मूत्रदुर्गन्धदरा दुराशा ।
संसेविता येन सदा मलाढया वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥३१॥
छ्लकपट करणाऱ्या, लोकांना फसवणाऱ्या, विष्ठा-मूत्र दुर्गन्धीचा ढीग असलेल्या, दुराशेने परिपूर्ण आणि अनेक प्रकारच्या घाणीने युक्त अशा स्त्रीचे सेवन ज्याने केले, त्याचे जीवन व्यर्थ होय. ॥३१॥
रम्भा :
चन्द्रानना सुन्दरगौरवर्णा व्यक्तस्तनी भोगविलासदक्षा ।
नान्दोलिता वै शयनेषु येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥३२॥
चंद्रमुखी, सुंदर, गौरवर्ण असलेल्या, जिच्या छातीवर स्तन उठून दिसत आहेत अशा, तसेच संभोग आणि विलासात चतुर अशा स्त्रिला ज्याने पलंगावर आलिंगन दिले नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. ॥३२॥
शुक :
उन्मेत्तवेषा मदिरासमत्ता पापप्रदा लोकविडम्बशीला ।
योगच्छला येन विभाजिता च वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥३३॥
मदिरा पिऊन उन्मत्त बनलेल्या, पापदायक, लोकांना फसवणाऱ्या आणि योग्यांबरोबर कपट करणाऱ्या स्त्रीचे सेवन सेवन ज्याने केले त्याचे जीवन व्यर्थ होय. ॥३३॥
रम्भा :
आनन्दरूपी तरूणी नताड्गी सदधर्मसंसाधनसृष्टिरूपा ।
कामार्थदा यस्य गृहे न नारी वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥३४॥
आनन्दरूप, नम्र, उत्तम धर्मपालक, पुत्रादि उत्पन्न करण्यात साहाय्यक, इंद्रियांना समाधान देणारी स्त्री ज्याच्या घरी नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. ॥३४॥
शुक :
अशौचदेहा पतितस्वभावा वपुःप्रगल्भा वललोभशीला |
मृषा वदन्ती कलिता च येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥३५॥
अशुद्ध शरीर असलेल्या, पतित स्वभाव असलेल्या, साहस आणि लोभ करणाऱ्या तसेच खोट बोलणाऱ्या स्त्रीवर ज्याने विश्वास ठेवला, त्याचे जीवन व्यर्थ होय. ॥३५॥
रम्भा :
क्षामोदरी हंसगतिप्रमत्ता सौंदर्यसौभाग्यवती प्रलोला ।
न पीडिता येन रतौ यथेच्छं वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥३६॥
पातळ कमर असलेल्या, हंसाप्रमाणे चाल असलेल्या, प्रमत्त सुंदर सौभाग्यवती, चंचल स्वभाव असलेल्या स्त्रीला ज्याने रतिक्रीडेच्या वेळी अनुकूलरित्या पीडित केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. ॥३६॥
शुक :
संसारसदभावन भक्तिहीना चित्तस्य चौरा हदि निर्दया च |
विहाय योगं कलिता नरेण वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥३७॥
संसारातल्या उत्तम भावनांना प्रकट करणाऱ्या, प्रेमाचा अभाव असलेल्या पुरूषांचे चित्त चोरणाऱ्या, हदयात दया नसलेल्या स्त्रीला ज्याने योगाभ्यास सोडून आलिंगन दिले, त्याचे जीवन व्यर्थ होय. ॥३७॥
रम्भा :
सुगन्धैः सुपुष्पैः सुशय्या सुकान्ता वसन्तो क्रतु: पूर्णिमा पूर्णचन्द्रः ।
यदा नास्तिपुस्त्वं नरस्य प्रभूतं ततः किं ततः किं ततः किं ततः किं ॥३८॥
सुंदर सुगन्धित पुष्पांनी सुशोभित शय्या असेल, मनोनुकूल स्त्री असेल, वसंत ऋतु असेल, पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे असेल परंतु ज्या पुरुषामध्ये परिपूर्ण पौरुष नाही त्याच्या जीवनाचा त्रिवार धिक्कार असो. ॥३८॥
शुक :
सुरूपं शरीरं नवीनं कलत्रं धनं मेरूतुल्यं वचश्र्चारू चित्रम् ।
हरेरंडिघ्रयुग्मे मनश्र्चेदलग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं ॥३९॥
सुंदर शरिरसंपदा, सुंदर भार्या, मेरु पर्वताएवढे धन, मनाला भुरळ घालणारी मधुर वाणी असेल पण जर भगवान शंकराच्या चरणी मन एकाग्र होत नसेल त्या जीवाचा त्रिवार धिक्कार असो. ॥३९॥
रम्भा :
मार्गे मार्गे नूतनं चूतखण्डं खण्डे खण्डे कोकिलानां विराब: ।
रावे रावे मानिनीमानभड्गॊ भड्गे भड्गे मन्मथ: पञ्चबाण: ॥१॥
हे मुनि ! हर मार्ग में नयी मंजरी शोभायमान हैं, हर मंजरी पर कोयल सुमधुर टेहुक रही हैं । टेहका सुनकर मानिनी स्त्रीयों का गर्व दूर होता है, और गर्व नष्ट होते ही पाँच बाणों को धारण करनेवाले कामदेव मन को बेचेन बनाते हैं ।
शुक :
मार्गे मार्गे जायते साधुसङ्गः सङ्गे सङ्गे श्रूयते कृष्णकीर्तिः ।
कीर्तौ कीर्तौ नस्तदाकारवृत्तिः वृत्तौ वृत्तौ सच्चिदानन्द भासः ॥२॥
तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दं वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवाद: ।
वादे वादे जायते तत्त्वबोध: बोधे बोधे भासते चन्द्रचूड: ॥३॥
हे रंभा ! हर मार्ग में साधुजनों का संग होता है, उन हर एक सत्संग में भगवान कृष्णचंद्र के गुणगान सुनने मिलते हैं । हर गुणगाण सुनते वक्त हमारी चित्तवृत्ति भगवान के ध्यान में लीन होती है, और हर वक्त सच्चिदानंद का आभास होता है ।
हर तीर्थ में पवित्र ब्राह्मणों का समुदाय विराजमान है । उस समुदाय में तत्त्व का विचार हुआ करता है । उन विचारों में तत्त्व का ज्ञान होता है, और उस ज्ञान में भगवान चंद्रशेखर शिवजी का भास होता है ।
रम्भा :
गेहे गेहे जङ्गमा हेमवल्ली वल्यां वल्यां पार्वणं चन्द्रबिंबम् ।
बिम्बे बिम्बे दृश्यते मीनयुग्मं युग्मे युग्मे पञचबाणप्रचार: ॥४॥
हे मुनिवर ! हर घर में घूमती फिरती सोने की लता जैसी ललनाओं के मुख पूर्णिमा के चंद्र जैसे सुंदर हैं । उन मुखचंद्रो में नयनरुप दो मछलीयाँ दिख रही है, और उन मीनरुप नयनों में कामदेव स्वतंत्र घूम रहा है ।
शुक :
स्थाने स्थाने दृश्यते रत्नवेदी वेद्यां वेद्यां सिध्दगन्धर्वगोष्ठी ।
गोष्ठ्यां गोष्ठ्यां किन्नरद्वन्द्वगीतं गीते गीते गीयते रामचन्द्र: ॥५।
हे रंभा ! हर स्थान में रत्न की वेदी दिख रही है, हर वेदी पर सिद्ध और गंधर्वों की सभा होती है । उन सभाओं में किन्नर गण किन्नरीयों के साथ गाना गा रहे हैं । हर गाने में भगवान रामचंद्र की कीर्ति गायी जा रही है ।
रम्भा :
पीनस्तनी चन्दनचर्चिताङ्गी विलोलनेत्रा तरुणी सुशीला । ।
नाऽऽलिङ्गिता प्रेमभरेण येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥६॥
हे मुनिवर ! सुंदर स्तनवाली, शरीर पर चंदन का लेप की हुई, चंचल आँखोंवाली सुंदर युवती का, प्रेम से जिस पुरुष ने आलिंगन किया नहीं, उसका जन्म व्यर्थ गया ।
शुक :
अचिन्त्यरूपो भगवान्निरञजनो विश्वम्भरो ज्ञानमयश्चिदात्मा ।
विशोधितो येन ह्रदि क्षणं नो वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥७॥
जिसके रूप का चिंतन नहीं हो सकता, जो निरंजन, विश्व का पालक है, जो ज्ञान से परिपूर्ण है, ऐसे चित्स्वरुप परब्रह्म का ध्यान जिसने स्वयं के हृदय में किया नहीं है, उसका जन्म व्यर्थ गया ।
रम्भा :
कामातुरा पूर्णशशांक वक्त्रा बिम्बाधरा कोमलनालगौरा ।
नाऽऽलिङ्गिता स्वे ह्र्दये भुजाभ्यां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥८॥
हे मुनि ! भोग की इच्छा से व्याकुल, परिपूर्ण चंद्र जैसे मुखवाली, बिंबाधरा, कोमल कमल के नाल जैसी, गौर वर्णी कामिनी जिसने छाती से नहीं लगायी, उसका जीवन व्यर्थ गया ।
शुक :
चतुर्भुजः चक्रधरो गदायुधः पीताम्बरः कौस्तुभमालया लसन् । ।
ध्याने धृतो येन न बोधकाले वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥९॥
हे रंभा ! चक्र और गदा जिसने हाथ में लिये हैं, ऐसे चार हाथवाले, पीतांबर पहेने हुए, कौस्तुभमणि की माला से विभूषित भगवान का ध्यान, जिसने जाग्रत अवस्था में किया नहीं, उसका जन्म व्यर्थ गया ।
रम्भा :
विचित्रवेषा नवयौवनाढ्या लवङ्गकर्पूर सुवासिदेहा । ।
नाऽऽलिङ्गिता येन दृढं भुजाभ्यां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥८॥ हे मुनिराज ! अनेक प्रकार के वस्त्र और आभूषणों से सज्ज, लवंग कर्पूर इत्यादि सुगंध से सुवासित शरीरवाली नवयुवती को, जिसने अपने दो हाथों से आलिंगन दिया नहीं, उसका जन्म व्यर्थ गया ।
शुक :
नारायणः पङ्कजलोचनः प्रभुः केयूरवान् कुण्डल मण्डिताननः ।
भक्त्या स्तुतो येन न शुद्धचेतसा वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥७॥ कमल जैसे नेत्रवाले, केयूर पर सवार, कुंडल से सुशोभित मुखवाले, संसार के स्वामी भगवान नारायण की स्तुति जिसने एकाग्रचित्त होकर, भक्तिपूर्वक की नहीं, उसका जीवन व्यर्थ गया ।
रम्भा :
प्रियवंदा चम्पकहेमवर्णा हारावलीमण्डितनाभिदेशा । ।
सम्भोगशीला रमिता न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥८॥ हे मुनिवर ! प्रिय बोलनेवाली, चंपक और सुवर्ण के रंगवाली, हार का झुमका नाभी पर लटक रहा हो ऐसी, स्वभाव से रमणशील ऐसी स्त्री से जिसने भोग विलास नहीं किया, उसका जीवन व्यर्थ गया ।
शुक :
नारायणः पङ्कजलोचनः प्रभुः केयूरवान् कुण्डल मण्डिताननः ।
भक्त्या स्तुतो येन न शुद्धचेतसा वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥७॥