सरकारी सर्व खात्यांनीं ब्राह्यण कामगारांचें प्राबल्य असल्यामुळें त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्यण आपले मतलबी धर्माचे मिषानें अज्ञानी शेतकर्‍यांस इतकें नाडितात कीं, त्यांस आपली लहान चिटकुलीं मुलें शाळेंत पाठविण्याचीं साधनें रहात नाहींत व एकाद्यास तसें साधन असल्यास यांच्या दुरूपदेशानें तशी इच्छा होत नाहीं.

आतां पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकर्‍यांस भटब्राह्यण धर्ममिषानें इतकें नाडितात कीं, त्यांजविषय़ीं या जगांत दुसरा कोठें या मासल्याचा पडोसा सांपडणें फार कठीण. पूर्वीच्या धूर्त आर्यब्राह्यण ग्रंथकारांनीं आपले मतलबी धर्माचें लिगाड शेतकर्‍यांचे मागें इतकें सफाईनें लावलें आहे की, शेतकरी जन्मास येण्याचे पूर्वीच त्याचे आईस ज्या वेळेस ऋतु प्राप्त होतो, तेव्हां तिच्या गर्भाधानादि संस्कारापासून तो हा मरेपर्यत कित्येक गोष्टींनीं लुटला जातो, इतकेंच नव्हे तर हा मेला तरी याच्या मुलास श्राद्धें वगैरेच्या मिषानें धर्मांचें ओझे सोसावें लागतें. कारण शेतकर्‍यांचें स्त्रियास ऋतु प्राप्त होतांच भटब्राह्यण जपानुष्ठान व सदरचीं, ब्राह्यणभोजनें घेतेवेळीं भटब्राह्यण आपले आप्तसोयरे व इष्टमित्रासह तूपपोळयांची व दक्षिणेची इतकी धांदल उडवितात कीं, त्यांच्या उरल्या सुरल्या अन्नापैकीं त्या बिचार्‍या अज्ञान शेतकर्‍यांस पोटभर आमटीपोळी मिळण्याची सुद्धां मारामार पडते. ऋतुशांतीनिमित्तानें भटब्राह्यणांची उदरशांती होऊन त्यांचे हातावर दक्षिणा पडतांच ते शेतकर्‍यास आशिर्वाद दिल्यानंतर त्यास त्यांचे स्त्नियांनीं शनिवार अथवा चतुर्थीचीं व्रतें धरावी म्हणोन उपदेश करून घरोघर चालते होतात. पुढें भटब्राह्यण दर शनिवारीं व चतुर्थीस शेतकर्‍यांचे स्त्नियांकडून रुईचे पानांच्या माळा मारुतीचे गळयांत घालवून व गवताच्या जुडया गणपतीचे माथ्यावर रचून शिधेदक्षिणा आपण घेतात व पुढें कधीं कधीं संधान साधल्यास सदरची व्रतें उजविण्याची थाप देऊन शेतकर्‍यांपासून लहानमोठी ब्राह्यणभोजनें घेतात. इतक्यांत शेतकरणी बाया सृष्टिक्रमाप्रमाणें गरोदर झाल्यास, भटब्राह्यणांनी शेतकर्‍यांकडून मुंज्यांचे ब्राह्यण घालविण्याचे लटके पूर्वी केलेले नवस शेतकर्‍यांशीं सहज बोलतां बोलतां बाहेर काढावयाचे व शेतकर्‍यांच्या स्त्निया प्रसून होण्याच्या पूर्वी भटजीबुवा शेतकर्‍यांचे घरीं रात्नंदिवस खडया ( फैर्‍या ) घालितात व त्यांच्याशी मोठी लाडीगोडी लावून त्यांच्याशीं यजमानपणाचीं नातीं लाऊन त्यांजपासून त्या नवसांची फेड करून घेतात. पुढें शेतकर्‍यांचे स्त्नियांस पुत्न झाले कीं, भटब्राह्यणांची धनरेषा उपटते. ती अशी कीं, प्रथम मुख्य उपाध्ये शेतकर्‍यांचे घरीं जातात व त्यांचे घरांतील वाव व कासर्‍यांनीं वेळ मोजणार्‍या अज्ञानी स्त्नियांस मुलांचे जन्मकाळ विचारून, ज्या ज्या राशीस जास्त अनिष्ट ग्रह जुळत असतील, तसल्या राशी मुकरर करून त्यांच्या अर्भकांच्या जन्मपत्निका अशा रीतीनें तयार करितात कीं, अज्ञानी शेतकर्‍यांचे पुत्नजन्मानें जहालेल्या सर्व आनंदांत माती कालवून त्यास घाबरे करितात व दुसरे दिवशीं त्याजकडून पिंडींतील लिंगापुढें आपले भाऊबंद, सोयरे-धायरे व इष्टभित्नांपैकीं भटब्राह्यणास मोलानें जपानुष्ठानास बसवितात व त्यांपैकीं कोणांस शेतकर्‍यापासून उपोषणाचे निमित्तानें फलाहारापुरते पैसे देववितात. उन्हाळा असल्यास पंखे देववितात, पावसाळा असल्यास छत्न्या आणि हिंवाळा असल्यास पांढर्‍या धाबळया देववितात. खेरीज उपाध्याचा हात चालल्यास तो शेतकर्‍यापासून पुजेच्या निमित्तानें तेल, तांदूळ, नारळ, खारका,सुपार्‍या, तूप, साखर, फळफळावळ वगैरे पदार्थ उपटावयास कमी करीत नाहींत. शेतकर्‍यांचे मनावर मूर्तिपूजेचा जास्ती प्रेमभाव ठसावा म्हणून काहीं भट तपानुष्ठान संपेपावेतों आपल्या दाढयाडोया वाढवितात, कांहीं फलाहारावर राहतात. अशा नानाप्रकारच्या लोणकढया थापा देवून जपानुष्ठान संमेपावेतों भटब्राह्यण, शेतकर्‍यांचें बरेंच द्रव्य उपटतात. शेवटीं समाप्ति करवितेवेळीं भटब्राह्यण अज्ञान शेतकर्‍यापासून ब्राह्यणभोजनासहित यथासांग दक्षिणा घेण्याविषयीं कसकणी चंगळ उडवितात हें सर्व आपणांस माहीत असेलच.

आर्य भटब्राह्यण आपल्या संस्कृत विद्यालयांत शूद्र १ शेतकर्‍यांचे मुलास घेत नाहींत परंतु ते आपल्या प्राकृत मराठी शाळांत कामापुरती शूद्र शेतकर्‍यांची मुलें घेतात व त्यांजपासून दरमहाचे पगाराशिवाय दर अमावस्येस व पौर्णिमेस फसक्या, कित्येक सणांस शिधा, दक्षिणा व मुलांनीं शाळेंत खाण्याकरितां आणिलेल्या चबिन्यामधून चौथाई घेऊन त्यांस धुळाक्षर, अंकगणित, मोडी कागदवाचन, भाकडपुराणसंबंधीं प्राकृत श्र्लोक व भूपाळया शिकवून त्यांस कलगी अथवा तुर्‍याच्या पक्षाच्या लावण्या शिकून तत्संबंधीं झगडे घालण्यापुरते विद्वान करून सोडितात. त्यांस आपल्या घरची हिशेबाची टांचणें ठेवण्यापुरतेंदेखील ज्ञान देत नाहींत. मग त्यांचा मामलेदार कचेर्‍यांत प्रवेश होऊन कारकुनीचें काम करणें कठीणच.

शेतकर्‍यांचे मुलाच्या मागणीच्या वेळीं ब्राह्यण जोशी हातांत पंचांगें घेऊन त्यांचे घरीं जातात. व आपल्यापुढें राशीचक्रें मांडून त्यांस मुलीमुलांचीं नांवे विवारून मनांत स्वहित संकल्प धरून मोठया डौलानें आंगठयांचीं अग्रें बोटांचे कांडयावर नाचवून भलता एकादा अनिष्ट ग्रह त्यांचे राशीला जुळवून, त्या ग्रहाचे शमनार्थ जपानुष्ठानाच्या स्थापने-करितां व त्यांचे सांगतेकरितां कांहीं द्रव्या शेतकर्‍यापासून घेतात. नंतर शेतकर्‍यांच्या मुलाचा तिथिनिश्चय करतेवेळीं नवरीचे घरीं वस्त्नाचे चौघडीवर तांदुळाचे रांगोळयांनीं चौकोनी चौक तयार करून त्यावर मुलीच्या व मुलाच्या पित्यास बसवून त्यांचेपुढें खोबरें, खारका व हळकुंडाचे लहान लहान ढीग मांडतात, हळदकुंकू व अक्षता मागवून मुलीचें व मुलाचें वय, वर्ण, गुण वगैरे यांचा काडीमात्न विचार न करितां कामापुरत्या सुपार्‍यांत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून समर्पयामीचे धांदलींत शेतकर्‍यापासून सण्यांनीं पैसे उपटून कागदाचे चिठोर्‍यावर नेमलेल्या तिथीचें टिप्पण करितात व त्यावर हळदकुंकाचे माखण करून ते उभयतांचे हातीं देतात. नंतर तेथील सामानपैशासहित चौकाचे तांदूळ आपले पदरीं आवळून गणपतीसही घरीं फोडून खाण्याकरितां कडोसरीस लावून निघून जातात. लग्नाचे पूर्वी मारुतीचे देवळांत वधूकडील पोषाक नवरेमुलास देतेवेळीं भटब्राह्यण आणा दोन आणे कडोसरीस लावून पानविडे पागोटयांत खोवतात. नंतरवधूचे मांडवांत नवरा मुलगा गेल्यानंतर बोहल्यासमोर त्या उभयतांस उभे राहण्याकरितां पायपाटयामध्यें थोडेथोडे गहूं भरवून त्यावर समोरासमोर उभे करितात. पुढें वधूवरांचे मामाचे हातीं नागव्या तरवारी देऊन त्यास पाठीराखे करितात. व तेथें जमलेल्या मंडळीपैकीं भलत्या कोणाचीं तरी अंगवस्त्ने घेऊन त्यावर हळदकुंकाचे आडवे तिडवे पट्टे ओढून त्या वधूवरांमध्यें अंतरपाट धरून पाळीपाळीनें कोणी कल्याण रागांत व कोणी भैरवी रागांत श्र्लोक व आर्यांसहित शुभमंगल म्हणून ते अज्ञानी शेतकर्‍यांचे मुलाबाळांचीं लग्नें लावतात. कित्येक सधन माळया कुणब्यांचे लग्नांत त्यांचे भाऊबंद, सोयरेधायरे व वर्‍हाडी यांची पर्वा न करतां, अगांतुक ब्राह्यण दक्षिणेसाठी मांडीवर शालजोडया घेऊन मोठया झोकानें लोडाशीं लोडाशीं टेकून बसून मांडवांत इतकी धांदल करितात कीं, वधूवरांच्या बापांनीं आमंत्नण करून आणलेल्या गृहंस्थांचें आगतस्वागत करून त्यांस पानविडे देण्याची पुरती फुरसद होऊं देत नाहींत. असले निःसंग दांडगे भिकारी दुसर्‍या एखाद्या देशांत अथवा जातींत सांपडतील काय ?’ इतक्यांत लग्न लावणारे भटजी वधूवरांस खालीं समोरासमोर बसवून त्यांचेपुढें नानाप्रकारचे विधि करितांना, वेळोवेळीं "दक्षिणां समर्पयामि" म्हणतां म्हणतां शेवटीं थोडयाशा काडवासुडया गोळा करून त्यांस अग्नि लावून त्यांत तूप वगैरे पदार्थ टाकून वधुवरांस लज्जाहोमाच्या निमित्तानें चरचरीत धूर्‍या देऊन त्यांचे अज्ञानी पित्यांपासून अखेरचे भले मोठे शिधे व दक्षिणा घेऊन घरीं जातात. साडयाचे दिवशीं एकदोन हेकड शेतकर्‍यांस हातीं धरून वधुवरांचे पित्यापासून मन मानेल तशा रकमा आडवून घेतात व त्याचप्रमाणें मांडव खंडण्याबद्दल द्रव्य त्याजपासून उपटितात. त्यांतून कित्येक सधन शेतकर्‍यांस कणं वगैरे दानशूरांच्या उपमा देऊन त्याचेपुढें नानाप्रकारचे गोंडचाळे करून त्यांस इतके पेटवतात कीं, लग्नाचे अखेरीस त्यांचे घरीं मोठमोठया सभा करून त्यांत एकंदर वैदिक, शास्त्नी, पुराणिक, कयेकरी व भिक्षुक भटब्राह्यणांची वर्गावर्गी न करितां त्यांजपासून दक्षिणा उपटून आपाआपले घरीं जातां जातां त्यांजपैकीं कित्येक गुलहौशी भटब्राह्यण रात्नीं मांडवांत नाच असल्याविषयीं तपास ठेवून डोचक्यावर पिटकुल्या पागुटया व मांडीवर चिटकुल्या शालजोडया ठेवून, आमंत्नण करून आणलेल्या गृहस्थांचे मांडीशी मांडी भिडवून, लोडाशीं टेकून सर्व रात्नभर नाकाच्या जोडनळयांत तपकिरीचे वायबार ठासतां ठासतां आसपास तपकिरीचा धूरळा उडवून खुशाल नायकिणींचीं गाणीं ऐकत बसतात.

पुढें शेतकरी लोक वयपरत्वें मरण पावतांच त्यांचीं मुलें संसार करूं लागल्यापासून त्यांचे मरणकाळपावेतों त्यांस भटब्राह्यण धर्माचे भुलथापीनें कसें व किती नागवितात, त्याबद्दल एथें थोडासा खुलासा करितों. शेतकर्‍यांचीं मुलें आपलीं नवीं घरें बांधतेवेळीं शूद्र बिगारी भर उन्हाचे तापांत उरापोटावर मलमा वगैरेचीं टोपलीं वहातात. गवंडी व सुतार उंच गगनचुंबित पहाडावर माकडाचे परी चढून भिंती रचून, लाकडांच्या कळाशा जोडून घरें तयार करितात. यामुळें त्यांची दया येऊन त्या बापुडया कामगारांस गृहप्रवेश करतेवेळीं तूपपोळयांची जेवणें देऊं, म्हणून घराचे मालक कबूल करीत असतात व तीं जेवणें शेतकरीकामगारांस देण्यापूर्वी भटब्राह्यण शेतकर्‍यांचे घरोघर रात्नंदिवस घिरटया घालून त्यास नाना-प्रकारच्या धर्मसंबंधीं भुलथापा देऊन, कित्येक ब्राह्यण अंमलदारांच्या आललटपू शिफारशी भिडवून, त्यांच्या नव्या घरांत होमविधी करून घरच्या वळचणीला आगोजाग चिंध्यांचीं निशाणें फटकावून, प्रथम आपण आपल्या स्त्निया मुलांबाळांसहित तूपपोळयांची यथासांग भोजने सारून, उरलेंसुरलें शिळेंपाकें अन्न भोळया भाविक अज्ञानी घरधन्यास त्याच्या मुलाबाळांसहित कामगारांस गुळवण्याबरोबर खाण्याकरितां ठेवून पानविडे खातांच ऊसांतील इमानी कोल्हेभुकीदाखल आशिर्वाद देऊन शेतकर्‍यां-पासून दक्षिणा गुंडाळून पोटावर हात फिरवीत घरोघर जातात व एकदोन मतलबी साधू भटब्राह्यण कित्येक अल्पवयी अल्लड शेतकर्‍यांचे जवलग गडी बनून त्यांस नांवलौकिकाचे शहास गुंतवून त्यांजकडून लहानमोठया सभा करवून त्यांमध्यें कांहीं भटब्राह्यणांस शालजोडया देववून बाकी सर्वांना दक्षिणा देववितात. शेतकर्‍यांनीं नवीन बांधलेले शेतखाने खेरीजकरून त्यांनीं नवों देवळें, पार वगैरे इमारती तयार केल्या कीं, तेथें त्यांजपासून उद्यापनाचे निमितानें ब्राह्यणभोजन व दक्षिणा घेतातच.

सरकारी सर्व खात्यांनीं ब्राह्यण कामगारांचें प्राबल्य असल्यामुळें त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्यण आपले मतलबी धर्माचे मिषानें अज्ञानी शेतकर्‍यांस इतकें नाडितात कीं, त्यांस आपली लहान चिटकुलीं मुलें शाळेंत पाठविण्याचीं साधनें रहात नाहींत व एकाद्यास तसें साधन असल्यास यांच्या दुरूपदेशानें तशी इच्छा होत नाहीं.

आतां पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकर्‍यांस भटब्राह्यण धर्ममिषानें इतकें नाडितात कीं, त्यांजविषय़ीं या जगांत दुसरा कोठें या मासल्याचा पडोसा सांपडणें फार कठीण. पूर्वीच्या धूर्त आर्यब्राह्यण ग्रंथकारांनीं आपले मतलबी धर्माचें लिगाड शेतकर्‍यांचे मागें इतकें सफाईनें लावलें आहे की, शेतकरी जन्मास येण्याचे पूर्वीच त्याचे आईस ज्या वेळेस ऋतु प्राप्त होतो, तेव्हां तिच्या गर्भाधानादि संस्कारापासून तो हा मरेपर्यत कित्येक गोष्टींनीं लुटला जातो, इतकेंच नव्हे तर हा मेला तरी याच्या मुलास श्राद्धें वगैरेच्या मिषानें धर्मांचें ओझे सोसावें लागतें. कारण शेतकर्‍यांचें स्त्नियांस ऋतु प्राप्त होतांच भटब्राह्यण जपानुष्ठान व सदरचीं, ब्राह्यणभोजनें घेतेवेळीं भटब्राह्यण आपले आप्तसोयरे व इष्टमित्नांसह तूपपोळयांची व दक्षिणेची इतकी धांदल उडवितात कीं, त्यांच्या उरल्या सुरल्या अन्नापैकीं त्या बिचार्‍या अज्ञान शेतकर्‍यांस पोटभर आमटीपोळी मिळण्याची सुद्धां मारामार पडते. ऋतुशांतीनिमित्तानें भटब्राह्यणांची उदरशांती होऊन त्यांचे हातावर दक्षिणा पडतांच ते शेतकर्‍यास आशिर्वाद दिल्यानंतर त्यास त्यांचे स्त्नियांनीं शनिवार अथवा चतुर्थीचीं व्रतें धरावी म्हणोन उपदेश करून घरोघर चालते होतात. पुढें भटब्राह्यण दर शनिवारीं व चतुर्थीस शेतकर्‍यांचे स्त्नियांकडून रुईचे पानांच्या माळा मारुतीचे गळयांत घालवून व गवताच्या जुडया गणपतीचे माथ्यावर रचून शिधेदक्षिणा आपण घेतात व पुढें कधीं कधीं संधान साधल्यास सदरची व्रतें उजविण्याची थाप देऊन शेतकर्‍यांपासून लहानमोठी ब्राह्यणभोजनें घेतात. इतक्यांत शेतकरणी बाया सृष्टिक्रमाप्रमाणें गरोदर झाल्यास, भटब्राह्यणांनी शेतकर्‍यांकडून मुंज्यांचे ब्राह्यण घालविण्याचे लटके पूर्वी केलेले नवस शेतकर्‍यांशीं सहज बोलतां बोलतां बाहेर काढावयाचे व शेतकर्‍यांच्या स्त्निया प्रसून होण्याच्या पूर्वी भटजीबुवा शेतकर्‍यांचे घरीं रात्नंदिवस खडया ( फैर्‍या ) घालितात व त्यांच्याशी मोठी लाडीगोडी लावून त्यांच्याशीं यजमानपणाचीं नातीं लाऊन त्यांजपासून त्या नवसांची फेड करून घेतात. पुढें शेतकर्‍यांचे स्त्नियांस पुत्न झाले कीं, भटब्राह्यणांची धनरेषा उपटते. ती अशी कीं, प्रथम मुख्य उपाध्ये शेतकर्‍यांचे घरीं जातात व त्यांचे घरांतील वाव व कासर्‍यांनीं वेळ मोजणार्‍या अज्ञानी स्त्नियांस मुलांचे जन्मकाळ विचारून, ज्या ज्या राशीस जास्त अनिष्ट ग्रह जुळत असतील, तसल्या राशी मुकरर करून त्यांच्या अर्भकांच्या जन्मपत्निका अशा रीतीनें तयार करितात कीं, अज्ञानी शेतकर्‍यांचे पुत्नजन्मानें जहालेल्या सर्व आनंदांत माती कालवून त्यास घाबरे करितात व दुसरे दिवशीं त्याजकडून पिंडींतील लिंगापुढें आपले भाऊबंद, सोयरे-धायरे व इष्टभित्नांपैकीं भटब्राह्यणास मोलानें जपानुष्ठानास बसवितात व त्यांपैकीं कोणांस शेतकर्‍यापासून उपोषणाचे निमित्तानें फलाहारापुरते पैसे देववितात. उन्हाळा असल्यास पंखे देववितात, पावसाळा असल्यास छत्न्या आणि हिंवाळा असल्यास पांढर्‍या धाबळया देववितात. खेरीज उपाध्याचा हात चालल्यास तो शेतकर्‍यापासून पुजेच्या निमित्तानें तेल, तांदूळ, नारळ, खारका,सुपार्‍या, तूप, साखर, फळफळावळ वगैरे पदार्थ उपटावयास कमी करीत नाहींत. शेतकर्‍यांचे मनावर मूर्तिपूजेचा जास्ती प्रेमभाव ठसावा म्हणून काहीं भट तपानुष्ठान संपेपावेतों आपल्या दाढयाडोया वाढवितात, कांहीं फलाहारावर राहतात. अशा नानाप्रकारच्या लोणकढया थापा देवून जपानुष्ठान संमेपावेतों भटब्राह्यण, शेतकर्‍यांचें बरेंच द्रव्य उपटतात. शेवटीं समाप्ति करवितेवेळीं भटब्राह्यण अज्ञान शेतकर्‍यापासून ब्राह्यणभोजनासहित यथासांग दक्षिणा घेण्याविषयीं कसकणी चंगळ उडवितात हें सर्व आपणांस माहीत असेलच.

आर्य भटब्राह्यण आपल्या संस्कृत विद्यालयांत शूद्र १ शेतकर्‍यांचे मुलास घेत नाहींत परंतु ते आपल्या प्राकृत मराठी शाळांत कामापुरती शूद्र शेतकर्‍यांची मुलें घेतात व त्यांजपासून दरमहाचे पगाराशिवाय दर अमावस्येस व पौर्णिमेस फसक्या, कित्येक सणांस शिधा, दक्षिणा व मुलांनीं शाळेंत खाण्याकरितां आणिलेल्या चबिन्यामधून चौथाई घेऊन त्यांस धुळाक्षर, अंकगणित, मोडी कागदवाचन, भाकडपुराणसंबंधीं प्राकृत श्र्लोक व भूपाळया शिकवून त्यांस कलगी अथवा तुर्‍याच्या पक्षाच्या लावण्या शिकून तत्संबंधीं झगडे घालण्यापुरते विद्वान करून सोडितात. त्यांस आपल्या घरची हिशेबाची टांचणें ठेवण्यापुरतेंदेखील ज्ञान देत नाहींत. मग त्यांचा मामलेदार कचेर्‍यांत प्रवेश होऊन कारकुनीचें काम करणें कठीणच.

शेतकर्‍यांचे मुलाच्या मागणीच्या वेळीं ब्राह्यण जोशी हातांत पंचांगें घेऊन त्यांचे घरीं जातात. व आपल्यापुढें राशीचक्रें मांडून त्यांस मुलीमुलांचीं नांवे विवारून मनांत स्वहित संकल्प धरून मोठया डौलानें आंगठयांचीं अग्रें बोटांचे कांडयावर नाचवून भलता एकादा अनिष्ट ग्रह त्यांचे राशीला जुळवून, त्या ग्रहाचे शमनार्थ जपानुष्ठानाच्या स्थापने-करितां व त्यांचे सांगतेकरितां कांहीं द्रव्या शेतकर्‍यापासून घेतात. नंतर शेतकर्‍यांच्या मुलाचा तिथिनिश्चय करतेवेळीं नवरीचे घरीं वस्त्नाचे चौघडीवर तांदुळाचे रांगोळयांनीं चौकोनी चौक तयार करून त्यावर मुलीच्या व मुलाच्या पित्यास बसवून त्यांचेपुढें खोबरें, खारका व हळकुंडाचे लहान लहान ढीग मांडतात, हळदकुंकू व अक्षता मागवून मुलीचें व मुलाचें वय, वर्ण, गुण वगैरे यांचा काडीमात्न विचार न करितां कामापुरत्या सुपार्‍यांत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून समर्पयामीचे धांदलींत शेतकर्‍यापासून सण्यांनीं पैसे उपटून कागदाचे चिठोर्‍यावर नेमलेल्या तिथीचें टिप्पण करितात व त्यावर हळदकुंकाचे माखण करून ते उभयतांचे हातीं देतात. नंतर तेथील सामानपैशासहित चौकाचे तांदूळ आपले पदरीं आवळून गणपतीसही घरीं फोडून खाण्याकरितां कडोसरीस लावून निघून जातात. लग्नाचे पूर्वी मारुतीचे देवळांत वधूकडील पोषाक नवरेमुलास देतेवेळीं भटब्राह्यण आणा दोन आणे कडोसरीस लावून पानविडे पागोटयांत खोवतात. नंतरवधूचे मांडवांत नवरा मुलगा गेल्यानंतर बोहल्यासमोर त्या उभयतांस उभे राहण्याकरितां पायपाटयामध्यें थोडेथोडे गहूं भरवून त्यावर समोरासमोर उभे करितात. पुढें वधूवरांचे मामाचे हातीं नागव्या तरवारी देऊन त्यास पाठीराखे करितात. व तेथें जमलेल्या मंडळीपैकीं भलत्या कोणाचीं तरी अंगवस्त्ने घेऊन त्यावर हळदकुंकाचे आडवे तिडवे पट्टे ओढून त्या वधूवरांमध्यें अंतरपाट धरून पाळीपाळीनें कोणी कल्याण रागांत व कोणी भैरवी रागांत श्र्लोक व आर्यांसहित शुभमंगल म्हणून ते अज्ञानी शेतकर्‍यांचे मुलाबाळांचीं लग्नें लावतात. कित्येक सधन माळया कुणब्यांचे लग्नांत त्यांचे भाऊबंद, सोयरेधायरे व वर्‍हाडी यांची पर्वा न करतां, अगांतुक ब्राह्यण दक्षिणेसाठी मांडीवर शालजोडया घेऊन मोठया झोकानें लोडाशीं लोडाशीं टेकून बसून मांडवांत इतकी धांदल करितात कीं, वधूवरांच्या बापांनीं आमंत्नण करून आणलेल्या गृहंस्थांचें आगतस्वागत करून त्यांस पानविडे देण्याची पुरती फुरसद होऊं देत नाहींत. असले निःसंग दांडगे भिकारी दुसर्‍या एखाद्या देशांत अथवा जातींत सांपडतील काय ?’ इतक्यांत लग्न लावणारे भटजी वधूवरांस खालीं समोरासमोर बसवून त्यांचेपुढें नानाप्रकारचे विधि करितांना, वेळोवेळीं "दक्षिणां समर्पयामि" म्हणतां म्हणतां शेवटीं थोडयाशा काडवासुडया गोळा करून त्यांस अग्नि लावून त्यांत तूप वगैरे पदार्थ टाकून वधुवरांस लज्जाहोमाच्या निमित्तानें चरचरीत धूर्‍या देऊन त्यांचे अज्ञानी पित्यांपासून अखेरचे भले मोठे शिधे व दक्षिणा घेऊन घरीं जातात. साडयाचे दिवशीं एकदोन हेकड शेतकर्‍यांस हातीं धरून वधुवरांचे पित्यापासून मन मानेल तशा रकमा आडवून घेतात व त्याचप्रमाणें मांडव खंडण्याबद्दल द्रव्य त्याजपासून उपटितात. त्यांतून कित्येक सधन शेतकर्‍यांस कणं वगैरे दानशूरांच्या उपमा देऊन त्याचेपुढें नानाप्रकारचे गोंडचाळे करून त्यांस इतके पेटवतात कीं, लग्नाचे अखेरीस त्यांचे घरीं मोठमोठया सभा करून त्यांत एकंदर वैदिक, शास्त्नी, पुराणिक, कयेकरी व भिक्षुक भटब्राह्यणांची वर्गावर्गी न करितां त्यांजपासून दक्षिणा उपटून आपाआपले घरीं जातां जातां त्यांजपैकीं कित्येक गुलहौशी भटब्राह्यण रात्नीं मांडवांत नाच असल्याविषयीं तपास ठेवून डोचक्यावर पिटकुल्या पागुटया व मांडीवर चिटकुल्या शालजोडया ठेवून, आमंत्नण करून आणलेल्या गृहस्थांचे मांडीशी मांडी भिडवून, लोडाशीं टेकून सर्व रात्नभर नाकाच्या जोडनळयांत तपकिरीचे वायबार ठासतां ठासतां आसपास तपकिरीचा धूरळा उडवून खुशाल नायकिणींचीं गाणीं ऐकत बसतात.

पुढें शेतकरी लोक वयपरत्वें मरण पावतांच त्यांचीं मुलें संसार करूं लागल्यापासून त्यांचे मरणकाळपावेतों त्यांस भटब्राह्यण धर्माचे भुलथापीनें कसें व किती नागवितात, त्याबद्दल एथें थोडासा खुलासा करितों. शेतकर्‍यांचीं मुलें आपलीं नवीं घरें बांधतेवेळीं शूद्र बिगारी भर उन्हाचे तापांत उरापोटावर मलमा वगैरेचीं टोपलीं वहातात. गवंडी व सुतार उंच गगनचुंबित पहाडावर माकडाचे परी चढून भिंती रचून, लाकडांच्या कळाशा जोडून घरें तयार करितात. यामुळें त्यांची दया येऊन त्या बापुडया कामगारांस गृहप्रवेश करतेवेळीं तूपपोळयांची जेवणें देऊं, म्हणून घराचे मालक कबूल करीत असतात व तीं जेवणें शेतकरीकामगारांस देण्यापूर्वी भटब्राह्यण शेतकर्‍यांचे घरोघर रात्नंदिवस घिरटया घालून त्यास नाना-प्रकारच्या धर्मसंबंधीं भुलथापा देऊन, कित्येक ब्राह्यण अंमलदारांच्या आललटपू शिफारशी भिडवून, त्यांच्या नव्या घरांत होमविधी करून घरच्या वळचणीला आगोजाग चिंध्यांचीं निशाणें फटकावून, प्रथम आपण आपल्या स्त्निया मुलांबाळांसहित तूपपोळयांची यथासांग भोजने सारून, उरलेंसुरलें शिळेंपाकें अन्न भोळया भाविक अज्ञानी घरधन्यास त्याच्या मुलाबाळांसहित कामगारांस गुळवण्याबरोबर खाण्याकरितां ठेवून पानविडे खातांच ऊसांतील इमानी कोल्हेभुकीदाखल आशिर्वाद देऊन शेतकर्‍यां-पासून दक्षिणा गुंडाळून पोटावर हात फिरवीत घरोघर जातात व एकदोन मतलबी साधू भटब्राह्यण कित्येक अल्पवयी अल्लड शेतकर्‍यांचे जवलग गडी बनून त्यांस नांवलौकिकाचे शहास गुंतवून त्यांजकडून लहानमोठया सभा करवून त्यांमध्यें कांहीं भटब्राह्यणांस शालजोडया देववून बाकी सर्वांना दक्षिणा देववितात. शेतकर्‍यांनीं नवीन बांधलेले शेतखाने खेरीजकरून त्यांनीं नवों देवळें, पार वगैरे इमारती तयार केल्या कीं, तेथें त्यांजपासून उद्यापनाचे निमितानें ब्राह्यणभोजन व दक्षिणा घेतातच.

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.