संस्कृती/अयोध्याकांड १ राम वनाला जातो
तीन
अयोध्याकांड. १
राम वनाला जातो.
रामायणातील सर्व काण्डांत कथेच्या दृष्टीने अयोध्याकाण्ड उत्कृष्ट आहे. कथा एकसंध, भराभर पुढे सरकणारी अशी आहे. स्थलकालाच्या दृष्टीने बहुतेक कथा एका शहरात घडते. थोडासा भाग राज्याबाहेर, गंगेच्या दक्षिण तीरावर घडतो, पण एकंदर प्रदेश फार मोठा नाही. कालाच्या दृष्टीने पाहिलेतर सुरूवात होते ती दशरथाने रासभा बोलाविल्यापासून व संपते चित्रकूटावर भावाभावांच्या भेटीने. ह्या कांडात संपादकांनी नागेश (१७००- १७५०) ह्या टीकाकाराच्या तिलक' ह्या टीकेला कालगणनेच्या दृष्टीने ग्राह्य मानिले आहे. मीही ती ग्राह्य मानिते. तो भाग असाः चैत्रशुक्लदशम्यां रामस्य प्रस्थानम्। और्ध्वदेहिकेन पक्षो गतः एवं वैशाखे गते, ज्येष्ठे भरतस्य चित्रकूटं प्रति प्रस्थानम्। अग्रे वर्षाकाले संनिहिते सति कार्तिक्यन्तं चित्रकूटे रामस्य वासः| चैत्र शुक्ल नवमीला राज्याभिषेकाबद्दल बोलणी होऊन दुस-या दिवसाचा मुहूर्त ठरला. दुस-याच दिवशी कैकेयीने वर मागितल्याप्रमाणे राम वनात गेला. नंतर पाच दिवसांनी पौर्णिमेला दशरथ मेला. भरत अयोध्येला पोहोंचावयाला एक पक्ष म्हणजे पंधरवडा लागला. दशरथाच्या उत्तरक्रियेत आणखी एक पंधरवडा गेला. नागेश म्हणतो, वैशाख असा गेला. म्हणजे त्याची कालगणना उत्तर भारतीय पौर्णिमान्त मासाची दिसते. दशरथ मरणाच्या दिवशी चैत्र संपला. ज्येष्ठामध्ये भरत रामाच्या भेटीला गेला. भरत सर्व लवाजम्यानिशी (राजमातांना घेऊन) सावकाश गेला. जायला सहज आठवडा- दीड आठवडा लागला असेल. भावाभावांची भेट होऊन सर्व उलगडा होऊन भरत परतला, तो निम्मा ज्येष्ठ झाला असेल. आता पावसाळ्यात पुढे जाणे नको, म्हणून राम कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चित्रकूटास । संस्कृती ११ ' तीन
अयोध्याकांड. १
राम वनाला जातो.
रामायणातील सर्व काण्डांत कथेच्या दृष्टीने अयोध्याकाण्ड उत्कृष्ट आहे. कथा एकसंघ, भराभर पुढे सरकणारी अशी आहे. स्थलकालाच्या दृष्टीने बहुतेक कथा एका शहरात घडते. थोडासा भाग राज्याबाहेर, गंगेच्या दक्षिण तीरावर घडतो, पण एकंदर प्रदेश फार मोठा नाही. कालाच्या दृष्टीने पाहिले, तर सुरूवात होते ती दशरथाने सभा बोलाविल्यापासून व संपते चित्रकूटावर भावाभावांच्या भेटीने. ह्या कांडात संपादकांनी नागेश ( १७००- १७५०) ह्या टीकाकाराच्या 'तिलक' ह्या टीकेला कालगणनेच्या दृष्टीने ग्राह्य मानिले आहे. मीही ती ग्राह्य मानिते. तो भाग असा
चैत्रशुक्लदशम्यां रामस्य प्रस्थानम् । और्ध्वदेहिकेन पक्षो गतः एवं वैशाखे गते, ज्येष्ठे भरतस्य चित्रकूटं प्रति प्रस्थानम् । अग्रे वर्षाकाले संनिहिते सति कार्त्तिक्यन्तं चित्रकूटे रामस्य वासः !
चैत्र शुक्ल नवमीला राज्याभिषेकाबद्दल बोलणी होऊन दुसऱ्या दिवसाचा मुहूर्त ठरला. दुसऱ्याच दिवशी कैकेयीने वर मागितल्याप्रमाणे राम वनात गेला. नंतर पाच दिवसांनी पौर्णिमेला दशरथ मेला. भरत अयोध्येला पोहोंचावयाला एक पक्ष म्हणजे पंधरवडा लागला. दशरथाच्या उत्तरंक्रियेत आणखी एक पंधरवडा गेला. नागेश म्हणतो, वैशाख असा गेला. म्हणजे त्याची कालगणना उत्तर भारतीय पौर्णिमान्त मासाची दिसते. दशरथ मरणाच्या दिवशी चैत्र संपला. ज्येष्ठामध्ये भरत रामाच्या भेटीला गेला. भरत सर्व लवाजम्यानिशी (राजमातांना घेऊन) सावकाश गेला. जायला सहज आठवडा-दीड आठवडा लागला असेल. भावाभावांची भेट होऊन सर्व उलगडा होऊन भरत परतला, तो निम्मा ज्येष्ठ झाला असेल. आता पावसाळ्यात पुढे जाणे नको, म्हणून राम कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चित्रकूटास
११
किन्तु चित्तं मनुष्याणामनित्यमिति मे मतिः। सतां च धर्मनित्यानां कृतशोभि च राघव । २.४.२७ “जोपर्यंत भरत ह्या नगरापासून (दूर) प्रवासाला गेला आहे. तोपर्यंतचाच काल तुझ्या अभिषेकाला योग्य, असे मला वाटते. हे खरे आहे की, भरत सज्जन आहे. वडिलांची आज्ञा पाळणारा, धर्मात्मा, दयाशील व स्वत:वर ताबा ठेवणारा आहे. पण मनुष्य कितीही चांगला, धर्मिष्ठ व सत्कृत्य केलेला असो, त्याचे मन चंचल असते; कोठच्या वेळेला ते कसे वळेल, हे सांगता येत नाही." हे सर्व दशरथ सांगत असतो; राम काहीही न बोलता ऐकत असतो व परत आईकडे जाऊन अभिषेकासाठी त्याने व सीतेने कसा उपवास करावयाचा, हे सांगतो. दशरथाने जे करावे, असा निश्यय केला होता - रामाला युवराज करण्याचा - तो योग्यच होता; पण निधड्या मनाने. उघड, आधी भरताला बोलावून, सर्वांच्या विचाराने हे व्हावयास पाहिजे होते. म्हाता-या, दुबळ्या दशरथाने कैकेयीची वंचना केली, यात शंकाच नाही. पण रामाने हे कसे ऐकून घेतले, ह्याचे आश्चर्य वाटते. पिता बोलेल, त्यावर एकही शब्द बोलावयाचा नाही; कारण तो पितृभक्त व लहान (अवघा १७ वर्षाच) होता म्हणून काय? राम कौसल्येला हा वृत्तांत सांगायला गेला, तेव्हा ती देवपूजा - विष्णूची पूजा - करीत होती. ह्याच संबंधात विष्णूचे जनार्दन (२.४.३३) असे नाव आले आहे. पुढे सहाव्या अध्यायात 'नारायणा'चा (२.६.१) उल्लेख आहे व राम अभिषेकाच्या आदल्या रात्री उपवास करून व्रतस्थ असा विष्णूच्या ‘आयतना'त राहिला (२.६.४) असे सांगितले आहे. रामायण वाचीत असताना आपण फार मागल्या काळची गोष्ट वाचीत आहोत असे वाटत नाही. है। ह्यामुळेच. हे सर्व उल्लेख मागाहून घुसडलेले असतील का? कौसल्येजवळ सुमित्रा होती व शेजारीच सेवेकरी वृत्तीने हात जोडून लक्ष्मण होता. राम त्याला म्हणतो. "लक्ष्मणा, माझ्याबरोबर पृथ्वीवर आता तू राज्य कर. तू माझा दुसरा आत्माच आहेस. ही लक्ष्मी तुला प्राप्त झाली आहे." ।। संस्कृती ।। १३ मंथरेने ताबडतोब कैकेयीचे बोलणे खोडून काढिले, “रामाच्या मागाहून रामाचा मुलगा येणार. राजाचे काय सगळे मुलगे कधी राज्यावर बसतात का? तसे झाले, तर अनर्थच होईल. भरताने इथे असायचं, ते तू त्याला आपले आजोळीच पाठवून बसलीस." वगैरे (२.८.१३,१९). | "गर्वाने पूर्वी रामाच्या आईचा-आपल्या सवतीचा-तू अव्हेर केला होतास, तर आता ती तुला तशी सोडील का ? दासीप्रमाणे कौसल्येपुढे तुला हात जोडून उभे रहावे लागेल. रामाच्या बाजूच्या स्त्रिया आनंदित होतील. तुझ्या सुनांना मात्र वाईट दिवस येतील” (२.८.५). हे सर्व तिने कैकेयीला पटविले. राजाकडून कैकेयीला जे दोन वर येणे होते त्यांची आठवणही मंथरेलाच करून द्यावी लागली, व पुढे काय करावयाचे, ते ठरले. खरोखरच राजाने पूर्वी वर दिले होते का, अशी थोडी शंका येते. पुढे ती रागावली आहे, हे पाहून तिचा अनुनय करिताना राजा म्हणाला की, "तू मागशील ते देतो.” कैकेयीने बरेच आढेवेढे घेतले, तेव्हा “मी जे म्हणून पुण्य केले आहे, त्याची शपथ घेऊन सांगतो की, तू सांगशील ते मी करीन." (करिष्यामि तव प्रीतिं । सुकृतेनापि ते शपे। २.१०.१९) असे म्हणाल्यावर कैकेयीने दोन वर मागून घेतले. तिने ते मागू नयेत, म्हणून राजाने तिची याचना केली; तिच्या पायांवर लोटांगण घातले; तेव्हा त्याच्या शपथेची तिने आठवण दिली व त्याच्या कुळाच्या सत्यप्रतिज्ञत्वाच्या ख्यातीबद्दल त्याला | सुनाविले. पूर्वी वर दिलेले असणे ह्या प्रसंगात आवश्यक दिसून येत नाही. कैकेयीने वर मागून घेतल्यावर राजा बेशुद्ध पडला. पण तेवढ्यात त्याने सुमंत्राला बोलावून रामाला आणावयाला सांगितले (२.१३.२१). राजाचे बोलणे म्हणजेच आज्ञा-ऐकून तो रामाला बोलवावयाला गेला(२.१३.२२.). राम आला, तेव्हा दशरथ रडत होता. त्याने 'राम' असा एक शब्द तोंडातून काढला. पुढे त्याला बोलवेचना. शोकाने आणि संतापाने विलक्षण दिसणा-या, आपणांकडे धड न पाहणा-या | बापाला पाहून राम आश्चर्यचकित झाला. रागावलेला असला, तरीही आपणांला पाहून मृदु होणारा आपला बाप आज मी पाया पडत असतानाही माझ्याशी || संस्कृती ।। १५ बोलत असा का नाही? मी काय अपराध केला? - त्याने - कैकेयीला विचारिले, "आई, माझ्या कुठच्या अपराधामुळे राजा इतका संतापला आहे? राजा काय सांगेल ते मी करीन, अशी माझी प्रतिज्ञा आहे. राम कधीही दोनदा (तेच-ते) बोलत नसतो.” रामाने असे म्हटल्यावर कैकेयीने वरांची कथा सांगितली आणि म्हटले, "जर तू आपल्या बापाला सत्यप्रतिज्ञा करू इच्छीत असलास. तर आजच्या आज चौदा वर्षे वनात जा. भरताला अभिषेक होणार आहे.” राम म्हणाला, “एवढेच काय, ह्यापेक्षाही दारूण काही सांगितलेस, तरी मी करीन. पण राजाला म्हणावे, रागावू नकोस. भरताला आणायला दूत पाठव. हा मी दण्डकारण्यात चाललो." हे ऐकून कैकयी म्हणाली, "राजाला लाज वाटत आहे, म्हणून तो बोलत नाही. तू शक्य तितक्या लवकर जा. तू जाईपर्यंत तो स्नान व भोजनही करणार नाही. (२.१६.१...४२) हाय, हाय!' असे म्हणून राजा पलंगावर बेशुद्ध पडला व राम उठून चालू लागला. ह्या सर्व घटनेत दशरथाने स्वतः दूताला 'रामाला आणव' एवढे आपल्या तोंडाने सांगितले, बाकी काही नाही. तो बोललाच नाही. जणू तो रागावलाच आहे, अशा त-हेने सर्व बोलणे कैकेयीने केले. राजा स्त्रीलंपट, म्हातारा व बालिश. ही सर्व विशेषणे निरनिराळ्या लोकांनी राजाला दिलेली आहेत. लक्ष्मण तर चक्क सांगतो. तदिदं वचनं राज्ञः पुनर्बाल्यमुपेयुषः । पुत्रः को हृदये कुर्यात् ....।। (२.१८.१७). “कोणच्या मुलाने (म्हातारपणामुळे) पुन्हा बालपण आलेल्या राजाचे मानावे बोलणे मानावे?" राजा कैकेयीकडे जातो, तेव्हाचे वर्णन वृद्धस्तरूणीं भार्या प्राणेभ्योऽपि गरीयसीम् । ददर्श धरणीतले ।। (२.१०.३). त्या वृद्धाने प्राणांपेक्षाही अधिक अशा आपल्या तरूण बायकोला जमिनीवर घडलेले पाहिले. राम स्वतः बापाबद्दल असेच बोलतो- शोकोपहतचेताश्च वृद्धश्च जगतीपतिः । कामभारावसन्नश्च तस्मादेतद् ब्रवीमि ते ।। (२.४६.१६). १६ । ।।संस्कृती ।। राम सुमंत्राला निरोप देताना शोकाने म्हणतो. "शोकाने खचलेला म्हातारा, व स्त्रीमध्ये गुंतलेला असा राजा आहे, म्हणून मी सांगतो, ऐक" त्याचप्रमाणे वनवासात गेल्यावर पहिल्या की दुसऱ्या दिवशी तो लक्ष्मणाला म्हणतो-
सा हि देवी महाराजं कैकेयी राज्यकारणात् । अपि न च्यावयेत् प्राणान् दृष्ट्वा भरतमागतम् । । काम एवार्थधर्माभ्यां गरीयानिति मे मतिः । को ह्यविद्वानपि पुमान् प्रमदाया कृते त्यजेत् । छन्दानुवर्तिनं पुत्रं तातो मामिव लक्ष्मण ।। (२.४७.,७,१०).
"भरत आलेला पाहून कैकेयी राज्य संपादण्यासाठी राजाचा प्राण तर नाही ना घेणार? अर्थ व घर्म ह्यांपेक्षाही काम वरिष्ठ असे आता मला वाटायला लागले आहे. असा कोणी अडाणी तरी माणूस आहे का की, जो बाबांनी मला टाकले त्याप्रमाणे आपल्या आज्ञाधारक पुत्राला टाकील?" . एवढेच नव्हे, तर राजासुद्धा कौसल्येच्या महालात आल्यावर स्वतःबद्दल जे उद्गार काढतो, ते असेच त्याचा दुर्बलपणा व शहाणपणाचा अभाव दाखवितात
कैकेय्या विनियुक्तेन पापाभिजनभावया । मया न मन्त्रकुशलैर्युध्दैः सह समर्थितम् । न सुहृभिर्न चामात्यैर्मन्त्रयित्वा न नैगमैः । मयायमर्थः संमोहात् स्त्रीहेतोः सहसा कृतः ।। (२.५.३१५१६).
“जी वाईट गोष्ट, तीच जणू काही चांगली असे कैकेयीने केले; व मीही जाणत्या, विचारी वृद्धांचे त्याबद्दल काय मत आहे. ते विचारिले नाही: मित्रांशी चर्चा केली नाही: मंत्र्यांना, शास्त्रविदांना निवाडा करण्यासाठी बोलाविले नाही; आणि भुलीने एका बाईसाठी तडकाफडकी गोष्ट करून टाकली." असा होता राजा. पण मुलगाही तडकाफडकी गोष्ट करणारा होता, असे म्हणावे का ? तो लहान होता, तो अधिकारी नव्हता. राजालाच ते करिता आले असते. सकाळी सभा बोलावून सर्वांसमक्ष रामाला अभिषेक करावयाचे ठरले होते. ते बोलणे राजाने मोडले कसे? राजा सत्यप्रतिज्ञ म्हणून नव्हे, तर स्त्रीलंपट आणि म्हातारा होता. I राम कैकेयीच्या महालातून निघाला, तो थेट कौसल्येकडे गेला. "देवी, तुला माहीत नाही. मोठी भयंकर आपत्ती कोसळली आहे. तुला, सीतेला व लक्ष्मणला दुःखात लोटणारी अशी ही गोष्ट आहे. महाराजांनी भरताला यौवराज्याभिषेक करावयाचे ठरविले आहे व मला वनवासात पाठविले आहे."हे शब्द ऐकिल्याबरोबरच कौसल्या बेशुद्ध झाली. रामाने तिला शुद्धीवर आणिले, तेव्हा तिने फार दुख केले. प्रसंग येण्यापेक्षा एक वेळ पुत्र न झालेला पतकरला. पतिपौरुषाने मला कसलेच सुख वा कल्याण दिले नाही. आता मुलामुळे सुख मिळेल, ही आशा होती. सवतींची (दशरथाला बखळ बायका होत्या.) मर्मच्छेदक बोलणी मला जन्मभर ऐकून घ्यावी लागली. तू जवळ असूनही माझी अवहेलनाच होत गेली. तू गेलास, म्हणजे माझं मरणच ओढवेल. आज जी चार माणसं माझ्यामागे आहेत, तीसुद्धा कैकेयीच्या पुत्रामुळे माझ्याकडे पाहीनातशी होतील. तू गेलास, तर मी मरेन व तू मातृमरणाला कारण झाल्यामुळे नरकात जोशील” (२.१८.२३-२८). अशी नाना त-हेची बोलणी ऐकून तिच्याइतकेच दुख झालेला लक्ष्मण म्हणाला,"रामाने वनात जावे, हे मलाही पटत नाही. राजा वृद्ध आहे विपरीत वागतो आहे; स्त्रीबुद्धीला वश आहे. शत्रुलासुद्धा रामात दोष सापडणार नाही. मी बघतो कोण आमच्या विरूद्ध जाऊ शकेल ते? सगळ्या भरतपक्षीयांना मी मारून टाकतो. तू स्वस्थ राहून पहा." कौसल्येने आशेने रामाकडे पाहिले; पण राम काही केल्या ऐकेना. "माझ्या बापाची आज्ञा (वाक्य) न पाळणारी अशी शक्ती नाही. मी तुझ्या पाया पडतो. मला वनात जाऊ दे. (परशु) रामाने बापाच्या सांगण्यावरून आईला मारिले; मग हे तर काहीच नव्हे. आपल्या कित्येक पूर्वजांनी अशाच शपथा घेऊन त्या पूर्ण केल्या. माझ्या प्राणांची आण! मला जाऊ दे. - लक्ष्मणा, तुझे प्रेम मला माहीत आहे. पण अधर्माने, अविचाराने वागू नकोस. भरताला अभिषेक होऊ दे. मी वनात गेल्याने कैकेयीला शांती लाभू दे." रामाची वचने ऐकून लक्ष्मणाचे समाधान झाले नाही. शेवटी रामाच्या इच्छेप्रमाणे कौसल्येने मंगल आशीर्वाद देऊन त्याची पाठवणी केली. त्यानेही जाताना आईला सांगितले की, "मी गेल्यावर राजा पुत्रशोकाने झुरेल. त्याला त्रास होऊ नये, असे वाग" (२.२१. १९). कौसल्येने तसे केले नाही. १८ । ।।संस्कृती ।। कौसल्येकडून निघून राम स्वतःच्या राजवाड्यात येतो. तेथे सीता त्याची वाट पाहत बसलेलीच. कैकेयीसमोर, कौसल्येसमोर राम मोठ्या धीराने वागला. पण सीतेपुढे त्याला आपली व्यथा लपविता आली नाही. सभोवतालचे लोक आनंदात मग्न होते. राम आला तो शरमिंदा असा. सीता त्याला सामोरी गेली, तो तिला दिसले की, त्याची मुद्रा शोक व चिन्ता ह्यांनी पांढरीफटक पडली होती. तो घामेजलेला व किंचित संतापलेला असा दिसत होता. तीही घाबरून गेली. "आता तुझा अभिषेक व्हायचा ते हे काय? तू असा का दिसतोस?" तेव्हा रामाने थोडक्यात तिला सर्व सांगितले. सीता ते ऐकून सुन्नच झाली. पण रामापासून दूर रहायला ती मुळीच तयार नव्हती. भवभूतीने सर्वमुखी केलेल्या ओळी येथेच येतात. 'त्वया सह निवत्स्यामी वनेषु मधुगन्धिषु' (तुझ्याबरोबर सुवासिक अरण्यांत मी राहीन). ह्याच संबंधात सीता सांगते की, माहेरी लहानपणी ब्राह्मणांच्या तोंडून ऐकलं होतं की, माझ्या कपाळी वनवास आहे (२.२६.६). असं काहीतरी अचानक एकदम मधेच सांगून टाकायचे, ही एक रामायणाची लकबच आहे. त्याच्या आधी व त्याच्या मागून परत कधी ते येतही नाही. आपलं आयत्या वेळी आठवलं, सांगितलं, असं हे वाटतं. कैकेयीच्या वरांचे प्रकरण असेच आहे. ते वर आपण मागितले, हे कैकेयीला आठवतही नव्हते. ते कधी मागितले, कसे मागितले, हे सर्व मंथरेला सांगावे लागले! पुढेही एकदोन स्थळे अशीच आहेत. सीतेने रडून रडून रागावून रामाची व नंतर सासूची परवानगी मिळविली; लक्ष्मण नेहमीप्रमाणे हात जोडून जवळच उभा होता. त्याला रामाने सागितले की, "मी जातो. माझ्यामागे कौसल्येचे, सुमित्रेचे रक्षण कर." वगैरे. लक्ष्मणाने हे बोलणे उडवूनच लाविले. "रामा, जेथे तू तिथे मी. कुदळ, फावडे खांद्यावर घेऊन मी तुझ्याबरोबर येणार. कौसल्येबद्दल, तुला काळजी नको माझ्यासारख्या हजारांचा भार सहन करण्यास ती समर्थ आहे." परत एक आतापर्यंत जिचा उल्लेख आला नाही, अशी नवीनच गोष्ट आपल्याला कळते. परत ह्या गोष्टीचा उल्लेख नाही. संपादकांनी खाली टीप दिली आहे की, राजाने जेव्हा कैकेयीशी लग्न केले, तेव्हा कौसल्येला
१९
ह्या सर्व निरोपानिरोपीत व पुढेही एक गोष्ट राम व इतरही पुनः पुनः सांगतात, "मी परत येऊन राज्यावर बसेन तेव्हा " असे राम म्हणतो, इतरही म्हणतात. भरताला जर यौवराज्याभिषेक व्हायचा, तर 'मी राज्यावर बसेन,' असे राम का म्हणू शकतो? (प्राप्तराज्येन नरव्याघ्रे शिवेन पुनरागतः।(२.४६.७२). सुमित्राही असेच म्हणते (२.३९.१५). सर्वांचेच असे मत दिसते. भरताला अभिषेक झाला व दशरथ चौदा वर्षे राज्यावर राहिला, तर तो रामाला आपला वारस करू शकतो, असा का ह्याचा अर्थ ? म्हणून का कैकेयी राजाला मारील, असे भय सर्वांना वाटते? ह्या प्रश्नाचा उलगडा रामायणात झाला नाही. हा पेच मात्र पुढे सर्वस्वी सुटला.
रामाने लक्ष्मणाला शस्त्रागारातून उत्तम शस्त्रे विशेषतः दैवी धनुष्य बाण आणावयास सांगितले. आपले सर्व धन रामाने गुरूपुत्रांना व इतरांना वाटून टाकले व जाण्याच्या आधी दशरथाचा निरोप घेण्यास राम, लक्ष्मण व सीता अशी तिघेही कैकेयीच्या राजवाड्यात गेली, तो लक्ष्मण व सीता पायी जाताना पाहून सर्व लोक हळहळत होते. राम निरोप घ्यायला आला आहे, असे सुमंत्राने सांगितले, तेव्हा राजाने माझ्या बायकांना बोलावून आण म्हणून सांगितले, व राजाच्या शेकडो (७००-वर) बायका कौसल्येला घेऊन आल्या. ह्या सर्व घटनांमधे एक गोष्ट लक्षात येते. "सुमंत्रा, रामाला आण.” “सुमंत्रा, माझ्या सर्व स्त्रियांना बोलाव." असले निरोप सांगताना राजा पूर्ण शुद्धीवर होता. रामाने विचारिले, “माझी काय चूक झाली?" तेव्हा त्याला बोलवेना. त्याचप्रमाणे “माझ्या स्त्रियांना बोलाव, " ह्याऐवजी "मंत्र्यांना बोलाव," किंवा "वसिष्ठांना बोलाव." असे तो म्हणेना. ही एकच गोष्ट तो कैकेयीच्या किती अधीन होता व तिला वर दिले होते वगैरे खोटे असण्याचा कसा संभव आहे, हे दाखविते. "रामाला आणव," असे त्याने सांगितले. राम येताना पाहून तो धावत त्याला भेटायला गेला व मध्येच बेशुद्ध झाला. त्याला
।। संस्कृती ।।
रामाने निरोप मागितला. दशरथ म्हणाला, "तू राजा हो. मला बंधनात टाक" रामाने ते मानिले नाही." बरं, जा, पण आज जाऊ नकोस: उद्या सकाळी जा." रामाने तेही मानिले नाही. तेव्हा राजाने सुमंत्राला सांगितले, "चतुरंग सेना, धनधान्य, संपत्ती रामाबरोबर द्यावी. त्याचप्रमाणे ज्या संपन्न माणसांना रामाबरोबर जायचे असेल, त्यांनाही जाऊ दे, राम वनात राहील. तो येईपर्यंत भरत अयोध्येचे पालन करील." हे शब्द ऐकून कैकेयीने खाडकन बजाविले की, "राजा, ज्या राज्यातले धन गेले आहे, असे राज्य माझ्या भरताला नको. असे राज्य म्हणजे स्वाद गेलेल्या मद्यासारखे आहे. हवे आहे कुणाला ते? तुला जर वचन पाळायचं, तर नीट पाळ." राजा म्हणाला, "तर मग मी पण रामाबरोबर जातो. तू नि भरत राज्य करा." राम म्हणाला, "राजा, मला धनाची गरज काय ? कोणी तरी वस्त्रे व कु-हाड द्या, म्हणजे पुरे." कैकेयीने ताबडतोब तिघांनाही वल्कले दिली. सीतेला वल्कल नेसता येईना. ते रामाने तिच्या लुगड्यावरून नेसविले. शेवटी बराच शोक करून दशरथाने रथ जोडून तिघांना राज्याबाहेर घालविण्यास सुमंत्रास सांगितले. जाताना सुंदर वस्त्रे कोशागारातून आणून त्याने सीतेला नेसविली. तिघे रथातून चालू लागली. सबंध शहर मागे लोटले. राजाही मुलांचे शेवटचे दर्शन व्हावे, म्हणून रस्त्यावर आला. रामाने आपल्या आईला रथापाठीमागे धावताना जणू तिचा नाचच चालला आहे, अशी पाहिली. ते दृश्य त्याला पाहवेना. राजा 'रथ हळू ने' असे सांगत होता. रामाने सांगितले, " सुमंत्रा, रथ दौडव. राजा रागावला, तर म्हणावे तुमचे म्हणणे ऐकू आले नाही." राम दिसेपर्यंत, रामाच्या रथाची धूळ दिसेपर्यंत राजा रस्त्यावर होता. तो शेवटी तेथेच पडला. एका बाजूला कैकेयी होती, तिची तो निर्भत्सना करू लागला. त्याला हळूहळू कसेबसे कौसल्येच्या महालात नेले.
२१
चैत्यशतैः जुष्टः दैवस्थानैः उपशोभितः जनपथः ।
(झाडांखालच्या शेकडो चैत्यांनी व देवस्थानांनी नटलेला प्रदेश) हे वर्णन पुरातन वाटत नाही.
राम त्या रात्री तमसेच्या तीरावर निजला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून, आपल्याबरोबर आलेल्या नागरिकांना चुकवून तो राज्याची हद्द जे शृंगवेरपुर तेथे आला. तेथे त्याला गंगा दिसली. येथेही सीतेने गंगेला नमस्कार करिताना "आम्ही चौदा वर्षांनी येऊ. रामाला राज्याभिषेक होईल, तेव्हा मी तुझी पूजा करीन,” असे म्हटले आहे. तेथे गुहराजाच्या मदतीने सर्वजण गंगापार झाले. गंगापार होण्याआधी रामाने व लक्ष्मणाने केसांना उंबराचा चीक लावून त्यांच्या जटा बनविल्या.
गंगेच्या उत्तर तीरावरच रामाने सुमंत्राला परत धाडले. रामाने लक्ष्मणाला सांगितले, “तू पुढे हो. मध्ये सीता राहू दे व मी तुम्हा दोघांचे रक्षण करीत मागून चालतो (२.४६.७६). 'लक्ष्मण भावोजी मागे, पुढे स्वामी' हे मोरोपंतांचे वर्णन ह्यावरून चुकीचे वाटते.
राम नंतर प्रयागी भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेला. तेथे एक दिवसाचा पाहुणचार घेऊन, त्यांनाच वाट विचारून तेथून काही कोसांवर असलेल्या चित्रकूट-पर्वतावर तो गेला. ते स्थान त्याला इतके आवडले की, त्याने लक्ष्मणाला लाकडे तोडून पर्णकुटी बांधावयास सांगितले, व ती बांधून झाल्यावर तीत रहायला जाण्याआधी एक मोठा ऐण (काळवीट) मारून त्याच्या मासाचे हवन केले व आता चौदा वर्षे चित्रकूटावर रहावयाचे, असा त्यांनी बेत केला. येथे राम इतक्या सुखात होता की, त्याने सीतेला नाना सौंदर्यस्थळे दाखविली व म्हटले, "लक्ष्मण माझ्या आज्ञेत आहे, तू मला अनुकूल आहेस. मी आनंदात आहे. कित्येक वर्षे जरी इथे राहिलो, तरी मला वाईट वाटणार नाही."
।। संस्कृती ।।