ज्याच्या दृष्टिपुढें सुर सेना समरांत परम दम्रा त्या ॥ शुंभ्र विलोकी निहता प्राणसम ध्वस्तपरमद भ्रात्या ॥१॥ त्याही विलोकी ध्वस्ता विध्वस्ताऽशेष सुर सभा सेना ॥ ज्याच्या नव नव सुयशा हुनि मजा अमृत सुरस मासेना ॥२॥ बंधु वर्धे सैन्य वधें शुंभ क्षोभें लयाऽग्निशों तोलें ॥ त्या देवीसि कडकडुनि जड कडु निपडुचि रणीं असें बोलें ॥३॥ साऽहंकारे दृष्टें दुर्भे शौर्य धरुं नको गर्व ॥ अन्याचें बळ आश्रय करुनि करिशी युद्ध हें वृथा सर्व ॥४॥ श्रीद्र्ग्या त्यासि ह्मणे रे दृष्टा ऐक साधु धी रहिता ॥ मी एकलीस आहें या विश्वा माजी साधु धीर हिता ॥५॥ ज्या ब्रह्माणी प्रमुखा माझ्याचि विभुति जाण पापा हें ॥ मजमाजि समस्ताही झा करितात प्रवेश हा पाहें ॥६॥ हें ह्मणतां ब्रह्माणी प्रमुखा त्या देवता स्व गेद्दांत ॥ सर्वा प्रवेशल्पा त्या दुर्गेच्या तत्क्षणीं च देहांत ॥७॥ देवींच्या वृदांतें निरुपिजे जेवि भुमि कुंभातें ॥ नेउनि विलायासि ह्मणे सर्वाद्या सर्वभुति शुंभातें ॥८॥ होतीं प्रगट त्रिजगीं साधु हित करुनि असाधु वध मांजीं ॥ म्यां आअरिली रुपें तीं सुबहुमतें श्रुतींस अधमा जीं ॥९॥ मी एकलीच आतां उरलें आहेंरणांत न चपाप ॥ हुं हाणबाण जण स्त्रीं न मज तुला घडेल नच पाप ॥१०॥ ऐसें बोलुनि देवी आरंभी भव्य समर सन्नास ॥ ज्यातें पाहुनि झाले सर्व महेद्रादी अम्र सत्रास ॥११॥ शस्त्रास्त्रें देवींनें जीं त्या समरांत सोडिलीं होतीं ॥ शुभें प्रतिशस्त्रास्त्रें योजिनिं तत्काळ मोडिलीं होतीं ॥१२॥ देवींही शुंभाच्या खडी लीलेंकरुनि शस्त्रातें ॥ अस्त्रातेंही उडती वात जसा शुष्क सुक्ष्म वस्त्रातें ॥१३॥ परमेश्वरी करी जें ग्री वर्णु आज काय बा हुं तें ॥ परशस्त्रांस्त्रतें चि न दे बहुत शिव्या हि लाज बाहु तें ॥१४॥ कोंडी पळभरि शुभ श्रीमज्जगदीश्वरीस शरभवणीं ॥ पर शर झाले दुर्गा शर वृंदीं जेंविं सिंह शरभ वनीं ॥१५॥ ह्मणति सुरा झगटतसे शिरिं द्याया वामपाद परें मेला ॥ परमेला हा जिंकिले तरि पुरविनि काम पादम रमेला ॥१६॥ स्वाच्छादक शर पटलें छेदुनि खंडुनि शंभ चापतें ॥ जेविं परा विद्या जनि मृति हेत्वऽज्ञान रुप पापतं ॥१७॥ मग शुंभ शक्तितं धरी चक्रें खंडी तिला हि परमा ती ॥ शतचंद्र चर्म असि घे त्याची हि करावया सि पर माती ॥१८॥ चुरिलें शिवा शरांनी त्या असिसश चर्म रविकराऽमळ ॥ कीं अविनीताचें यश करितां हि सयाय पविकरा मळतें ॥१९॥ केला जगदाद्येनें लीलेनें संगरीं विरथ बकला ॥ बहुधा बहुधाष्टयेधें मुद्गर न रहावया शिर थबकला ॥२०॥ येता धांवत खडी बाणांही मुद्गरां शिवा राया ॥ तरी येचि शालि राशि प्रति जैसा मुद्रराशि वाराया ॥२१॥ न पर भृतिसि साहे माशीशी स्पर्शतां जसा कृष्टी ॥ जगदंबेच्या हृदयीं हाणी धावोनि दृष्ट तो मृष्टी ॥२२॥ देवी क्षितिवर धडलड पाडी हाणुनि उरीं अरीस तंळें ॥ होईल सुबहुत कसें आत्यगुणें सागरापरीस तळें ॥२३॥ सहसा उडुरि शिवेतें घेउनि गगनांत जाप मग नींच ॥ जरिहि निरधारा तो करी अरिशींबाहुयुद्ध गगनींच ॥२४॥ ते प्रथम सिद्ध मुनि जन विस्मय कारण नियुद्ध बहुरुचिर ॥ झालें त्या श्रीदुर्गा दैत्याशी खंगिणी अतुल सुचिर ॥२५॥ सुचिर नियुध व्योमीं करुनि धरुनि अरिहरिसहगजातें ॥ सुखव्हाया फिरवि अधिक जरि सकळांपारिसरिसहगजांतें ॥२६॥ फिरवुनि भरभर गरगर अंबा लंब सनिभ मुकेशी ॥ ती आपटी महिवरी शुंभ तनु जीवना मति मुकेशी ॥२७॥ उठुनि वळुनि मुष्टि सबळ कुंदुकसा तो पुन्हा उसळला जो ॥ त्या पाहुनि नच लवणें स्ववृत्त ह्मणतां पुन्हा मुसळ लाजो ॥२८॥ नीच निमट त्या ह्मणुनि मुष्टि विदारुनि वक्ष माराया ॥ तेव्हां सदयाहि करीं जगदंबा लेश न क्षमा राया ॥२९॥ शुंभातें जयमुलेम शुलें हृदयांत चंडिका ताडी ॥ शत्रु शतशमनशीला लीलालेशेम्चि भुतळीं पाडी ॥३०॥ झाला असतां तो खळ सुर मद नग भित नव क्षण रणातें ॥ पावे शुलाघातें होतां मग भिन्न वक्ष मरणातें ॥३१॥ पडतां तेणें सकळा भु सद्वीपा ससागरा सनगा ॥ कांपविली एक न स्या देवींचें मात्र कापलें मन गा ॥३२॥ मग लागल्या कराया रायामागें चि यान सागगा ॥ तो जेविं ताप मोह प्रद होय न तेविं मानस गगा ॥३३॥ विश्व प्रसन्न झालें होय जसें भास्करोदयीं कमल ॥ उप्तात मेघशमले सर्व व्योम प्रकाशलेम अमल ॥३४॥ झाले प्रहर्ष निर्भर मानस सुरज जे महाधिनें गलित ॥ गंधर्वाहीं केलें गान शिवासद्यशोमृतें ललित ॥३५॥ वाजविलीं बहु वाद्यें त्या शत सहस्त्र वादकांहीं हो ॥ तद्रव हित कर्णाला न व रुचला इतर वाद कांहीं हो ॥३६॥ अतिमुदित अप्सरांचे गण तेव्हा नाचले शत ज्ञाते ॥ निज भान धरुं तेती न च त्यांचे नाच लेश तज्ज्ञा ते ॥३७॥ मंद सुंगंध सुशीतळ वायु सदा लागले वहायास ॥ सुप्रभ होय दिवाकर त्यांचे पद्म ही सुखें पहायास ॥३८॥ पेटत नव्हते पुर्वी जे अग्नि सुखें चि पेटले हो ते ॥ होते खिन्न मुदित मग होउनि बहु त्यांसि भेटले होते ॥३९॥ कांदबिनी शिवेतें जो शतमखमुख तयाहि लेखातें ॥ चातक मयुर ऐसें तच्चारितहि अमृतवर्ष लेखा तें ॥४०॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.