शुंभ क्रोधें खवळे श्रवण करुनि चंड मुंड वध वार्ता ॥ अज्ञापी सैन्यातें तो व्हाया स्वास्त्रियाहि अधवार्ता ॥१॥


जे कंबुघोम्र कालक दैर्दद मौर्यादि सर्व ते योध ॥ घेउनि श्रुंभ निघाला गेला देवीसमीप सक्रोध ॥२॥


देवी पाहे आलें अतिभेषण दैत्य सैन्य तें तूर्ण ॥ स्वथनुर्गुण नादांही करि भु गगनावकाश ती पुर्ण ॥३॥


सिहहि बहुताचि गर्जे काळीही गर्जना करी मोठी ॥ त्या नादांतें परिमुनि असुरांच्या त्या वधीत ती कोटी ॥४॥


तैं विधि हरि हर वासव देहापासुनि निघोनि तद्रुपा ॥ शक्ति शिवाप्रति आल्या देवहितपराहितार्थ ज्या भुपा ॥५॥


त्या शक्तिसह येऊनि इषान प्रभु असें शिवेसि वदे ॥ मत्प्रेमें शीघ्र असुर मारुनि विश्‍वासि तु शिवें शिव दे ॥६॥


तों त्या देवी देहा पासुनि निघोनि चडिका शक्ति ॥ पावे परम भयंकर मूर्ति शिवाशतनिनादिनी व्यक्ति ॥७॥


वात्या उन्मुलन या सर्वाऽमर साधु रिपु चमु कदली ॥ प्रकटुनि ईशानातें मग ती अपराजिता असं वदली ॥८॥


भगवंता दुतत्व स्वीकारुनियां क्षणीच तु आगें ॥ सत्कीर्तिस्तव जा त्या शुंभनिशुंभाकडॆ असे सांगे ॥९॥


त्रैलोक्यातें पावो शक्र जयांचें तयासि ओपावं ॥ सेवोत अमर हवितें धर्म तुह्मातें ह्मणोनि ओं पावें ॥१०॥


जरि आपण वांचावें ऐसें इच्छित असाल आजि तरी ॥ पाताळाशि तुम्हीं जा साम करीं हित करी न आजितरी ॥११॥


बळ गर्वे रण कामाचि तरि म्यां केला असे पुढें कर या ॥ माझ्या देवोत शिवा तुमच्या मांसे करुनि ढेंकर यां ॥१२॥


कथुनि असें पाठविला दुत पणें शिव ह्मणोनि ती देवी ॥ शिवदुती भक्त सदा या सन्नामा सुधाधिका सेवी ॥१३॥


कथिला त्या देवीचा तैसचि निरोप तो तयां शैर्वै ॥ गर्वें मान्य न केला दृष्टांहीं ज्यांत मंगळें सुर्वे ॥१४॥


शिव झाला दुत वृथा मरति ह्मणुनि बहु दयाळु कळवलला ॥ परि त्याच्य हित बोधें दोघांतुन एकही न खळ बळला ॥१५॥


शुंभ शिवेवरी गेला स्व भेट पुढे करुन सर्वही राजा ॥ बंदलिचि कर जोडुनि सांडुनि काठिन्य गर्व हिरा ज्या ॥१६॥


विविधायुधवृष्टि असुर सर्वाहि कात्यायनीवरि करीती ॥ न तशा मेघांच्या त्या प्रळपी<ंच्या साजती बरिक रिती ॥१७॥


देवीचे दिनकर कर खर तर शर पर विमुक्त शस्त्रातें ॥ भस्म करिति तत्काळ ज्वाळ जसे धौत सुक्ष्म वस्त्रातें ।\१८॥


मारी ती ब्रह्माणी स्व कमडलु वारिचे सटाके शें ॥ परिभविली न परें जशि करिच्या सृद्दढेंहि हरिसंटा केशें ॥१९॥


माहेश्वरीं त्रिशुलें चक्रें दैत्यांसि वैष्णवी मारी ॥ तैशीच शक्तिने ती देवी शिखि वाहनाहि कौमारी ॥२०॥


निज चक्र तुंड दंष्टे यांही मारी परांसि वाराहि ॥ तैशीच नारसिंही बहु भी जीच्या नर्खाहि वारा ही ॥२१॥


चंदाऽदृहास करुनि क्षितिवरि पाहुनि अनेक शिवदुती ॥ भक्षी पर भर हरि जी तिस साधुन भू मनें कशि वदु तीं ॥२२॥


यापारि मातृगणांतें प्रकुपित पाहोनि पावले दैन्य ॥ त्रासें पलायन अकरी शुंभचें निहतें शेष जें सैन्य ॥२३॥


तेव्हां होय महासुर परम कुपित रक्तबीज बा राया ॥ द्यांवे मात्तृगनांतें अत्यद्रुत युद्ध करुनि माराया ॥२४॥


घाली तो ऐद्रींशी गांठि करुनियां त्वरा गदापाणी ॥ त्या क्षोभदा होय कुलिश जैसें आमेज्वरा गदा पाणी ॥२५॥


क्षत रक्तबीज देहा पासुनि जितुका ही रक्त बिंदु निघे ॥ त्याचा होय महासुर जो किमपि उणेपणेंग न निंदुने घे ॥२६॥


तत्तुल्याचा व्हाया रक्ताचा मायबाप थेंब गळे ॥ कीं चालती बकाच्या बक वगळ्याच्या हि बा पथें बगळे ॥२७॥


ऐसें शतशः क्षतजः प्रभव पुरुष रक्तबीज सम राजा ॥ सांगों काय करिति ज्या मातृगणांशीं असीम समरा ज्या ॥२८॥


ऐद्रीनें क्षत केलें हिर ह्माणुनिं वज्र पुनरपि तयाचें ॥ तद्रक्तज पुरुष वरिति तच्छीलजसें चि सुनर पितयाचें ॥२९॥


त्या शोणित बीजातें निज चक्रें करुनि वैष्णवी ताडी ॥ ऐंद्रे कौमारी ही शुलें माहेश्वरी उरीं फाडी ॥३०॥


त्या शक्तीतें ताडी तो शोणितबीज ही गदा घातें ॥ बहु मानवए सर्व ही सुर त्याच्या त्या महागदाघातें ॥३१॥


शक्तींनी क्षत करितां सर्वांगी उसळले क्षतज बिंदु ॥ बहु कोटि पुरुष झाले सिंधु तरंगी जसे तरणि इंदु ॥३२॥


ते रक्तोद्भव पुरुष व्यापुनि करिती भयातें विश्वास ॥ निश्वास उष्ण सोडिते देव जयाचा नये चि विश्वास ॥३३॥


भ्याले निर्जर पाहुनि कालींतें चंदिका स्वयें सांगें ॥ चामुंडे मुख पसरी तु खाद्य स्वादु साडिशी कांगे ॥३४॥


माझ्या शस्त्राघातें अरि रक्ताचा उडेल जो बिंदु ॥ तो तव मुखी पडावा गुरु पर्वी जेंवि राहुच्या इंदु ॥३५॥


जे रक्त बिंदुपासुनि होतिल उप्तन्न पुरुष तव तुंडी ॥ तो नच उरतिल पडले शलभ जसे दीप्त वन्हिओच्य कुंडीं ॥३६॥


पी रक्तातें घटघट गटगट ते गीळ जेविं अजिंर ॥ नव यश गाइल करिकुळ अवलंबुनि चरण जेवि मजीर ॥३७॥


या युक्तिनेंचि होईल समरी हा रक्तबीज नीरक्त ॥ सर्व हि तुझिया साऽमर चामरकर भक्त वीर्जना रक्त ॥३८॥


काली ह्मणे शिवे तुज किति हा लघुकाय न पर मेरु चला ॥ विश्वास निदेश तुझा अमृत्ताहुनि काय न परमेश्व चला ॥३९॥


त्या शोणितबीजातं निजशुलें चंडिका नृपा हाणी ॥ वाहे तद्देहातुनि रक्त जसें टोंचितां गदा पाणी ॥४०॥


जिकडे शोणित वाहे तिकडे पसरुनि ती वदन देवी ॥ काली कराल वदना त्या शोणित बीज शोणिता सेवी ॥४१॥


वदनीं होती त्यांतें भावी बहु सुरस मानवे चावे ॥ शतकोटि तद्रदांनी पर वृत्रासुरसमान वेचावे ॥४२॥


रक्तज कुतर्कसे ती विद्याशी ते नवे नवे दमुनी ॥ शुंभनिशुंभ हि मानी तिस केवळ मानवे न वेद मुनी ॥४३॥


शोणितबीज गदेंनें तोंडीं परि चंदिकेसि अल्पाही ॥ पीडा न उग्र ही गदा घात करी जेवि हरिसें तल्पाहि ॥४४॥


देवी शुलें वज्रें खंगें हाणी तसं चि ऋष्टीने ॥ दृष्टीनें हि हत करी अरितें खीळुनि बाण दृष्टिने ॥४५॥


काळी तद्रक्ताचे व्हाया तद्रचित पाप थेंब हुत ॥ निज मुख कुंडीं करि जरी मळला होताहि कपिथें बहुत ॥४६॥


केला निरक्त ऐसा अति दारुण रक्तबीज तो खचला ॥ सुर मुन ह्माणति नमुनियश वर्णुन देवु शिवेसि तोख चला ॥४७॥


तो मातृगण प्रमुदित झाला विजयें करुनि मग नाचे ॥ जयजयकारें भरिती सुर मुनि हृद्देश सर्व गगनाचे ॥४८॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.