सायकॉलॉजिकली ! (नाट्यछटा)

<poem> थांब, ये नारु ! - अरे, आधीं नीट ऐकून घेतलेंस का काय काय आणायचें तें ? - हां बरोबर, पानाच्या तीन पट्टया आणि एक सिगारेटसची पेटी ! - पण ती कोणती ठाऊक आहे का ? - सीझर्स ! कैची छाप ! भलतीसलती उगीच आणूं नकोस ! - चल आटप, ठोक धूम लवकर ! सगळे आम्ही इथें वाट पहात आहोंत ! - छे बोवा ! काय तुम्ही मघांपासून उगीच पिरपिर लावली आहेत हो ? - तुम्हांलाच तेवढी घाई अन् आम्ही काय इथें राह्यला आलों आहोंत ? अनायासें सुट्टी मिळाली आहे, बसूं थोडा वेळ आणखी ! समजलें हो ! काम .... काम .... काय कामाचें सांगतां येवढें ? येऊन जाऊन स्नान करुन जेवायचें, अन् खुशाल आढ्याला पाय लावून ताणू न द्यायची, हेंच कीं नाहीं ? सत्तेची येवढी बायको असल्यावर मग हो कां इतकी घाई ? - असें ! हें नव्हतें मला ठाऊक ! तुमची आमची विशेष ओळखही नुकतीच झालेली ! त्यामुळें .... कधींची बरें गोष्ट हीं ? - म्हणजे जवळजवळ चार वर्षे झालीं म्हणानात ! - ब.... रं ! फिरुन कांही मग ? - ना .... हीं !! अरे, म्हणजे सांगतां आहां काय तुम्ही ! खरेंच का ? - मग मोठें विलक्षण आहे बोवा ! बायको जाऊन चार वर्षे झाली आणि अजून लग्न नाही म्हणतां ? - हेः स्टुपिड् ! - रागावूं नका तुम्ही ! पण खरें सांगायचें म्हणजे .... साफ इथें चुकतां आहां तुम्ही ! यावरुन होतें काय ठाऊक आहे का ? - अहो, बायकोवर तुमचें प्रेम नाहीं हें उघड उघड दिसतें ! - भलतेंच एखादें ! - असें आहें त्याचें.... इतकें कशाला प्रत्यक्ष माझेंच घ्या ना ! पहिली बायको माझी मेली, तेव्हां लगेच दुसरी केली ! म्हणजे झालें काय ? - पहिलीवर झालें माझें दुप्पट प्रेम ! पुढें दुसरी गेल्यावर तिसरी ! त्यामुळें .... लक्षांत आलें का काय झालें तें ? .... पहिलीवर माझें झालें तिप्पट, दुसरीवर दुप्पट अन् तिसरीवर एकपट, म्हणजे सर्वात कमी प्रेम तिच्यावर ! असें मोठें हें .... ' सायकॉलॉजिकली ' - म्हणजे मानसशास्त्रदृष्ट्या .... बरें का ? - मानसशास्त्रदृष्टया हें मोठें विचित्र त्रांगडें आहे ! - भले महाराज ! टॉलस्टॉय आणि टागोर वाचून हेंच का शेवटीं सार काढलेंत ? ...

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.