हें काय सांगायला हवें ! (नाट्यछटा)

<poem> हां, आतां बरोबर ! घरचेच तुमच्या बातमीदार ! तेव्हां इतक्यांत तुम्हांला कळलें हें ठीकच ! - छे ! मला अजून वार्तासुद्धां नाहीं ! आपली कुणकुण लागली आहे इतकेंच ! - बाकि आहे काय त्यांत म्हणा ! कळेल, आज नाहीं उद्या ! - कां .... हीं खटपट नाहीं अन् कांही नाहीं ! पत्रंही कोणाला घातलीं नाहींत, किंवा कोणाकडे जोडेही फाडले नाहींत ! - अन् अर्ज तरी काय, खरडायचा म्हणून खरडला इतकेंच ! वांकडयांत असा शिरलोंच नाहीं ! म्हटलें काय होईल तें आपलें सरळ ! - नेहमीचेंच माझें आहे हें ! काम मनापासून करायचें, अन् चोखपणानें वागायचें ! हव्यात कशाला इतर खटपटी आणि लटपटी ! - आतां तुम्ही म्हणाल कीं, हें जमलें कसें ? अहो ! तेंच तर मोठें आश्चर्य आहे ! अर्ज जेव्हां म्हणतात माझा दृष्टीस पडला, तेव्हां .... आपले लोक बाजूलाच राहिले, पण एका युरोपियननें म्हणे हट्टच धरला कीं, ' अमुक एक गृहस्थ माझ्या जोडीला परीक्षक असतील, तरच मीही परीक्षक होईन ! नाहींतर साफ जरुर नाहीं मला युनव्हर्सिटीची ! ' - तेव्हां बोला आतां ! फादर लगबगमननेंच असें म्हटल्यावर ... अन् तें म्हणजे बडं प्रस्थ ! .... कोण पुढें काय बोलणार ! मुकाटयानें सगळे कबूल ! - छेः ! ओळख ना देख ! काळा कां गोरा त्यानें अजून पाहिलंसुद्धां नाहीं मला ! कुठं कांहीं लिहितों सवरतों, तें त्यानें मला वाटतें वाचलेलें ! तेवढयावरुन हें सगळें, बाकी खटपटीचें म्हणून नाव नाहीं ! - हॉ ! हॉ कसें बोललांत ! सरळ आपलें काम करीत असावें, पारख करणारा, आज ना उद्या, भेटतो कोणी तरी जगांत ! - ब .... रें ! कांही नवल विशेष ? - कुशाभाऊ जोशी; कोण बुवा हा ? - ओ ! आय् सी ! आपल्या तो .... नागुअण्णाच्या .... बयडीचा कुशा ? तो का बसणार आहे आमच्या परीक्षेला ? - काय ! इतका मोठा झाला आहे ! अहो परवां ना त्याला पाहिला आपण? धड नाकसुद्धां पुसतां येत नव्हतें ! आणि तो आतां कॉलेजांत का आला आहे ! - काय ! दिवस कसे हां हां म्हणतां जातात पहा ! - हो, तेंही खरेंच आहे ! प्रकृतीमुळें जे नागुअण्णा कोल्हापूरला गेले, ते तेही तिकडेच, आणि कुशाही तिकडेच ! तेव्हां काय मध्यंतरी दिसायचें कारण ? बरें कामाशिवाय आम्ही थोडेच कुठेंख हालतों आहों ! आपलं पुणें, नाहीं तर मुंबई ! बाकी म्हणून .... बरें आहे येऊं आतां ? - वा, वा ! भलतेंच ! त्याची नको काळजी ! कसें झालें तरी आपल्या बयडीचा कुशा ! तेव्हां हें काय सांगायला हवें ? हळूच केव्हांतरी बरं का ? - हळूच केव्हां तरी नंबर वगैरे ....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.