सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या २१०१ ते २२००
<poem> कीं बाधक काय आनंदीं बुद्धीचा जों काल उद्भव न होतां ।एक स्फूर्ति मात्र असे आंतौता । तेचि मायादेवी स्वस्वरूपा वरुता ।भासली असे तया स्फूर्तिचे दोन प्रकार । जाणीव नेणीव निरंतर ।विद्या नामें जाणतें होणार । अविद्यास्वरूप नेणीव ॥२॥ऐशिया विद्या अविद्या दोन । त्यांत प्रतिबिंबित जीवेशान । विद्येसह ईश निमित्त कारण । उपादान जीव अविद्या ॥३॥बुद्धीपासून देहापर्यंत । जें जग कार्यरूपें समस्त ।जीवही कार्यरूपीं विशेष भासत । स्वप्नीं कीं जागृतीं ॥४॥परी सुषुप्तीमाजींही कारणरूपीं । जीवत्व असे नेणीव संकल्पीं ।आणि ईश्र्वर निमित्तमात्र विक्षेपीं । तो कार्यांत नये ॥५॥कार्यांत न ये म्हणोनि निमित्त । जो उद्भव स्थिति लया आंत ।जो उपादान कारण समस्तांत । हा निर्णयचि असे ॥६॥असो ऐसा आनंमय । या पांचांचा येथें अन्वय । परी मुख्य बाधकत्वाचा अपाय । ते अविद्या नेणीव ॥७॥स्वस्वरूपाचें न कळणें । हेंचि कोशनामें आच्छादन । येर विद्या माया जीवेशान । हेही विकाररूपी ॥८॥मुख्य मूळ मायाच विकारी । जे न होऊन जाहली निर्विकारी ।अविद्या स्वरूपा आच्छादन करी । विद्या उभारी जगकार्य ईश अलिप्तत्वें प्रेरक ।जीव सुखदुःखाचा भागी एक । एवं मायेसहित हें पंचक ।बाधक विकारी ॥२११०॥या कोशाचे शिर प्रिय । मोद दक्षिण पक्ष होय । प्रमोदा बोलिली सुखमय । पक्ष उत्तर ॥११॥आनंद आत्मा जो चवथा । तोही स्थापिला असे सर्वथा ।आत्मा ब्रह्मघनाही समर्था । पुच्छत्वीं प्रतिष्ठिलें ॥१२॥बुद्धीचा बहिर्व्यापार सरता । विश्रांति घ्यावया परतता ।प्रथम वासनेसी सुखाकारता । तेंचि प्रिय या कोशीं ॥१३॥पुढें बुद्धीचा तरंग मावळे । तेव्हां सुखाकारता उफाळे ।तो मोदनामें सुषुप्ति काळें । दुजें अंग ॥१४॥जेव्हां घन सुषुप्ति लागे । तेव्हां प्रमोदाकार होय अंगें ।गाढ सुषुप्तीचिया प्रसंगें । तो आनंद आत्मा ॥१५॥हा आनंद आत्मा म्हणितला । परी ब्रह्म आत्मा न जाय स्थापिला ।पांच अंगांचा पक्षी जो वर्णिला । त्याचा आत्मा असो प्रिय अथवा मोद । प्रमोद किंवा आनंद ।हे चारी सुखाचे स्वाद । नेणीवरूप वृत्तीचे ॥१७॥एक सुख एक करी ग्रहण । हेचि त्रिपुटी अन्यथात्वें पूर्ण ।ते यथार्थ नव्हे सुखैकघन । उद्भवणें नाश जया ॥१८॥हेही चारी जेथून जाहले । आणि मायादि पंचक उद्भवलें ।हेंही सर्व जाहल्यांत आलें । तीं तीं भूतें दृश्यापरी ॥१९॥हे जया अधिष्ठानीं निर्माण । तें अविनाश ब्रह्म सच्चिद्घन ।जें पुच्छत्वें केलेंसे स्थापन । तें ब्रह्म आत्मा स्वयें ॥२०॥श्रुतीचा भाव अधिष्ठानावरी । कीं ब्रह्मतत्त्वीं ईशादि तृणांत सारी ।परी आनंदमयापासूनी निर्धारी । सर्व जाहलें बोलिली परी हें बोलणें वाउगेंचि । जैशी योजना चहूं कोशांची । विचारणा पाहिली अधिकाराची ।परी तात्पर्य पुच्छत्त्वीं ॥२२॥चार नामा कल्पिलें वाउगें । तैसेंचि ब्रह्म पुच्छ म्हणोनि सांगे ।परी तें सत्यत्वें कोठें अंगें । मा पुच्छ नाम प्रतिष्ठे ॥२३॥तें कार्य ना नव्हे कारण । निमित्त ना नसे उपादान । सहजीं सत्य एक अधिष्ठान । मायादि भ्रमासी ॥२३॥सत्य अधिष्ठानेंविण । भ्रमासी नव्हेंचि उद्भवन । हें श्रुतीनें यथार्थ जाणून । म्हणे जेथून सर्व जाहलें ॥२५॥सर्व म्हणजे हे बत्तीस । जे सांगोपांग पंचकोश । यात अधिष्ठानत्वें जें अविनाश । ते एक विलक्षण चिति ॥२६॥ऐसें श्रुतीचें तात्पर्य । एक चिद्रूप ब्रह्म आत्मा निश्चय । येर हे बत्तीस सह आनंदमय । सर्व भूतांत आले ॥२७॥जैसें अन्न प्राण मन विज्ञान । पांच पांच अंगे भिन्न भिन्न ।अनात्मजात सांडिलें निरसोन । तेवींच त्यागावें वृत्यानंद स्फूर्ति विद्या अविद्या जीव शीव । हे पांचही विकारी स्वभाव । जाहलें तें भूतरूप स्वयमेव । अनात्मत्वें निरसिजे या पंचका कोश अभिधान ।जे प्रिय मोदादि पांच लक्षण । यांत चारी अनात्मत्वें निरसोन ।उरें ते पाचवें ब्रम्ह तेंचि अवधी दोष निजसार । याहून निषेधिलें सर्व हे येर । तस्मात् साधकें साधावें दृढतर ।ब्रह्म आत्मा हा निश्चय हा निश्चय अभ्यासें खलावा । अन्ये अत्म्याचा निरसिजे गोवा । तोचि पुढे बोलिजेल आघवा । परी येथें निवडिले मनोमयीं नुसधा उपदेश । विज्ञानमयीं साधन अभ्यास । तैसाचि आनंदमयीं निदिध्यास ।चारी निरसे तों करावा सर्वांची प्रीति आपणाकरितां । त्यांतही देहादि विज्ञानांत त्यागितां । केवळ उरे स्फुरद्रूपता । ते प्रियता पहिली मग सर्पपणाचें भान विरे । एक स्वकीयत्वचि वृत्तीसी स्फुरे । तया मोद नाम हें साचोकारें । ओळखावें साधकें पुढें कृतकृत्यता जे वाटे । तेणें सुखाचा समूह लोटे । त्या नांव प्रमोद वाउगा दाटे । वृत्यानंदात्मक ॥३६॥तो वृत्यानंद सर्व ओसरे । निवृत्तिरूपें सुख सुखी थारे ।तेंचि जाणावें सामान्य निर्धारें । आनंद अंग चवथें ॥३७॥तेथें सुखैकगोचर सामान्य वृत्ति । त्रिपुटीरूप सहज असती ।म्हणूनि हे मावळेल जै स्फूर्ति । तेंचि ब्रह्म पुच्छा प्रतिष्ठा अगा हे सुमति रविदत्ता ।सावध अससी कीं चित्ता । पंचकोशिविवेचन हें तत्वतां । येथें सांग केलें ॥३९॥ऐसाचि अभ्यास वृत्तीनें करावा । तो पुढें अनुक्रमें बोलिजे बरवा ।परी अनात्म्याचा निवडिला गोंवा । मुख्य आत्मा ब्रह्म एक ॥४०॥येथें पंचकोश विवेचितां । शंका मानील कोणी चित्ता । कीं श्र्लोकपदीं हें कांहीं नसतां । अप्रासंगिक बोलिलें ॥४१॥तरी पहावें विचारून । श्र्लोकार्थाचेंचि निरूपण । ध्वनितार्थरूपें केलें कथन । प्रसंगानुसार ॥४२॥रूपाहून चिति जे वेगळी । तेचि कीं बत्तिसांहून निराळी ।पंचकोशात्मक बत्तीस हे सकळी । रूपात्मक असती पांच भूतें पांच खाणीं । ऐशीं दहा रूपें जड मिळोनि । अन्नमयचि बोलिजे वाणी ।याहून भिन्न ते चिती ॥४४॥पंचप्राण पंचकर्मेंद्रिय । या दहा तत्त्वांचा समुदाय ।याचीं नांवें कोश प्राणमय । याहून भिन्न ते चिती ॥४५॥ज्ञानेंद्रियपंचक एक मन । या साहांसी मनोमय अभिधान ।तेवींच बुद्धि तो कोश विज्ञान । या साताहुन भिन्न चिती ॥४६॥स्फूर्ति विद्या अविद्या जीवेश । या पांचा नाम आनंदकोश ।याहून विलक्षण तो चिदंश । आत्मा ब्रह्म एकरस एवं दहा दहा मिळतां वीस ।त्यांत सात घालितां सत्तावीस । पुढें पांचांसहित होती बत्तीस ।एवं पंचक्रोश रूपात्मक ॥४८॥या इतुकियांचेही रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी पूर्णपणीं ।तस्मात् श्र्लोकपदाचेचि व्याख्यानीं । असे विवेचन ॥४९॥जैसें रूपाहून चिद्रूप निवडिलें । अर्थात् पंचकोश विवेचन जाहलें ।तैसेंचि गुणदोषांहून भिन्न जें संचलें । येथें सुचलें तें बोलूं ॥५०॥बत्तीस तत्त्वात्मक पंचकोश । तेचि हे देहत्रय अशेष । अन्नमय तो स्थूल विशेष । साकार पंचीकृताचा ॥५१॥प्राण मन विज्ञान तिन्ही । असती सूक्ष्म देहालागुनी ।सप्तदश तत्त्वें स्थूलीं राहूनी । व्यापार करिती ॥५२॥आनंदमय तोचि कारण । या देहत्रयाचें उत्पत्तिस्थान ।एवं देहत्रय जीवालागून । उपाधि असे ॥५३॥या देहत्रयाचे दोषगुण । व्यापार होताती भिन्न भिन्न ।तोचि जागृदादि अवस्था तीन । विहार जीवाचे ॥५४॥स्थूललिंगाचिये आधारें । क्रिया होतसे विषयानुकारें ।तेचि जागृति पंच व्यापारें । जे स्थूल चाले बोले ॥५५॥येऱ्हवीं पाहतां या जडासी । अवस्था असे तरी कायसी ।सूक्ष्मास्तव चळणें देहासी । म्हणोनी बोलिली ॥५६॥जागृति स्वप्न किंवा सुषुप्ति । या तिन्ही अवस्था बुद्धीप्रती ।परी स्थूल वावरे ते जागृती । स्थूलाची बोलावी ॥५७॥बुद्धि मन हें अंतःकरण । पंचप्राणें पावें चळण । पांच ज्ञानेंद्रियद्वारा निघोन । शब्दादि विषय घेती ॥५८॥तेवींच कर्मेंद्रियसहवासें । वचन गमनादि क्रिया होतसे ।एवं दशधा व्यापारा नाम आलेसें । जागृति ऐशी ॥५९॥या जागृतीसी नेत्रस्थान । बोलिलें हें एक उपलक्षण ।परी सर्वांगीं असे वर्तन । श्रोत्रादि द्वारा ॥२१६०॥श्रवणीं ऐकावें नेत्रें पहावें । जिव्हा रस सेवी घ्राणी हुंगावें ।त्वचीं स्पर्शावें वाणीनें बोलावें । शब्दमातृकांसी ॥६१॥पहिला आठव ते परा वाचा । दुजा आभास ते पश्यंति साचा ।तिसरा भाव जो मननाचा । ती मध्यमा वाणी पुढें वैखरी तें बोलणें ।मातृकांचा उच्चार करणें । एवं सर्वांगें जागृतीचीं स्थानें । घेणें देणेंही कराचें ॥६३॥पादांचें गमन उपस्थेंद्रिया । रतिसुख भोगाची घडे क्रिया । गुदीं विसर्ग जो होणें यया । जागृतिस्थान म्हणावें असो सर्वांगें देह वर्तता ।जागृति अवस्था हे तत्त्वता । इतुकाही बहिर्व्यापार त्यागितां ।तेचि अवस्था स्वप्न ॥६५॥नुसधें मन बुद्धि हें अंतःकरण । इंद्रिय प्रत्यक्ष विषयावांचून ।अंतरींच वर्ते ध्यास घेऊन । इंद्रिय विषयादिकांचे नेत्र झांकुन मनन करी ।अथवा अन्यथा पाहे झोंपेमाझारीं । स्वप्नचि बोलिजे दोहीं परी ।आंतिचा आंतु क्रीडे मनन तें कंठगत उद्भवे ।यास्तव कंठस्थान स्वप्नासी म्हणावें । एवं स्वप्न अवस्थेसी जाणावें ।सूक्ष्मदेहाचें ॥६८॥हेचि बुद्धि मन लीन होती । श्रम पाऊन निचेष्टित पडती । उगीच सुखाकार जे स्थिति । ते सुषुप्ति अवस्था ॥६९॥गाढ झोंप किंवा उगेपणा । परी ते सुषुप्ति अवस्थेची लक्षणा ।देहद्वयाचिया अवसाना । नेणीव स्फूर्ति उरे जे नेणीव तेचि अविद्या अज्ञान ।तोचि डोहो हृदयस्थान । एवं सुषुप्तीचें केलें लक्षण । स्थानासहित ॥७१॥यापरी जागृति स्वप्न सुषुप्ति । अवस्था बुद्धीच्या सहजगति ।परी बोलाव्या तिहीं देहाप्रती । व्यापारभेदें ॥७२॥या तिहीं अवस्थांचे तीन । नेत्र कंठ हृदय स्थान । आतां बोलिजे तिहीं लागून । प्रणव त्रिप्रकारें ॥७३॥स्थूलदेह जागृति स्थान नेत्र । हा साकार दृश्य समग्र ।हेचि मात्रा म्हणावी अकार । पहिली प्रणवाची ॥७४॥सूक्ष्मदेह स्वप्नअवस्था । कंठस्थानीं मनन संस्था ।हेचि उकार मात्राव्यवस्था । दुजी प्रणवाची ॥७५॥नेणीव कारण अवस्था सुषुप्ति । हृदयस्थान जें तयेप्रति ।हेचि मकार मात्रा निश्चिती ं तिजी प्रणवाची ॥७६॥या तिहीं अवस्थांचे अभिमान । एक मीपणा परी असती तीन ।तया तिहींचें भिन्न भिन्न लक्षण । बोलिजे ऐकावें स्वस्वरूपाचें अज्ञान ।स्वयें न कळे असंग आपण । परी अहंब्रह्मास्मि जें स्फुरण ।तेणें देखिलें देहादिकां ॥७८॥तेव्हां मी देहचि दृढ धरिलें । ते ते धर्मही आपणासीच कल्पिले ।ऐसे अनंत कल्प जरी गेले । तरी क्षीण नोव्हे जो जो जे क्षणीं देह प्राप्त । तो मी म्हणून सदृढ धरित । तो त्यागिला जरी अकस्मात । परी मीपण न त्यागी आधीं दुजिया देहातें धरी । मग प्रस्तुत देहाचा त्याग करी । ऐसे अनंत जन्म जातां निर्धारी । न त्यागी हा मीपणा तोचि एक देहीं तीन अवस्थांसी । धरोनि बैसला तिहीं देहांसी । जागृति या साकारासी । सदृढ धरिलें ॥८२॥हाचि मी आणि हें हें माझें । हें किंचितही न त्यागी ओझें ।हाचि विश्र्वाभिमानी बुझे । नाम पावला ॥८३॥मी पाहतों ऐकतों बोलतों । मी खातों पितों स्पर्शतों ।चालतों भोगितों सुखी होतों । मीच जागेपणें ॥८४॥ऐसा मीपणा सर्व शरीराचा । प्रत्यक्ष घेऊन बैसला साचा ।तैसाचि साभिमान माझेपणाचा । आमरण न सोडी ॥८५॥हें म्यां किती प्रयत्नें मिळविलें । हें वडिलीं संपादिलें । ऐसिया पदार्थमात्र म्हणे आपुले । स्त्रीपुत्रादिकां ॥८६॥एवं ऐसें जें मी माझेपण । हाचि जागृति विश्र्वाभिमान ।यासीच साधकें त्यागावें विचारून । अत्यागें मोक्ष कैंचा ॥८७॥हाच स्वप्नींही भास देहासी । मी म्हणून बैसला अपेशी ।परी तैजस नाम आलें तयासी । तये समयीं ॥८८॥उगें बैसताही मनना आंत । म्यां हें केलें करीन अद्भूत ।पूर्वी केलें तें असें भोगित । आतांचें भोगीन पुढें ॥८९॥ऐसा ध्यास कर्तेपणाचा । विषयाभावीं मननात्मकाचा ।तोचि ध्यास झोंपेंत साचा । घेणें हा तैजस ॥२१९०॥एवं ध्यासकाळीं कीं उगेपणीं । कर्तृत्व कीं भोक्तृत्व ध्यानीं ।हे तैजस अभिमानाची करणी । बंधनरूप जीवा ॥९१॥हें असो विश्र्व तैजस । साभिमानिया देहद्वयास ।परी कारणरूप या उभय यांस । तो प्राज्ञ अभिमानी ॥९२॥गाढ झोंपेंत कीं उगेपणा आंत । मी नेणता असे सदोदीत ।हाचि प्राज्ञ अभिमानी निश्चित । कारणशरीरीं ॥९३॥हे नेणतपण जोंवरी न फिटे । तों कालज्ञानें केवी आत्मा भेटे ।भवसागर हा कैसा आटे । केंवीं तुटे बंधन ॥९४॥असो ऐसा एकचि अभिमान । अवस्थाभेदें जाहला भिन्न । तयाचें सांगितलें लक्षण । आतां भोग तीन अवधारा ॥९५॥प्रत्यक्ष देहासी प्रत्यक्ष विषय । दृश्याकारें भोग्य जरी होय ।तरीच भोगिले ऐसा प्रत्यय । हा स्थूल भोग स्थूलासी ॥९६॥मनें आठवून भासती । अंतरींच सुखदुःखें उमटती ।हा प्रविविक्त भोग तैजसाप्रति । भासरूपें होतसे ॥९७॥विकारजात सर्व निमावें । उगेंचि सहज सुखी असावें ।हेंचि वास्तविक रूप जाणावें । आनंदभोगाचें ॥९८॥सत्वगुणें जागृति होतसे । कारण कीं सर्व जाणतेपणा असे ।स्वप्नीं कांहीं जाणीव कांही नेणीव दिसे । म्हणून रजोगुण ॥९९॥हा अवस्थेचा असे प्रकार । परी रजोगुणाचें स्थूल शरीर ।तैजस विष्णु साचार । पालनधर्मी सत्वगुण ॥२२००॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |