एकनाथी भागवत/अध्याय तेरावा
<poem> एकनाथी भागवत - आरंभ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो जी अनादि हंसा । हंसरूपा जी जगदीशा । तूं सद्गुअरु परमहंसा । परमपरेशा परिपूर्णा ॥१॥ उभयपक्षेंवीण देख । तुझे शोभती दोनी पांख । शुद्धसत्त्वाहोनि चोख । स्वरूप सुरेख सोज्वळ ॥२॥ हंस बोलिजे शुभ्रवर्ण । तुझी हंसता विलक्षण । सांडोनियां सकळ वर्ण । हंसपण तुज शोभे ॥३॥ विकासल्या सुवर्णपंकजें । इतर हंसीं तेथें क्रीडिजे । प्रेमें उत्फुल्लित कमळ जें । तुवां क्रीडिजे ते ठायीं ॥४॥ मानससरोवरीं वस्ती हंसासी । तूं मानसातीत रहिवासी । हंसा उत्पतन आकाशीं । तुझें चिदाकाशीं उड्डाण ॥५॥ विवेकचंचूचिया मुद्रा । स्वभावें निवडिसी क्षीरनीरां । मग सांडोनियां असारा । शुद्ध सारा सेविसी ॥६॥ ऐसिया हंसा जी सुकुमारा । मुक्तमोतियांचा तुज चारा । जीं कां वैराग्यशुक्तिद्वारा । चित्सागरामाजीं झालीं ॥७॥ सर्वथा नातळोनि क्षिती । निरालंब मार्गाप्रती । चालणें चालसी हंसगती । हे गमनशक्ती अभिनव ॥८॥ अभिन्न स्वभावतां निजअंहशीं । चिन्मात्रवागीश्वरी तूं वाहसी । हंसवाहिनी आख्या ऐशी । तुझेनि अंशेंसीं तीस झाली ॥९॥ तुझेनि चालविल्या सरस्वती चाले । तुवां बोलविल्या वेदू बोले । तुवां चेतविल्या प्राण हाले । तुझेनि वाचाळें वाग्देवी वदे ॥१०॥ झाली वागीश्वरी वाग्देवता । तियेसी तुझेनि वाचाळता । जेवीं कां वेणु वाजे मधुरता । परी वाजविता तो भिन्न ॥११॥ एवं वाच्य वचन वक्ता । तूंचि वागीश्वरी तूंचि वदता । आपुल्या हंसरूपाची कथा । स्वभावतां बोलविसी ॥१२॥ बोलावया महाकवीच्या ठायीं । तुंवा वागीश्वरी द्योतिली पाहीं । ते हंसरूपाची नवाई । अभिनव कांहीं बोलवी ॥१३॥ तो तूं सर्वभूतीं समान । हंसस्वरूपी श्रीजनार्दन । त्याचे वंदितां निजचरण । जन्ममरण पळालें ॥१४॥ आपभयें पळतां त्यासी । लपणी मिळाली भ्रमापाशीं । जन्मामागे मरणासी । ठावू वसतीसी दीधला ॥१५॥ यालागीं भ्रमामाजीं जो पडला । तो जन्ममरणांसी आतुडला । मग न सुटे कांहीं केल्या । यंत्रीं पडला भ्रमचक्रीं ॥१६॥ तेथ राहाटमाळेच्या परी । जन्ममरणांचे पडे यंत्रीं । एकाची सोसी भरोवरी । तंव दुसरें शिरीं आदळे ॥१७॥ तें निस्तरावया जन्ममरण । तुज सोहंहंसाचें स्मरण । जैं कां करी सावधान । भ्रममोचन तैं होय ॥१८॥ तो तूं परमात्मा परमहंसू । परब्रह्मैक पूर्ण परेशू । ब्रह्मपुत्रांसी उपदेशू । करावया हंसू झालासी ॥१९॥ तें हंसमुखींचें निरूपण । बोलावया बोलका श्रीशुक जाण । त्या वचनार्थातें लेवून । परम पावन परीक्षिती ॥२०॥ त्या हंसाचें हंसगीत । कृष्ण उद्धवासी सांगत । श्रोतां व्हावें दत्तचित्त । अचुंबित निजबोधू ॥२१॥ तो हा तेरावा अध्यावो । अत्यादरें सांगे देवो । तें ऐकतां उद्धवो । विषयविलयो देखेल ॥२२॥ तेरावे अध्यायीं निरूपण । सत्त्ववृद्धीचें कारण । विद्याउद्भयवक्रमू जाण । अतिसुलक्षण सोपारा ॥२३॥ हंसइयतिहासाचा योगू । स्वयें सांगेल श्रीरंगू । तेणें चित्तासी विषयवियोगू । सुगम साङ्ग सांगेल ॥२४॥ द्वादशाध्यायाचे अंतीं । करूनि सद्गुंरूचीं भक्ती । पावोनि विद्याकुठारप्राप्ती । छेदावा निश्चितीं जीवाशयो ॥२५॥ छेदिल्या जीवाचें जीवपण । सकळ सांडावें साधन । हें उद्धवें ऐकूनि जाण । प्रतिवचन नेदीच ॥२६॥ उद्धवाचे जीवींचा भावो । सखोल हृदयींचा अभिप्रावो । सकळ आकळोनियां सद्भाववो । स्वयें श्रीकृष्णदेवी बोलत ॥२७॥ म्हणसी लागोनि सूत्र त्रिगुण । जीवासी आलें जीवपण । ते अंगीं असतां तिनी गुण । सद्विद्या जाण उपजेना ॥२८॥ तोंडींचा खिळू नव्हता दूरी । नारेळजळ न चढे करीं । तेवीं गुण न वचतां निर्धारीं । विद्या कैशापरी उपजेल ॥२९॥ ऐसा आशंकेचा भावो । जाणोनियां श्रीवासुदेवो । तिहीं श्लोकीं तो पहा हो । गूढाभिप्रावो निरसितू ॥३०॥
एकनाथी भागवत - श्लोक १ ला
श्रीभगवानुवाच । सत्त्वं रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मनः । सत्त्वेनान्यतमौ हन्यात् सत्त्वं सत्त्वेन चैव हि ॥१॥
सत्त्वरजतमादि गुण । निश्चयेंसी मायेचे जाण । हें द्वादशाध्यायीं निरूपण । तुज म्यां संपूर्ण सांगीतलें ॥३१॥ सच्चिदानंदू जो येथ । आत्म्यासीं अभिन्न नित्य । तैसे गुण नव्हती समस्त । ते प्राकृत प्रकृतिकार्यें ॥३२॥ जें सद तेंचि चिद । जें चिद तोचि आनंद । स्वरूपीं नाहीं त्रिविध भेद । तें एकवद सच्चिदानंद ॥३३॥ जेवीं श्वेतता मृदु मधुर । त्रिविध भेदें एक साखर । तेवीं सच्चिदानंद अविकार । वस्तु साकार एकवद ॥३४॥ प्रकृति गुणांतें उपजविती । गुणांस्तव सबळ प्रकृती । गुणांसी आत्म्यासी संगती । न घडे कल्पांतीं उद्धवा ॥३५॥ येथ विद्याउत्पत्तिलक्षण । स्वयें सांगे नारायण । करूनि गुणें गुणांचें मर्दन । सद्विद्या जाण साधावी ॥३६॥ सत्त्व वाढवून सुरवाडें । जैं रज तम निःशेष झडे । तैं सद्विद्या हाता चढे । सत्त्वाची वाढी मोडे निजसत्त्वेकरूनी ॥३७॥ सर्पु लागला होय ज्यासी । विष खादल्या उतार त्यासी । तें विष खातां येरे दिशीं । आत्मघातासी वाढवी ॥३८॥ तैसें रजतमलोपें सत्त्व वाढे । वाढलें सत्त्व बाधकत्वें कुडें । तेही बाधा मी तुज पुढें । अतिनिवाडें सांगेन ॥३९॥ मी अलिप्त कर्मकार्या । मी ज्ञाता मी महासुखिया । ऐशा वाढवूनि अभिप्राया । गुणें गुणकार्या गोंविजे सत्त्वे ॥४०॥ ऐसा वाढला जो सत्त्वगुण । त्यासी उपशमात्मक निजसत्त्वे जाण । समूळ करावें निर्दळण । तैं समाधान पाविजे ॥४१॥ उद्धवा तूं ऐसें म्हणसी । समानता तिहीं गुणांसी । केवीं वाढी होईल सत्त्वासी । गुण गुणांसी राखण ॥४२॥ वाढल्या तमोगुण । नावडे तेव्हां ज्ञानध्यान । नावडे त्याग भोग चंदन । निद्रा दारुण कां कलहो ॥४३॥ वाढल्या रजोगुण । ऐकतां ज्ञाननिरूपण । त्याचें भोगासक्त मन । सदा ध्यान विषयांचे ॥४४॥ धनलोभ सुदल्या दिठी । पांपरा घेतल्या क्रोध नुठी । हे रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटीं स्त्रीपुत्रां ॥४५॥ वाढलिया सत्त्वगुण । स्त्रियादिभोगीं उदासीन । सदा करी भगवच्चिंतन । कां करी कीर्तन हरीभक्ती ॥४६॥ क्रोधलोभमोहलक्षण । सत्त्वकाळीं नुठे जाण । परी एकला केवीं वाढे सत्त्वगुण । गुणांसी राखण गुण होती ॥४७॥ मागें तम पुढें रज पूर्ण । मध्यें अडकला सत्त्वगुण । तो कैसेनि वाढेल जाण । अडकलेपण सुबद्ध ॥४८॥ ऐसी आशंका धरूनि जाण । म्हणसी वाढेना सत्त्वगुण । तें सत्त्ववृद्धीचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥४९॥
एकनाथी भागवत - श्लोक २ रा
सत्त्वाद् धर्मो भवेद् वृद्धात् पुंसो मद्भ क्तिलक्षणः । सात्त्विकोपासया सत्त्वं ततो धर्मः प्रवर्तते ॥२॥
ये श्लोकींचें निरूपण । पहिलें उत्तरार्धव्याख्यान । तेथें सत्त्ववृद्धीचें कारण । सात्त्विक सेवन करावें ॥५०॥ सात्त्विक पदार्थ सेवितां । सत्त्वबुद्धि होय सर्वथा । सत्त्वविजयें वर्ततां । पवित्रता करावें जीवाची ॥५१॥ सत्त्वउित्कर्षाचें लक्षण । धर्मनिष्ठ स्वधर्माचरण । तैसें तेथील वासनाबंधन । इहामुत्र जाण वांछीना ॥५२॥ झालिया शुद्ध अंतःकरण । तेव्हां निःसीम वाढे सत्त्वगुण । पुरुषासी मद्भअक्तिलक्षण । धर्म जाण उपतिष्ठे ॥५३॥ सत्त्वें वाढल्या धर्मप्रवृत्ती । तैं गुरुभजनीं अतिप्रीती । कां सत्त्वविग्रही माझी मूर्ती । ते ठायीं भक्ती उल्हासे ॥५४॥ कायिक वाचिक मानसिक । मदर्पण करी स्वाभाविक । मजवेगळा आणिक । भावार्थ देख स्फुरेना ॥५५॥ गुरु भगवंत अभिन्न । हें ते काळीं प्रकटे चिन्ह । ते अतिसत्त्वाची वोळखण । हे धर्म पूर्ण सात्त्विक ॥५६॥
एकनाथी भागवत - श्लोक ३ रा
धर्मो रजस्तमो हन्यात् सत्त्ववृद्धिरनुत्तमः । आशु नश्यति तन्मूलो ह्यधर्म उभये हते ॥३॥
ऐसा वाढलिया सात्त्विक धर्म । तैं सत्त्ववृद्धि सर्वोत्तम । जे सत्त्वीं प्रकटे पुरुषोत्तम । विश्रामधाम मुमुक्षां ॥५७॥ एवं सत्त्ववृत्तीं वाढला धर्म । तो तत्काळ नाशी अधर्म । अधर्माचें मूळ रजतम । त्यांचें रूपनाम उरों नेदी ॥५८॥ सात्त्विकसेवने सत्त्ववृद्धी । तेणें सद्विद्येची उपलब्धी । हे उपायाची विधानविघी । कृष्ण कृपानिधी बोलिला ॥५९॥ करावें सात्त्विकसेवन । ते सात्त्विक पदार्थ कोण कोण । ऐक त्यांचेंही निरूपण । दशलक्षण सांगेन ॥६०॥
एकनाथी भागवत - श्लोक ४ था
आगमोऽपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च । ध्यानं मन्त्रोऽथ संस्कारो दशैते गुणहेतवः ॥४॥
गुणवृद्धीचें कारण । आगम म्हणिजे शास्त्र जाण । आप म्हणिजे तें जीवन । आवडतें स्थान तो देशू ॥६१॥ ऐक प्रजांचें विंदान । प्रजा म्हणिजे त्रिविध जन । जैसी ज्याची संगती जाण । तैसें लक्षण तो पावे ॥६२॥ काळ म्हणिजे दिवसभाग । कर्म म्हणिजे जें जें करी अंग । जन्म म्हणिजे दीक्षा सांग । मंत्राचें लिंग यथारुचि ॥६३॥ कर्त्याचा जेथ अत्यादरू । त्या नांव बोलिजे संस्कारू । हा दशलक्षणप्रकारू । गुणवृद्धिविचारू तो ऐक ॥६४॥ येथ सत्त्ववृद्धीसी प्रस्तुत । साधकांसी शास्त्र निवृत्त । उपनिषद्भावगेंसीं वेदांत । त्याचा मथितार्थ सेवावा ॥६५॥ आप म्हणिजे जळपवित्रता । गौतमीभागीरथ्यादि पुण्यसरिता । ज्यांचा अवचटें शिंतोडा लागतां । पाप सर्वथा उरेना ॥६६॥ कां माझ्या प्रतिमांचें चरणामृत । ज्यालागीं ब्रह्मादिक आर्तभूत । किंवा शालिग्रामशिळेचें तीर्थ । सकळ दुरित निवारी ॥६७॥ जेणें सकळ तीर्थें होती पावन । तें ब्राह्मणाचें चरणतीर्थ जाण । स्वयें वंदी श्रीनारायण । निजहृदयीं चरण वाहतसे ॥६८॥ भलतैसें हो कां पाणी । जें लागलें सद्गु रुचरणीं । तें सकळ तीर्थां शिरोमणी । सेवितां तत्क्षणीं उद्धरी ॥६९॥ सत्त्ववृद्धीचें कारण आप । तें इये तीर्थीं जाण पुण्यरूप । सेविता सत्त्ववृद्धीचे स्वरूप । आपेआप प्रकाशे ॥७०॥ प्रजा म्हणिजे महाजन । सेवावे साधु सज्जन । ज्यांचे संगतीस्तव जाण । उद्धरण जडजीवां ॥७१॥ सत्त्ववृद्धीसी कारण । मुख्यत्वें सत्संगतीचि जाण । त्या सत्संगाचें महिमान । केलें निरूपण द्वादशीं ॥७२॥ देशू पूण्यभूमिका सिद्धिस्थळ । विजनवासू एकांतशीळ । जेथ बैसतांचि तत्काळ । सत्त्वासी बळ चढोवढीं ॥७३॥ एकांतीं स्थिरावल्या आसन । सहजें वाढे सत्त्वगुण । मनीं हव्यासू चढता जाण । वस्तु चिद्घगन साधावया ॥७४॥ साधकांसी काळ यथोचित । अवश्य ब्राह्ममुहूर्त । कां जे काळीं उद्वेगरहित । हर्षयुक्त मन होय ॥७५॥ प्रेमयुक्त अंतःकरणें । जो काळ जाय कथाश्रवणें । कां जयंत्यादि महापूजा करणें । जागरणें हरिदिनीं ॥७६॥ थोर काळाची सार्थकता । हरिकीर्तनीं गातां नाचतां । त्या काळाचा महिमा तत्त्वतां । माझेन सर्वथा न बोलवे ॥७७॥ निरभिमान कीर्तन करणें । निर्लोभ गाणें नाचणें । तो काळू वंदिजे म्यां श्रीकृष्णें । महिमा कोणें बोलावा ॥७८॥ कर्म म्हणिजे तें निवृत्त । जें आशापाशफळरहित । कां क्रिया जे उपकारार्थ । सात्त्विक निश्चित तें कर्म ॥७९॥ गुरूपासोनि दीक्षाग्रहण । तें पुरुषासी नवें जन्म जाण । गुरु मायबाप संपूर्ण । तें ऐक लक्षण उद्धवा ॥८०॥ उपजलिया बाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता । जनिता आणि उपनेता । तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ॥८१॥ जो भयापासूनि सोडविता । जे बंधविमोचन करविता । जो देहाचें मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थें ॥८२॥ यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पंचभूतां । मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥८३॥ ज्याचे देखिलिया चरण । बांधूं न शके भवबंधन । तो सद्गुेरु पिता जाण । भाग्येंवीण न पाविजे ॥८४॥ उपजल्या बाळकासी सर्वथा । वेगळालीं माता पिता । एक वीर्यातें निक्षेपिता । धारणपोषणता जननीची ॥८५॥ तैसा सद्गुेरु नव्हे पिता । निजवीर्य न वेंचितां । योनिद्वारें नुपजवितां । जननी जनिता स्वयें झाला ॥८६॥ उदराबाहेरी घातल्यापाठीं । माता पुत्रस्नेहें कळवळा उठी । बाहेरिलें सूनि आपुले पोटीं । निजस्नेहें गोमटी गुरुमाता ॥८७॥ यालागीं शिष्यासी तत्त्वतां । सद्गु रुचि माता पिता । निजस्नेहें वाढविता । तदात्मता अभेदें ॥८८॥ मागील पिते जे चौघेजण । ते याचे सावत्र बाप जाण । माता पिता भिन्न भिन्न । सखेपण त्यां कैंचें ॥८९॥ यालागीं सद्गु्रु जो सकृपू । तो सच्छिष्यासी सखा बापू । पित्यापुत्रांमाजीं अल्पू । कांहीं विकल्पू उपजेना ॥९०॥ त्या सद्गुररूपासून जाण । शैवीवैष्णवीदीक्षाग्रहण । अथवा उपदेशी निर्गुण । चैतन्यघन निजबोधें ॥९१॥ ऐक दीक्षानामाची युक्ती । दे चारी पुरुषार्थ चारी मुक्ती । निःशेष अविद्येची नाशी स्थिती । दीक्षाव्युत्पत्ती त्या नांव ॥९२॥ एवं दीक्षाजन्माची जे कथा । उद्धवा सांगीतली म्यां तत्त्वतां । ध्याननिष्ठ जे सात्त्विकता । ऐक आतां सांगेन ॥९३॥ सत्त्वोपाधि शरीर साचें । चैतन्यघन स्वरूप ज्याचें । तो श्रीविष्णु ध्येय सात्त्विकांचे । ध्यान त्याचें करावें ॥९४॥ अथवा धवळधाम गोक्षीर । कर्पूरगौर पंचवक्त्र । ध्यानीं आणावा शंकर । संसारपार तरावया ॥९५॥ या मूर्तींचें ध्यान करितां । हारपे ध्येय ध्यान ध्याता । ठसावे चैतन्यघनता । सात्त्विकता हें ध्यान ॥९६॥ जैसी दीक्षा तैसें ध्यान । हें आगमशास्त्रींचे प्रमाण । त्या ध्यानाचें पर्यवसान । चैतन्यघन पावावें ॥९७॥ केवळ जें चैतन्यघन । तें सद्गुनरुस्वरूप जाण । त्याचें करावें नित्य ध्यान । अनुसंधान निजनिष्ठा ॥९८॥ पंचभूतदेहाची मूस । तेथ वोतिला ब्रह्मरस । गुरुस्वरूप तें सविलास । ध्यान रात्रंदिवस करावें त्याचें ॥९९॥ सात्त्विकांचें जें कां ध्यान । तें हें तूं उद्धवा जाण । आतां मंत्रांचें मंत्रग्रहण । तेंही निरूपण अवधारीं ॥१००॥ सकळ मंत्रांची जननी । जे द्विजन्मा करी तत्क्षणीं । गायत्रीच्या मंत्रग्रहणीं । ब्राह्मणपणीं अधिकारू ॥१॥ जे सकळ मंत्रांचा राजा । जे वांट्या आली असे द्विजा । जिचेनि धाकें द्विजपूजा । मज अधोक्षजा करणें पडे ॥२॥ ते गायत्री स्वभावतां । आली असे ब्राह्मणांच्या हाता । तिची उपेक्षा करितां । लौल्यें दरिद्रता पावले ॥३॥ गायत्रीनिष्ठ जो ब्राह्मण । त्याचे मस्तकीं मी वंदीं चरण । मंत्रीं गायत्री श्रेष्ठ जाण । वेद प्रमाण ये अर्थीं ॥४॥ गायत्री रिघाल्यावीण कांहीं । इतर मंत्रां रिघमू नाहीं । मुख्यत्वें गायत्रीच्या ठायीं । ते लागले पाहीं सकल मंत्र ॥५॥ नव्हतां गायत्रीसंबंध । मुखीं रिघों न शके वेद । इतर मंत्रां केवीं संवाद । वेदां वंद्य गायत्री ॥६॥ गायत्रीचें गुह्य परम । चिन्मात्रैक परब्रह्म । तो मंत्र ब्राह्मणासीच सुगम । परी तेही वर्म चुकले ॥७॥ एवं गायत्रीमंत्र ब्रह्मपूर्ण । सकळ सिद्धींचें कारण । शैववैष्णवमंत्रग्रहण । तेणें त्वरित जाण सत्त्वशुद्धी ॥८॥ सत्त्वशुद्धीचे परिपाटीं । शैववैष्णवमंत्रकोटी । तेणें सत्त्वशुद्धी उठाउठीं । होय निजात्मदृष्टी साधकां ॥९॥ मंत्रग्रहणविचार । उद्धवा जाण हा साचार । आतां बोलिला जो संस्कार । तोही प्रकार परियेसीं ॥११०॥ मनाचे संकल्पविकल्प । तोडावया अतिसाक्षेप । येचि अर्थींचा खटाटोप । महासाटोप जो मांडीं ॥११॥ संकल्पु उठूंचि न लाहे । जेथें उठी तेथें ठेंचित जाये । विवेकाचेनि बळें पाहे । मोकळु होये मनाचा ॥१२॥ परमात्मनिष्ठापरवडी । अखंड मनाची मोडी पाडी । उसंत घेवों नेदी अर्धघडी । स्मरणनिरवडी मन राखे ॥१३॥ वैराग्यबळें दमी मन । तेणें भेणें करी हरिचिंतन । दासी नुल्लंघी स्वामीचें वचन । तैसें स्मरणाधीन मन करी ॥१४॥ इंद्रियें पाहती नाना पदार्थां । मन न पाहे आणिका अर्था । जागृतीं स्वप्नीं स्वभावतां । अखंडतां हरि स्मरे ॥१५॥ ऐशा संस्कारें संस्कारिलें मन । निमिषोन्मेषीं हरिचिंतन । श्वासोच्छ्वासांचे गमनागमन । सोहंध्यान त्या ठायीं ॥१६॥ स्वाभाविक स्मरणादरु । या नांव आत्मसंस्कारु । हा सत्त्ववृद्धीचा प्रकारु । शारङ्गधरु बोलिला ॥१७॥ आत्मशुद्धीचें महाकारण । बोलिलों तें हें दशलक्षण । साधकीं सेवावया जाण । विशद निरूपण म्यां केलें ॥१८॥ जेणें खवळला वाढे तमोगुण । तें तमोवृद्धीचें दशलक्षण । केवळ त्यागावया जाण । तेंही निरूपण सांगेन ॥१९॥ तेथींचा आगम आभिचारिक । वेदविरुद्ध मार्ग देख । वारुणी माध्वी मद्योदक । आवश्यक सेविती ॥१२०॥ जे उभयभ्रष्ट पाखंडी । वेषधारी वृथा मुंडी । त्याचें संगतीची अतिगोडी । जेथ अपरवडी विधिवेदां ॥२१॥ द्वेष चोहटा कां परद्वार । तेथेंचि बैसका निरंतर । काळ तों त्यासी मध्यरात्र । तैं व्यापार कर्माचा ॥२२॥ क्रियारंभु जारणमारण । मोहन स्तंभन उच्चाटण । कां करावें वशीकरण । हें कर्म जाण तामस ॥२३॥ जन्म म्हणिजे दीक्षाग्रहण । प्रेतभूतपिशाचविद्या जाण । करितां प्रेतभूतआराधन । प्रेतजन्म जाण तामसां ॥२४॥ जेथ तमोगुण प्रधान । तो क्रोधयुक्त पुरुष जाण । सदा शत्रूचें करी ध्यान । करावया हनन उद्यतू ॥२५॥ तामसी मंत्र मुकी मैळी । अथवा उच्छिष्टचांडाळी । कां प्रेतदेवता कंकाळी । मंत्रशैली हे तेथें ॥२६॥ संस्कार दगड माती । माझें घर हे माझी क्षिती । स्वप्नीं निजेला घाली भिंती । एवढी आसक्ती गृहाची ॥२७॥ घर करावया अशक्त । तरी त्या खिंडोराआंत । सदा दगडमाती राखत । नांदतें तेथ येवों नेदी ॥२८॥ देहालागीं गेह करणें घडे । तें देह कष्टवी अतिदुर्वाडें । तामससंस्कारें रोकडें । केवळ वेडें गृहासक्तीं ॥२९॥ गृहासक्तीचा व्यापारू । जो मरणान्त न सोडी नरू । तो जाण तामस संसारू । त्याचा संस्कारू तो माती ॥१३०॥ जेणें थोरावे तमोगुण । तें हें जाण दशलक्षण । ऐक राजसाचें चिन्ह । त्याचें भिन्न स्वरूप ॥३१॥ करावें सत्त्वाच्या अंगीकारा । त्यागावा तमोगुण दुसरा । पुढें चाविरा मागें लातिरा । ऐक तिसरा रजोगुण ॥३२॥ हो कां शाहाणी सिंदळी नारी । ते पुरुषाचें मन बरें धरी । मग ठकोनि जाय व्यभिचारीं । तैसी परी रजोगुणा ॥३३॥ जैसें कां कुचर घोडें । बरें दिसें परी आडवीं अडे । कांहीं केल्या न चले पुढें । मागिलीकडे सरों लागे ॥३४॥ तैसी रजोगुणाची स्थिती । त्यागू न संभवे कल्पांतीं । धर्म करितो केवळ स्फीती । मनीं आसक्ती कामाची ॥३५॥ सर्वस्व घ्यावया संवचोरू । सवें धांवे होऊनि नफरू । तैसा रजोगुणाचा विचारू । कामनासंसारू वाढवी ॥३६॥ धर्म करी कामासक्ती । केलें भोगवी निश्चितीं । पाडी जन्ममरणआवर्तीं । कदा कल्पांतीं सुटेना ॥३७॥ सात्त्विक तरले माझेनि भजनें । तामस तरले मद्विरोधध्यानें । राजसाचें जन्ममरणधरणें । रजोगुणें उठीना ॥३८॥ जेणें प्रबळ वाढ रजोगुणा । त्या सांगेन मी दशलक्षणां । केवळ त्यागावया काम्यकल्पना । या निरूपणा अवधारीं ॥३९॥ राजसाचें प्रवृत्तिशास्त्र । जें केवळ कामनापर । जेणें होय इहामुत्र । तेथें अत्यादर राजसा ॥१४०॥ आप म्हणिजे तें तंव जळ । वेळा वाळा सुपरिमळ । कर्पूरयुक्त अतिशीतळ । प्रिय प्रबळ तें राजसा ॥४१॥ प्रजासंगति त्याची ऐक । राजवर्गीं सभानायक । व्यवहारीं चतुर अतिरंजक । प्रवृत्तिलोक प्रिय त्यासी ॥४२॥ राजद्वारीं कां सभेमाझारीं । बैसावें पारीं अथवा वेव्हारीं । कां मंडपतोरणाभीतरीं । सन्मानें करी उपविष्ट ॥४३॥ वेळु न गमे जैं घरिंच्या घरीं । तैं क्रमी चौहाटा नगरीं । कां बैसे बुद्धिबळांवरी । अत्यादरीं सादर ॥४४॥ ऐक रजोगुणाची वेळ । सूर्योदयउयपरी जो काळ । कां राजस जे सांजवेळ । ते ते काळ प्रिय त्यासी ॥४५॥ राजसांचें सकाम कर्म । धनधान्यार्थ करिती धर्म । वासना ते पशुपुत्रकाम । स्वप्नीं निष्काम नेणती ॥४६॥ राजसांसी काम गहन । कामासक्ती दीक्षाग्रहण । तेंचि त्यांचें जन्म जाण । सदा ध्यान स्त्रियेचें ॥४७॥ मंत्र घ्यावा अभिलाखें । जेणें सन्मान होय लौकिकें । ज्याचा सुगरावा थोर देखे । तो मंत्र आवश्यकें आदरी ॥४८॥ संस्कार अतिराजस । शरीरभोगांचे विलास । नाना परिमळ बहुवस । उत्तम वास सुधूत ॥४९॥ संस्काराची अंतरनिष्ठा । लौकिकीं व्हावी देहप्रतिष्ठा । माझी आज्ञा वंद्य वरिष्ठां । सभेचे चौहाटां मी पूज्य ॥१५०॥ रजोगुण दशलक्षण । उद्धवा त्याची ही वोळखण । राजसासी जन्ममरण । सर्वथा जाण सोडीना ॥५१॥ सात्त्विक त्याग करी विवेकनिष्ठें । तामस त्याग करी कडकडाटें । राजसासीं त्याग न घडे स्पष्टें । द्रव्यदारालोभिष्टें लोभाळू ॥५२॥ तिहीं गुणांचें लक्षण । म्यां सांगितलें भिन्न भिन्न । तिहींचें सर्वसाधारण । सांगेन चिन्ह तें ऐक ॥५३॥
एकनाथी भागवत - श्लोक ५ वा
तत्तत्सात्त्विकमेवैषां यद् यद् वृद्धाः प्रचक्षते । निंदन्ति तामसं तत्तद् राजसं तदुपेक्षितम् ॥५॥
विवेकवृद्ध वृद्धाचारें । ज्यातें स्तविती अत्यादरें । तें तें सात्त्विक जाण खरें । निजनिर्धारे निश्चित ॥५४॥ विवेकियाचे अनुवादा । ज्या पदार्थांची करिती निंदा । ते ते जाण तामसबाधा । माझ्या निजबोधा मानलें ॥५५॥ ज्यातें स्तवित ना निंदित । जीवें भावें उपेक्षित । तें राजस जाण निश्चित । बाधा अद्भुभत तयाची ॥५६॥ जैसें कां विखें रांधिलें अन्न । वरिवरी गोड अंतरीं मरण । तैसा जाण राजस गुण । अतर्क्य बंधन तयाचें ॥५७॥ राजसासी ज्ञानबोधू । करितां थोंटावला वेदू । त्याचे उपदेशीं ब्रह्मा मंदू । माझेनेही बोधू न करवे ॥५८॥ याचिलागीं रजोगुण । विवेकी सांडिला उपेक्षून । उपेक्षेचें हेंच कारण । तुज म्यां जाण सांगीतलें ॥५९॥ यालागीं सात्त्विक सेवन । साधकीं अवश्य करावें जाण । सात्त्विकसेवनाचा गुण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥१६०॥
एकनाथी भागवत - श्लोक ६ वा
सात्त्विकान्येव सेवेत पुमान् सत्त्वविवृद्धये । ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत् स्मृतिरपोहनम् ॥६॥
सात्त्विक द्रव्यें सेवितां । सत्त्ववृद्धी होय तत्त्वतां । सत्त्ववृद्धी पुरुषीं होता । धर्म स्वभावतां प्रवर्ते ॥६१॥ धर्मप्रवृत्ति माझें भजन । माझ्या भक्तिउल्हासें जाण । भक्तांसी मी होयें प्रसन्न । तैं स्वभावें ज्ञान प्रकाशे ॥६२॥ तत्त्वमस्यादि वाक्यव्युत्पत्ती । ते गुरुद्वारा ज्ञानाची प्राप्ती । तरी सत्त्वशुद्धित्वें धर्म भक्ती । कोणे अर्थीं सेवावी ॥६३॥ ऐसा विकल्प जरी तूं धरिसी । उद्धवा ऐक त्याही विचारासी । यथार्थ सांगेन तुजपाशीं । सत्त्वशुद्धीसी उपयोगू ॥६४॥ केवळ सत्त्वशुद्धीविण । जाहल्या गुरुवाक्याचें श्रवण । तें पां हाटगाण्याऐसें जाण । अनोळखपण स्वस्वरूपा ॥६५॥ आंधळें उपजलें जे कुशीं । स्तनपान करी अहर्निशीं । परी तें न देखे माउलीसी । दशा तैशी उपदेशा ॥६६॥ इंद्रियें सचेतनमेळीं । भगवंत सर्वांतें प्रतिपाळी । त्यातें न देखती विषयांधळीं । अतिअंध झालीं चित्तशुद्धीविण ॥६७॥ अजागळां लोंबते जाण । मिथ्या भाषण म्हणती ते स्तन । त्यापरी सत्त्वशुद्धीविण । वृथा जाण उपदेश ॥६८॥ वाहते उदकीं लिहले लेख । तळीं अक्षर नुमटे एक । तेवीं सत्त्वशुद्धीविण देख । निजज्ञान सुटंक प्रकटेना ॥६९॥ झाल्या आपादतां सत्त्वशुद्धी । जंव प्रकटेना धर्मबुद्धी । तंव निजज्ञानाची नव्हे सिद्धी । जेवीं ग्रहणामधीं चंद्रमा ॥१७०॥ ऐकतां हरिकथाश्रवण । बाष्प रोमांच स्वेद रुदन । रुका वेंचितां जाय प्राण । तेथेंही ब्रह्मज्ञान प्रकटेना ॥७१॥ हृदयींचा लोभ जंव न तुटे । तंव निश्चयज्ञान कैंचे भेटे । सत्त्वशुद्धिधर्मू जैं प्रकटे । तैं निजज्ञाननेटें सुपंथीं लागे ॥७२॥ ते चालतां धर्मपंथीं । जै माझी भक्ति होय सांगाती । तैं चोरांची न पडे गुंती । शीघ्रगती मज पावे ॥७३॥ ते भक्तीचा सांडितां सांगातू । पुढील अनोळख महापंथू । तेथ कामक्रोध करिती घातू । विकल्पआवर्तू बुडविती ॥७४॥ भाग्येंवीण माझी भक्ती । प्राण्यासी नव्हे गा सांगाती । जिचे संगें चालतां पंथीं । अल्पही गुंती पडेना ॥७५॥ माझे भक्तीसवें महाशूर । नांवाणिगे नवविध वीर । सत्रदबद्ध सदा समोर । महाझुंझार निजबोधें ॥७६॥ यालागीं माझे भक्तीविण । सहस्त्रधा केल्या श्रवण मनन । माझी प्राप्ति नव्हे जाण । भजनें पूर्ण मत्प्राप्ती ॥७७॥ सर्व भूतीं भगवद्भाेवो । या नांव मुख्यभक्ति पहा हो । ते सांगाती झालिया स्वयमेवो । कामक्रोधमोहो न शकती बाधूं ॥७८॥ साक्षेपें नेऊनि घागरी । पालथी घातल्या गंगासागरीं । जळबिंदु रिघेना भीतरीं । तैशी परी महावाक्या ॥७९॥ यालागीं अत्यादरेंसीं जाण । धर्मयुक्त माझें भजन । करितां मी होय प्रसन्न । मत्प्रसादें ज्ञान प्रकाशे ॥१८०॥ लोभ ठेऊनि अर्थस्वार्थीं । कोरडी करितां माझी भक्ती । मी प्रसन्न नव्हें श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८१॥ जो धनें मनें काया वचनें । वेंचूनि भजे मजकारणें । त्यासीच म्यां प्रसन्न होणें । जेवीं चंद्रकिरणें चकोरा ॥८२॥ व्याली धेनु वत्सा वोरसे । तेवीं मी तुष्टें अतिसंतोषें । तेवीं माझेनि प्रसादवशें । माझें ज्ञान प्रकाशे मद्भषक्तां ॥८३॥ सगुण सुंदर आणि पतिव्रता । अतिशयें पढियंती होय कांता । तिसी सर्वस्व दे न मागतां भर्ता । तेवीं मी मद्भकक्तां प्रसन्न ॥८४॥ माझेनि प्रसादें प्रकाशे ज्ञान । श्रुति स्मृती नांव म्हणती जाण । सविलास अविद्यानिरसन । 'अपोहन' या नांव ॥८५॥ गुणास्तव देह जाण । देहास्तव उपजे ज्ञान । तेणें ज्ञानें गुणनिर्दळण । देहनिरसन न घडे म्हणसी ॥८६॥ हे गोष्टी तूं म्हणसी कुडी । कीं पक्षी आपुले पांख मोडी । नारळ नारळीतें तोडी । स्वमांसाची गोडी व्याघ्र चाखे ॥८७॥ हें न घडतें जैं घडों बैसे । तैं देहींचेनि ज्ञानें गुणदेह नासे । हा विकल्पू धरिसी मानसें । ऐक अनायासें तो निरासू ॥८८॥
एकनाथी भागवत - श्लोक ७ वा
वेणुसङ्घर्षजो वह्निर्दग्ध्वा शाम्यति तद्वनम् । एवं गुणव्यत्ययजो देहः शाम्यति तत्क्रियः ॥७॥
दैवें वायूच्या कल्लोळीं । परस्परें वेळूजाळीं । स्वजातिकांचणीं इंगळी । पेटली ते होळी वनाची करी ॥८९॥ अग्नि उपजला जे कांडीं । तेंही कांडें जाळूनि सांडी । वनीं नुरवूनियां काडी । स्वयें राखोंडी होऊनि विझे ॥१९०॥ तेवीं वैराग्याभ्यासवायूंनीं । होतां त्रिगुणांची कांचणी । तेथें प्रकटला ज्ञानाग्नी । अविद्यावनीं दाहकू ॥९१॥ तो हरिगुरुकृपा खवळला । वृत्तिरूपें प्रज्वळला । देहद्वयेंसीं लागला । प्रवर्तला गुणांतें जाळूं ॥९२॥ जळाल्या आषातृष्णेच्या पाळी । जळालीं कामलोभांची कोल्हीं । क्रोधव्याघ्राची होळी झाली । आगी लागली मदगजा ॥९३॥ जाळिली स्नेहाची आरांटी । जाळिली असत्याची बोरांटी । जाळिला मोहअरजगरू उठाउठी । जाळिला शेवटीं काळविट काळू ॥९४॥ उठिला अहंकाराचा सोरू । धरितां न धरे अनिवारू । तोही जाळिला दुर्धरू । वणवा चौफेरू कोंडला ॥९५॥ पळूनि जावयापुरता । अणुभरी ठावो नुरेचि रिता । एवं जळाला तो पळतपळतां । अहंसोरु सर्वथा निमाला ॥९६॥ नवल अग्नीचें विंदाण । आपणिया जाळी आपण । दाहकशक्तीतें जाळून । स्वस्वरूपीं जाण उपरमे ॥९७॥ ऐसें ऐकोनि निरूपण । उद्धवासी विस्मयो गहन । जनास केवढी नागवण । आप आपणिया आपण वोढवली ॥९८॥ नश्वरदेहाचिये साठीं । पाविजे परब्रह्माची पुष्टी । ते सांडूनियां करंटीं । विषयनिष्ठीं मरमरों मरती ॥९९॥ सात्त्विकसेवनें सत्त्ववृद्धी । तेणें अलभ्य लाभे सिद्धी । ते सांडोनियां दुर्बुद्धी । विषयविधीं रातले ॥२००॥ केवढा नाडू मांडला लोकां । ऐशी जीवींची आशंका । यालागीं यदुनायका । आदरें देखा पुसत ॥१॥
एकनाथी भागवत - श्लोक ७ वा
वेणुसङ्घर्षजो वह्निर्दग्ध्वा शाम्यति तद्वनम् । एवं गुणव्यत्ययजो देहः शाम्यति तत्क्रियः ॥७॥
दैवें वायूच्या कल्लोळीं । परस्परें वेळूजाळीं । स्वजातिकांचणीं इंगळी । पेटली ते होळी वनाची करी ॥८९॥ अग्नि उपजला जे कांडीं । तेंही कांडें जाळूनि सांडी । वनीं नुरवूनियां काडी । स्वयें राखोंडी होऊनि विझे ॥१९०॥ तेवीं वैराग्याभ्यासवायूंनीं । होतां त्रिगुणांची कांचणी । तेथें प्रकटला ज्ञानाग्नी । अविद्यावनीं दाहकू ॥९१॥ तो हरिगुरुकृपा खवळला । वृत्तिरूपें प्रज्वळला । देहद्वयेंसीं लागला । प्रवर्तला गुणांतें जाळूं ॥९२॥ जळाल्या आषातृष्णेच्या पाळी । जळालीं कामलोभांची कोल्हीं । क्रोधव्याघ्राची होळी झाली । आगी लागली मदगजा ॥९३॥ जाळिली स्नेहाची आरांटी । जाळिली असत्याची बोरांटी । जाळिला मोहअहजगरू उठाउठी । जाळिला शेवटीं काळविट काळू ॥९४॥ उठिला अहंकाराचा सोरू । धरितां न धरे अनिवारू । तोही जाळिला दुर्धरू । वणवा चौफेरू कोंडला ॥९५॥ पळूनि जावयापुरता । अणुभरी ठावो नुरेचि रिता । एवं जळाला तो पळतपळतां । अहंसोरु सर्वथा निमाला ॥९६॥ नवल अग्नीचें विंदाण । आपणिया जाळी आपण । दाहकशक्तीतें जाळून । स्वस्वरूपीं जाण उपरमे ॥९७॥ ऐसें ऐकोनि निरूपण । उद्धवासी विस्मयो गहन । जनास केवढी नागवण । आप आपणिया आपण वोढवली ॥९८॥ नश्वरदेहाचिये साठीं । पाविजे परब्रह्माची पुष्टी । ते सांडूनियां करंटीं । विषयनिष्ठीं मरमरों मरती ॥९९॥ सात्त्विकसेवनें सत्त्ववृद्धी । तेणें अलभ्य लाभे सिद्धी । ते सांडोनियां दुर्बुद्धी । विषयविधीं रातले ॥२००॥ केवढा नाडू मांडला लोकां । ऐशी जीवींची आशंका । यालागीं यदुनायका । आदरें देखा पुसत ॥१॥
एकनाथी भागवत - श्लोक ८ वा
श्रीउद्धव उवाच । विदन्ति मर्त्याः प्रायेण विषयान् पदमापदाम् । तथापि भुञ्जते कृष्ण तत्कथं श्वखराजवत् ॥८॥
उद्धव म्हणे श्रीमुकुंदा । ऐक सर्वज्ञा गोविंदा । विषयांची पदोपदीं आपदा । सर्वीं सर्वदा कळलीसे ॥२॥ जो झाला विषयाधीन । तो सर्वीं सर्वत्र सदा दीन । ऐसें जाणतजाणतां जन । आसक्ति गहन विषयांची ॥३॥ जैसें कां श्वान आणि खर अज । तैसे विषयांसी लोक निर्लज्ज । सांडूनि स्वहिताचें काज । का विषयांचे भोज नाचती ॥४॥ शुनी वसवसोनि पाठीं लागे । श्वान सवेंच लागे मागें । पुच्छ हालवूनि हुंगे । लाज नेघे जनाची ॥५॥ काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठफरा गळां वाहत । तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचार ॥६॥ शुनी सक्रोधें वसवसी । तें गोड लागे श्वानासी । जीवित बांधलें तिच्या पुंसीं । तीमागमागेंसीं हिंडतू ॥७॥ अंगीं अंगा होतां भेटी । सक्रोध शुनी लागे पाठीं । तरी न सोडी पुसांटी । कुंकांत उठी कामासी ॥८॥ ऐशा संकटीं जैं भोग चढे । तैं भोगासवेंचि आडकोनि पडे । हड हड करिती चहूंकडे । जगापुढें फजीती ॥९॥ निंदेचे सैंघ वाजती धोंडे । मूर्ख तेही थुंकिती तोंडें । ऐंसेंचि पुरुषासही घडे । तरीही आवडे अतिकामू ॥२१०॥ श्वानाचें हेंड तत्काळ सुटे । मनुष्याचें आकल्प न सुटे । स्त्रीलोभाळू अतिलोभिष्ठे । तीलागीं संकटें नाना सोशी ॥११॥ नातरी गाढवाच्या परी । दूरी देखोनियां खरी । भुंकत धांवे तीवरी । लाज न धरी सर्वथा ॥१२॥ खरी पळे पुढेंपुढें । खरू धांवे वाडेंकोडें । लाता हाणोनि फोडी जाभाडें । तरी पुढेंपुढें धसो लागे ॥१३॥ लाता हाणे उरावरी । तरी तिची प्रीती धरी । ऐशिया स्त्रियांचे घराचारीं । खराच्यापरी नांदती ॥१४॥ नातरी बोकडाची गति जैशी । तैशी दशा दिसे पुरुषासी । मारूं आणिल्या पशुहत्यार्याैपाशीं । तरी शेळ्यांसी सेवित ॥१५॥ स्वयाती मारितां देखे । अनुताप नेघे तेणें दुःखें । मृत्युसमीपही अभिलाखें । कामसुखें वांछिती ॥१६॥ पूर्ण मृत्यूची पायरी । तें वार्धक्य वाजलें उरीं । तरी धांवे विषयावरी । आठवू न धरी मरणाचा ॥१७॥ मेष मारूं आणिला घातकें । निजसख्यांतें मारितां देखे । तें न मनूनियां यथासुखें । अजीसीं हरिखें रमों धांवे ॥१८॥ मेष श्वान आणि खर । हे ऋतुकाळींचि विषयतत्पर । त्याहूनि विशेषेंसीं नर । कामी दुर्धर सर्वदा ॥१९॥ गर्भ संभवल्यापाठीं । श्वानही स्त्रीभोगासी नुठी । पुरुषाची अभिनव गोठी । गरोदर गोमटी भोगिती ॥२२०॥ गाढव गाढवीसी बुंथड । न करी अलंकार मोथड । मनुष्यासी स्त्रियेचें कोड । तिचें वालभ वाड वाढवी ॥२१॥ दांडा गोंडा मूद वेणी । टिळकुवरी रत्नलखेवणी । नाकींचें हालों दे सुपाणी । हें मनुष्यपणीं वालभ ॥२२॥ जरी प्रसूतिकाळ निकट । गाड्याएवढें वाढलें पोट । तरी कामचारी विवेकनष्ट । रमताती दुष्ट स्त्रियांसीं ॥२३॥ अस्थि मांस विष्ठा मूत । तेणें कामिनी पूर्ण भरित । ते कुश्चळीं जन कामासक्त । जाणोनि होत कां देवा ॥२४॥ या प्रश्नाचें प्रत्युत्तर । तीं श्लोकीं सांगे शार्ग्ङधर । कामासक्तीचा विचार । ऐक सादर उद्धवा ॥२५॥
एकनाथी भागवत - श्लोक ९ वा
श्रीभगवानुवाच । अहमित्यन्यथाबुद्धिः प्रमत्तस्य यथा हृदि । उत्सर्पति रजो घोरं ततो वैकारिकं मनः ॥९॥
मोहप्रमत्त विवेकशून्य । त्या पुरुषांच्या ठायीं जाण । देहात्मवादें अभिमानें । रजोगुणें खवळला ॥२६॥ जैसा मदिरापानें उन्मत्तू । विसरूनि आपुला निजस्वार्थू । मग अन्योन्य अनर्थू । आत्मघातू करूं धांवे ॥२७॥ तेवीं शुद्ध बुद्ध नित्यमुक्तु । हा विसरोनि निजस्वार्थु । रजोगुणें लोलंगतु । कामासक्तु नरू कीजे ॥२८॥ रजीं रंगल्या अभिमान । दुःखरूप तो दारुण । दुर्धर वाढे रजोगुण । विचारी मन तेणें होय ॥२९॥
एकनाथी भागवत - श्लोक १० वा
रजोयुक्तस्य मनसः सङ्कल्पः सविकल्पकः । ततः कामो गुणध्यानाद् दुःसहः स्याद्धि दुर्मतेः ॥१०॥
जैं रजोयुक्त झालें मन । तैं संकल्पविकल्प गहन । एकांतीं घातल्या आसन । ध्यानीं चिंतन स्त्रियेचें ॥२३०॥ रजोगुणें कामासक्ती । होय दुष्ट वासना दुर्मती । कामावांचूनि चित्तीं । आणिक स्फुर्ती स्फुरेना ॥३१॥ जनीं वनीं आणि विजनीं । जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं । ध्यानीं मनीं चिंतनीं । स्त्रीवांचूनी स्मरेना ॥३२॥ कामिनीकामाचा अध्यास । हावभाव अतिविलास । गुणलावण्य सुरतरस । आसक्त मानस ते ठायीं ॥३३॥ रतिसुखाचा आराम । कामिनीक्रीडेचा संभ्रम । तेणें दुर्धर झाला जो काम । तयासि नियम चालेना ॥३४॥ धनधान्यपुत्रसुख । वांछी इहलोकपरलोक । हा रजोगुणाचा देख । अलोलिक अतिकामू ॥३५॥
एकनाथी भागवत - श्लोक ११ वा
करोति कामवशगः कर्माण्यविजितेन्द्रियः । दुःखोदर्काणि सम्पश्यन् रजोवेगविमोहितः ॥११॥
जेथ रजाचा वेग उदित । तेथ कामग्रहो खवळे अद्भु१त । जो पुरुष झाला कामग्रस्त । तो सदा अंकित कामाचा ॥३६॥ ज्यासी विवेक नाहीं मानसीं । तो जाण पां कामाची आंदणी दासी । काम नाचवी जैसें त्यासी । तेणें विकारेंसीं नाचत ॥३७॥ कामांकित झालिया पुढें । सकाम कर्म करणें पडे । ज्याचें उत्तरोत्तर दुःख वाढे । अतिदुर्वाडें गर्वितु ॥३८॥ रजोगुणें अतिमोहित । यालागीं अजितेंद्रिय अयुक्त । जन्ममरणांचा अंकित । कर्में करीत तद्रूपें ॥३९॥ रजोगुणाचा अतिबाध । तेणें जन केले विषयांध । रजरागी महामंद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥२४०॥ रजें बांधल्यापाठीं जाण । होय महामोहाचें संचरण । तेव्हां भ्रमाचें वाउधाण । सैरा तमोगुण उल्हासे ॥४१॥ ऐशी प्राणियांची मती । उद्धवा जाण निश्चितीं । यालागीं काम ते सेविती । नव्हे विरक्ती विषयांची ॥४२॥ तुज ऐसें वाटेल चित्तीं । बुडाली तरणोपायस्थिती । खुंटली प्राण्यांची परम गती । विषयासक्ती अनिवार ॥४३॥ जीवा अविद्याविषयसंबंधू । याचा बाधू अतिसुबद्धू । अविद्यायोग अनादिसिद्धू । तेणें दृढ भेदू जीवासी ॥४४॥ अंतःकरणही अनादी । प्रवाहरूपें त्याची सिद्धी । तेणें दृढ झाली विषयबुद्धी । त्याग त्रिशुद्धी घडेना ॥४५॥ सत्त्वीं उत्पन्न अंतःकरण । परी तें प्रकृतिकार्य जाण । तेथें भोगाध्यासें रजोगुण । खवळला कोण आवरी ॥४६॥ विषयीं बांधिले विवेकी । तो विषयत्याग नव्हे ये लोकीं । उद्धवा तुझी आशंका हेच कीं । ऐक तेविखीं उपावो ॥४७॥ विवेकियांच्या ठायीं । विषयबुद्धि नुपजे पाहीं ।
एकनाथी भागवत - श्लोक १२ वा
रजस्तमोभ्यां यदपि विद्वान् विक्षिप्तधीः पुनः । अतन्द्रितो मनो युञ्जन् दोषदृष्टिर्न सज्जते ॥१२॥
हो कां रजतमांचेनि गुणें । जरी बुद्धि विक्षिप्त केली तेणें । तरी आळस सांडूनि सज्ञानें । आवरणें मनातें ॥४९॥ अस्थिमांसाचा घडिला । विष्ठामूत्रांचा कोथळा । स्त्री विचारितां कांटाळा । नरकजिव्हाळा तो भोगू ॥२५०॥ भोगीं दावूनि दोषदृष्टी । मनासी विषयांची तुटी । करावी गा उठाउठी । नेमूनि निहटीं मनातें ॥५१॥ ऐसेनिही मन अतिदुर्धर । नियमासी नावरे अनावर । साधकांसी अतिदुस्तर । अशक्त नर ये अर्थीं ॥५२॥ तरी ऐक बापा सावधान । मनोनिग्रहाचें लक्षण । तेंही सांगेन साधन । जेणें प्रकारें मन आकळे ॥५३॥
एकनाथी भागवत - श्लोक १३ वा
अप्रमत्तोऽनुयुञ्जीत मनो मय्यर्पयञ्छनैः । अनिर्विण्णो यथाकालं जितश्वासो जितासनः ॥१३॥
आळसनिद्रेसी दवडूनि दूरी । जो सावधान निजवृत्ति धरी । माझें चिद्रूप निर्धारीं । शनैः शनैः करी अभ्यासू ॥५४॥ अभ्यासीं प्रथम भूमिका । शिकावी आसनगाढिका । मूळबंध अतिनेटका । आसनजयो देखा शिकावा ॥५५॥ आसनजयो आल्या हाता । सहजें चढे योगपंथा । तेथें प्राणापानसमता । अभ्यासितां हों लागे ॥५६॥ विषय ते मनाआधीन । मन पवनासी वश्य जाण । अभ्यासें वश केला पवन । सहजें मन स्थिरावे ॥५७॥ यापरी जो हळू हळू । अभ्यासें सार्थक करी काळू । अविरक्त परी प्रबळू । होय भुकाळू परमार्थी ॥५८॥ हरिचिंतनीं एकाग्र मन । तैं एक होती प्राणापान । हाचि पवनजयो पूर्ण । योगसाधन सहजेंचि ॥५९॥ तंव प्राणापान सम जोडी । षट्चक्रांचे पदर फोडी । तैं विषयांतें चित्त सांडी । विषयो वोसंडी चित्तातें ॥२६०॥ यापरी या अभ्यासवाटे । सकाम कामाचा तटका तुटे । सनकादिक येणें परिपाठें । म्यां आत्मनिष्ठे लाविले ॥६१॥
एकनाथी भागवत - श्लोक १४ वा
एतावान् योग आदिष्टो मच्छिष्यैः सनकादिभिः । सर्वतो मन आकृष्य मय्यद्धाऽऽवेश्यते यथा ॥१४॥
येणेंचि उपदेशें देख । माझे शिष्य सनकादिक । अभ्यासबळें अलोकिक । निजात्मसुख पावले ॥६२॥ तो उपदेश कोण म्हणसी । जो वियोग चित्तविषयांसी । हें म्यां सांगोनियां त्यांसी । आत्माभ्यासीं लाविलें ॥६३॥ मन जेथें जेथें जाये । तेथें तेथें वस्तूचि आहे । येणें अभ्यासें लवलाहें । सनकादिक पाहें सिद्ध झाले ॥६४॥ चित्तासी विषयांचा वियोगू । हा सनकादिकीं साधिला योगू । त्यांसी उपदेशावया सांगू । मी स्वयें श्रीरंगू उपदेष्टा ॥६५॥ तें ऐकोनि उद्धव पाहीं । विचारी आपुलिया ठायीं । मी श्रीकृष्णावेगळा कंहीं नाहीं । सनकादिक कंहीं उपदेशिले ॥६६॥ सनकादिक ब्रह्मशीळ । पूर्वीं जाहले बहुकाळ । कृष्ण ये काळींचें देवकीबाळ गुरुत्व केवळ घडे कैसें ॥६७॥
एकनाथी भागवत - श्लोक १५ वा
श्रीउद्धव उवाच । यदा त्वं सनकादिभ्यो येन रूपेण केशव । योगमादिष्टवानेतद् रूपमिच्छामि वेदितुम् ॥१५॥
उद्धव म्हणे गा केशवा । सनकादिकांसी केव्हां । उपदेश केला गा तुवां । जवळी तेव्हां मी कां नव्हतों ॥६८॥ येणेंचि रूपें हृषीकेशी । योग सांगीतला तयांसी । किंवा रूपांतरें म्हणसी । तें जाणावयासी मज इच्छा ॥६९॥ कोण काळ समयो कोण । कोण योग कैसा प्रश्न । तें कृपा करोनि आपण । मज संपूर्ण सांगावें ॥२७०॥ ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । कृपा कळवळला नारायण । हंसइितिहासनिरूपण । आपुलें आपण सांगत ॥७१॥
एकनाथी भागवत - श्लोक १६ वा
श्रीभगवानुवाच । पुत्रा हिरण्यगर्भस्य मानसाः सनकादयः । पप्रच्छुः पितरं सूक्ष्मां योगस्यैकान्तिकीं गतिम् ॥१६॥
ब्रह्मयाचे मानसपुत्र । महाप्रसिद्ध सनत्कुमार । तिंहीं सत्यलोकीं प्रश्न थोर । अतिदुस्तर पूशिला ॥७२॥ अतिसूक्ष्म योगगती । दुर्ज्ञेय स्वस्वरूपस्थिती । परम कठिण प्रश्नोक्ती । पित्याप्रती पूशिली ॥७३॥
एकनाथी भागवत - श्लोक १७ वा
सनकादय ऊचुः । गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रभो । कथमन्योन्यसंत्यागो मुमुक्षोरतितितीर्षोः ॥१७॥
सनकादिक पुसत । विषयांच्या ठायीं चित्त । स्वभावें असे विषयासक्त । तें विषयीं सतत आवेशलें ॥७४॥ तैसेचि विषय पाहीं । प्रवेशले चित्ताच्या ठायीं । वासनारूपें जडले तेही । निघों कंहीं नेणती ॥७५॥ फळ काळ दोनी नाहीं । तरी तैंचे आंबे गोड पाहीं । ऐसे विषय चित्ताचे ठायीं । रिघाले कंहीं न निघती ॥७६॥ पर्णिली कांता माहेरा जाये । चित्तीं रिघाली दूरी न राहे । यापरी विषयो पाहें । जडला ठाये चित्तासी ॥७७॥ चित्त विषयो अन्योन्यत्यागू । मुमुक्षां केवीं घडे चांगू । ये उपायीं उपाययोगू । स्वामीनें साङ्गू सांगावा ॥७८॥
एकनाथी भागवत - श्लोक १८ वा
श्रीभगवानुवाच । एवं पृष्टो महादेवः स्वयंभूर्भूतभावनः । ध्यायमानः प्रश्नबीजं नाभ्यपद्यत कर्मधीः ॥१८॥
ज्यासी अग्रपूजेचा सन्मान । श्रेष्ठ देवांमाजीं महिमान । महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासी जाण या हेतू ॥७९॥ जो आंगें स्त्रजी चराचर । जो वेदांचें निजमंदिर । त्या ब्रह्मयाप्रती अतिगंभीर । प्रश्न महाथोर पुत्रीं केला ॥२८०॥ त्या प्रश्नाची प्रश्नोत्तरविधी । ब्रह्मयासी न कळे त्रिशुद्धी । कर्मजड झाली बुद्धी । बोधकसिद्धी स्फुरेना ॥८१॥ प्रश्न अत्यंत सखोल पडिला । तेणें ब्रह्मा वेडावला ठेला । कांहीं न बोलवे जी बोला । तो चिंतूं लागला मज तेव्हां ॥८२॥ सनकादिकांची प्रश्नावस्था । सत्यलोकीं समस्तांदेखतां । न कळे न म्हणवे सर्वथा । सांगों जातां नव्हे बोध ॥८३॥ ऐसें ब्रह्मयासी दुर्घट । कांहीं न बोलवे स्पष्ट । परम देखोनि संकट । मी ज्ञानवरिष्ठ चिंतिलों ॥८४॥
एकनाथी भागवत - श्लोक १९ वा
स मामचिंतयद् देवः प्रश्नपारतितीर्षया । तस्याहं हंसरूपेण सकाशमगमं तदा ॥१९॥
निरसावया पुत्राचें अज्ञान । आणि तरावया त्यांचा प्रश्न । ब्रह्मा करी माझें चिंतन । तेव्हां माझेंही मन कळवळलें ॥८५॥ ब्रह्मा माझे पोटींचे बाळ । त्यासी कर्मजाड्यें आलें पडळ । तें निरसावया तत्काळ । हंस केवळ मी जाहलों ॥८६॥ प्रश्न केला अपरंपार । जो परमहंसाचें परम सार । त्याचा पावावया परपार । हंसरूपधर मी जाहलों ॥८७॥ नातळे वर्णव्यक्तिविलास । तो मी श्वेतवर्ण स्वप्रकाश । स्वयें झालों राजहंस । ब्रह्मपुत्रांस उपदेशावया ॥८८॥ सृष्टि स्त्रजावयाचे विधी । विधाता लागला त्रिशुद्धी । तेणें कर्मजड झाली बुद्धी । निजज्ञानसिद्धी विसरला ॥८९॥ जो म्हणे मी कर्माधिकारी । तेव्हांचि तो देहधारी । तो परमार्थाचे नगरीं । न सरे निर्धारीं बाह्यमुद्रा ॥२९०॥ 'न कर्मणा न प्रजया' ऐसी वेदोक्ति । कर्म निषेधें त्यागवि श्रुती । तेणें कर्में ब्रह्मप्राप्ती । जे म्हणती ते अज्ञान ज्ञाते ॥९१॥ म्यां उपदेशिलें ब्रह्मयासी । शेखीं कर्मजाड्य आलें त्यासी । केवळ कर्में कर्मठासी । मुक्ति तयासी कैसेनी ॥९२॥ ब्रह्मा अदृष्टद्रष्टा लोकीं तिहीं । तो कर्मजाड्यें झाला विषयी । इतरांचा तो पाड कायी । ठकले ये ठायीं सज्ञान ॥९३॥ सांगतां पुत्रांचा प्रश्न । उजळेल ब्रह्मयाचें निजज्ञान । ऐसें साधोनियां विंदान । सत्यलोकीं जाण उतरलों ॥९४॥ प्रश्नकर्ते सनकादिक । वक्ता सत्यलोकनायक । दोहींसीही पडली अटक । ते काळीं देख मी आलों ॥९५॥ नासों नेदितां साचार । हंस निवडी क्षीरनीर । तैसें निवडावया सारासार । ज्ञानचतुर मी राजहंस ॥९६॥ पूर्वपुण्यसंचयेंवीण । विमानेंवीण स्वयें गमन । सत्यलोकीं आगमन । कोणाचेंही जाण कदा नव्हे ॥९७॥ मी पापपुण्यातीत पाहीं । यालागीं मज पाप पुण्य नाहीं । पाखीं कां चालोनि पायीं । तो मी सर्वां ठायीं सर्वगतू ॥९८॥ त्या सत्यलोका मी अवचितां । हंसस्वरूपें झालों येता । त्या मज देखोनियां समस्तां । परमाश्चर्यता वाटली ॥९९॥
एकनाथी भागवत - श्लोक २० वा
दृष्ट्वा मां त उपव्रज्य कृत्वा पादाभिवंदनम् । ब्रह्माणमग्रतः कृत्वा पप्रच्छुः को भवानिति ॥२०॥
परब्रह्मैक परम मूर्ती । मज येतां देखोनि हंसस्थितीं । उभे ठाकोनि सामोरे येती । चरण वंदिती साष्टांग ॥३००॥ ब्रह्मसदनीं वेद मूर्तिमंत । पुण्यही मूर्तिमंत तेथ । सत्यलोकीं मूर्तिमंत सत्य । तपादि समस्त मूर्तिमंतें ॥१॥ त्या समस्तां देखतां जाण । ब्रह्मयानें पुसावें तूं कोण । पुसल्या येईल नेणतेपण । यालागीं मौन धरोनि ठेला ॥२॥ ब्रह्मा पुढें करूनि जाण । सनकादिकीं आपण । मज केला गा तिंहीं प्रश्न । तुम्ही कोण कोठील ॥३॥
एकनाथी भागवत - श्लोक २१ वा
इत्यहं मुनिभिः पृष्टस्तत्त्वजिज्ञासुभिस्तदा । यदवोचमहं तेभ्यस्तदुद्धव निबोध मे ॥२१॥
ब्रह्मयासी पुसिला जो प्रश्न । त्याचा तत्त्वार्थ जाणावया जाण । मज पुशिलें तिंहीं तूं कोण । अतिविचक्षण जिज्ञासू ॥४॥ त्यासी स्थूळ लिंग कारण । यावेगळी वस्तु चिद्धन । सांगावया प्रश्नखंडण । तीं श्लोकीं जाण म्यां केलें ॥५॥ करोनियां प्रश्नखंडण । नित्यानित्यविवेकज्ञान । त्यांसी म्यां सांगीतलें जाण । तेंचि निरूपण तूं ऐक ॥६॥ सनकादिकांसमान । उद्धवा तुज मी मानीं जाण । यालागीं त्यांचें ज्ञानकथन । ऐक सांगेन म्हणतसें ॥७॥ तें अतिश्रेष्ठ जुनाट ज्ञान । उद्धवा परिसें सावधान । ऐसें ऐकोनियां वचन । येरें मनाचे कान पसरले ॥८॥ देहद्वय सांडोनि मागें । उद्धव श्रवण झाला सर्वांगें । यालागीं स्वयें श्रीरंगें । गुह्य ज्ञान स्वांगें सांगीतलें ॥९॥ देवालयीं लागे रत्नीखाणी । त्यांमाजीं सांपडला स्पर्शमणी । अमृत स्त्रवे त्यापासोनि । तैसा सभाग्यपणीं उद्धवू ॥३१०॥ सांगता श्रीमहाभागवता । श्रीकृष्णासारिखा वक्ता । त्याहीमाजी हंसगीतकथा । आदरें सांगता हरि झाला ॥११॥ सनकादिकांची जे प्राप्ती । ते दाटूनि उद्धवाचे हातीं । स्वयें देतसे श्रीपती । त्याचें भाग्य किती वर्णावें ॥१२॥ ब्रह्मरूप स्वयें वक्ता । तोही उपदेशी ब्रह्मकथा । गुरु ब्रह्मचि स्वभावतां । हे सभाग्यता उद्धवीं ॥१३॥ यालागीं निजभाग्यें भाग्यवंतू । जगीं उद्धवचि अतिविख्यातू । ज्यालागीं स्वयें जगन्नाथू । ज्ञानसमर्थू तुष्टला ॥१४॥
एकनाथी भागवत - श्लोक २२ वा
वस्तुनो यद्यनानात्वं आत्मनः प्रश्न ईदृशः । कथं घटेत वो विप्रा वक्तुर्वा मे क आश्रयः ॥२२॥
परमात्मा अवघा एक । तेथ 'मी तूं' हें न रिघे देख । 'तूं कोण' हें जें वाचिक । वृथा शाब्दिक वाचाळे ॥१५॥ तुम्हीं केला जो प्रश्न । त्यासी द्यावया प्रतिवचन । वक्त्यासी आश्रयो नाहीं जाण । मीतूंपण दिसेना ॥१६॥ तुम्हीं पुसिलें नेणोन । म्यां काय सांगावें जाणोन । मूळीं नाहीं मीतूंपण । पुशिला प्रश्न तो मिथ्या ॥१७॥ नामरूपवर्णव्यक्ती । नाहीं स्वजातिविजाती । विप्र हो तुमची वचनोक्ती । न घडे निश्चितीं सत्यत्वें ॥१८॥ चारी पुरुषार्थ पूर्ण करिती । हे विप्रनामाची परमख्याती । त्या तुम्हां सज्ञानाची प्रश्नोक्ती । न घडे निश्चितीं विप्र हो ॥१९॥ असावें जरी बहुपण । तरी पुसणें घडे तूं कोण । आत्म्याचे ठायीं ऐसा प्रश्न । न घडे जाण सर्वथा ॥३२०॥ प्रश्न न घडे आत्म्याच्या ठायीं । जरी म्हणाल देहाविषयीं । तेंही न घडे गा पाहीं । तो देहाचे ठायीं योजेना ॥२१॥
एकनाथी भागवत - श्लोक २३ वा
पञ्चात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः । को भवानिति वः प्रश्नो वाचारंभो ह्यनर्थकः ॥२३॥
आदी ब्रह्मा अंतीं मशक । देह तितुका पांचभौतिक । तेथ तूं कोण म्हणावया देख । वेगळीक दिसेना ॥२२॥ कटक कुंडलें मुकुट माळा । करमुद्रिका कटिमेखळा । अलंकार पाहातां डोळां । सुवर्णावेगळा अंशु नाहीं ॥२३॥ कां घडा गाडगें वेळणी । परळ रांजण माथणी । हें मृत्तिकेवांचुनी । आन कांहीं असेना ॥२४॥ तेवीं सर्व देहीं देहत्वें जाण । पांचभौतिक समसमान । तेथ म्हणावया तूं कोण । वेगळेपण असेना ॥२५॥ वस्तु वस्तुत्वें समसमान । भूतें भूतत्वें समान जाण । तेथ प्रश्नोक्ति वाचारंभण । 'तूं कोण' हें अनर्थू ॥२६॥ हो कां आपणिया आपण । जो कोणी पुसेल तूं कोण । तो अतिभ्रमें भुलला जाण । निजात्मज्ञान विसरला ॥२७॥ विचारितां प्रश्नाचा अर्थू । एवढा दिसतसे अनर्थू । कांहीं भासेना परमार्थू । तूं कोण हा व्यर्थू प्रश्न तुमचा ॥२८॥ देहासी तूं कोण ऐसें । आत्मा जैं स्वयें पुसे । तैं आत्मत्वा लागलें पिसें । अतिभ्रंशें भूलला ॥२९॥ दोराअंगीं सर्प नसे । त्यावरी तो भ्रमें भासे । त्या सर्पातें दोरू पुसे । तूं कोण ऐसें तें मिथ्या ॥३३०॥ या रीतीं त्यांचें प्रश्नखंडन । उद्धवा तैं म्यां केलें जाण । तेणें भेदाचें निरसन । वचनोक्तीं जाण दाविलें ॥३१॥ प्रश्नखंडणाचे अर्थें । कैंचीं करणें कैंचीं भूतें । भेद नाहीं जीवशिवांतें । हेंही त्यांतें सूचिलें ॥३२॥ याहीवरी जे कथा गहन । परम कारणेंसीं अभिन्न । त्यांसी म्यां सांगीतलें निजज्ञान । ऐक सावधान उद्धवा ॥३३॥
एकनाथी भागवत - श्लोक २४ वा
मनसा वचसा दृष्ट्या गृह्यतेऽन्यैरपीन्द्रियैः । अहमेव न मत्तोऽन्यद् इति बुध्यध्वमञ्जसा ॥२४॥
मजवेगळा तिळाइतुका । रिता ठावो नाहीं देखा । तेथ व्याप्य आणि व्यापका । अभिन्नत्व देखा सहजचि ॥३४॥ मनाच्या संकल्पा आलें जें जाण । त्यासी शाब्दिक म्हणती भिन्न । माझ्या स्वरूपाचा विवर्त तें मन । हे अभिन्न खूण कळेना ॥३५॥ मन लक्षितां सावधान । सर्वथा लक्षेना तें जाण । परब्रह्मही अलक्ष्य पूर्ण । दोनी समान चिद्रूपें ॥३६॥ शिंपीच्या अंगीं रुपें आभासे । तेंचि तेथें साचें नसे । माझ्या स्वरूपीं मन तैसें । मिथ्या भासे कल्पनामात्र ॥३७॥ विचारितां शब्दमहिमान । शब्द स्वरूपें ज्ञानघन । ज्ञानार्थेंवीण वचन । अल्पही जाण असेना ॥३८॥ वक्ता वाच्य वचन । तीनी मीचि आहें जाण । बोलु बोलका मजवीण । दुसरा जगीं कोण असे ॥३९॥ मी वेदू जाण पां वेदांचा । प्रणवरूप मीचि साचा । मुख्य वाचेची मीचि वाचा । वेगळा शब्दाचा ठावो नाहीं ॥३४०॥ दृष्टीचें जें देखणेंपण । देखणें तेंचि मुख्य ज्ञान । तेंचि जाण ब्रह्म पूर्ण । चैतन्यघन निजदृष्टीं ॥४१॥ मीचि डोळा मीचि देखता । दृश्य द्रष्टा मीचि तत्त्वतां । मजवेगळी देखणी अवस्था । नाहीं सर्वथा तिहीं लोकीं ॥४२॥ मीचि डोळियांचा निजडोळा । मी सर्वांगदेखणा सोज्ज्वळा । मजवेगळी देखणी कळा । नाहीं जिव्हाळा आणिकांचा ॥४३॥ मीचि शब्दांतें शब्दविता । मीचि श्रवणांमाजीं श्रोता । ऐशिया एकात्मता पाहतां । शब्द निःशब्दता परब्रह्म ॥४४॥ कान वचन मीचि श्रोता । मीचि जाणता शब्दार्था । ऐकणाही मजपरता । नाहीं तत्त्वतां श्रवणाचा ॥४५॥ मीचि घ्राण मीचि वास । मीचि जाणता सुवास । मजवेगळा रहिवास । परिमळास असेना ॥४६॥ रसना रसज्ञत्वें चोखडी । परी ते केवळ चामडी । कापूनि सोडिल्या बापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥४७॥ मीचि रसू मीचि रसना । स्वादु सेविता मीचि जाणा । मजवेगळा चवीचाखणा । रसज्ञपणा आन नाहीं ॥४८॥ इतर इंद्रियप्रवृत्ती । त्याही मद्रूप जाण निश्चितीं । मी सर्वात्मा आत्ममूर्ती । क्रियाशक्ती तेही मीचि ॥४९॥ पांचभौतिक देहाचा गोळा । भ्रांत म्हणती मजवेगळा । चुकोनि व्यापका सकळा । तो कोठें निराळा राहों लाहे ॥३५०॥ जैसे जळींचे जळतरंग । जळरूपें जळीं क्रीडती चांग । तैसे माझ्या स्वरूपीं साङ्ग । देह अनेग मद्रूपे ॥५१॥ हो कां घृताची पुतळी । थिजोनि जाली एके काळीं । परी ते नव्हे घृतपणावेगळी । तेवीं भूतें झालीं मजमाजीं ॥५२॥ जळीं जळाची जळसागर । जळामाजीं भासली साकार । तैसें मजमाजीं चराचर । अभिन्न साचार मद्रूपीं ॥५३॥ जैसा एकला एक तंतू । सुतेंचि विणिला सुताआंतू । त्यां वेगळाले म्हणती तांतू । तैसें मजआंतू जग भासे ॥५४॥ तंतू पाहतां वस्त्र न दिसे । आत्मा लक्षितां जगचि नसे । येणें अद्वैततत्त्वसौरसें । आहे अनायासें परब्रह्म ॥५५॥ ऐसा अद्वैतबोधें मी एकू । सर्वात्मा सर्वात्मकू । हा निश्चयेंसीं विवेकू । बुद्धिबोधें निष्टंकू जाणावा ॥५६॥ मीचि एक सर्वां ठायीं । हेंचि दृढ धरिल्या पाहीं । मग साधनाचें कार्य नाहीं । ठायींच पाहीं नित्यमुक्त ॥५७॥ सर्वात्मा चैतन्यघन । अतिसुलभ हें निजज्ञान । उद्धवा म्यां हें सांगोन जाण । भेदखंडण केलें त्यांचें ॥५८॥ सनकादिकांचा पूर्वील प्रश्न । जो ब्रह्मादिकां अटक जाण । त्याचेंही म्यां प्रतिवचन । विवंचूनि ज्ञान सांगितलें ॥५९॥
एकनाथी भागवत - श्लोक २५ वा
गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रजाः । जीवस्य देह उभयं गुणाश्चेतो मदात्मनः ॥२५॥
तुम्हीं ब्रह्मयासी पुसिलें पाहीं । विषय रिघाले चित्ताच्या ठायीं । चित्त जें रिघालें विषयीं । तें वेगळें कांहीं निवडेना ॥३६०॥ विषयत्यागेंविण । कदा नव्हे ब्रह्मज्ञान । त्याही त्यागाची त्यागिती खूण । ऐक संपूर्ण सांगेन ॥६१॥ चित्त विषय दोनी पाहें । तें जीवाचें निजस्वरूप नव्हे । हे उपाधिवशें दोनी देहें । लागलीं पाहें प्रवाहरूपें ॥६२॥ कर्तृत्वभोक्तृत्वरूपें जाण । विषयी जाहलें अंतःकरण । तेणें उभय देहांचें कारण । अंहकारू जाण खवळला ॥६३॥ तेणें भुलविलें चित्त विषयांसी । विसरला निजात्मस्वरूपासी । तेणें तदात्मता जीवामनांसी । अतिशयेंसी दृढ झाली ॥६४॥ चित्त जीवाचें स्वरूप होतें । तरी विषयीं लोलुप नव्हतें । हा उभय उपाधी जीवातें । अभिमानें येथें वाढविला ॥६५॥ जेवीं कां विसरोनि आपणासी । स्वप्नींचिया स्वप्नदेहासी । अतिप्रीति वाढे पुरुषासी । तैसी दशा जीवासी येथ झाली ॥६६॥ नित्य शुद्ध मुक्त जाण । जीवाचें स्वरूप चैतन्यघन । त्यासी अभिमानें हें जाण । मिथ्या बंधन लाविलें ॥६७॥ यालागीं सांडावा अभिमान । तैं तुटे सकळ बंधन । अभिमान निरसावया जाण । माझें भजन करावें ॥६८॥ परी वैराग्येंवीण माझी भक्ती । पोंचट जाण पां निश्चितीं । जैं वैराग्ययुक्त उपजे भक्ती । तैं मद्रूपप्राप्ती जीवासी ॥६९॥ हृदयीं विषयांचा अभावो । आणि सर्वांभूतीं भगवद्भापवो । हे वैराग्ययुक्त भक्ति पहा हो । तैं जीवासी निर्वाहो मद्रूपीं ॥३७०॥ जीव मद्रूपचि तत्त्वतां । त्यासी देहाभिमान जीविता । सदा भूतीं मद्भा वो पाहतां । सिद्ध मद्रूपता उद्बो॥धे ॥७१॥ जीवासी जाहल्या मद्रूपता । सहजें त्यागू विषयचित्ता । देखें उभयांसी मिथ्यात्वता । न त्यागितां हा त्यागू ॥७२॥ चित्तविषयांचा त्यागू । पुत्र हो तुम्हीं पुशिला चांगू । तो म्यां सांगितला अव्यंगू । हा ज्ञानमार्गू अतिशुद्ध ॥७३॥ म्हणाल मिथ्या उभयांचें भान । तरी एवढें जीवासी बंधन । लागावया कांहीं कारण । ऐसें कांहीं मन कल्पील जरी ॥७४॥ गगनसुमनांची माळा । कधीं कोणी लेइली गळां । तारूं बुडे मृगजळां । हें कोणी तरी डोळां देखतें काय ॥७५॥ सत्यासी बाधक । कदा बाधूं न शके लटिक । ऐसें कल्पाल तुम्हीं कल्पक । तोही परिपाक अवधारा ॥७६॥ तरी परिसा सावधान । तें मी सांगेन निरूपण । जेणें जीवासी बंधन । लटिकेंचि जाण दृढ झालें ॥७७॥
एकनाथी भागवत - श्लोक २६ वा
गुणेषु चाविशच्चित्तं अभीक्ष्णं गुणसेवया । गुणाश्च चित्तप्रभवा मद् रूप उभयं त्यजेत् ॥२६॥
अनादिसंसारमाळेच्या ठायीं । नित्य विषय भोगिले पाहीं । ते ठसावले चित्ताच्या ठायीं । वारंवार देहीं सेवितां ॥७८॥ चित्तासी विषयांची अतिप्रीती । तेणें वाढली विषयासक्ती । ते प्रवेशलें विषयांप्रती । न निघे मागुती सर्वथा ॥७९॥ बुद्धीसी विषयांचें ध्यान । चित्तीं विषयांचें चिंतन । विषयांलागीं तळमळी मन । विषयाभिमान तेणें झाला ॥३८०॥ विषयीं खवळल्या अभिमान । देहद्वयाचें दृढ बंधन । जीवासि लागलें अतिकठिण । परम दारुण दुस्तर ॥८१॥ मग त्या देहाचे विकार । ते आपुले मानी साचार । अंध पंगू मी कुष्ठी नर । स्वरूपें सुंदर मी ज्ञाता ॥८२॥ मी देह हें मानोनि चित्तें । निजरूप विसरला भावार्थें । हें मिथ्याबंधन जीवातें । सत्यत्वें त्यातें अभिमानू ॥८३॥ मिथ्या बुद्धिबळाचा खेळ । हारी जैती ही निष्फळ । तरी खेळत्या अभिमान प्रबळ । तैसें देहबळ जीवासी ॥८४॥ त्या खेळाचे घोडे हस्ती । पहिले काय जीत होती । मा मारिले म्हणोनि भांडती । तेवीं जन्मपंक्ती जीवासी ॥८५॥ हें निरसावया जीवबंधन । निःशेष सांडावा देहाभिमान । अभिमान सांडितांचि जाण । मद्रूपपण सहजेंचि ॥८६॥ जीवें साधिल्या मद्रूपता । सहजेंचि त्याग विषयचित्ता । माझे स्वरूपीं अहंता । नाहीं वार्ता विषयांची ॥८७॥ जेव्हां बुद्धिबळांचा खेळ मोडे । तेव्हां राजाप्रधानादि लांकुडें । तेवीं अहंकारू निमाल्या पुढें । प्रपंच उडे मिथ्यात्वें ॥८८॥ जेवीं स्वप्नींचा स्वप्नाभिमान । दारा पुत्र स्वजन धन । स्वदेहेंसी मिथ्या जाण । जागेपण झालिया ॥८९॥ तेवीं पावलिया माझी सरूपता । कैंचा देह कैंची अहंता । विषयचित्तांची वार्ता । नाहीं अवस्था गुणत्रया ॥३९०॥ तिहीं अवस्थीं अवस्थाभूत । जागृतिस्वप्नसुषुप्तिमंत । तो होऊनि जीव निरवस्थ । परमात्म्यांत मिळे कैसा ॥९१॥ ऐसा कांहीं कल्पाल भावो । त्या जीवासी अवस्थांचा अभावो । त्रिगुण गुणांचा स्वभावो । या वृत्ति पहा हो बुद्धिच्या ॥९२॥
एकनाथी भागवत - श्लोक २७ वा
जाग्रत्स्वप्नः सुषुप्तं च गुणतो बुद्धिवृत्तयः । तासां विलक्षणो जीवः साक्षित्वेन विनिश्चितः ॥२७॥
तिन्ही गुणांच्या तिन्ही वृत्ती । सत्त्वगुणाची जागृती । रजोगुणें स्वप्नप्राप्ती । केवळ सुषुप्ती तमाची ॥९३॥ या तिनी अवस्था पाहीं । दृढ जडल्या बुद्धीच्या ठायीं । जीवासी यांचा संबंध नाहीं । तो वेगळा पाहीं साक्षित्वें ॥९४॥ जैं जीवाअंगीं अवस्था जडे । तैं जो अवस्थेमाजीं बुडे । तिहींचें साक्षित्व त्यासी न घडे । ऐक निवाडें अवस्था ॥९५॥ जागृतीमाजीं नाहीं स्वप्न । स्वप्न जागृतीसी नेणे जाण । सुषुप्ती नेणे जागृतिस्वप्न । सुषुप्तीचें भान त्या नेणती ॥९६॥ जीवूं अवस्थांचा अभिमानी । हेंही न घडे जीवालागुनी । विश्व तैजस प्राज्ञ तिन्ही । अवस्थाभिमानी हे तिहींचे ॥९७॥ जो जे अवस्थेचा अभिमानी । तो ते अवस्थेसवें जाय निमोनी । जीव वेगळा साक्षिपणीं । अवस्थाभिमानी तो नव्हे ॥९८॥ देहातीत गुणातीत । तिहीं अवस्थां अतीत । द्रष्टा साक्षी निश्चित । जाणता येथ तो जीवू ॥९९॥ अवस्थाभिमान नाहीं जीविता । तरी कवण भोगी तिनी अवस्था । मी निजलों मीचि जागता । म्यां स्वप्नावस्था देखिली ॥४००॥ ऐसा प्रत्यक्ष अनुभवू । स्वयें बोलताहे जीवू । हा म्हणाल जीवाचा स्वभावू । ऐक अभिप्रावू सांगेन ॥१॥
एकनाथी भागवत - श्लोक २८ वा
यर्हि संसृतिबंधोऽयं आत्मनो गुणवृत्तिदः । मयि तुर्ये स्थितो जह्यात् त्यागस्तद् गुणचेतसाम् ॥२८॥
जो डोल्हारां बैसे यथासुखें । तो न हालतां हाले तेणें हरिखें । उंच नीच खाय झोंके । निजकौतुकें हिंदोळे ॥२॥ हिंदोळतांही प्रबळ । डोल्हाराचि अतिचंचळ । बैसला तो निजनिश्चळ । मानी केवळ मी हालतों ॥३॥ जीवासी झाली तैशी वानी । अहंममतेच्या अभिमानीं । तिनी अवस्था स्वयें मानी । जेवीं कां स्वप्नीं गृहदारा ॥४॥ हो कां लोखंडकाम घडतां । लोहाचे घाय अग्नीचे माथां । प्रत्यक्ष दिसती वाजतां । लोहतादात्मतासंयोगें ॥५॥ तेणें अग्निसंगें वाडेंकोडें । लोहकामचि घडे मोडे । परी अग्नीसी घडमोड न घडे । तेणें पडिपाडें जीवू येथें ॥६॥ जेवीं अग्निवीण लोह न घडे । तेवीं आत्मसंयोगेंवीण पुढें । बुद्धि केवळ जड वेडें । कर्मक्रिया नातुडे सर्वथा ॥७॥ लोह घडवूनि अग्नि न घडता । कर्म करवूनि जीव अकर्ता । तरी वृत्तिसंगें तदात्मता । अहंकर्ता हें मानी ॥८॥ जीव आपुले प्रकाशता । झाला वृत्तीतें प्रकाश करिता । वृत्ति जीवासी नानावस्था । निजस्वभावता देतसे ॥९॥ सूर्यें प्रकाशिलें जळ । जळें केलें प्रतिमंडळ । खळाळ चंचळ निश्चळ । कांपे चळचळ जळकंपें ॥४१०॥ सूर्याची गगनीं नित्य वस्ती । तो जळें आणिला अधोगती । तेवीं वृत्तीचि या निजख्याती । मुक्तांतें दाविती बद्ध करूनी ॥११॥ आत्म्यानें प्रकाशिली वृत्ती । वृत्तीनें आत्म्यासी जीवप्राप्ती । जीवा जीवत्वें देहासक्ती । सुखदुःखप्राप्ती तेणें भोगी ॥१२॥ एवं वृत्तीचिया संगती । वाढली विषयांची आसक्ती । तेणें संसारबंधप्राप्ती । झाली निश्चितीं जीवासी ॥१३॥ हो कां गुणचित्त-विषयासक्ती । जरी झाली जीवासी बंधप्राप्ती । तरी आवरावी विषयवृत्ती । वैराग्ययुक्तीं गुरुकृपा ॥१४॥ ऐक गुरुकृपेची मातू । तिहीं अवस्थांमाजीं सततू । जो मी तुरीय गुणातीतू । ते अभ्यासीं लावितू निजबोधें ॥१५॥ नवल अभ्यासाची गोठी । विषयवृत्तीच्या पाठींपोटीं । मज तुरीयातें दावी दिठी । बोधपरिपाटी निजबोधें ॥१६॥ मी तुरीय तंव संततु । सर्वीं असे सर्वगतु । शिष्यवृत्तीसी मजआंतु । गुरु निजस्वार्थु दाखवी ॥१७॥ सुतावेगळें लुगडें । करूं जातां गा उघडें । तेथ क्रियाचि लाजोनि बुडे । मागें पुढें सूतचि ॥१८॥ तेवीं साधकासी जाण । विषयांचें विषयभान । माझे स्वरूपीं नव्हेचि भिन्न । चैतन्यघन मीचि मी ॥१९॥ तेथ नामरूपवर्णभेद । नाहीं कर्म कर्ता विधिवाद । बुडाले प्रणवेंसीं वेद । केवळ शुद्ध मी एक ॥४२०॥ तेथें भ्रमेंसहित पळाली भ्रांती । क्रियेसहित गळाली प्रवृत्ती । लाजा विराली निवृत्ती । स्वस्वरूपीं वृत्ती विनटली ॥२१॥ सूर्योदयो जाहल्यापाठीं । समूळ अंधारातें घोंटी । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी ॥२२॥ तेवीं माझी स्वरूपप्राप्ती । मायेची मावळे स्फूर्ती । लाजा विसरे प्रवृत्तिनिवृत्ती । नित्यतृप्ती स्वानंदें ॥२३॥ ऐशी माझ्या स्वरूपाची गोडी । जैं साधकां लागे धडफुडी । तैं चित्त विषयातें सांडी । विषयो वोसंडी चित्तातें ॥२४॥ जीं देंठीं वाढलीं फळें । तींचि परिपाकाचे वेळे । होती देंठावेगळें । देंठू तो फळें धरीना ॥२५॥ कां मंथूनि काढिलें नवनीत । तें परतोनि घातल्या ताकाआंत । तें ताकेंसी होय अलिप्त । तैसें चित्त विषयांसी ॥२६॥ पावल्या माझी स्वरूपता । दैव बळें विषयो देतां । चित्तासी नुपजे विषयावस्था । स्वभावतां अलिप्त ॥२७॥ एवं साधिल्या माझा योगू । चित्तविषयांचा वियोगू । सहजेंचि होय चांगू । हा सुगम सांगू उपावो ॥२८॥ येथें झणें आशंका धराल देख । स्वरूप शुद्ध अवघें एक । तेथें कैंचें बाध्यबाधक । काय साधक साधिती ॥२९॥ ऐशाही संधीमाजीं जाण । अहंता बंधाचें कारण । त्याचें सांगेन मी लक्षण । सावधान परियेसीं ॥४३०॥
एकनाथी भागवत - श्लोक २९ वा
अहङ्कारकृतं बन्धं आत्मनोऽर्थविपर्ययम् । विद्वान्निर्विद्य संसार चिन्तां तुर्ये स्थितस्त्यजेत् ॥२९॥
जेथ मुहूर्तमात्र वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे । ऐसें अभिमानाचें सांकडें । पाहें पां रोकडें कौतुक त्याचें ॥३१॥ बुद्धि अहंकार अळुमाळ । उठतां शुद्धासी करी शबळ । तेणें देहयोगें धरिल्या बळ । करी तत्काळ विपरीत ॥३२॥ अहंकार खवळल्या जाण । करी आनंदाचें आच्छादन । बुडे परमात्मस्फूर्तीचें स्फुरण । देहाचें मीपण वाढवी ॥३३॥ जेवीं कूर्मीच्या पिलियां । चक्षुरमृतें तृप्ती तयां । तेंचि मातेसि चुकलिया । मग भुकेलिया कर्दमू सेवी ॥३४॥ तेवीं खुंटलिया आनंदअभभिव्यक्ती । जीवासी वाढे विषयासक्ती । कामिनीकामा पंगिस्त होती । चिंता चित्तीं विषयांची ॥३५॥ विसरला आपुलें पूर्णपण । धनालागीं अतिहीन दीन । मी देहवंत परिच्छिन्न । ऐसा देहाभिमान दृढ होय ॥३६॥ तेणें कर्माकर्मांचे आघात । नाना नरकयातना होत । जन्ममरणादि आवर्त । तेणें दुःखी होत अतिदुःखें ॥३७॥ भोगितां दुःखयातना । त्रासु उपजे ज्याच्या मना । न साहवे भववेदना । तेणें देहाभिमाना सांडावें ॥३८॥ अभिमान सांडितां न संडे । हेंचि दुर्घट थोर मांडे । यालागीं साधनाचें सांकडें । सोसणें पडे साधकां ॥३९॥ जें जें करावें साधन । साधनीं रिघे साधनाभिमान । धांवणें नागवी संपूर्ण । साधनीं विघ्न होय तैसें ॥४४०॥ ऐक साधकांचें साधन । वेदोक्त स्वधर्माचरण । साधावें वैराग्य पूर्ण । माझें भजन अतिप्रीतीं ॥४१॥ तत्काळ जावया देहाभिमान । अखंड माझें नामस्मरण । गीत नृत्य हरिकीर्तन । सर्वांभूतीं समान मद्भामवो ॥४२॥ मद्भाृवें भूतें समस्त । सर्वदा पाहतां सतत । मी तुरीय जो सर्वगत । ते ठायीं चित्त प्रवेशे ॥४३॥ तिहीं अवस्थांमाजीं मी सतत । तिहीं अवस्थांतें मी प्रकाशित । तिहीं अवस्थांहूनि अतीत । तो जाण निश्चित मी तुरीयू ॥४४॥ तिहीं गुणांहूनि परता । चौथेपणेंवीण चौथा । तो मी तुरीय जाण तत्त्वतां । ते ठायीं चित्ता जो ठेवी ॥४५॥ तेथें ठेवितां चित्ता । जीवू पावे मद्रूपता । निमाली सांसारिक चिंता । विषयावस्था बुडाली ॥४६॥ तेव्हां चित्त चिंता चिंतन । विषयवासना अभिमान । या अवघियांचें होय शून्य । मी स्वानंदघन स्वयें प्रकटें ॥४७॥ न तुटतां भेदाचें भेदभान । जो म्हणवी मी सज्ञान । वृथा धरी ज्ञानाभिमान । तोही अज्ञान तें ऐका ॥४८॥
एकनाथी भागवत - श्लोक ३० वा
यावन्नानार्थधीः पुंसो न निवर्तेत युक्तिभिः । जागर्त्यपि स्वपन्नज्ञः स्वप्ने जागरणं यथा ॥३०॥
नाना वर्ण नाना व्यक्ती । नाना गोत्रें नाना जाती । अधमोत्तमविधानस्थिती । भेदु चित्तीं दृढ भासे ॥४९॥ मी काळा गोरा सांवळा । मी सज्ञानत्वें आगळा । माझी उत्तम पवित्र लीळा । मी कुळें आगळा सत्कुलीन ॥४५०॥ ऐशी झाल्या भेदप्राप्ती । पाहतां अभेदपरा श्रुती । साधकां शास्त्रार्थयुक्तीं । भेदनिवृत्ती ज्यां नव्हेचि ॥५१॥ त्याचा व्यर्थ ज्ञानाभिमान । त्याचें व्यर्थ कर्माचरण । तो जागाचि निजेला जाण । जागेपण त्या नाहीं ॥५२॥ दृढ जो कां देहाभिमान । तेंचि कनकबीजसेवन । करूनि थोर भ्रमला जाण । अविद्या दीर्घ स्वप्नभेदु देखे ॥५३॥ वोसणतां बोली न लभे अर्थू । तेवीं पठणमात्रें परमार्थू । श्रुतिशास्त्रांचा निजशास्त्रार्थू । नव्हेचि प्राप्तु तयांसी ॥५४॥ वेदाध्ययन नित्य करिती । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्ती । नव्हेचि कामक्रोधनिवृत्ती । पठणें परमप्राप्ती कदा न घडे ॥५५॥ देहाभिमानें भेददृष्टी । पढतां श्रुतिशास्त्रांच्या कोटी । परमार्थेंसीं नव्हे भेटी । भेददृष्टी न वचतां ॥५६॥ जो कां स्वप्नींचे स्वप्नीं जागा जाहला । स्वप्नीं वेदशास्त्र पढिन्नला । जागा म्हणतां असे निजेला । तैसा व्यवहारू झाला शास्त्रज्ञांसी ॥५७॥ देहाभिमानेंसीं भेदभान । निःशेष जंव न वचे जाण । तंववरी नव्हे निजज्ञान । अत्यंत बंधन तो भेद ॥५८॥ सनकादिकांची आशंका । घेऊनि देव बोले देखा । वेदविभाग नेटका । सकळ लोकां कळे तैसा ॥५९॥ स्वयें प्रकाशोनि सकळ भेदू । गर्जत उठी तुझा वेदू । भेद वेदेंचि प्रतिपाद्यू । वेदानुवादू नव्हे मिथ्या ॥४६०॥ वेदवचन तें तात्त्विक । मानावें पैं आवश्यक । हे तुझीच शिकवण देख । तो वेद लटिक म्हणावा कैसा ॥६१॥ वेदाज्ञेचा परम नेम । वेदें प्रतिपाद्य क्रियाकर्म । वेदबळें वर्णाश्रम । निज स्वधर्म चालविती ॥६२॥ वेद म्हणे जो लटिक । जो वेदबाह्य आवश्यक । हें तूंचि बोलिलासी देख । तो वेद लटिक केवीं मानूं ॥६३॥ ऐशी मानाल आशंका । तोहीविषयीं मीचि देखा । वेदवादाच्या विवेका । विभाग नेटका सांगेन ॥६४॥ अविद्याभेद सबळ ज्यासी । भेदू नियामक म्यां केला त्यासी । मद्रूपीं अभेदता ज्या भक्तासी । मिणधा त्यापाशीं वेदवादु ॥६५॥ वेद तितुकाही त्रिगुण । अभेदजनें भक्त निर्गुण । त्यासी वेदाचें नियामकपण । न चले जाण ममाज्ञा ॥६६॥ रायाचा जिवलग सेवकू । त्यासी द्वारपाळ नव्हे नियामकू । कां दासीस लागल्या राजांकू । तीस मानी लोकू प्रधानादि ॥६७॥ निजकन्येसी शिकवी माता । लाज धरावी लोकांदेखतां । एकांतीं मीनल्या कांता । लाज सर्वथा सोडावी ॥६८॥ सबळ भेदांचें भेदमान । तंव दुर्लंघ्य वेदवचन । अभेद भक्त माझे जाण । वेदविधान त्यां न बाधी ॥६९॥ आशा तेचि अविद्याबाधू । छेदिल्या बाधीना वेदवादू । जेवीं सूर्योदयापुढें चांदू । होय मंदू निजतेजें ॥४७०॥
एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा
असत्त्वाद् आत्मनोऽन्येषां भावानां तत्कृता भिदा । गतयो हेतवश्चास्य मृषा स्वप्नदृशो यथा ॥३१॥
गुरुकृपा जो सज्ञान । त्यासी देहाचें अबाधित भान । मिथ्या प्रपंचाचें दर्शन । कर्में कर्तेपण त्या नाहीं ॥७१॥ अविद्या द्योतिले वर्णाश्रम । तेथींचे आविद्यक क्रियाकर्म । तेथील जो वेदोक्त धर्म । तो अविद्याभ्रम अज्ञाना ॥७२॥ सज्ञान भक्तांच्या ठायीं । ते अविद्या निःशेष नाहीं । मा वेदविधान तेथें पाहीं । रिघावया कायी कारण ॥७३॥ आंबा सफळित जव असे । तंव नेटेंपाटें राखण बैसे । फळ हाता आल्या आपैसें । राखण वायसें राहेना ॥७४॥ तेवीं अविद्येचें जंव बंधन । तंव वेदाचें वेदविधान । अविद्या नाशिलिया जाण । विधीनें तें स्थान सोडिलें ॥७५॥ अविद्या जाऊनि वर्ततां देहीं । देहाचा देहत्वें हेतु नाहीं । हें म्हणाल न घडेच कांहीं । ऐक तेंही सांगेन ॥७६॥ स्वप्नींचें देहादि प्रपंचभान । स्वप्नाचमाजीं सत्य जाण । जागें होतां तें अकारण । संस्कारें स्वप्न दिसतांही ॥७७॥ स्वप्नीं राज्यपद पावला । कां व्याघ्रमुखीं सांपडला । अथवा धनादिलाभ झाला । रत्नेंं पावला अनर्घ्यें ॥७८॥ तेथींचें सुख दुःख हरिख । जागत्यासी नाहीं देख । तेवीं सज्ञानासी आविद्यक । नोहे बाधक निजबोधें ॥७९॥ देहीं असोनि विदेहस्थिती । ऐशा बोधसाधिका ज्या युक्ती । स्वयें सांगेन म्हणे श्रीपती । भेदाची उत्पत्ती छेदावया ॥४८०॥
एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा
यो जागरे बहिरनुक्षणधर्मिणोऽर्थान् । भुङ्क्ते समस्तकरणैहृदि तत्सदृक्षान् । स्वप्ने सुषुप्त उपसंहरते स एकः । स्मृत्यन्वयात्त्रिगुणवृत्तिदृगिन्द्रियेशः ॥३२॥
तिहीं अवस्थांच्या ठायीं । आत्मा एकचि असे देहीं । तोचि देहाच्या ठायीं विदेही । साक्षी पाहीं सर्वांचा ॥८१॥ मी बाळ तोचि झालों तरणा । आतां आलों म्हातारपणा । ऐशा वयसांचे साक्षीपणा । आपण आपणा देखतू ॥८२॥ जागृतीसी नाना भोग । सविस्तर भोगी अनेक । तेचि स्वप्नामाजीं साङ्ग । निजहृदयीं चांग विस्तारी ॥८३॥ जागृतिभोगाचा संस्कारू । तोचि स्वप्नामाजीं विस्तारू । मनोमय विश्वाकारू । निजहृदयीं वेव्हारू वाढवी ॥८४॥ गज तुरंग खर नर । गिरी दुर्ग पुर नगर । विशाळ सरिता समुद्र । वासनेचें वैचित्र्य स्वप्नीं देखे ॥८५॥ नाहीं जागृती नाहीं स्वप्न । अंतःकरणही करोनि लीन । सुषुप्तिकाळीं तोचि जाण । अहंकारेंवीण उरलासे ॥८६॥ विश्वाभिमानी इंद्रियवृत्ती । तेणें तो देखतसे जागृतीं । तैजस अभिमानी अविद्यावृत्ती । स्वप्नस्थिती तो देखे ॥८७॥ प्राज्ञ अभिमानी मूढवृत्ती । तो देखतसे सुषुप्ती । एक आत्मा तिहींप्रती । न घडे निश्चितीं म्हणाल ॥८८॥ तिहीं अवस्थांचे अभिमानी । म्हणाल देखणे भिन्न तिनी । तरी एक आत्मा द्रष्टेपणीं । उरला निदानीं तें ऐका ॥८९॥ पहिला जो कां मी जागता । तेणें म्यां देखिली स्वप्नावस्था । तोचि मी सुखें निजेला होता । या तिनी अवस्था स्वयें मी जाणें ॥४९०॥ जेणें जे देखिली नाहीं । तो ते अवस्था सांगेल कायी । यालागीं तिहीं अवस्थांचे ठायीं । आत्मा पाहीं अनुस्यूत ॥९१॥ जागृतीं इंद्रियां देखणेपण । स्वप्नीं देखणें तें तंव मन । सुषुप्ति गाढ मूढ अज्ञान । कैंचें देखणेपण आत्म्यासी ॥९२॥ येही आशंकेचें वचन । ऐका द्विज हो सावधान । मन इंद्रियें जडें जाण । देखणेपण त्यां कैंचें ॥९३॥ जो मनाचा चाळकू । जो इंद्रियांचा प्रकाशकू । जो सुषुप्तीचा द्योतकू । साक्षित्वें एकू तो आत्मा ॥९४॥ म्हणाल सुषुप्ती आत्मा नाहीं । बोलणें न घडे कांहीं । मी सुखें निजेलों होतों पाहीं । हें कोणाचे ठायीं जाणवे ॥९५॥ प्रकृतिकार्याहूनि परता । देहादि अवस्थांतें प्रकाशिता । गुणइंखद्रियांचा नियंता । जाण तत्त्वतां तो आत्मा ॥९६॥ इंद्रियें आत्मा नव्हती हा नेम । त्यांचें सदा एकदेशी कर्म । आत्मा सर्वकर्ता सर्वोत्तम । करोनि निष्कर्म सर्वदा ॥९७॥ मन आत्मा नव्हे तें ऐक वर्म । संकल्पविकल्प त्याचें कर्म । आत्मा निर्विकल्प निरुपम । विश्रामधाम जगाचें ॥९८॥ जो सुषुप्तिसुखभोगसाक्षी । जो देखणेपणें तिहीं लोकीं । तो मी आत्मा गा एकाकी । जाण निष्टंकीं निश्चित ॥९९॥ एवं युक्तीचिया विभागलीला । परमात्मा जो एकू साधिला । तो साधकांसी उपयोगा आला । योग सिद्धी नेला तेणें बळें ॥५००॥
एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा
एवं विमृश्य गुणतो मनसस्त्र्यवस्था । मन्मायया मयि कृता इति निश्चितार्थाः । सञ्छिद्य हार्दमनुमानसदुक्तितीक्ष्ण । ज्ञानासिना भजत माखिलसंशयाधिम् ॥३३॥
म्यां सांगीतल्या ज्या युक्ती । ज्या कां श्रुतिशास्त्रार्थसंमती । त्या विचारोनि परमार्थगतीं । संसारगुंतीं उगवावी ॥१॥ संसारगुंतीसी कारण गुण । गुणावस्थीं व्यापिलें मन । त्यासी माझी माया मूळ जाण । जिया केलें आवरण माझेंचि ॥२॥ माझी माया माझेनि सबळ । त्या मजचि आवरिलें तत्काळ । जैसें डोळ्याचें डोळां जळ । गोठूनि पडळ होऊनि ठाके ॥३॥ कां पूर्णचंद्र अतिनिर्मळ । तेथ पृथ्वी बिंबली सकळ । तेणें सलांछन चंद्रमंडळ । लोक सकळ देखती ॥४॥ पृथ्वीचंद्रासी अंतर । विचारितां दूरांतर । मिथ्या बाधिला रजनीकर । ते लोक साचार मानिती ॥५॥ यापरी माया माझ्या ठायीं । आतळली नाहीं कंहीं । मिथ्याभासें लोक पाहीं । तिच्याठायीं भूलले ॥६॥ तेणें नाथिली गुणावस्था । अहंकर्तृत्वें घेतली माथां । तेणें विषयभोगअुवस्था । वासनायुक्ता वाढविल्या ॥७॥ एवं उभय देहबंधन । मिथ्या जीवत्वें लागलें जाण । त्याचें करावया छेदन । माझ्या युक्ती जाण विवराव्या ॥८॥ करितां युक्तींचें अनुमान । तेणें अनुमानिक होय ज्ञान । न तुटे अविद्याबंधन । यालागीं साधुसज्जन सेवावे ॥९॥ साधूंमाजीं साधुत्व पूर्ण । सेवावे सद्गुसरुचरण । तेणें निरसे भवबंधन । साधुसज्जन सद्गु्रु ॥५१०॥ त्या साधूंचिया सदुक्ती । श्रुत्यर्थें उपदेश करिती । तेणें होय ज्ञानखड्ग प्राप्ती । जे बुद्धीच्या हातीं हातवशी ॥११॥ तेंही वैराग्यनैराश्यसाहाणे । लावूनि सतेज शस्त्र करणें । धृतीच्या धारणा दृढ धरणें । सावधपणें निःशंक ॥१२॥ शस्त्रासी आणि आपणा । एकपणाची धारणा । दृढ साधूनि साधना । देहाभिमाना छेदावें ॥१३॥ जो सकळ संशयाचा कंदू । जेणें देहदुःखाचा उद्बो१धू । ज्याचेनि सदा विषयसंदू । जो कामक्रोधपोषकू ॥१४॥ जो वाढवी तिनी गुण । जो शुद्धासी आणी जीवपण । ज्याचेनि जीव जन्ममरण । दुर्निवार जाण लागलें ॥१५॥ जो सकळ अनर्थांचा दाता । ज्याची लडिवाळ कन्या ममता । तियेसी वाढवी माया माता । तिच्या सत्ता हा दाटुगा ॥१६॥ तेथें शस्त्राचेनि लखलखाटें । राहोनियां नेटेंपाटें । समरांगणीं सुभटें । घावो येणें नेटें हाणावा ॥१७॥ एकेचि घायें जाण । माया ममता अभिमान । त्रिपुटीचें होय छेदन । येणें बळें जाण छेदावा ॥१८॥ भोग्य भोगू भोक्ता । कर्म कार्य कर्ता । ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी तत्त्वतां छेदावी ॥१९॥ अहं कोहं सोहं स्वभावो । हाही छेदूनि अहंभावो । साधकां निजपदीं ठावो । ब्रह्म स्वयमेवो होऊनि ठेले ॥५२०॥ म्हणाल सांगतां जो प्रकारू । तो शब्दज्ञान वेव्हारू । बोलाचा कडकडाट थोरू । कैसेनि अहंकारू मारवे ॥२१॥ शब्दमात्रें अभिमान । जरी पावता निर्दळण । तरी कां पां विद्वज्जन । अभिमानमग्न होताती ॥२२॥ अभिमान संमुख दिसता । तरी धांवोनि करूं ये घाता । तो अतर्क्य जी सर्वथा । शब्दें अहंता मरेना ॥२३॥ घडे अपरोक्षसाक्षात्कारू । तो शब्दमात्रें नव्हे प्रकारू । ऐसा आशंकेचा विचारू । ऐक निर्धारू सांगेन ॥२४॥ जो अनन्यभावें माझें भजन । सर्वदा करी सावधान । कां सद्गुारूचे श्रीचरण । मद्भाावें जाण जो सेवी ॥२५॥ मज आणि सद्गुरुमूर्ती । भेद नाहीं गा कल्पांतीं । येणें अभेदभावें जे भजती । ते ज्ञान पावती सहजचि ॥२६॥ त्यांसी स्वभावें भजनस्थिती । ज्ञानखड्गाची होय प्राप्ती । सहजेंचि सांपडे हातीं । ज्या शस्त्रदीप्ति काळू कांपे ॥२७॥ ज्या शस्त्राच्या धाकाभेण । माया ममता अभिमान । सांडूनियां जीवपण । समूळ जाण पळालीं ॥२८॥ हाणावया पुरता घावो । अहंममतेसी नाहीं ठावो । अविद्येचाही अभावो । आपभयें पहा हो आपणचि ॥२९॥ सद्भायवें जें माझें भजन । करितां एवढें होय ज्ञान । येथ आशंका करील मन । कोठें भजन करावें ॥५३०॥ तुझें स्वरूप अतर्क्य जाण । अतिसूक्ष्म आणि निर्गुण । तुज भजावया कवण स्थान । आम्हांसी जाण कळेना ॥३१॥ ऐसें कल्पील जरी मन । तरी ऐक सावधान । अतिसुगम भजनस्थान । मी सांगेन तें ऐक ॥३२॥ नुल्लंघितां पर्वतकोटी । न रिघतां गिरिकपाटीं । दूरी न करितां आटाटी । जे स्थानीं भेटी सदा माझी ॥३३॥ भजनस्थान निरुपम । जेथ मी वसें पुरुषोत्तम । प्राप्तीलागीं अतिसुगम । विश्रामधाम भक्तांचें ॥३४॥ सर्व सुखांचा आराम । निजहृदयीं आत्माराम । सर्वदा असे सम । भजावें सप्रेम ते ठायीं ॥३५॥ आदि ब्रह्मा अंतीं मशक । सर्वांचे हृदयीं मीचि एक । ऐसें पाहे तो सभाग्य देख । हें भजन चोख मत्प्राप्ती ॥३६॥ ज्या मज हृदयस्थाचे दीप्ति । मनबुद्ध्यादिकें वर्तती । ज्या माझिये स्फुरणस्फूर्ती । ज्ञानव्युत्पत्ती पायां लागे ॥३७॥ त्या मज हृदयस्थाच्या ठायीं । भजनशीळ कोणीच नाहीं । शिणतां बाह्य उपायीं । जन अपायीं पडताती ॥३८॥ ऐशांत सदैव कोणी एक । निजभाग्यें अत्यंत चोख । मज हृदयस्थाचा विवेक । करूनि निष्ठंक मद्भोजनीं ॥३९॥ करितां हृदयस्थाचें भजन । माझें पावे तो निजज्ञान । वैराग्ययुक्त संपूर्ण । जे ज्ञानीं पतन रिघेना ॥५४०॥ ज्या ज्ञानाभेणें जाण । धाकेंचि पळे अभिमान । तें मी आपुलें त्यांसी दें ज्ञान । जे हृदयस्थाचें भजन करिती सदा ॥४१॥ ज्या ज्ञानाचिये ज्ञानसिद्धी । अखिल जाती आधिव्याधी । संशय पळती त्रिशुद्धी । भक्त निजपदीं पावती ॥४२॥ सबळ बळें सुभटें । शस्त्राचेनि लखलखाटें । संशयो छेदावा कडकडाटें । हें म्यां नेटेंपाटें सांगीतलें ॥४३॥ यावरी ऐसें गमेल चित्तीं । संसाराची सत्यप्राप्ती । त्यासी शस्त्र घेऊनि हातीं । कोणे युक्तीं छेदावा ॥४४॥ तरी संसार तितुकी भ्रांती । हेंचि सांगावया दृष्टांतीं । पुढील श्लोकाची श्लोकोक्ती । स्वयें श्रीपती सांगतू ॥४५॥
एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा
ईक्षेत विभ्रममिदं मनसो विलासं । दृष्टं विनष्टमतिलोलमलातचक्रम् । विज्ञानमेकमुरुधेव विभाति माया । स्वप्नस्त्रिधा गुणविसर्गकृतो विकल्पः ॥३४॥
देहादि अहंकारपर्यंत । पिंड ब्रह्मांड जें भासत । तें मनोमात्र विलसत । मिथ्याभूत संसारु ॥४६॥ जैसें स्वप्नीं निद्रेमाजीं मन । स्वयें देखे त्रिभुवन । तैसेंचि हें दीर्घस्वप्न । अविद्या जाण विकाशी ॥४७॥ आन असूनि आन देखती । त्या नांव आभास म्हणती । शुक्तिकेमाजीं रजतभ्रांती । दोरातें म्हणती महासर्पू ॥४८॥ सूर्याचे किरण निखळ । ते ठायीं देखती मृगजळ । तैशी शुद्ध वस्तू जे केवळ । तो संसार बरळ म्हणताती ॥४९॥ तया आरोपासी अधिष्ठान । मीचि साचार असें आपण । जेवीं कां कोलिताचें कांकण । अग्नितेजें जाण आभासे ॥५५०॥ अलातचक्रींचा निर्धार । अग्नि सत्य मिथ्या चक्र । तेवीं निर्धारितां संसार । ब्रह्म साचार संसार मिथ्या ॥५१॥ तेथ आधिदैव आधिभौतिक । आध्यात्मादि सकळिक । अलातचक्राच्याऐसे देख । त्रिगुणमायिक परिणाम ॥५२॥ कोलिताचेनि भ्रमभासें । भ्रमणबळें तें चक्र दिसे । क्षणां दिसे क्षणां नासे । तैसा असे हा संसारू ॥५३॥ जंव भ्रमणाचें दृढपण । तंव कोलिताचें कांकण । भ्रम गेलिया जाण । कांकणपण असेना ॥५४॥ तेवीं जंव जंव भ्रम असे । तंव तंव दृढ संसार भासे । भ्रम गेलिया अनायासें । संसार नसे पाहतांही ॥५५॥ मी देहो माझें कलत्र पुत्र । हें भ्रमाचें मुख्य सूत्र । तें न छेदितां पामर । मुक्ताहंकार मिरविती ॥५६॥ एवं मायामय संसारू । ऐसा जाणोनि निर्धारू । तेथील सांडूनि अत्यादरू । उपरमप्रकारू सांगत ॥५७॥
एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा
दृष्टिं ततः प्रतिनिवर्त्य निवृत्ततृष्णः । तूष्णीं भवेन्निजसुखानुभवो निरीहः । संदृश्यते क्व च यदीदमवस्तुबुद्ध्या । त्यक्तं भ्रमाय न भवेत् स्मृतिरानिपातात् ॥३५॥
पूर्विल्या भजनपरिपाटीं । सहजें निर्मळ झाली दृष्टी । मिथ्या सांसारिक त्रिपुटी । हा निर्धार पोटीं दृढ झाला ॥५८॥ तेथें सांसारिक त्रिपुटी । सांडूनि उपरमवितां दृष्टी । मज हृदयस्थासी होय भेटी । जेवीं सुवर्णदृष्टीं अळंकारू ॥५९॥ तेथ दृष्य द्रष्टा दर्शन । मोडूनि त्रिपुटीचें भान । तेचि धारणा तेंचि ध्यान । तेथ समाधान धरावें ॥५६०॥ तेंचि अंगें व्हावया आपणा । सांडावी सकळ तृष्णा । वाचेसी धरावें महामौना । देहचेष्टा जाणा आवराव्या ॥६१॥ सांडावी वेदशास्त्रव्युत्पत्ति वाड । सांडावी वाग्वादबडबड । भगवद्भा वो धरावा दृढ । जेणें आशेचें बूड समूळ छेदे ॥६२॥ काया वाचा आणि मन । दृढ आवरावें आपण । तुटों नेदावें अनुसंधान । सदा सावधान निजरूपीं ॥६३॥ ते स्वरूपसुखीं लोधल्या जाण । देहाचें स्फुरेना देहपण । अहंकारेंसीं मावळे मन । स्वानंद पूर्ण वोसंडे ॥६४॥ तेथ संमुख ना पाठिमोरें । एकपण ना दुसरें । देवो भक्त हेंही नुरे । सुखें सुखभरें सुखरूप ॥६५॥ मी एक सुखरूप आहें । वेगळेपणें ठावें नोहे । येणे आत्मानुभवें राहे । एवढी प्राप्ती होये मद्भ॥क्तां ॥६६॥ म्हणाल काष्ठाच्या परी त्यासी । पडला असेल अहर्निशीं । हेंही न घडे गा तयासी । सांडूनि हेतूसी देहीं वर्ते ॥६७॥ तोही प्रारब्धाचेनि बळें । आहारनिद्रादि खेळेंमेळें । देहींचीं कर्में करितां सकळें । सर्वथा नातळे देहबुद्धी ॥६८॥ दंड काढोनि नेलिया कुंभारें । पहिले भवंडीं चक्र फिरे । तेवीं प्रारब्धाचेनि संस्कारें । कर्मानुसारें देह वर्ते ॥६९॥ कुलालचक्रीं बैसली माशी । न हालतां भोंवे चक्रासरसी । कोटी फेरे म्हणती तिसी । तेवीं मुक्तासी देहकर्में ॥५७०॥ यापरी देहकर्मीं वर्ततां । ज्ञाता न म्हणे अहं कर्ता । जेवीं वार्यामचिया स्वभावता । दिसे चपळता गलितपत्रीं ॥७१॥ जेवीं कां पुरुषासवें छाया असे । परी ते छायेसी पुरुष न बैसे । तेवीं ज्ञात्यासवेंही देह दिसे । परी तो देहदोषें मैळेना ॥७२॥ निजछायेसी बैसों जातां । छायाचि पळे तत्त्वतां । तेवीं मद्भबक्तीं माया पाहतां । माया स्वभावतां मिथ्यात्वें पळे ॥७३॥ हो कां मुक्ताफळांची माळा । भ्रमें सर्परूप भासे डोळां । तेचि भ्रमांतीं घालितां गळां । नुपजे कंटाळा सर्पभयाचा ॥७४॥ तेवीं अधमोत्तम योनी । कां वंद्यनिंद्य जे जनीं । ते मी म्हणतां ज्ञानी । शंका न मानी देहमिथ्यात्वें ॥७५॥ यापरी ते अतिसज्ञान । जाणोनि देहाचें मिथ्याभान । देहकर्मीं वर्ततां जाण । देहाचें देहपण स्फुरेना ॥७६॥ तो देहो सर्वांगीं तोडितां । कां वृकव्याघ्रादिकीं फाडितां । कां अग्निमाजीं धडाडितां । त्यासी देहअयहंता स्फुरेना ॥७७॥ आपुली छाया देखिली शूळीं । तीलागीं पुरुष न तळमळी । तेवीं देहाची होत होळी । ज्ञाता न डंडळी निजबोधें ॥७८॥ म्हणाल देहसंगें वर्ततां । केवीं बाधीना देहअोहंता । सांडूनि अंगींची क्षारता । लवण वर्ततां उरे कैसें ॥७९॥ हिंग सांडूनि आपुली घाणी । केवीं राहेल सुगंधपणीं । निःशेष सांडोनि अंगींचें पाणी । केळी केळीपणें उरे कैंची ॥५८०॥ न झुंझें म्हणोनि रणीं रिघतां । जेवीं कां घाय वाजती माथां । तेवीं देहसंगें वर्तता । देहअ हंता सोडीना ॥८१॥ येविषयीं ऐका सावधान । ज्ञात्यासी देहाचें बाधीना भान । तेथें स्फुरे जो अभिमान । तो भर्जित जाण बीज जैसें ॥८२॥ भर्जित बीजें जाण । हों शके क्षुधाहरण । परी करितां बीजारोपण । अंकुर जाण त्या नाहीं ॥८३॥ चित्रामाजीं व्याघ्र दिसे । परी बाधकत्व त्यासी नसे । तेवीं भर्जित अभिमानशेषें । बाधा नसे ज्ञात्यासी ॥८४॥ चित्रींच्या वाघासी जाण । निःशेष नाहीं व्याघ्रपण । तेवीं मुक्तांच्या देहासी जाण । देहपण असेना ॥८५॥ दृढ ठसावल्या चैतन्यघन । स्वरूपीं वृत्ति होय निमग्न । तेव्हां दिसे तेंही भर्जित भान । तेंही स्फुरण निमालें ॥८६॥ ऐशी मावळल्या स्मृती । ज्ञात्याची वर्तती स्थिती । स्वयें सांगतु श्रीपती । यथानिगुती निजबोधें ॥८७॥ सर्व कर्मी वर्ततां जाण । देहाचें स्फुरेना देहपण । तें मुख्य समाधिलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥८८॥
एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा
देहं च नश्वरमवस्थितमुत्थितं वा । सिद्धो न पश्यति यतोऽध्यगमत् स्वरूपम् । दैवादपेतमुत दैववशादुपेतं । वासो यथा परिकृतं मदिरामदांधः ॥३६॥
जया देहाचेनि मद्भाजनें । माझें शुद्ध स्वरूप पावणें । त्या देहासी विसरिजे तेणें । मी माझेपणें देखेना ॥८९॥ जेवीं कां भाडियाचें घोडें । जेणें आणिलें निजधामा रोकडें । तें आहे कीं गेलें कोणीकडे । हें स्मरेना पुढें तो जैसा ॥५९०॥ हो कां भेटावया भ्रतारासी । सवें मजुर आणी विश्वासी । ते पतीसीं पहुडल्या राणिवसीं । त्या मजुरासी विसरली ॥९१॥ कां जो दैवयोगें पालखीं चढे । तो पूर्वील तुटके मोचडे । आहेत कीं गेले कोणीकडे । हें स्मरेना पुढें तेणें हरिखें ॥९२॥ हो कां बहुकाळें पत्नी जैसी । भर्तारू मीनल्या निजसेजेसी । ते निःशेष विसरे लाजेसी । देहाची तैसी दशा जाहली ॥९३॥ त्या दांपत्याचे सुखभेटी । पारकें देखतां लाज उठी । तेवीं देहाचें भान द्वैतदृष्टीं । मदैक्यपुष्टीं देह कैंचें ॥९४॥ एवं पावोनि माझ्या स्वरूपासी । स्वानंदपूर्ण साधकासी । सुखें सुखरूपता जाहली त्यासी । निजदेहासी विसरोनी ॥९५॥ मग उठलें कीं बसलें । चालतें कीं राहिलें । जागतें कीं निजलें । हें स्मरण ठेलें देहाचें ॥९६॥ हें धालें कीं भुकेलें । हिंवले कीं तापलें । प्यालें कीं तान्हलें । राहिलें उगलें स्मरेना तो ॥९७॥ हें येथें कीं तेथें । मुकें कीं बोलतें । होतें कीं नव्हतें । स्मरणसहितें स्मरेना तो ॥९८॥ हें ओंवळें कीं सोंवळें । चोखट कीं मैळें । डोळस कीं आंधळें । अंगीं पांगुळलें स्मरेना तो ॥९९॥ हें आलें कीं गेलें । होतें कीं केलें । जाहलें कीं मेलें । तटस्थ राहिलें स्मरेना तो ॥६००॥ हें बाळ कीं प्रौढ । मोठें कीं रोड । हळू कीं जड । कांहीं सदृढ स्मरेना तो ॥१॥ हें खोटे कीं भुयीं । ठायीं कीं कुठायीं । आहे कीं नाहीं । हेंही पाहीं स्मरेना तो ॥२॥ हें मंत्रीं कीं तंत्रीं । तीर्थीं कीं क्षेत्रीं । विष्ठीं कीं मूत्रीं । आहे पवित्रीं स्मरेना तो ॥३॥ जनीं कीं वनीं । अथवा निरंजनीं । जपीं कीं ध्यानीं । हेंही मनीं स्मरेना तो ॥४॥ हें सुजनीं कीं दुर्जनीं । बंदी कीं विमानीं । मंदिरीं कीं मसणीं । पाहती कोणी स्मरेना तो ॥५॥ हें गजीं कीं तुरगीं । कीं अंगनासंभोगीं । खरीं कीं उरगीं । अंगीच्या अंगीं स्मरेना तो ॥६॥ हें काशीं कीं कैकटीं । नरकीं कीं वैकुंठीं । घरी कीं कपाटीं । राहिलें नेहटी स्मरेना तो ॥७॥ हें पूजिलें कीं गांजिलें । धरिलें कीं मारिलें । देहाचें येकही केलें । अथवा काय झालें स्मरेना तो ॥८॥ मी शेषशयनावरी । कीं मातंगाच्या घरीं । कीं बैसलों शूळावरी । हेंही न स्मरी सहसा तो ॥९॥ ऐशी ज्ञात्याची निरभिमानता । माझेनि न सांगवे तत्त्वतां । जे पावले माझी सायुज्यता । त्यांची कथा न बोलवे ॥६१०॥ जेथ वेदां मौन पडे । स्वरवर्णेंसीं वाचा बुडे । त्या संतांचे पवाडे । माझेनिही निवाडे न सांगवती ॥११॥ ऐकोनि सज्ञानाची स्थिती । तुम्हांसी गमेल ऐसें चित्तीं । केवळ जड मूढ झाली प्राप्ती । एकही स्फूर्ती स्फुरेना ॥१२॥ जेवीं कां केवळ पाषाण । तैसें झालें अंतःकरण । एकही स्फुरेना स्फुरण । ज्ञातेपण घडे कैसें ॥१३॥ ऐशी धरिल्या आशंका । तेविषयीं सावध ऐका । ज्ञानअिज्ञानभूमिका । अतर्क्य लोकां निश्चित ॥१४॥ केवळ जें शुद्ध ज्ञान । आणि जडमूढ अज्ञान । दोहींची दशा समान । तेथीलही खूण मी जाणें ॥१५॥ निबिड दाटला अंधकारू । त्यामाजीं काजळाचा डोंगरू । तेथ आंधळा आला विभाग करूं । तैसा व्यवहारू अज्ञाना ॥१६॥ शोधावया अध्यात्मग्रंथ भले । अंधमूकाहातीं दीधले । तें ऐके देखे ना बोले । तैसें जडत्वें झालें अज्ञान ॥१७॥ ऐशी अज्ञानाची गती । ऐका सज्ञानाची स्थिती । अपरोक्षसाक्षात्कारप्रतीती । देहीं वर्तती विदेहत्वें ॥१८॥ जेवीं कां रत्नें आणि गारा । दोहींचा सारिखा उभारा । मोल वेंचूनि नेती हिरा । फुकट गारा न घेती ॥१९॥ जैसें कण आणि फलकट । दोहींसी वाढी एकवाट । तैसें ज्ञानाज्ञान निकट । दिसे समसकट सारिखें ॥६२०॥ जेवीं कां खरें कुडें नाणें । पाहतां दिसे सारिखेपणें । खरें पारखोनि घेती देखणे । मूर्खीं नाडणें ते ठायीं ॥२१॥ तेवीं ज्ञानाज्ञानाची पेंठ । भेसळली दिसे एकवट । तेथ अणुभरी चुकल्या वाट । पाखंड उद्भदट अंगीं वाजे ॥२२॥ यालागीं मद्भुक्तीपाशीं आले । जे माझ्या विश्वासा टेंकले । त्यांसी म्यां निजरूप आपुलें । खरें दीधलें अतिशुद्ध ॥२३॥ माझ्या नामविश्वासासाठी । प्रल्हाद द्वंद्वें पायें पिटी । न घेतां मुक्ती लागे पाठीं । विश्वासें भेटी माझ्या रूपीं ॥२४॥ पावोनि माझ्या निजस्वरूपेसी । तेंचि ते झालें मद्भावेंसीं । जेवीं लवण मीनल्या जळासी । लवणपणासी मूकलें ॥२५॥ तेथ मी एक लवण । हेही विराली आठवण । स्वयें समुद्र झालें जाण । तेवीं सज्ञान मद्रूपें ॥२६॥ ऐसें पावोनि माझ्या स्वरूपासी । विसरले देहअभिमानासी । झाले चैतन्यघन सर्वांशीं । आनंदसमरसीं निमग्न ॥२७॥ जेवीं दोरीं सर्पू उपजला । नांदोनि स्वयें निमाला । तो दोरें नाहीं देखिला । तैसा झाला देहभावो मुक्तां ॥२८॥ तेव्हां मी तूं हे आठवण । आठवितें आहे कोण । विसरोनि गेलें अंतःकरण । आपण्या आपण विसरला ॥२९॥ तेथ कैंचा स्वर्ग कैंचा नरक । कैंचें चोख कैंचें वोख । कैंचे चतुर्दश लोक । ब्रह्म एक एकलें ॥६३०॥ कैंचें पवित्र कैंचें अपवित्र । कैचें तीर्थ कैंचें क्षेत्र । कैचा वेदू कैंचें शास्त्र । ब्रह्म स्वतंत्र अद्वय ॥३१॥ तेथ कैंचा उत्पत्तिविनाशू । कैंचा वैकुंठ कैलासू । कैंचा ब्रह्मा विष्णु महेशू । एक अविनाशू उरलासे ॥३२॥ तेथ कैंचा बोधू कैंची बुद्धी । देवपण बुडालें त्रिशुद्धी । लाजा निमाली मोक्षसिद्धी । कैंचा क्षीराब्धिशेषशायी ॥३३॥ तेथ माझीही भगवंतता । हारपोनि जाय तत्त्वतां । प्रणवाचा बुडाला माथा । ऐशी सायुज्यता पावले ॥३४॥ यालागीं देहाचें केलें ठेलें । अथवा आलें कां गेलें । हें स्फुरेना जें बोलिलें । ते विशद केलें या रीती ॥३५॥ अविद्या कारण देह कार्य । ते अविद्या नासोनि जाये । कारण नासल्या कार्य राहे । हें न घडे पाहें म्हणाल ॥३६॥ वृक्ष समूळीं उपडिला जाये । सार्द्रता तत्काळ न जाये । पत्र पुष्प फळ सार्द्र राहे । शुष्क होये अतिकाळें ॥३७॥ तेवीं अविद्या नासोनि जाये । भोगानुरूप दैव जें राहे । तेणें ज्ञाता वर्तताहे । निजदेहीं पाहे विदेहत्वें ॥३८॥ म्हणाल वाढवितां वाडेंकोडें । प्रतिपाळितां सुरवाडें । राखतराखतां देह पडे । प्रत्यक्ष रोकडें दिसताहे ॥३९॥ ज्याचें देह त्यासी दृढ नव्हे । तरी तें तत्काळचि पडावें । वांचलें असे कोणे भावें । ऐसें कांहीं जीवें कल्पाल ॥६४०॥ ज्याचें देह तो न पुसे त्यातें । तरी तें देह केवीं कर्मीं वर्ते । ऐशी आशंका तुम्हांतें । ऐका सावचित्तें सांगेन ॥४१॥ देहाचें उत्पत्तिस्थितिनिदान । पुरुषासी वश्य नव्हे जाण । त्यासी अदृष्टचि प्रमाण । दैवयोगें चळण देहाचें ॥४२॥ उठणें कां बैसणें । तें देहासी दैवगुणें । अदृष्टगतीं देणें घेणें । खाणें जेवणें अदृष्टें ॥४३॥ स्वदेशीं कां परदेशीं । अदृष्ट नेतसे देहासी । स्वर्गनरकभोगासी । अदृष्ट देहासी उपजवी ॥४४॥ यश लाभ हानि मृत्यु । देहासी अदृष्टें असे होतू । ज्ञाता देहासी अलिप्तू । जैसा घटांतू चंद्रमा ॥४५॥ जैशी छाया पुरुषासरसी । तैशी काया सज्ञानासी । ते राहिली अदृष्टापाशीं । निजकर्मासी भोगावया ॥४६॥ जन्मोनि छाया सरसी वाढे । माझी ऐशी अहंता न चढे । तैसेंच देह ज्ञात्याकडे । मी म्हणोनि पुढें येवों न शके ॥४७॥ सदा छाया सरिसी असे । परी कोठें असे कोठें नसे । हें ज्याची तो न पुसे । देहाचें तैसें वर्तन झालें ॥४८॥ छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजीं चढे । पुरुषासी सुखदुःख न जोडे । ज्ञात्यासी तेणें पाडें देहभोग ॥४९॥ येथवरी निजदेहासी । कैसेन विसर पडिला त्यासी । ऐक त्याही अभिप्रायासी । दृष्टांतेंसीं सांगेन ॥६५०॥ जो मोलें मदिरा पिवोनि ठाये । तो तेणें मदें नाचे गाये । देहवंत देह विसरोनि जाये । वस्त्र नाहीं आहे स्मरेना ॥५१॥ हा तंव ब्रह्मरस प्याला । परमानंदें तृप्त झाला । देहो झाला कीं मेला । आठवू ठेला तेणें मदें ॥५२॥ एवं देहाचें भरण पोषण । जन्म अथवा मरण । तें दैवयोगें जाण । तेंचि निरूपण हंस बोले ॥५३॥
एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा
देहोऽपि दैववशगः खलु कर्म यावत् । स्वारंभकं प्रतिसमीक्षत एव सासुः । तं सप्रपञ्चमधिरूढसमाधियोगः । स्वाप्नं पुनर्न भजते प्रतिबुद्धवस्तुः ॥३७॥
जितुकें देहाचें वर्तन । तितुकें अदृष्टास्तव जाण । अज्ञानासी देहाभिमान । त्यातें सज्ञान न धरिती ॥५४॥ जैसें अदृष्ट पूर्वस्थित । तैसा देह उपजे येथ । सावेव प्राणेंसहित । ऐसें वर्तत जंव दैवें ॥५५॥ म्हणाल दैवयोगें देहीं असतां । अवश्य वाढेल देहअ्हंता । जेवीं एकत्र गमनें मार्गस्थां । येरयेरांच्या व्यथा भोगिती ॥५६॥ लवणाच्या मिळणीं पाणी । होऊनि ठाके खारवणी । तेवीं ज्ञाताही देहाचे मिळणीं । देहाभिमानी होईल ॥५७॥ जेवीं लोहसंगाचिये प्राप्ती । दुर्धर अग्नि घण वरी घेती । तेवीं देहाचिया संगती । ज्ञाते भोगिती सुखदुःखें ॥५८॥ ऐसा कल्पाल अभिप्रावो । तो सज्ञानासी न घडे भावो । तिंहीं निवटूनियां अहंभावो । चिदानंदें पहा हो समाधिस्थ ॥५९॥ 'अधिरूढसमाधियोग' । हें मूळींचें पद अभंग । येणें समाधि अतिनिर्व्यंग । साधिली चांग निजबोधें ॥६६०॥ तरी समाधी ते कैशी असे । तटस्थ काष्ठाचेपरी दिसे । कां समाधिस्थ केवळ पिसें । अथवा असे सज्ञान ॥६१॥ ते सामाधीचीं लक्षणें । ऐक सांगेन संपूर्णें । देहीं असोनि देहबंधनें । नाहीं अडकणें सज्ञाना ॥६२॥ केवळ ताटस्था नांव समाधी । म्हणतां ज्ञात्याची ठकली बुद्धी । ते समाधि नव्हे त्रिशुद्धी । मूर्च्छित ते संधी असे वृत्ती ॥६३॥ निरभिमान निरवधी । त्या नांव अखंडसमाधी । परी काष्ठांतें त्रिशुद्धी । नव्हे समाधी सर्वथा ॥६४॥ ताटस्थ्यचि समाधि साचें । जे मानिती त्यांसी स्वरूपाचें । ज्ञान नाहीं निश्चयाचें । अनुमानाचें बोलणें ॥६५॥ प्रचंड आघाताच्या भुली । तत्काळ तटस्थता बाणली । तरी काय तेणें झाली । सत्यचि भली समाधि त्यासी ॥६६॥ ओंवाळणीचिया आस्था । बहुरूपी सोंग संपादितां । वायु स्तंभविला अवचितां । तेणें तटस्थता बहुकाळ ॥६७॥ परी वासना जंव उरली आहे । तंव समाधि कैसेनि हों लाहे । सावध होतांचि म्हणे काये । ये दात्याचे रायें उचित द्यावें ॥६८॥ सर्व संकल्पांची अवधी । त्या नांव निर्विकल्प समाधी । सकळ शास्त्र हेंचि प्रतिपादी । समाधि त्रिशुद्धी त्या नांव ॥६९॥ सापु आल्या शेळीप्रती । तटस्थ होय सकळवृत्ती । तैशी झालिया ताटस्थस्थिती । नव्हे निश्चितीं ते समाधी ॥६७०॥ अकस्मात अवचितां । दिव्य स्वरूप देखतां । आश्चर्यें झाली तटस्थता । तेथ जाणावी तत्त्वतां वृत्ति आहे ॥७१॥ स्वस्वरूप देखतां प्रथमदृष्टीं । न संवरतु विस्मयो उठी । तोही जिरवूनियां पोटीं । दशा जे उठी ते समाधी ॥७२॥ निःशेष कल्पना जेथ विरे । तेथ विस्मयो कोठें स्फुरे । सूक्ष्म कल्पना थावरे । तेणें वोसरे विस्मयो ॥७३॥ जेथ साचार ब्रह्मप्राप्ती होये । तेथें देहचि स्फुरों न लाहे । तेव्हां तटस्थ कीं चालताहे । हें देखणें होये पुढिलांचें ॥७४॥ एवं देहचि जेथ मिथ्यापणें । त्याचीं कवण लक्षी लक्षणें । हो कां मृगजळींचेनि नाहाणें । जेवीं कां निवणें सज्ञानीं ॥७५॥ मिथ्यादेहासी तटस्थता । झाल्या मानावी समाध्यवस्था । ऐशीं लक्षणें सत्य मानितां । ठकले तत्त्वतां परीक्षक ॥७६॥ हो कां स्वप्नींचे सज्ञानासी । ताटस्थ्यमुद्रा लागल्या त्यासी । जरी मान्य झाल्या स्वप्नींच्यासी । तरी जागृतीसी नाहीं आला ॥७७॥ हो कां स्वप्नींच्या लोकांप्रती । थोर झाली समाधीची ख्याती । तरी नाहीं आला तो जागृती । जाणावा निश्चितीं निद्रितू ॥७८॥ तेवीं ताटस्थ्या नांव समाधी । ते अविद्या स्वप्नमूर्च्छासिद्धी । परी स्वस्वरूपप्रबोधीं । जागा त्रिशुद्धी नाहीं झाला ॥७९॥ तो जागा होऊनि स्वप्न पाहे । तें मिथ्यात्वें देखताहे । त्यांतु आपुला देहो सत्य काये । मा ताटस्थ्य राहे ते ठायीं ॥६८०॥ जो जागा होऊनि तत्त्वतां । स्वप्नदेहासी तटस्थता । साक्षेपपूर्वक लावूं जातां । लाजे परी अधिकता दशा न मनीं ॥८१॥ जो जागा होऊनि स्वप्न सांगे । तें मिथ्यापणेंचि अवघें । परी सत्यसत्त्वाचेनि पांगें । कदा निजांगें नातळे ॥८२॥ तैशी साचार वस्तुप्राप्ती । तो नातळे देहस्थिती । तरी देह वर्ते कोणे रीती । तो प्रारब्धगतीचेनि शेषें ॥८३॥ स्थंडिलीं अग्नि विझोनि जाये । तरी भूमिये उष्णता राहे । कर्पूर सरल्याही पाहें । सुवासु आहे ते देशीं ॥८४॥ पाळणा हालवितां वोसरे । तरी तो हाले पूर्वसंस्कारे । तेवीं अविधानाशें प्रारब्ध उरे । तेणें देहो वावरे मुक्तांचा ॥८५॥ लक्ष्य भेदोनियां तीरें । बळें चालिजे पुढारें । तेवीं अविद्यानाशें प्रारब्ध उरे । तेणें देहो वावरे मुक्तांचा ॥८६॥ शरीराचेनि छाया चळे । परी शरीर छायेवेगळें । तेवीं देह मिथ्या मुक्ताजवळें । चळे वळे प्रारब्धें ॥८७॥ हेतुवीण अनायासें । पुरुषासवें छाया असे । तेवीं सज्ञानासरिसें । देह दिसे मिथ्यात्वें ॥८८॥ जैसें गलित पत्र वारेनि चळे । तैसें देह वर्ते प्राचीन मेळें । परी देहकर्माचेनि विटाळें । ज्ञाता न मैळे निजबोधें ॥८९॥ त्या प्रारब्धाच्या पोटीं । सांगो सकळ जगेंसीं गोठी । कां धरोनि मौनाची मिठी । गिरिकपाटीं पडो सुखें ॥६९०॥ तो आचरो सकळ कर्में । अथवा पिसा हो कां निजभ्रमें । तेणें तेणें अनुक्रमे । जाण परिणामें प्रारब्धें ॥९१॥ तो चढो पालखीं गजस्कंधीं । कां पडो विष्ठामूत्रसंधीं । ते ते प्रारब्धाची सिद्धी । जाण त्रिशुद्धी ज्ञात्यासी ॥९२॥ जेथ बाध्यबाधकता फिटली । सकळ अहं अविद्या तुटली । सहज समाधी त्या नांव झाली । हे संख्या केली सिद्धांतीं ॥९३॥ ऐशी जे सैर समाधिअवस्था । तोचि भोग भोगोनि अभोक्ता । कर्में करोनि अकर्ता । जाण तत्त्वतां तो एक ॥९४॥ तो क्रियाकारणसंयोगें । डुलत देखिजे विषयभोगें । परी समाधिमुद्रा न भंगे । भोगसंगें अलिप्त ॥९५॥ त्यासी स्त्री म्हणे माझा भर्ता । पुत्र म्हणे माझा पिता । शिष्य म्हणे स्वामी तत्त्वतां । त्यांहूनि परता त्यांमाजीं वर्ते ॥९६॥ हो कां काष्ठास्तव उत्पत्ती । काष्ठावरी ज्याची स्थिती । तो आकळितां काष्ठीं बहुतीं । नावरे निश्चितीं अग्नि जैसा ॥९७॥ फुंकितां लखलखिला । जो फुंकास्तव प्रकटला । तो फुंक न साहतां ठेला । निर्वातींचा संचला दीप जैसा ॥९८॥ तेवीं कर्मास्तव उत्पत्ती । कर्मेंचि झाली परब्रह्मप्राप्ती । त्या कर्मामाजीं वर्तती । निष्कर्मस्थिती महायोगी ॥९९॥ तो व्यवहारी दिसो जनीं । कीं पिसेपणीं नाचो वनीं । अथवा तटस्थ राहो विजनीं । दशा अधिकउीणी बोलूं नये ॥७००॥ जें सिंहासनीं राजत्व जोडे । तें वनांत खेळतां न मोडे । कीं धांवतां व्याहाळीपुढें । राजपद चोखडें ढळूं नेणे ॥१॥ रावो रानीं वसिन्नला । त्या रानासी राजभोग आला । रावो राजत्वा मुकला । मूर्खही या बोला न बोलती ॥२॥ तेवीं पावोनि स्वरूपप्राप्ती । योगी प्रारब्धाच्या स्थिती । नाना कर्में करितां दिसती । परी निजात्मस्थिती भंगेना ॥३॥ यालागीं समाधि आणि व्युत्थान । या दोहीं अवस्थांचें लक्षण । अपक्वासीचि घडे जाण । परिपूर्णासी लक्षण तें कैंचें ॥४॥ स्वरूपावेगळें कांहीं एक । पूर्णासी उरलें नाहीं देख । समाधिव्युत्थानाचें मुख । त्यासंमुख येवों लाजे ॥५॥ अर्जुना देवोनि समाधि । सवेंचि घातला महायुद्धीं । परी कृष्ण कृपानिधी । तटस्थ त्रिशुद्धी न करीच ॥६॥ यालागीं समाधिव्युत्थानविधी । ताटस्थ्येंसहित निरवधी । गिळूनि झाली सैर समाधी । पूर्ण निजपदीं विलसतां ॥७॥ एवं प्रारब्ध जंव असे । तंव मुक्ताचें देह वर्ते ऐसें । परी अहंममतेचें पिसें । पूर्विल्याऐसें बाधीना ॥८॥ जेवीं स्वप्नदेहाच्या नाना अवस्था । जागृतीं आलिया तत्त्वतां । पुरुष नेघे आपुले माथां । तेवीं समाधिस्था देहकर्में ॥९॥ हेचि परमार्थता ब्रह्मस्थिती । नाना परींच्या उपपत्ती । म्यां सांगीतल्या तुम्हांप्रती । ज्ञानसंपत्ती निजगुह्य ॥७१०॥ तूं कोण हें पुसिलें होतें । सांगावया तें सनकादिकांतें । सांगतसें निजरूपातें । विश्वास त्यातें दृढ व्हावया ॥११॥
एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा
मयैतदुक्तं वो विप्रा गुह्यं यत् साङ्ख्ययोगयोः । जानीत माऽऽगतं यज्ञं युष्मद् धर्मविवक्षया ॥३८॥
अतिगुह्य ज्ञान परात्पर । जें उपनिषदांचें भांडार । म्यां सांगितलें साचार । योगसार योग्यांचें ॥१२॥ ज्या ज्ञानालागीं साधनकोटी । मुमुक्षु करिती हटतटीं । योगी रिघोनि गिरिकपाटीं । महामुद्रा नेहटीं साधिती ॥१३॥ वेदशास्त्रांचिया युक्ती । थोंटावल्या जिये अर्थीं । तें निजज्ञान म्यां तुम्हांप्रती । यथानिगुती सांगीतलें ॥१४॥ एवढिया ज्ञानाचा ज्ञानवक्ता । मी कोण हें न कळेल सर्वथा । तरी यज्ञाचा यज्ञभोक्ता । जाण तत्त्वतां मी विष्णू ॥१५॥ मज यावया हेंचि कारण । तुम्हीं ब्रह्मयाप्रती केला प्रश्न । तें उपदेशावया ब्रह्मज्ञान । स्वयें आपण येथें आलों ॥१६॥ ज्या उपदेशाच्या पोटीं । वर्णाश्रमपरिपाटी । न सांडितां होय माझी भेटी । तेही गोष्टी ध्वनिलीसे ॥१७॥ सांडावें ब्राह्मणपण । मग मांडावें संन्यासग्रहण । हे दोनी धर्म देहींचे जाण । उपदेशीं देहपण मुख्यत्वें मिथ्या ॥१८॥ उपदेशू करूनि प्रमाण । सनकादिकीं ब्राह्मणपण । अद्यापि सांडिलें नाहीं जाण । माझें गुह्य ज्ञान पावले ॥१९॥ तेणेंचि उपदेशें निश्चित । नारद ब्राह्मणपणें वर्तत । ब्रह्मानंदें डुल्लत । गात नाचत निजबोधें ॥७२०॥ ऐसें जें चैतन्यघन । आपुलें स्वरूप आपण । स्वयें करिताहे स्तवन । निजमहिमान द्योतावया ॥२१॥
एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा
अहं योगस्य साङ्ख्यस्य सत्यस्यर्तस्य तेजसः । परायणं द्विजश्रेष्ठाः श्रियः कीर्तेर्दमस्य च ॥३९॥ सांख्य जें परम ज्ञान । योग अष्टांगादिसाधन । सत्याचें सत्यपण । सत्यस्वरूप जाण मी एक ॥२२॥ पहां पां ज्या सत्याच्या ठायीं । संत सद्धर्में राहिले पाहीं । सूनृत जे वाचा तेही । मजवेगळी कांहीं हों नेणे ॥२३॥ तेजाची जे प्रगल्भता । ते माझेनि तेजें सतेजता । श्रियेची जे ऐश्वर्यता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२४॥ कीर्ति माझेनि कीर्तनें । सदा वंदिजे साधुजनें । मजवेगळें कीर्तीचें जिणें । कोणी पोसणें न घेती ॥२५॥ माझेनि तेजें निग्रहता । निग्रहो करी समस्तां । अदम्या दमू दमिता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२६॥ येथ ध्येय आणि ध्यान । कां साध्य आणि साधन । या अवघियां मी अधिष्ठान । मजवेगळें भान यां कैंचें ॥२७॥ तुम्ही ब्राह्मण अतिश्रेष्ठ । मजही पूज्यपणें वरिष्ठ । यालागीं निजज्ञान चोखट । तुम्हांसी म्यां प्रकट सांगीतलें ॥२८॥
एकनाथी भागवत - श्लोक ४० वा
मां भजन्ति गुणाः सर्वे निर्गुणं निरपेक्षकम् । सुहृदं प्रियमात्मानं साम्यासङ्गादयोऽगुणाः ॥४०॥
मी वस्तुतां निरपेक्ष निर्गुण । त्या माझ्या ठायीं भजोनि गुण । सहृद आत्मा प्रिय जाण । ऐसें लक्षण मज करिती ॥२९॥ समता आणि असंगता । याही गुणांच्या अवस्था । आणूनि ठेविती माझ्या माथां । गुणस्वभावतां लक्षणें ॥७३०॥ हो कां सबळ बळें अंधकार । कैं युद्धा आला सूर्यासमोर । तरी तमारी हा बडिवार । सूर्या आंधार जेवीं देत ॥३१॥ कोणें धरोनियां आकाश । घटीं घातलें सावकाश । तरी घटयोगें घटाकाश । मिथ्या गगनास नांव आलें ॥३२॥ नाहीं घटासी आतळला । गगनींचा गगनींच संचला । तो घटें घटचंद्रमा केला । मूर्खासी मानला सत्यत्वें ॥३३॥ तेवीं मी केवळ निर्गुण । त्या माझ्या ठायीं भजोनि गुण । सुहृद आत्मा इत्यादि जाण । असंगादि लक्षण मज देती ॥३४॥ गुणासी मी नातळें जरी । तरी मज म्हणती लीलाधारी । एवं गुणचि गुणांमाझारीं । मिथ्या मजवरी आळ हा ॥३५॥ तेथ मी घेता ना देता । कर्ता ना करविता । हे माझी निजस्वभावता । येर ते अवस्था गुणांची ॥३६॥ एवं पूर्वापर अतिविचित्र । सांगोनि ज्ञानविज्ञाननिर्धार । त्या इतिहासाचा उपसंहार । स्वयें सारंगधर करीतसे ॥३७॥
एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा
इति मे छिन्नसंदेहा मुनयः सनकादयः । सभाजयित्वा परया भक्त्यागृणत संस्तवैः ॥४१॥
आत्मज्ञानी परम दक्ष । मुमुक्षुंमाजीं अतिनेटक । संदेहापन्न सनकादिक । म्यां यापरी देख निःसंदेह केले ॥३८॥ सदा सावधानें निर्मळ । माझ्या भजनीं अतिप्रेमळ । सदा मद्रूपें मननशीळ । अव्याकुळ श्रवणार्थी ॥३९॥ उद्धवा तिंहीं ऐकतां माझी गोष्टी । माझ्या स्वरूपीं घातली मिठी । मद्रूप झाले उठाउठी । बाप जगजेठी ब्रह्मपुत्र ॥७४०॥ तिंहीं दृश्य द्रष्टा दर्शन । त्रिपटीचें केलें शून्य । परब्रह्मचि झाले पूर्ण । माझेनि जाण उपदेशें ॥४१॥ परम पावले समाधान । गद्यपद्यादि सुलक्षण । माझें करोनियां स्तवन । पूजाविधान मांडिलें ॥४२॥
एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा
तैरहं पूजितः सम्यक् संस्तुतः परमर्षिभिः । प्रत्येयाय स्वकं धाम पश्यतः परमेष्ठिनः ॥४२॥
इति श्रीमद्भावगवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कंधे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥ जरी पूज्यपूजकता गेली । तरी तिंहीं गुरूची पूजा केली । सांडूनि द्वैताची भुली । पूजा मांडिली अतिप्रीतीं ॥४३॥ शिष्य झालियाही ब्रह्मसंपन्न । त्याहीवरी त्यासी गुरु पूज्य जाण । सद्गु रु तोचि ब्रह्म पूर्ण । हे पावली खूण सनकादिकां ॥४४॥ ज्याच्या बोलासरिसेंचि पाहें । अवघें ब्रह्मचि होऊनि ठाये । त्या सद्गुोरूचे पूज्य पायें । सांगूं काये बोलवरी ॥४५॥ ज्यासी परब्रह्म आलें हाता । तोचि जाणे सद्गु रूची पूज्यता । इतरांसी हे न कळे कथा । अनुमानता बोलवरी ॥४६॥ ते सनकादिक समस्त । माझी पूजा करोनि यथोक्त । वारंवार स्तवन करीत । चरणा लागत पुनःपुनः ॥४७॥ माझ्या भजनीं एकमुख । माझिया निजभावें अतिभाविक । मज अवाप्तकामासी सुख । त्यांचे पूजनीं देख उथळलें ॥४८॥ मग करूनि प्रदक्षिणा । ते लागले माझिया चरणा । परम सुख झालें ब्राह्मणां । वचनार्थें जाणा माझेनी ॥४९॥ पहात असतां प्रजापती । सनकादिक उभे असती । त्यांदेखतां निजधामाप्रती । शीघ्रगती मी आलों ॥७५०॥ माझे शिष्य सनकादिक । उद्धवा या रीतीं झाले देख । तो इतिहास अलोलिक । तुज म्यां सम्यक सांगीतला ॥५१॥ ते योगियांमाजीं अतिउद्भ ट । भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ । ज्ञानियांमाजीं अतिवरिष्ठ । शिष्य चोखट सनकादिक ॥५२॥ हंसगीतनिरूपण । पुरातन जें ब्रह्मज्ञान । तें उद्धवासी श्रीकृष्ण । प्रसन्न होऊन दीधलें ॥५३॥ भागवतपंथें चालतां । हे पुरातन ब्रह्मकथा । एका एकादशू पाहतां । स्वभावें हाता पैं आली ॥५४॥ जीं हंसमुखींचीं चिद्रत्नेंे । जीं सनकादिकां झालीं भूषणें । उद्धवा अळंकारिला श्रीकृष्णें । तें शेष जनार्दनें मज दीधलें ॥५५॥ सनकादिक-उद्धवाचें शेष । हाता आलें हा बोल वोस । ते गोष्टीसी जाहले बहु दिवस । म्हणाल वायस हा जल्पू ॥५६॥ कृतयुगीं शंखासुरासी । देवें मर्दिलें होतें त्यासी । ते ठायीं अद्यापि सभाग्यासी । अव्हाशंखासी पावती ॥५७॥ रामें पूर्वीं अयोध्येसी । केलें होतें महायागासी । तेथें हविःशेष लोकांसी । अद्याप हातासी येतसे ॥५८॥ तैसेंचि येथें भागवतीं । जनार्दनकृपापद्धतीं । सनकादिकांची शेषप्राप्ती । एकादशार्थीं आम्हां झाली ॥५९॥ मागेंपुढें अवघें एक । हा एकादशाचा विवेक । तेणें सनकादिक -उद्धवशेख । आम्हांम्ही देख प्राप्त झालें ॥७६०॥ करूं नेदितां गयावर्जनीं । न रिघवे समर्थजनीं । ते पदीं माशीलालागुनी । निवारण कोणी करीना ॥६१॥ तेवीं नाना शास्त्रार्थयुक्तींसी । शिणतां समर्थ साधकांसी । प्राप्ती नव्हे ज्ञानशेषासी । ते झाली आम्हांसी एकादशें ॥६२॥ हंसकृष्ण जनार्दन । स्वरूप एक नामें भिन्न । तेणें घालूनि बोधांजन । जुना ठेवा जाण दाखविला ॥६३॥ तेथ मी एका एकू देखता । आणि तो एकू मातें दाखविता । हेही नुरेचि बोध्यबोधकता । पाहता पाहविता तोचि तो ॥६४॥ आरसा आलिया मुख दिसे । तो गेलिया तें न दिसे । परी येणें जाणें मुखासी नसे । ते सहजेंचि असे संचलें ॥६५॥ आरिशाचें मुख आरिसें नेलें । परी पाहातया नाहीं ऐसें झालें । जें कटकटा माझें मुख गेलें । तें असे संचलें तो जाणे ॥६६॥ तेवीं अज्ञानें न्यावें । कां ज्ञान झालिया यावें । तैसें वस्तूसी न संभवे । तें असे स्वभावें संचलें ॥६७॥ तैसें देखतें आणि दाखवितें । दोनी जाऊनियां तेथें । माझें मीपण जें जुनें होतें । तें दाविलें मातें जनार्दनें ॥६८॥ जेवीं सूर्याचेनि प्रकाशें । सूर्येंचि कीं सूर्यो दिसे । तेवीं माझेनि निजप्रकाशें । मज मीचि असें देखत ॥६९॥ ऐशियाही ठायीं जाण । कैंचें नवें जुनें ज्ञान । बहु काळ ठेविलें सुवर्ण । त्यासी म्हणे कोण कुहजकू ॥७७०॥ कालचाचि आजि उगवला । तो सूर्य काय म्हणावा शिळा । कीं आजिचा अग्नि सोंवळा । कालचा काय वोंवळा म्हणों ये ॥७१॥ तेवीं सनकादिकांचें जें ज्ञान । तेंचि मराठीभाषेमाजीं जाण । येथें ठेवूं जातां दूषण । दोषी आपण होइजे ॥७२॥ कां सुवर्णाचें केलें सुणें । परी तें मोलें नव्हेचि उणें । तेवीं सनकादिकांचीं ज्ञानें । देशभाषा हीनें नव्हतीच ॥७३॥ जेवीं कां गुळाचें कारलें केलें । परी तें कडूपणा नाहीं आलें । तेवीं हंसगीत मराठें झालें । नाहीं पालटलें चिन्मात्र ॥७४॥ जें मोल मुकुटींच्या हेमासी । तेंचि मोल सुवर्णश्वानासी । जो कां ग्राहिक सुवर्णासी । तो घे दोघांसी समत्वें ॥७५॥ तैसें आत्मानुभवी जे येथें । ते मानितील या ग्रंथातें । येर ते हेळसितील यातें । निजभावार्थें न घेती ॥७६॥ जे वंदिती कां निंदिती । ते दोघे आम्हां ब्रह्ममूर्ती । हे निजात्मभावाची प्रतीती । केली निश्चितीं जनार्दनें ॥७७॥ एका जनार्दना शरण । रिघतां विरालें एकपण । जेवीं कां समरसोनि लवण । स्वयें जाण समुद्र झालें ॥७८॥ तेथे एका आणि जनार्दन । एक झाले हें म्हणे कोण । जेवीं डोळ्यांचें देखणेपण । डोळाचि आपण स्वयें जाणे ॥७९॥ डोळ्यांनी आरिसा प्रकाशिजे । तेथें डोळेनि डोळा पाहिजे । तेवीं हें ज्ञान जाणिजे । देखणें देखिजे देखणेनी ॥७८०॥ सांडोनियां एकपण । एका जनार्दना शरण । हेंचि हंसगीतनिरूपण । झालें परिपूर्ण पूर्णत्वें ॥७८१॥
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां श्रीकृष्णोद्धवसंवादे हंसगीतनिरूपणं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ मूळ श्लोक ॥४२॥ ओंव्या ॥७८१॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
[[]]