गणपतीची आरती/स्थापित प्रथमारंभी तुज

<poem> स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती। विघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती। ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती। सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती॥१॥

जय देव जय देव जय गणराजा। आरती ओवाळू तुजला महाराजा॥धृ.॥

एकदंता स्वामी हे वक्रतुंडा। सर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा। लप लप लप लप लप लप हालति गज शुंडा। गप गप मोद्क भक्षिसी घेऊनि करि उंडा॥ जय देव जय देव जय गणराजा॥२॥

शेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुजा। कर्णी कुंडल झळ्के दिनमनी उदय तुझा। परशांकुश करि तळपे मूषक वाहन दुजा। नाभिकमलावरती खेळत फ़णिराजा॥ जय देव जय देव जय गणराजा॥३॥

भाळी केशरिगंधावर कस्तुरी टीळा। हीरेजडित कंठी मुक्ताफ़ळ माळा॥ माणिकदास शरण तुज पार्वतिबाळा। प्रेमे आरती ओवाळिन वेळोवेळा॥ जय देव जय देव जय गणराजा॥४॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg