तुकाराम गाथा/गाथा ३९०१ ते ४२००

      आपुलिया हिता जो असे जागता अभंग

3901
 काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥1॥
 सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥
 रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥2॥
 तुका ह्मणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥3॥

3902
 कीर्त्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥1॥
 भH जाय सदा हरि कीतिऩ गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥
 त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥2॥
 नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये । मागाअ चालताहे संगें हरि ॥3॥
 तुका ह्मणे त्याला गोडी कीर्त्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥4॥

3903
 बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥1॥
 आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥
 नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥2॥
 तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥3॥

3904
 हरिचिया भHा नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥1॥
 न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥
 असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥2॥
 तुका ह्मणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥3॥

3905
 दसरा दिवाळी तो चि आह्मां सन । सखे संतजन भेटतील ॥1॥
 आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥
 धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥2॥
 तुका ह्मणे काय होऊं उतराइऩ । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥3॥

3906
 खिस्तीचा उदीम ब्राह्मण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥1॥
 वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥
 मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥2॥
 आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥3॥
 तुका ह्मणे देह जालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥4॥

3907
 जगीं ब्रह्मक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥1॥
 आंतेजा खिचडी घेताती मागून । गािळप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥
 उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥2॥
 तुका ह्मणे ऐसी कलयुगाची चाली । स्वाथॉ बुडविलीं आचरणें ॥3॥

3908
 हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥1॥
 हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥
 डोिळयांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥2॥
 बहु चित्त ओढे तयाचिये सोइऩ । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥3॥
 बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥4॥
 तुका ह्मणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥5॥

3909
 जेणें माझें हित होइल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥1॥
 मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥
 तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥2॥
 तुका ह्मणे मी तों राहिलों नििंश्चत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥3॥

3910
 शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥1॥
 त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥
 बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥2॥
 शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥3॥
 तुका ह्मणे तरि वत्तूऩिन निराळा । उमटती कळा ब्रह्मींचिया ॥4॥

3911
 पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥1॥
 भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥2॥
 तुका ह्मणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥3॥

3912
 सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥1॥
 अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥2॥
 तुका ह्मणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥3॥

3913
 चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥1॥
 देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥
 मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता ह्मणों नये ॥2॥
 वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥3॥
 तुका ह्मणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥4॥

3914
 मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में॥1॥
 काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥
 नाना छंद अंगीं बैसती विकार । छिळयेले फार तपोनिधि ॥2॥
 तुका ह्मणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥3॥

3915
 जेजे कांहीं मज होइऩल वासना । तेते नारायणा व्हावें तुह्मीं ॥1॥
 काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥ध्रु.॥
 तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥2॥
 अवघें पिशुन जालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥3॥
 तुका ह्मणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥4॥

3916
 कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दYाानें देवा नाश केला ॥1॥
 आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥
 संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं ह्मणती एक ॥2॥
 बुडविली भिH म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥3॥
 न करावी कथा ह्मणती एकादशी। भजनाची नासी मांडियेली ॥4॥
 न जावें देउळा ह्मणती देवघरीं । बुडविलें या परी तुका ह्मणे ॥5॥

3917
 नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥1॥
 संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥
 न करिसी तरि हेंचि कोडें मज । भिH गोड काज आणीक नाहीं ॥2॥
 करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥3॥
 महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥4॥
 तुका ह्मणे नाहीं मुिHसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥5॥

3918
 होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥1॥
 निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥2॥
 तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनादऩन भेटे केवीं ॥3॥

3919
 लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥1॥
 सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥2॥
 तुका ह्मणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥3॥

3920
 कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥1॥
 घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥2॥
 पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥3॥

3921
 कौडीकौडीसाटीं फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥1॥
 पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥2॥
 तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥3॥

3922
 दाढी डोइऩ मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥1॥
 उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥2॥
 चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका ह्मणे त्यास यम दंडी ॥3॥

3923
 होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥1॥
 शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥2॥
 तुका ह्मणे त्यासी नाहीं शिवभिH । व्यापार करिती संसाराचा ॥3॥

3924
 लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥1॥
 नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥2॥
 तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥3॥

3925
 ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाटीं घेती प्रतिग्रह ॥1॥
 परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥2॥
 जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका ह्मणे ॥3॥

3926
 िस्त्रया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥1॥
 यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥2॥
 ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका ह्मणे ॥3॥

3927
 न लगती मज शब्दब्रह्मYाान । तुझिया दर्शनावांचूनियां॥1॥
 ह्मणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥
 काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥2॥
 तुका ह्मणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥3॥

3928
 तुझा ह्मणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥1॥
 अYाान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥
 तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥2॥
 तुका ह्मणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥3॥

3929
 जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥1॥
 सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाइऩच्या वरा पावें वेगीं ॥2॥
 तुका ह्मणे तूं गा पतितपावन । घेइप माझा सीण जन्मांतर ॥3॥

3930
 आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाइऩचा पति पावे चि ना ॥1॥
 कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥2॥
 तुका ह्मणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥3॥

3931
 पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाइऩ जननी भेटे केव्हां ॥1॥
 न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अिग्नचिया ॥2॥
 तुका ह्मणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥3॥

3932
 तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥1॥
 अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥2॥
 तुका ह्मणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥3॥

3933
 आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥1॥
 देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
 देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥2॥
 निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें ह्मणोनि व्यर्थ गेला ॥3॥
 तुका ह्मणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥4॥

3934
 माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥1॥
 तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥
 पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥2॥
 तुका ह्मणे अमृतसििद्ध । हरे क्षुधा आणि व्याधि ॥3॥

3935
 तुझें अंगभूत । आह्मी जाणतों समस्त ॥1॥
 येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥
 ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥2॥
 तुका ह्मणे भेदा । करुनि करितों संवादा॥3॥

3936
 तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥1॥
 ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥
 बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥2॥
 दंड लाहें केला । तुका ह्मणे जी विठ्ठला ॥3॥

3937
 माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥1॥
 धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥
 करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥2॥
 तुका ह्मणे माते । पांडुरंगे कृपावंते॥3॥

3938
 जरि न भरे पोट । तरि सेवूं दरकूट ॥1॥
 परि न घलूं तुज भार । हा चि आमुचा निर्धार ॥ध्रु.॥
 तुझें नाम अमोलिक। नेणती हे ब्रह्मादिक ॥2॥
 ऐसें नाम तुझें खरें । तुका ह्मणे भासे पुरें॥3॥

3939
 सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥1॥
 नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥
 द्यावें तें चिं घ्यावें । ह्मणउनि घ्यावें जीवें ॥2॥
 तुका ह्मणे उरी । मागें उगवितां बरी ॥3॥

3940
 गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें॥1॥
 त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ध्रु.॥
 श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥2॥
 तुका ह्मणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥3॥

3941
 सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें॥1॥
 स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥
 सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं Yाानपणाची मस्ती ॥2॥
 तुका ह्मणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥3॥

3942
 आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान॥1॥
 दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥2॥
 तुका ह्मणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥3॥

3943
 अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुिद्ध ॥1॥
 काय ह्मणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥
 जो स्मरे रामराम । तयासी ह्मणावें रिकामें ॥2॥
 जो तीर्थव्रत करी । तयासी ह्मणावें भिकारी ॥3॥
 तुका ह्मणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं॥4॥

3944
 या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥1॥
 गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥
 सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥2॥
 प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥3॥
 पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी॥4॥
 तुका ह्मणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥4॥

3945
 उपजलों मनीं । हे तों स्वामीची करणी ॥1॥
 होइल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥
 येइल अभय जरि । तरि हे आYाा वंदिन शिरीं ॥2॥
 भिHप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना॥3॥
 यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥4॥
 तुका ह्मणे आळीकरा । त्यासी योजावें उत्तरा ॥5॥

3946
 माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून॥1॥
 कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥
 मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥2॥
 तुका ह्मणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥3॥

3947
 भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा॥1॥
 सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥
 काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥2॥
 तुका ह्मणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥3॥

3948
 जातीचा ब्राह्मण । न करितां संध्यास्नान ॥1॥
 तो एक नांनवाचा ब्राह्मण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥
 सांडुनियां शािळग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥2॥
 नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥3॥
 तुका ह्मणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥4॥

3949
 जालों जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥1॥
 करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥
 जोंजों धरिली भीड । तोंतों बहु केली चीड ॥2॥
 तुका ह्मणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥3॥

3950
 आह्मां हें चि काम । वाचे गाऊं तुझें नाम ॥1॥
 आयुष्य मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥
 अमृताची खाणी । याचे ठायीं वेचूं वाणी ॥2॥
 तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जिवाच्या जिवलगा ॥3॥

3951
 मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥1॥
 तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥
 कैसें तुज लाजवावें । भH ह्मणोनियां भावें ॥2॥
 नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥3॥
 अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥4॥
 तुका ह्मणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं॥5॥

3952
 जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥1॥
 आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥
 कासया सांडूं मांडूं। भाव हृदयीं च कोंडूं ॥2॥
 तुका ह्मणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा॥3॥

3953
 जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥1॥
 तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥
 गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरडएावरि लोळे ॥2॥
 प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥3॥
 तुका ह्मणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥4॥

3954
 तरलों ह्मणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥1॥
 वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥
 ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥2॥
 तुका ह्मणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥3॥

3955
 कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥1॥
 तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥
 वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥2॥
 ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥3॥
 मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥4॥

3956
 सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥1॥
 धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥
 विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥2॥
 तुका ह्मणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ॥3॥

3957
 भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे॥1॥
 अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥
 नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥2॥
 रििद्ध सििद्ध ज्या कामारी। तुका ह्मणे ज्याचे घरीं ॥3॥

3958
 ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥1॥
 येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥
 गोडी िप्रयापाशीं । सुख उपजे येरासी ॥2॥
 तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल॥3॥

3959
 बाळ माते निष्ठ‍ होये । परि तें स्नेह करीत आहे॥1॥
 तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आह्मां ॥ध्रु.॥
 नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥2॥
 भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥3॥
 त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे॥4॥
 नांवें घाली उडी । तुका ह्मणे प्राण काढी ॥5॥

3960
 हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥1॥
 बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥
 मुरगािळला कान । समांडिलें समाधान ॥2॥
 धन्य ह्मणे आतां । येथें नुधवा माथां॥3॥
 अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥4॥

3961
 किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥1॥
 एका घाइप न करीं तुटी । न निघें दवासोइऩ भेटी ॥ध्रु.॥
 सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥2॥
 सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ॥3॥

3962
 कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥1॥
 बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥
 परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥2॥
 तुका ह्मणे विसावलों । येथें आलों धणीवरि ॥3॥

3963
 साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥1॥
 मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥
 दासा नव्हे कर्म दान। तन मन निश्चळ ॥2॥
 तुका ह्मणे आत्मनिष्ट । भागे चेष्ट मनाची॥3॥

3964
 घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥1॥
 आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥
 सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥2॥
 तुका ह्मणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥3॥

3965
 आह्मां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥1॥
 तुह्मांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥
 दासांचें तें देखों नये । उणें काय होइल तें ॥2॥
 तुका ह्मणे विश्वंभरा । दृिष्ट करा सामोरी ॥3॥

3966
 अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तों वीट मानी॥1॥
 नावडेसा जाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥
 नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥2॥
 तुका ह्मणे अभHासी । माता दासी जग झोडी ॥3॥

3967
 आह्मी हरिचे हरिचे । सुर किळकाळा यमाचे ॥1॥
 नामघोष बाण साचे । भाले तुळसी मंजुरेचे ॥ध्रु.॥
 आह्मी हरिचे हरिचे दास । कलिकाळावरि घालूं कास ॥2॥
 आह्मी हरिचे हरिचे दूत । पुढें पळती यमदूत ॥3॥
 तुका ह्मणे आह्मांवरी । सुदर्शन घरटी करी ॥4॥

3968
 देवाचिये पायीं वेचों सर्व शHी । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥1॥
 न घेइप माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥
 मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥2॥
 तुका ह्मणे घेइप विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥3॥

3969
 पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥1॥
 नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥
 विष्णुदासां गति नाहीं तरावया । ह्मणती गेले वांयां कष्टत ही ॥2॥
 धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते कािळचा ॥3॥
 तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥4॥

3970
 वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥1॥
 चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥
 लुटालुटा पंढरपूर। धरा रखुमाइऩचा वर ॥2॥
 तुका ह्मणे चला । घाव निशानी घातला॥3॥

3971
 पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥1॥
 प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥
 सुदामा ब्राह्मण दरिद्रें पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥2॥
 तुका ह्मणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥3॥

3972
 निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥1॥
 तैसा आह्मासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥
 मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥2॥
 दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥3॥
 पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥4॥

3973
 श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥1॥
 भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥2॥
 तुका ह्मणे आह्मां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥3॥

3974
 सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥1॥
 सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥
 आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काइऩ ॥2॥
 तुका ह्मणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥3॥

3975
 जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥1॥
 वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय कवणा ॥ध्रु.॥
 हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥2॥
 तुका ह्मणे तुझ्या चरणांची पाखर । असतां किळकाळ पायां तळीं ॥3॥

3976
 क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥1॥
 तृण नाहीं तेथें पडे दावािग्न । जाय तो विझोनि आपसया ॥2॥
 तुका ह्मणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥3॥

3977
 याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥1॥
 ब्रह्महत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥2॥
 तुका ह्मणे नव्हे चोरीचा व्यापार । ह्मणा रघुवीर वेळोवेळां ॥3॥

3978
 पानें जो खाइऩल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥1॥
 तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥
 कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥2॥
 जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥3॥
 जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका ह्मणे ॥4॥

3979
 कामांमध्यें काम । कांहीं ह्मणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होइऩल दुःखाचें ॥1॥
 कळों येइऩल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥
 जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥2॥
 केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका ह्मणे कर्म । जाळोनियां तरसी ॥3॥

3980
 तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥1॥
 दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥
 देव भH ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥2॥
 तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥3॥

3981
 कोठें गुंतलासी योगीयांचे ध्यानीं । आनंदकीर्तनीं पंढरीच्या ॥1॥
 काय काज कोठें पडलीसे गुंती । कानीं न पडती बोल माझे ॥ध्रु.॥
 काय शेषनशयनीं सुखनिद्रा आली । सोय कां सांडिली तुह्मी देवा ॥2॥
 तुका ह्मणे कोठें गुंतलेती सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥3॥

3982
 माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥1॥
 अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥
 मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥2॥
 ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥3॥
 माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥4॥
 तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥5॥
 तुका ह्मणे नारायणा। तुह्मां बहुत करुणा ॥6॥

3983
 कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥1॥
 तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाटीं व्याली ॥ध्रु.॥
 वत्साचिये आसे। धेनु धांवेना गोरसें ॥2॥
 तुका ह्मणे धरि । बाळ टाकिलें वानरीं ॥3॥

3984
 भHांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥1॥
 जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥2॥
 तुका ह्मणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥3॥

3985
 तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥1॥
 सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥
 उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥2॥
 तुका ह्मणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥3॥

3986
 अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सवाौत्तमु ॥1॥
 जैसा तैसा लागे करणें अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥
 अवघें चि मज गििळयेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥2॥
 तुका ह्मणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥3॥

3987
 मूतिऩमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप॥1॥
 जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥2॥
 तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥3॥

3988
 धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥1॥
 लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या॥ध्रु.॥
 नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥2॥
 भाविक हो येथें धरा रे आवांका । ह्मणे दास तुका शुद्धयाति ॥3॥

3989
 अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहें समागमें अंगसंगें ॥1॥
 अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥2॥
 फळपाकीं देव देतील प्राणीयें । तुका ह्मणे नये सवें कांहीं ॥3॥

3990
 संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥1॥
 अवघीं च इंिद्रयें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥
 शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥2॥
 तुका ह्मणे सार हरिनामउच्चार । ये†हवी येरझार हरीविण ॥3॥

3991
 सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे॥1॥
 आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥
 जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आह्मांसी सहज द्यावें आतां ॥2॥
 तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥3॥

3992
 भHांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥1॥
 नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा॥ध्रु.॥
 सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें॥2॥
 सर्वस्वें त्याचा ह्मणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥3॥
 तुका ह्मणे भिHसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं॥4॥

3993
 राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥1॥
 लIमीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥2॥
 तुझे नामीं प्रेम देइऩ अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं॥3॥
 तुका ह्मणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥4॥

3994
 हरी तुझें नाम गाइऩन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥1॥
 अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देइप हें चि ॥2॥
 तुका ह्मणे आतां देइप संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना॥3॥

3995
 गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥1॥
 संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥
 साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपायामाजी गुंती ॥2॥
 निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥3॥
 तुका ह्मणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥4॥

3996
 भाव धरिला चरणीं ह्मणवितों दास । अहिनिऩशीं ध्यास करीतसें ॥1॥
 करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥2॥
 धरिले निश्चळ न सोडीं ते पाय । तुका ह्मणे सोय करीं माझी ॥3॥

3997
 तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥1॥
 येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥2॥
 माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥3॥
 अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥4॥
 तुका ह्मणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥5॥

3998
 आतां तुज मज नाहीं दुजेपण । दाखवीं चरण पांडुरंगा ॥1॥
 तुज रूप रेखा नाम गुण नाहीं । एक स्थान पाहीं गांव सिंव ॥ध्रु.॥
 नावडे संगाति तुजा दुजयाची । आपुल्या भHांची प्रीति तुह्मां ॥2॥
 परि आह्मांसाटीं होसील सगुण । स्तंभासी फोडून जयापरि ॥3॥
 तुका ह्मणें तैसें तुज काय उणें । देइप दरुषण चरणांचें ॥4॥

3999
 करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां॥1॥
 जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥
 शरणागतां देव राखे। येरां वाखे विघ्नाचे ॥2॥
 तुका ह्मणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥3॥

4000
 आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी॥1॥
 सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥
 अनाथाचा नाथ देव। अनुभव सत्य हा ॥2॥
 तुका ह्मणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ॥3॥

4001
 मुखें सांगे भ्रमकथान । जन लोकाची कापितो मान॥1॥
 असत्य सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥
 कथा करितो ज्ञानाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥2॥
 तुका ह्मणे तो चि वेडा। त्याचें बहू उद्देश हाणावा ॥3॥

4002
 कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥1॥
 सेटएा ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥ध्रु.॥
 पाप न लगे धुंडावें॥ पाहिजे तरि तेथें जावें ॥2॥
 जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥3॥
 गाइऩ ह्मसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥4॥
 तुका ह्मणे पाहीं । तेथें पुण्या रीघ नाहीं ॥5॥

4003
 तुझी माझी आहे जुनी सोयरीक । आधीं बंधु लेंक मग जाले ॥1॥
 वांटेकरी ह्मणून पुसती आतां । परि आहे सत्ता करीन ते ॥ध्रु.॥
 लेंकीचें लेंकरूं नातु जाल्यावरी । मंगळा ही दुरि अंतरलों ॥2॥
 बाइलेचा भाऊ पिसुना सोयरा । ह्मणउनि करा विनोद हा ॥3॥
 आकुळीं तों करूं नये तें चि केलें । न बोलावें भलें तों चि आतां ॥4॥
 न ह्मणसी लेंकी माउसी बहिणी । आह्मां केलें धणी पापाचें त्या ॥5॥
 बहु पांचांजणी केली विटंबना । नये दाऊं जना तोंड ऐसें ॥6॥
 तुका ह्मणे आधीं मूळ तें चि धरूं । मागील तें करूं उरी आतां ॥7॥

4004
 मागें बहुत जाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥1॥
 हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥
 भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥2॥
 तुका ह्मणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥3॥

4005
 आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥1॥
 सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥
 करावीं व्यसनें। दुरी येउनि नारायणें ॥2॥
 जवळील दुरी । जालों देवा धरीं करीं॥3॥
 ह्मणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥4॥
 तुका ह्मणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥5॥

4006
 झंवविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥1॥
 करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥
 बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥2॥
 तुका ह्मणे ठावें । ऐसें जालें अनुभवें॥3॥

4007
 पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंता वरी बोल ॥1॥
 भेइऩना करितां पापाचे डोंगर । दुर्जन पामर दुराचारी॥ध्रु.॥
 नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥2॥
 तुका ह्मणे त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥3॥

4008
 आधीं देह पाहता वाव । कैचा प्रारब्धासी ठाव॥1॥
 कां रे रडतोसी माना । लागें विठ्ठलचरणा ॥ध्रु.॥
 दुजेपण जालें वाव। त्रिभुवनासि नाहीं ठाव ॥2॥
 तुका ह्मणे खरे पाहें । विठ्ठल पाहोनियां राहें ॥3॥

4009
 िस्त्रया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥1॥
 ह्मणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥ध्रु.॥
 सर्वदुःखासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥2॥
 आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥3॥
 देह लोभें नाडला । घाला यमाचा पडला॥4॥
 तुका ह्मणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥5॥

4010
 जेंजें होआवें संकल्पें । तें चि पुण्य होय पाप ॥1॥
 कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥
 सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥2॥
 तुका ह्मणे सार । नांव जीवनाचे सागर ॥3॥

4011
 ओले मातीचा भरवसा । कां रे धरिशी मानसा ॥1॥
 डोळे चिरीव चांगले । वृद्धपणीं सरवया जाले ॥ध्रु.॥
 नाक सरळ चांगलें । येउन हनवटी लागलें ॥2॥
 तुका ह्मणे आलें नाहीं । तंव हरिला भज रे कांहीं ॥3॥

4012
 तुह्मां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ॥1॥
 आह्मां ह्मणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥
 िस्त्रया पूजुनि सरे देती । भलते िस्त्रयेसि भलते जाती ॥2॥
 श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस। अंगीकारी मद्यमांस ॥3॥
 चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंHी ॥4॥
 ह्मणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥5॥
 ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥6॥
 तुका सद्गुरुदास्य करी । सििद्ध पाणी वाहे घरीं ॥7॥

4013
 त्या हरिदासांची भेटी घेतां । नकाऩ उभयतासी जातां॥1॥
 माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥
 देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥2॥
 तुका ह्मणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥3॥

4014
 देव गावा ध्यावा ऐसें जालें । परदेशी नाहीं उगलें ।
 वडील आणि धाकुलें । नाहीं ऐसें जालें दुसरें तें ॥1॥
 नाहीं लागत मुळीहूनि । सुहृदजन आणि जननी ।
 लागल्या लागें त्यागें सांडूनि। लोभीये मांडणी संयोगाची ॥ध्रु.॥
 शिव बाटला जीवदशे । बहुत ओतत आलें ठसें ।
 हीन जालें भूषणाचें इच्छे । निवडती कैसे गुणागुण ॥2॥
 आतां हे हुतांश तों बरें । अवघे एक च मोहरें ।
 पिटिलियाविण नव्हे खरें । निवडें बरें जातिशुद्ध ॥3॥
 तुका उतावेळ याजसाटीं । आहे तें निवेदीन पोटीं ।
 आवडी द्यावी जी येथें लाटी । तुझी जगजेठी कीर्ती वाखाणीन ॥4॥

4015
 भोगी जाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंिद्रयांचा लाग । आह्मांवरूनि चुकला ॥1॥
 करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥
 तळीं पिक्षणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं घाली बाळका ॥2॥
 तुका ह्मणे ये आवडी । आह्मीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥3॥

4016
 कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥1॥
 दिवस गमा भरा पोट । कां गे नेटनेटावा ॥ध्रु.॥
 दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥2॥
 तुका ह्मणे झोंडगीं हो । काुंफ्दा कां हो कोरडी ॥3॥

4017
 तुझें प्रेम माझ्या हृदयीं आवडी । चरण न सोडीं पांडुरंगा ॥1॥
 कासया सिनासि थोरिवां कारणें । काय तुझें उणें होइल देवा ॥ध्रु.॥
 चातकाची चिंता हरली जळधरें । काय त्याचें सरे थोरपण ॥2॥
 चंद्र चकोरांचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥3॥
 तुका ह्मणे मज अनाथा सांभाळीं । हृदयकमळीं िस्थर राहें ॥4॥

4018
 आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥1॥
 ठेवा जोडला मिरासी । ठाव जाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥
 बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥2॥
 तुका ह्मणे जालों बळी । आह्मी निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी आमचें ॥3॥

4019
 न लगावी दिठी । माझी तुझे मुखवटी ॥1॥
 आधीं पाउलें पाउलें । ते मी पाहेन तें भलें ॥ध्रु.॥
 देइऩन हे काया । वरि सांडणें सांडाया ॥2॥
 तुका ह्मणे देवा । बहु आवडसी जीवा ॥3॥

4020
 कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥1॥
 गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥
 आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥2॥
 तुका ह्मणे इंिद्रयांसी । ये चि रसीं रंगवूं ॥3॥

4021
 नाम तारक भवसिंधु । विठ्ठल तारक भवसिंधु ॥1॥
 नामधारक तया अरि मित्रु । समता त्यागुनियां क्रोधु ॥ध्रु.॥
 नामधारक तया । कदापि न घडे विषयाचा बाधु ॥2॥
 ज्या नामें तरले शुकादिक । नारद संत मुनिजन साधु ॥3॥
 जाणूनियां जे नसरें । ते नेणति जैसा गज अंधु ॥4॥
 सहज तुकया । नाम चि जपतां स्वरुपीं वेधु ॥5॥

4022
 आह्मां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥1॥
 तरी च हरिचेदास ह्मणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥
 गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भुिH मुिH दोन्ही न मगों तुज ॥2॥
 तुका ह्मणे देवा ऐसी यांची सेवा। द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥3॥

4023
 पावलों हा देह कागतालिन्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥1॥
 आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां॥ध्रु.॥
 अंधऑयाचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥2॥
 तुका ह्मणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥3॥

4024
 कळे परि न सुटे गांठी । जालें पोटीं कुपथ्य ॥1॥
 अहंकाराचें आंदणें जीव । राहे कींव केली ते ॥ध्रु.॥
 हेंकडाची एकी च वोढी । ते ही खोडी सांगती ॥2॥
 तुका ह्मणे सांगों किती । कांहीं चित्तीं न राहे ॥3॥

4025
 सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥1॥
 ऐसे तंव तुह्मी नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेत ॥ध्रु.॥
 फांटा जाला त्यासी नाहीं वोढा वारा । वेरसा चि खरा हाटो गुण ॥2॥
 तुका ह्मणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां अंगीं ॥3॥

4026
 आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥1॥
 आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहीं । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ध्रु.॥
 लाचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥2॥
 तुका ह्मणे आह्मी केली जे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥3॥

4027
 तिळ एक अर्ध राइऩ । सीतबुंद पावे काइऩ । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥1॥
 ह्मणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । सावचित्त तों ॥ध्रु.॥
 तीथॉ न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे कासी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥3॥
 येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका ह्मणे तो येथें ॥3॥

4028. विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥1॥
 विठ्ठलविठ्ठल भावें ह्मणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥
 बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥2॥
 तुका ह्मणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥3॥

4029
 भोळे भिHभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ॥1॥
 भाव नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया मी खेदा काय सांगों ॥ध्रु.॥
 गणिकेसारिकीं नामें उद्धरीलीं । सYाानें पडिलीं खटाटोपीं ॥2॥
 तुका ह्मणे काय शुद्ध माझी जाति । थोर केली ख्याती हरिनामें ॥3॥

4030
 आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥1॥
 दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥
 एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥2॥
 तुका ह्मणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड॥3॥

4031
 पंढरीचें बा भूत मोटें । आल्या गेल्या झडपी वाटे॥1॥
 तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥2॥
 तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥3॥

4032
 बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥1॥
 सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥
 उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥2॥
 सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥3॥
 तुका जाला वाणी । चुकवुनि चौ†यासीच्या खाणी ॥4॥

4033
 काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना ।
 प्राथिऩतां ही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥1॥
 आतां धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी ।
 न दिसे कोणी आवरी। आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥
 न राहे एके ठायीं एकी घडी। चित्त तडतडा तोडी ।
 घालूं पाहे बा हे उडी या भवडोहीं ॥2॥
 आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं ।
 तुका ह्मणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी॥3॥

4034
 पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा॥1॥
 सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥
 ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥2॥
 पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥3॥
 चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण॥4॥
 तुका ह्मणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥5॥

4035
 पापांचीं संचितें देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥1॥
 पेरी कडू जिरें मागे अमृतफळ । आकाऩ वृक्षफळें कैसीं येती ॥ध्रु.॥
 सुख अथवा दुःख भोग हो देहेचा । नास हा Yाानाचा न करावा ॥2॥
 तुका ह्मणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥3॥

4036
 लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥1॥
 ऐसी भHाची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥
 माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥2॥
 तुका ह्मणे नाड । नाहीं शरणागता आड ॥3॥

4037
 आपुलेंसें करुनी घ्यावें । आश्वासावें नाभींसें ॥1॥
 ह्णउनि धरिले पाय । आवो माय विठ्ठले ॥ध्रु.॥
 कळलासे सीन चिंता । शम आतां करावा ॥2॥
 तुका ह्मणे जीवीं वसें । मज नसें वेगळे ॥3॥

4038
 तुजविणं कांहीं । िस्थर राहे ऐसें नाहीं ॥1॥
 कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥
 मोकलिली आस। सर्वभावें जालों दास ॥2॥
 तुका ह्मणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥3॥

4039
 खोंकरी आधन होय पाकसििद्ध । हें तों घडों कधीं शके चि ना ॥1॥
 खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥2॥
 पालथे घागरी रिचवितां जळ । तुका ह्मणे खळ तैसे कथे ॥3॥

4040
 नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥1॥
 अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण॥ध्रु.॥
 आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥2॥
 एकासी आड पडोनि होंकरी । एकासी देखोनि लपवी भाकरी ॥3॥
 एकासी धड न बोले वाचा । एकासी ह्मणे मी तुझे बांदीचा ॥4॥
 तुका ह्मणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु॥5॥

4041
 पिंडपोशकाच्या जळो Yाानगोष्टी । झणी दृिष्टभेटी न हो त्याची ॥1॥
 नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ॥ध्रु.॥
 पोहों सिणलें नये कासे लावितो आणिका । ह्मणावें त्या मूर्खा काय आतां ॥2॥
 सिणलें तें गेलें सिणलियापासीं । जाली त्या दोघांसी एक गति ॥3॥
 तुका ह्मणे अहो देवा दिनानाथा। दरुषण आतां नको त्याचें ॥4॥

4042
 संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥1॥
 पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥
 कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाविती विरHी ॥2॥
 आशापाशीं बांधोनि चित्त । ह्मणती जालों आह्मी मुH ॥3॥
 त्यांचे लागले संगती । जाली त्यांसी ते चि गति ॥4॥
 तुका ह्मणे शब्दYाानें । जग नाडियेलें तेणें॥5॥

4043
 दोष करूनि आह्मी पतित सिद्ध जालों । पावन मागों आलों ब्रीद तुझें ॥1॥
 आतां पतिता तारावें कीं ब्रीद हें सोडावें । यांत जें पुरवे तें चि सांगा ॥ध्रु.॥
 उद्धार तुमच्यानें नव्हे हो श्रीहरि। सोडा झडकरी ब्रीद आतां ॥2॥
 तें ब्रीद घेउनी हिंडों दारोदारीं । सांगूं तुझी कीर्ती रे पांडुरंगा ॥3॥
 देवें हारविलें ब्रीद हें सोडिलें । पतितें जिंकिलें आह्मीं देवा ॥4॥
 तुका ह्मणे आह्मीं उठलों दैन्यवरि। विचारा श्रीहरी तुह्मी आतां ॥5॥

4044
 राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥1॥
 काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥
 चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देइऩन हा बळी जीव पायीं ॥2॥
 तुका ह्मणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥3॥

4045
 देव धरी नाना सोंगें । नाम श्रेष्ठ पांडुरंग ॥1॥
 तो हा गविळयाचे घरीं । नाम सारितो मुरारि ॥ध्रु.॥
 धन्य यशोदेचें प्रारब्ध । नाचे अंगणीं गोविंद ॥2॥
 ऐशा भHांसाटीं देवें । नाना धरियेलीं नांवें ॥3॥
 होय दासांचा जो दास । तुका ह्मणे विठ्ठलास॥4॥

4046
 आइत्या भाग्या धणी व्हावे । केनें घ्यावें न सरे तें॥1॥
 केणें आहे पंढरपुरीं । उधाराचें लाभीक ॥ध्रु.॥
 बाखराची करुनी रीती । भरा पोतीं लवलाहीं ॥2॥
 तुका ह्मणे संतांपाडें । करूं पुढें वाखती ॥3॥

4047
 जन्मोजन्मीं दास । व्हावें हे चि माझी आस ॥1॥
 पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥
 संतसमागम । अंगीं थिरावलें प्रेम ॥2॥
 स्नान चंद्रभागे । तुका ह्मणे हें चि मागें ॥3॥

4048
 कां गा कोणी न ह्मणे पंढरीची आइऩ । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥1॥
 तेव्हां माझ्या मना होइल समाधान । जाइल सर्व शीण जन्मांतरिंचा ॥2॥
 तुका ह्मणे माझी होशील माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥3॥

4049
 वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला॥1॥
 विठोबासी शरण जावें । निजनिष्ट नाम गावें ॥ध्रु.॥
 सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥2॥
 अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हा चि हेत ॥3॥

4050
 मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥1॥
 न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली ॥ध्रु.॥
 न पवे धांवणें न पवे चि लाग । न चलती माग धरावया ॥2॥
 भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥3॥
 तुका ह्मणे नेदी हाका मारूं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥4॥

4051
 धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥1॥
 कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं ॥ध्रु.॥
 आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥2॥
 तुका ह्मणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥3॥

4052
 गरुडावरि बैसोनि येतो जगजेठी । त्याचे चरणीं मिठी घालूं चला ॥1॥
 सांवळें रूपडें देखिलें लोचनीं । शंख चक्र दोन्ही शोभताहे ॥ध्रु.॥
 पीतांबर झळके हे चि त्याची खूण । वाकी रुणझुण करिताती ॥2॥
 गरुडाचा चपेटा असे नेटें । कस्तुरीमळवट शोभताहे ॥3॥
 पदक एकावळी शोभताहे कंठीं । तुका ह्मणे मिठी घालूं चला ॥4॥

4053
 नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥1॥
 नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं ॥ध्रु.॥
 तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ ह्मणा त्यासी ॥2॥
 तुका ह्मणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांडे पु†या ॥3॥

4054
 जाली हरिकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥1॥
 वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेइप रे तूं आतां धणीवरि ॥ध्रु.॥
 प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें होतीं रंगलीं विटलीं तीं ॥2॥
 तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । ह्मणउनि पुढती आणियेलें ॥3॥

4055
 संकिल्पला तुज सकळ ही भाव । कोण एक ठाव उरला तेथें ॥1॥
 इंिद्रयव्यापार जेंजें कांहीं कर्म । करितों ते धर्म सकळ तुझे ॥ध्रु.॥
 माझें हित फार लागला विचार । तुज सर्व भार चालवणें ॥2॥
 जो कांहीं लौकिक करिसी तो तुझा । अपमान पूजा कांहींतरि ॥3॥
 तुका ह्मणे मी तों राहिलों नििंश्चत । तुज कळे हित तैसें करीं ॥4॥

4056
 भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥1॥
 जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥
 उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥2॥
 तुका ह्मणे चित्त । होय आवडी मििश्रत॥3॥

4057
 ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया॥1॥
 तेथें बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥
 चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृिष्ट ॥2॥
 तुका ह्मणे सांगों काय । एकाएकीं हरिवृित्तमय ॥3॥

4058
 कोणा ही केंडावें हा आह्मां अधर्म । जोजो पावे श्रम तोतो देव ॥1॥
 ह्मणउनि चित्ता सिकविलें वोजें । आतां हें चि दुजें न बोलावें ॥ध्रु.॥
 हालविलें जरि परउपकारें । जिव्हे पाप खरें उपाधीचें॥2॥
 तुका ह्मणे जीव प्रारब्धा आधीन । कोण वाहे सीण करुणा शोभे ॥3॥

4059
 देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥1॥
 साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
 पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥2॥
 तुका ह्मणे वाणी । शुद्ध जनादऩनीं जनीं ॥3॥

4060
 काय उणें मज पांडुरंगा पायीं । रििद्धसििद्ध ठायीं वोळगती ॥1॥
 कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आह्मी ॥ध्रु.॥
 स्वर्गसुखें आह्मीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥2॥
 तुका ह्मणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥3॥

4061
 माझें मागणें तें किती । दाता लIमीचा पति ॥1॥
 तान्हेल्यानें पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी ॥ध्रु.॥
 कल्पतरु जाला देता । तेथें पोटाचा मागता ॥2॥
 तुका ह्मणे संतां ध्यातां । परब्रह्म आलें हाता ॥3॥

4062
 अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥1॥
 तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥
 बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥2॥
 तुका ह्मणे नाव । जनासाटीं उदकीं ठाव ॥3॥

4063
 जन्मोजन्मींची संगत । भेटी जाली अकस्मात ॥1॥
 आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतीचा तुटेना ॥ध्रु.॥
 माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥2॥
 तुका ह्मणे अंतीं । तुझी माझी एक गति ॥3॥

4064
 सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥1॥
 न कळे हा निर्धार ब्रह्मादिकां पार । कायसा विचार माझा तेथें ॥2॥
 तुका ह्मणे आतां धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥3॥

4065
 काय फार जरी जालों मी शाहाणा । तरी नारायणा नातुडसी ॥1॥
 काय जालें जरी मानी मज मन । परि नातुडति चरण तुझे देवा ॥ध्रु.॥
 काय जालें जरी जालों उदासीन । परि वर्म भिन्न तुझें देवा ॥2॥
 काय जालें जरी केले म्यां सायास । ह्मणवितों दास भH तुझा ॥3॥
 तुका ह्मणे तुज दाविल्यावांचून । तुझें वर्म कोण जाणे देवा ॥4॥

4066
 जातां पंढरीच्या मागॉ । काय वणूप सुखा मग ॥1॥
 घडे लाभ लक्षकोटि । परब्रह्मीं होइल भेटी ॥ध्रु.॥
 नाम गर्जत येती संत । त्यांच्या दर्शनें होइऩजे मुH ॥2॥
 जो अलIय ब्रह्मादिकां । आला संनिध ह्मणे तुका ॥3॥

4067
 सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥1॥
 तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥
 जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि नेम अहिनिऩशीं ॥2॥
 तुका ह्मणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥3॥

4068
 मोल घेऊनियां कथा जरी करीं । तरी भंगो हरी देह माझा ॥1॥
 माझी कथा करा ऐसें ह्मणें कोणा । तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥ध्रु.॥
 साहए तूं जालासी काय उणें तुपें । आणीक भूतांपें काय मागों ॥2॥
 तुका ह्मणे सर्व सििद्ध तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥3॥

4069
 जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि Yाान ब्रह्म होय ॥1॥
 कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥
 जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य चक्षु ॥2॥
 तुका ह्मणे देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥3॥

4070
 पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरिसील सत्ता सकळ ही ॥1॥
 कां जी आह्मांवरी आणिकांची सत्ता । तुह्मासी असतां जविळक ॥2॥
 तुका ह्मणे पायीं केलें निवेदन । उचित हें दान करीं आतां ॥3॥

4071
 रात्री दिवस आह्मां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाहए जग आणि मन ॥1॥
 जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥2॥
 तुका ह्मणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥3॥

4072
 होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥1॥
 आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । अविट तें सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥
 होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥2॥
 सांडोवा पायरी । वाहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥3॥
 लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका ह्मणे देइप । धाक नाहीं जन्माचा ॥4॥

4073
 माझिया जीवाचा मज निरधार । न करीं उत्तर जनासवें ॥1॥
 आपुलें कारण साधों जी विचार । करावा हा धीर धरूनियां ॥ध्रु.॥
 काय कराविया आणिका या युिH । काय नव्हे भिH विठोबाची ॥2॥
 एक पुढें गेले वाट दावूनियां । मारग तो वांयां कोण सांडी ॥3॥
 तुका ह्मणे माझी विठोबासी चिंता । भेइऩना सर्वथा न घडे तें ॥4॥

4074
 कासया व्हावें जीतांचि मुH । सांडुनियां थीतें प्रेमसुख ॥1॥
 वैष्णवांचा दास जाला नारायण । काय त्या मिळोन असे काम ॥ध्रु.॥
 काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि बैसोन धीरु धरीं ॥2॥
 सुख आह्मांसाटीं केलें हें निर्माण । निद।व तो कोण हाणे लाता ॥3॥
 तुका ह्मणे मज न लगे सायोज्यता । राहेन या संतां समागमें ॥4॥

4075
 आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग॥1॥
 कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती॥2॥
 तुका ह्मणे जीवा थोर जालें सुख । नाठवे हे भूक तान कांहीं ॥3॥

4076
 लाडें भाकितों करुणा । तूं रे उदाराचा राणा ॥1॥
 करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ ॥ध्रु.॥
 नाहीं चिंता रे आह्मांसी । तूं चि भार चालविसी ॥2॥
 आह्मी जालों उदासीन । तूं चि करिसी जतन ॥3॥
 आह्मां नाहीं जीवनास । तूं चि पुरविसी घास ॥4॥
 तुका ह्मणे भलते सवें । जातां मागें मागें धांवे ॥5॥

4077
 आह्मां हें सकळ । तुझ्या पायांचें चि बळ ॥1॥
 करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥
 जयाचा जो भोग। सुख दुःख पीडा रोग ॥2॥
 तुका ह्मणे देवा । तुझे पायीं माझा ठेवा ॥3॥

4078
 प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥1॥
 दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥2॥
 तुका ह्मणे तया दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥3॥

4079
 संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥1॥
 येणें होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश कांहीं ॥ध्रु.॥
 घेइऩल तयासी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥2॥
 सांगितली सोय करुणासागरें । तुह्मां कांहो बरें न वाटतें ॥3॥
 तुका ह्मणे तेणें उपकार केला । भोऑया भाविकाला तरावया ॥4॥

4080
 आह्मां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥1॥
 आह्मांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥
 काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥2॥
 नाहीं शीण आह्मां जालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥3॥
 तुका ह्मणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुह्मी ॥4॥

4081
 तांबगी हें नाणें न चले ख†या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥1॥
 करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥
 हिरयासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥2॥
 देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥3॥
 तुका ह्मणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥4॥

4082
 चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥1॥
 ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥
 हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥2॥
 तुका ह्मणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥3॥

4083
 आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुट ॥1॥
 नाहीं कोणासवें बोलणें लागत । नििंश्चतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥
 लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥2॥
 तुका ह्मणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥3॥

4084
 आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥1॥
 ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥
 क्लेशाची चित्तीं राहाते कांचणी । अग्नींत टाकोनी ठाव जाळी ॥2॥
 तुका ह्मणे येणें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥3॥

4085
 अYाानाची भिH इिच्छती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥1॥
 अYाानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥
 अYाानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥2॥
 अYाानाचें Yाान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥3॥
 तुका ह्मणे जळो ऐसियांचे तोंड । अYाानाचें बंड वाढविती ॥4॥

4086
 गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥1॥
 अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥
 ऐसिया डांभिकां कैची हरिसेवा । नेणे चि सद्भावा कोणे काळीं ॥2॥
 तुका ह्मणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥3॥

4087
 आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥1॥
 फुकाचा चाकर जालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥ध्रु.॥
 दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग ॥2॥
 तुका ह्मणे ऐसें आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥3॥

4088
 अनंत लक्षणें वाणितां अपार । संताचें तें घर सांपडेना ॥1॥
 जये घरीं संत राहती आपण । तें तुह्मां ठिकाण आतुडेना ॥ध्रु.॥
 ठिकाण धरूनी पाहवे ते संत । उगा च अकांत करूं नये ॥2॥
 संत होऊनियां संतांसी पाहावें । तरि च तरावें तुका ह्मणे ॥3॥

4089
 संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥1॥
 हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥
 जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥2॥
 ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥3॥
 तुका ह्मणे आह्मीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥4॥

4090
 पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥1॥
 मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥
 शांति क्षमा अंगीं विरिH सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥2॥
 तुका ह्मणे नाहीं वर्णा अभिमान । अवघे जीवनमुH लोक ॥3॥

4091
 देखीचें तें Yाान करावें तें काइऩ । अनुभव नाहीं आपणासी ॥1॥
 इंिद्रयांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥
 युHीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥2॥
 नाव रेवािळतां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥3॥
 तुका ह्मणे बुिद्ध आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥4॥

4092
 नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥
 न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥
 असावें म्यां सदा विषयीं विरH । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥2॥
 करोनियां साहए पुरवीं मनोरथ । व्हावें कृपावंत तुका ह्मणे ॥3॥

4093
 आपुल्या पोटासाटीं । करी लोकांचिया गोष्टी ॥1॥
 जेणें घातलें संसारीं । विसरला तो चि हरी ॥ध्रु.॥
 पोटा घातलें अन्न । न ह्मणे पतितपावन ॥2॥
 मी कोठील आणि कोण । हें न कळे ज्यालागून ॥3॥
 तुका ह्मणे नरस्तुति । करितो भाट त्रिजगतीं॥4॥

4094
 स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥1॥
 सेकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥ध्रु.॥
 सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं Yाानपणाची मस्ती ॥2॥
 तुका ह्मणे गाढव लेखा। जेथें भेटेल तेथें ठोका ॥3॥

4095
 जगीं कीतिऩ व्हावी । ह्मणोनी जालासी गोसावी॥1॥
 बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥
 चित्तीं नाहीं अनुताप। लटिकें भगवें स्वरूप ॥2॥
 तुका ह्मणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥3॥

4096
 प्राHनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥1॥
 उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राह्मणीं वंदूं नये ॥ध्रु.॥
 कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र ह्मणोन घेऊं नये ॥2॥
 यातिहीन जाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥3॥
 भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥4॥

4097
 बोलिलों उत्कषॉ । प्रेमरस दाशत्वें ॥1॥
 साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥
 समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥2॥
 तुका ह्मणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥3॥

4098
 विचा केला ठोबा । ह्मणोनि नांव तो विठोबा ॥1॥
 कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥
 शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग जाला ॥2॥
 तुका ह्मणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥3॥

4099
 भ्रतारअंगसंगें सुखाची वेवस्था । आधीं तों सांगतां नये कोणा ॥1॥
 तथापि सांगणें कुमारिकेपाशीं । ते काय मानसीं सुख मानी ॥ध्रु.॥
 तैसा आत्मबोध आधीं बोलों नये । बोलासी तो काय सांपडेल ॥2॥
 तथापि सांगणें बहिर्मुखापाशीं । तो काय संतोषासी मूळ होय ॥3॥
 तुका ह्मणे संत सुखाचे विभागी । ब्रह्मानंद जगीं साधुरूपें ॥4॥

4100
 कलयुगामाजी थोर जालें बंड । नष्ट लोक लंड जाले फार ॥1॥
 न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले ॥ध्रु.॥
 सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वारा । ऐसिया पामरा तारी कोण ॥2॥
 विश्वास तयाचा बैसेना कोठें ही । स्तुति निंदा पाहीं जीवीं धरी ॥3॥
 तुका ह्मणे कैसें केलें नारायणें । जाणावें हें कोणें तयाविण ॥4॥

4101
 आपुली बुटबुट घ्यावी । माझी परताप द्यावी ॥1॥
 आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बइऩल चुकला मोरा ॥2॥
 तुका ह्मणे ऐशा नरा । परिस न झोंबे खापरा ॥3॥

4102
 भावभिHवादें करावें कीर्तन । आशाबधी मन करूं नये ॥1॥
 अन्न पाणी धन द्रव्य नारायण । विठ्ठला वांचून बोलूं नये ॥ध्रु.॥
 सप्रेम करावें देवाचें कीर्तन । भय द्या सोडून शरीराचें॥2॥
 तरी मग जोडे विठ्ठलनिधान । केलिया कीर्तन सििद्ध पावे ॥3॥
 देव जोडिलिया तया काय उणें । तुका ह्मणे मन धीट करा ॥4॥

4103
 चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंसी खापर काय होय ॥1॥
 दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥2॥
 तुका ह्मणे जरि पूर्वपुण्यें सििद्ध । तरि च राहे बुिद्ध संतसंगीं॥3॥

4104
 रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचें ॥1॥
 निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागीं तैसा शास्त्रबोध ॥ध्रु.॥
 दास तुका ह्मणे विठ्ठलउदारें । अYाानअंधारें दूरी केलें ॥2॥

4105
 मथनासाटीं धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥1॥
 तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥
 सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥2॥
 तुका ह्मणे घालें पोट । मग बोटचांचणी॥3॥

4106
 माझा घात पात अथवा हित फार । अवघा विचार तुझ्या हातीं ॥1॥
 ठेवुनि जीव भाव तुझ्या ठायीं चित्त । राहिलों निवांत पांडुरंगा ॥ध्रु.॥
 चित्ताचा चाळक बुद्धीचा जनिता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥2॥
 तुका ह्मणे काय करिसी तें पाहीन । ठेविसी राहीन सुखें तेथें ॥3॥

4107
 संतपाउलें साजिरीं । गंगा आली आह्मांवरी ॥1॥
 जेथें पडे रजधुळी । तेथें करावी अंघोळी ॥ध्रु.॥
 स्वेतबंद वाराणसी। अवघीं तीथॉ तयापासीं ॥2॥
 तुका ह्मणे धन्य जालों । संतसागरीं मिळालों ॥3॥

4108
 न घडे मायबापें बाळकाचा घात । आपणादेखत होऊं नेदी ॥1॥
 कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक करितां तुज ॥ध्रु.॥
 वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान भूक वाहे कडिये खांदीं ॥2॥
 तुका ह्मणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥3॥

4109
 करावें कीर्तन । मुखीं गावे हरिचे गुण ॥1॥
 मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ध्रु.॥
 शांतिखड्ग हातीं। काळासी ते नागविती ॥2॥
 तुका ह्मणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥3॥

4110
 तुझी कीर्ती सांगों तुजपुढें जरी । ब्रह्मांडीं ही हरी माइऩना ते ॥1॥
 मेरूची लेखणी सागराची शाइऩ । कागद हा मही न पुरे चि ॥ध्रु.॥
अनंत अपार आपंगिले भH । माझें चि संचित ओडवेना ॥2॥
 तुका ह्मणे तुह्मां बोल नाहीं देवा । पामरें म्यां सेवा केली नाहीं ॥3॥

4111
 काय साधनाच्या कोटी । केल्या आटी होती त्या॥1॥
 देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥
 केले होते चिंता श्रम । उपरम न होतां ॥2॥
 तुका ह्मणे कळों आलें । सर्व जालें आपरूप ॥3॥

4112
 तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥1॥
 काय येणें उणें आह्मां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥
 नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥2॥
 जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥3॥
 नामासाटीं प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥4॥
 तुका ह्मणे आह्मी गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥5॥

4113
 कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज॥1॥
 बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा िस्थर केला जीव ॥ध्रु.॥
 तेणें सुखें मन िस्थर जालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥2॥
 नाभी नाभी ऐसें बोलिलों वचन । तें माझें कल्याण सर्वस्व ही ॥3॥
 तुका ह्मणे जालों आनंदनिर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥4॥

4114
 भHीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥1॥
 अष्टमासििद्ध वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां॥ध्रु.॥
 तेथें दुष्ट गुण न मिळे निशेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥2॥
 संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥3॥
 तुका ह्मणे येथें काय तो संदेह । आमचें गौरव आह्मी करूं ॥4॥

4115
 साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥1॥
 साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥2॥
 तुका ह्मणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥3॥

4116
 संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥1॥
 याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥
 एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥2॥
 शब्दYाानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥3॥
 तुका ह्मणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥4॥

4117
 तुझें वर्म आह्मां कळों आलें सुखें । संतांचिया मुखें पांडुरंगा ॥1॥
 अवघा चि नट वाउगा पसारा । चेइऩला तूं खरा तूं चि एक ॥ध्रु.॥
 ह्मणउनि देहबुिद्ध नासिवंता । नातळे या चित्ता नेदावया ॥2॥
 सोय हे लागली पुढिलांची वाट । पावले जे नीट तुजपाशीं ॥3॥
 तुका ह्मणे नाहीं कोणासवें काज । बोलायाचें मज अंतरींचें ॥4॥

4118
 पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥1॥
 जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥
 अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥2॥
 जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥3॥
 तुका ह्मणें देह वाइऩलें विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥4॥

4119
 संकोचतो जीव महkवाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥1॥
 कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥
तुमचे चरण पावविलों सेवा । ह्मणउनि हेवा हा चि करीं ॥2॥
 विनउनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचें॥3॥

4120
 देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥1॥
 आळवित्या न लगे धर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥
 नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥2॥
 आतां परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥3॥

4121
 भिH ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥1॥
 तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥
 भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥2॥
 तुका ह्मणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥3॥

4122
 समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाची या ॥1॥
 मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारीं भीक मागे ॥2॥
 दुष्ट हें जाणावें आपुलें स्वहित । तुका ह्मणे मात ऐसी आहे ॥3॥

4123
 भवाचिया संगें बहु च नाडिले । किळकाळें पाडिले तोंडघसीं ॥1॥
 तया भवसंगें गुंतलासी वांयां । धन पुत्र जाया भुलों नको ॥ध्रु.॥
 जेजे घडी जाय तेते काळ खाय । प्राण्या तरणोपाय काय केला ॥2॥
 तुका ह्मणे करीं सर्व ही तूं त्याग । अपाअ हें सर्वांग जगदीशीं ॥3॥

4124
 रुचे सकळा मिष्टान्न । रोग्या विखाच्या समान॥1॥
 तरि कां तया एकासाटीं । काम अवघें करणें खोटीं ॥ध्रु.॥
 दर्पण नावडे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥2॥
 तुका ह्मणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥3॥

4125
 जागा घरटी फिरे तस्कराची दिवसाराती । नीदसुरें नाडिलीं असो मागों किती ॥1॥
 हाट करी सकळ जन । वस्तु करा रे जतन ॥ध्रु.॥
 हुशार ठायीं । निजनिजेलिया पाहीं ॥2॥
 सावचित्त असे खरा । लाभ घेउन जाये घरा ॥3॥
 तराळ राळ बोंबें उतराइऩ। राखा आपुलिया भाइऩ ॥4॥
 हरिच्या नामीं घालूं जागा । तुका ह्मणे हुशार गा ॥5॥

4126
 संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली॥1॥
 गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥2॥
 तुका ह्मणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥3॥

4127
 चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम वर्णावे गुण ॥1॥
 हें चि एक तुह्मां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥
 खुंटली जाणींव माझें बोलणें आतां । करूं यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥2॥
 तुका ह्मणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलों विचार॥3॥

4128
 संतांच्या पादुका घेइऩन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥1॥
 भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सििद्ध पाय हरिदासांचे ॥ध्रु.॥
 ध्यानगति मति आसन समाधि । हरिनाम गोविंदीं प्रेमसुख ॥2॥
 नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊं गीतीं ॥3॥
 सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका ह्मणे संतमहंतपाय ॥4॥

4129
 हरिजनीं प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं जालों ॥1॥
 ह्मणियें सत्वर करीन सांगतां । घेइऩन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥
 आस करूनियां राहेन अंगणीं । उचिष्टाची धणी घ्यावयासी ॥2॥
 चालतां ते मागाअ चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥3॥
 दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका ह्मणे लाता घेइन अंगीं ॥4॥

4130
 पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । जाला सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥1॥
 आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदाटलें पुढें । ब्रह्म सावळें॥ध्रु.॥
 आलिंगणें संतांचिया । दिव्य जाली माझी काया । मस्तक पाया । वरी त्यांच्या ठेवितां ॥2॥
 तुका ह्मणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥3॥

4131
 ठाव देऊनिया राखें पायापासीं । मी तों आहें रासी पातकाची ॥1॥
 पातकाची रासी ह्मणतां लागे वेळ । ऐके तो कृपाळ नारायण ॥ध्रु.॥
 नारायणनामें अवघें सांग जालें । असंग चि केलें एकमय ॥2॥
 एकमय जालें विठोबाच्या नामें । भेदाभेद कर्म आणिक कांहीं ॥3॥
 तुका ह्मणे चित्तीं चिंतिलें जें होतें । तें होय आपैतें नामें याच्या ॥4॥

4132
 आतां आह्मां भय नाहीं बा कोणाचें । बळ विठोबाचें जालें असे ॥1॥
 धीर दिला आह्मां येणें पांडुरंगें । न पांगों या पांगें संसाराच्या ॥2॥
 तुका ह्मणे माझा कैवारी हा देव । नाहीं भय भेव त्याच्या संगें ॥3॥

4133
 भिH आह्मी केली सांडुनी उद्वेग । पावलों हें सांग सुख याचें ॥1॥
 सुख आह्मां जालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥2॥
 तुका ह्मणे सुख बहु जालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥3॥

4134
 शास्त्रYा हो Yााते असती बहुत । परि नाहीं चित्त हाता आलें ॥1॥
 क्षणा एका साटीं न धरवे धीर । तेणें हा रघुवीर अंतरतो ॥ध्रु.॥
 तोळाभर सोनें रतिभार राइऩ । मेळविल्या पाहीं नास होतो ॥2॥
 हरीचे अंकित असती विरळागत । तयांसी अच्युत कृपा करी ॥3॥
 तुका ह्मणे काय धुडवण्या गोष्टी । जंव नाहीं गांठी चित्त आलें ॥4॥

4135
 इंिद्रयांसी नेम नाहीं । मुखीं राम ह्मणोनि काइऩ ॥1॥
 जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥
 कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥2॥
 हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥3॥
 तुका ह्मणे नका रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥4॥

4136
 न लगे देवा तुझें आह्मांसी वैकुंठ । सायुज्याचा पट न लगे मज ॥1॥
 देइप तुझें नाम मज सर्वकाळीं । मागेन वनमाळीहें चि तुज ॥ध्रु.॥
 नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥2॥
 सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामें॥3॥
 तुका ह्मणे हरी देइप तुझें नाम । अखंडित प्रेम हें चि द्यावें ॥4॥

4137
 पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । जालें या चित्तासी समाधान ॥1॥
 मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥
 सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥2॥
 तुका ह्मणे सर्व अंतर्बाहए आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥3॥

4238
 होतें तैसें पायीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होतों ॥1॥
 संबोखुनी केलें समाधान चित्त । वोगरुणि भात प्रेमरस॥ध्रु.॥
 नामरत्नमणी करूनी भूषण । अळंकारमंडण माळा दिली ॥2॥
 तुका ह्मणे सुखें जालों निरामय । नामीं नामसोय निमग्नता ॥3॥

4139
 िस्थरावली वृित्त पांगुळला प्राण । अंतरींची खुण पावूनियां ॥1॥
पुंजाळले नेत्र जाले अधाौन्मीिळत । कंठ सद्गदित रोमांच आले ॥ध्रु.॥
 चित्त चाकाटलें स्वरूपा माझारी । न निघे बाहेरी सुखावलों ॥2॥
 सुनीळ प्रकाश उदैजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥3॥
 शशिसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटली आनंदाची ॥4॥
 तुका ह्मणे सुखें प्रेमासी डुलत । वीरालों नििंश्चत नििंश्चतीनें ॥5॥

4140
 बोध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥1॥
 लोकांचियेसाटीं शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ॥ध्रु.॥
 आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ॥2॥
 म्यां च तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका ह्मणे ॥3॥

4141
 मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥1॥
 चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥
 सुखें असों संसारीं । मग जवळी च हरि ॥2॥
 मुिHवरील भिH जाण । अखंड मुखीं नारायण ॥3॥
 मग देवभH जाला । तुका तुकीं उतरला ॥4॥

4142
 प्रेम जडलें तुझे पायीं । आणीक न सुचे मजला कांहीं ॥1॥
 रात्रीदिवस तुझें ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥
 नामापरतें नेणें दुजें । ऐसें कळलें मजला निज ॥2॥
 तुका ह्मणे अंतकाळीं । आह्मां सोडवीं तात्काळीं ॥3॥

4143
 तुझे पाय माझी काशी । कोण जाय माझें काशी॥1॥
 तुझें रूप तें चि ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥
 तुझे चरण ते चि गया । जालें गयावर्जन देहा ॥2॥
 तुका ह्मणे सकळ तीथॉ । तुझें पायीं वसती येथें ॥3॥

4144
 क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नावडे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥1॥
 कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । ह्मणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥
 बलत्कारीं जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनियां ॥2॥
 तुका ह्मणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥3॥

4145
 श्रीराम सखा ऐसा धरीं भाव । मीपणाचा ठाव पुसीं मना ॥1॥
 शरण निरंतर ह्मण तूं गोविंदा । वाचे लावीं धंदा नारायण ॥ध्रु.॥
 यापरि सोपान नाहीं रे साधन । वाहातसें आण तुझी मना ॥2॥
 नको कांहीं करूं अळस अंतरीं । जपें निरंतर रघुपती ॥3॥
 तुका ह्मणे मोठा लाभ नरदेहीं । देहीं च विदेही होती नामें ॥4॥

4146
 सर्वापरी तुझे गुण गाऊं उत्तम । तुझेठायीं प्रेम राहो माझें ॥1॥
 माउलीपरिस आहेसी उदार । तरि कां निष्ठ‍ मन केलें॥ध्रु.॥
 गजेंद्राकारणें केलें त्वां धांवणें । तरि कां निर्वाण पाहातोसी॥2॥
 प्रल्हादास कष्टीं रिक्षलें तों देवा । तरि कां केशवा सांडी केली ॥3॥
 अन्यायी अजामेळ तो जाला पावन । ऐसें हें पुराण हाका मारी ॥4॥
 तुका ह्मणे माझे थोर अपराध । नाम करी छेद क्षणमात्रें ॥5॥

4147
 आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥1॥
 दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥
 यावें जावें आह्मीं देवा च सांगातें । मागूनी करीत हें चि आलों ॥2॥
 काय वांयां गेलों तो करूं उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥3॥
 तुका ह्मणे प्रेम मागतों आगळें । येथें भोगूं फळें वैकुंठींचीं ॥4॥

4148
 आतां आह्मां हें चि काम । वाचे स्मरूं रामराम ॥1॥
 ऐसी मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥
 अमृताची खाणी । तये ठायीं वेचूं वाणी ॥2॥
 तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ॥3॥

4149
 आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥1॥
 जेथें चंद्रभागातिरीं । आह्मी नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥
 जेथें संतांची दाटणी । त्याचें घेऊं पायवणी ॥2॥
 तुका ह्मणे आह्मी बळी । जीव दिधला पायां तळीं ॥3॥

4150
 आह्मी नरका जातां काय येइल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥1॥
 तुज शरण आलियाचें काय हें चि फळ। विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥
 तुझें पावनपण न चले आह्मांसीं । ऐसें हृषीकेशी कळों आलें ॥2॥
 आह्मी दुःख पावों जन्ममरण वेथा । काय तुझ्या हाता येत असे ॥3॥
 तुका ह्मणे तुह्मी खादली हो रडी । आह्मी धरली सेंडी नाम तुझें ॥4॥

4151
 पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आह्मी ॥1॥
 आतां संतांनीं करावी पंचाइऩत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥
 कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आह्मी पातकी ही ॥2॥
 याचें पावनपण सोडवा चि तुह्मी । पतितपावन आह्मी आहों खरें ॥3॥
 आह्मी तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥4॥
 तुका ह्मणे आह्मी मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥5॥

4152
 घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥1॥
 ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ॥ध्रु.॥
 रांडापोरांतें गोविती । वर्षासन ते लाविती ॥2॥
 जसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥3॥
 तुका ह्मणे तया । तमोगुणियाची क्रिया ॥4॥

4153
 वैभव राज्य संपत्ती टाकावी । उदरार्थ मागावी माधोकरी॥1॥
 आपुलें तें आधीं करावें स्वहित । ऐसी आहे नीत स्वधर्माची ॥ध्रु.॥
 वर्ण कुळ जाति याचा अभिमान । तजावा सन्मान लौकिकाचा ॥2॥
 तुका ह्मणे राहे एकाकी निःशंक । देउनियां हाक कंठीं काळ ॥3॥

4154
 हातपाय मिळोनि मेळा । चला ह्मणती पाहों डोळां॥1॥
 देखणी नव्हे देखती कैसे । सकळांचा देखणा डोळा चि असे ॥2॥
 डोऑयाचा डोळा पाहों गेला । तुका ह्मणे तो पाहों ठेला ॥3॥

4155
 मुखें संति इंिद्रयें जती । आणिक नेणे भाव भHी॥1॥
 देवा हे चि दोन्ही पदें । येर गाइलीं विनोदें ॥2॥
 चित्ताचें आसन। तुका करितो कीर्त्तन ॥3॥

4156
 धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥1॥
 ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन िस्थरावलें तुझ्या पायीं ॥2॥
 तुका ह्मणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥3॥

4157
 गावलोकिकाहीं लावियेलें पिसें । काय सांगों ऐसें तुजपासीं ॥1॥
 तोंड काळें केलें फिरविलें मज । नाहीं धरिली लाज पांडुरंगा ॥ध्रु.॥
 काय तुजपासीं सांगों हें गा†हाणें । मग काय जिणें तुझें माझें ॥2॥
 कोणासाटीं आतां करावा संसार । केली वारावार आपणें चि ॥3॥
 तुका ह्मणे आह्मी मोडिला घरचार । धरियेला धीर तुझ्या पायीं ॥4॥

4158
 जीवें जीव नेणे पापी सारिका चि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥1॥
 आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥
 देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठ‍ाचे हात वाहाती कैसे ॥2॥
 तुका ह्मणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥3॥

4159
 मनीं भाव असे कांहीं । तेथें देव येती पाहीं ॥1॥
 पाहा जनाइऩ सुंदरी । तेथें देव पाणी भरी ॥ध्रु.॥
 शुद्ध पाहोनियां भाव । त्याचे हृदयीं वसे देव ॥2॥
 तुका ह्मणे विठोबासी । ठाव देइप चरणापासीं ॥3॥

4160
 भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥1॥
 ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥
 सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥2॥
 तुका ह्मणे येथें आतां उरला कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥3॥

4161
 काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुह्मांपें ॥1॥
 आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥
 कैसी तुह्मां होय सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥2॥
 आश्चर्य चि करी तुका । हे नायका वैकुंठिंचिया ॥3॥

4162
 चित्त गुंतलें प्रपंचें । जालें वेडें ममतेचें ॥1॥
 आतां सोडवीं पांडुरंगा । आलें निवारीं तें आंगा ॥ध्रु.॥
 गुंतली चावटी । नामीं रूपीं जाली तुटी ॥2॥
 तुका ह्मणे चाली । पुढें वाट खोळंबली॥3॥

4163
 किती एका दिसीं । बुिद्ध जाली होती ऐसी ॥1॥
 कांहीं करावें स्वहित । तों हें न घडे उचित ॥ध्रु.॥
 अवलंबुनी भीक। लाज सांडिली लौकिक ॥2॥
 तुका ह्मणे दीन । जालों मनुष्यपणा हीन ॥3॥

4164
 आतां बरें जालें । सकाळीं च कळों आलें ॥1॥
 मज न ठेवीं इहलोकीं । आलों तेव्हां जाली चुकी ॥ध्रु.॥
 युगमहिमा ठावा । नव्हता ऐसा पुढें देवा ॥2॥
 तुका ह्मणे ठेवीं । भोगासाटीं निरयगांवीं ॥3॥

4165
 परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाइऩच्या पती पांडुरंगा ॥1॥
 चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥2॥
 तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥3॥

4166
 पापाचिया मुळें । जालें सत्याचें वाटोळें ॥1॥
 दोष जाले बिळवंत । नाहीं ऐसी जाली नीत ॥ध्रु.॥
 मेघ पडों भीती । पिकें सांडियेली िक्षती ॥2॥
 तुका ह्मणे कांहीं । वेदा वीर्य शिH नाहीं॥3॥

4167
 ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥1॥
 कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ध्रु.॥
 मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥2॥
 वासनेच्या लहरा येती । उद्योगहेलकावे बसती ॥3॥
 तरावया एक युिH असे । तुका नामनावेमधीं बैसे॥4॥

4168
 देव जडला जाइना अंगा । यासी काय करूं सांगा॥1॥
 वरकड देव येती जाती । हा देव जन्माचा सांगाती ॥ध्रु.॥
 अंगीं भरलें देवाचें वारें । देव जग चि दिसे सारें ॥2॥
 भूत न बोले निरुतें। कांहीं केल्या न सुटे तें ॥3॥
 जीव खादला दैवतें । माझा आणि पंचभूतें ॥4॥
 तुका ह्मणे वाडें कोडें । उभें पुंडलिकापुढें॥5॥

4169
 हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥1॥
 ह्मणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥
 संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥2॥
 तुका ह्मणे अंगीं । शHी देइप नाचें रंगीं ॥3॥

4170
 लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तो चि खरा ॥1॥
 कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥
 जळमंडपयाचे घोडे राउत नाचती । ते काय तडवती युद्धालागीं ॥2॥
 तुका ह्मणे तैसें मतवादीयांचें जिणें। दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥3॥

4171
 काय आह्मीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥1॥
 हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥
 गजा नाडएा सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥2॥
 तुका ह्मणे गणिका नष्ट। माझे कष्ट त्याहूनि ॥3॥

4172
 भाग्यासाटीं गुरु केला । नाहीं आह्मांसी फळला॥1॥
 याचा मंत्र पडतां कानीं । आमच्या पेवांत गेलें पाणी ॥ध्रु.॥
 गुरु केला घरवासी । आमच्या चुकल्या गाइऩम्हसी ॥2॥
 स्वामी आपुली बुटबुट घ्यावी । आमुची प्रताप टाकुन द्यावी ॥3॥
 तुका ह्मणे ऐसे नष्ट । त्यांसी दुणे होती कष्ट ॥4॥

4173
 गुणा आला इऩटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥1॥
 डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥
 निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥2॥
 तुका ह्मणे समध्यान । हे चरण सकुमार ॥3॥

4174
 रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥1॥
 हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥
 देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥2॥
 तुका ह्मणे देवा । देइप कीर्त्तनाचा हेवा ॥3॥

4175
 तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥1॥
 भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥
 नाम आदित्याचें झाड। त्याचा न पडे उजड ॥2॥
 सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥3॥
 तुका ह्मणे देवा । िब्रद सोडूनियां ठेवा ॥4॥

4176
 जालों आतां दास । माझी पुरवीं हे आस ॥1॥
 पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥
 संतसमागम । अंगीं भरोनियां प्रेम ॥2॥
 चंद्रभागे स्नान । तुका ह्मणे हें चि दान ॥3॥

4177
 यासाटीं करितों निष्ठ‍ भाषण । आहेसी तूं जाण सर्वदाता ॥1॥
 ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तें मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥
 बैसलासे केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुस†याची ॥2॥
 तुका ह्मणे आलें अवघें पायांपें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥3॥

4178
 पोरा लागलीसे चट । धरी वाट देवळाची ॥1॥
 सांगितलें नेघे कानीं । दुजें मनी विठ्ठल ॥ध्रु.॥
 काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुिश्चत्त ॥2॥
 आमुचे कुळीं नव्हतें ऐसें । हें चि पिसें निवडलें ॥3॥
 लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें॥4॥
 तुका ह्मणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टाचीं ॥5॥

4179
 देवा बोलें आतां बोला । त्वां कां धरिला अबोला॥1॥
 भेऊं नको देइप भेटी । तूं कां पडिलासी संकटीं ॥ध्रु.॥
 तुझ्या जीवींचें मी जाणें । ह्मणसी मुHी आह्मां देणें ॥2॥
 तुका ह्मणे न लगे कांहीं । चित्त राहो तुझे पायीं ॥3॥

4180
 यमधर्म आणिक ब्रह्मादिक देव । त्यांचा पूर्ण भाव तुझे पायीं ॥1॥
 करिती स्मरण पार्वतीशंकर । तेथें मी किंकर कोणीकडे॥ध्रु.॥
 सहजरमुखेंसी घोष फणिवराचा । मज किंकराचा पाड काय ॥2॥
 चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणें । करिती भ्रमण प्रदिक्षणा ॥3॥
 तुका ह्मणे त्यांसी स्वरूप कळेना । तेथें मज दीना कोण पुसे ॥4॥

4181
 विठोबाचे पायीं जीव म्यां ठेविला । भिHभावें केला देव ॠणी ॥1॥
 देव माझा ॠणी आहे सहाकारी । परसपरवारि भवभय ॥ध्रु.॥
 भवभयडोहीं बुडों नेदी पाहीं । धरूनियां बाही तारी मज ॥2॥
 तारियेले दास पडिल्या संकटीं । विष केलें पोटीं अमृतमय ॥3॥
 अमृतातें सेवीतसे नामरसा । तोडियेला फांसा बंधनाचा ॥4॥
 बंधनाचा फांसा आह्मीं कांहीं नेणों । पाय तुझे जाणों पद्मनाभा ॥5॥
 पद्मनाभा नाभिकमळीं ब्रह्मादिक । त्रैलोक्यनायक ह्मणविसी ॥6॥
 ह्मणविसी देवा दासाचा अंकित । मनाचा संकेत पाहोनियां ॥7॥
 पाहोनियां दृढ निश्चय तयाचा । तो चि दास साचा जवळीक ॥8॥
 जवळीक जाली ब्रह्मीं सुखावले । मार्ग दाखविले मूढा जना ॥9॥
 मूढा जनामाजी दास तुझा मूढ । कास तुझी दृढ धरियेली ॥10॥
 धरियेले तुझे पाय रे विठ्ठला । तुका सुखी जाला तुझ्या नामें ॥11॥

4182
 बहु क्लेशी जालों या हो नरदेहीं । कृपादृष्टी पाहीं पांडुरंगा ॥1॥
 पांडुरंगा सर्वदेवांचिया देवा । घ्यावी माझी सेवा दिनानाथा ॥ध्रु.॥
 दिनानाथ िब्रद त्रिभुवनीं तुझें । मायबापा ओझें उतरावें ॥2॥
 उतरीं सत्वर पैलथडी नेइप । पूर्णसुख देइप पायांपाशीं॥3॥
 पायांपाशीं मज ठेवीं निरंतर । आशा तुझी फार दिवस केली ॥4॥
 केली आस तुझी वाट मी पाहातों । निशिदिनीं ध्यातों नाम तुझें॥5॥
 नाम तुझें गोड स्वभHा आवडे । भHांलागीं कडे खांदा घेसी॥6॥
 घेसी खांद्यावरी खेळविसी लोभें । पाउल शोभे विटेवरि ॥7॥
 विटेवरि उभा देखिलासी डोळां । मनाचा सोहळा पुरविसी ॥8॥
 पुरवीं सत्वर त्रैलोक्यस्वामिया । मिठी घाली पायां तुका भावें ॥9॥

4183
 एक वेळे तरी जाइऩन माहेरा । बहुजन्म फेरा जाल्यावरी॥1॥
 चित्ता हे बैसली अविट आवडी । पालट ती घडी नेघे एकी ॥ध्रु.॥
 करावें ते करी कारणशरीर । अंतरीं त्या धीर जीवनाचा ॥2॥
 तुका ह्मणे तरि होइल विलंब । परि माझा लाभ खरा जाला ॥3॥

4184
 सांग त्वां कोणासी तारिलें । संतांवेगळें उद्धरिलें॥1॥
 संत शब्द उपदेशी । मग तूं हो ह्मणशी ॥2॥
 तुका ह्मणे नाहीं तुझा उपकार । करूं संतांचा उच्चार ॥3॥

4185
 उमा रमा एके सरी । वाराणसी ते पंढरी ॥1॥
 दोघे सारिखे सारिखे । विश्वनाथ विठ्ठल सखे ॥ध्रु.॥
 तेथें असे भागीरथी। येथें जाणा भीमरथी ॥2॥
 वाराणशी त्रिशुलावरी । सुदर्शनावरि पंढरी ॥3॥
 मनकणिऩका मनोहर । चंद्रभागा सरोवर ॥4॥
 वाराणशी भैरवकाळ । पुंडलीक क्षेत्रपाळ ॥5॥
 धुंडिराज दंडपाणी। उभा गरुड कर जोडुनी ॥6॥
 गया ते चि गोपाळपुर । प्रयाग निरानरसिंपुर ॥7॥
 तेथें असती गयावळ । येथें गाइऩ आणि गोपाळ॥8॥
 शमीपत्रपिंड देती । येथें काला निजसुखप्रािप्त ॥9॥
 संतसज्जनीं केला काला । तुका प्रसाद लाधला ॥10॥

4186
 फटएाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥1॥
 कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥
 गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥2॥
 तुका ह्मणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥3॥

4187
 दिवसा व्यापारचावटी । रात्री कुटुंबचिंता मोटी ॥1॥
 काय करूं या मनासी । नाठवे हृषीकेशी ॥ध्रु.॥
 वेश्येपाशीं रात्रीं जागे । हरिकीर्त्तनीं निद्रा लागे ॥2॥
 तुका ह्मणे काय जालासी । वृथा संसारा आलासी ॥3॥

4188
 अहो कृपावंता । हाइप बुद्धीचा ये दाता ॥1॥
 जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥
 वदवी हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥2॥
 तुका ह्मणे देवा । माझें अंतर वसवा ॥3॥

4189
 निंदक तो परउपकारी । काय वणूप त्याची थोरी । जे रजकाहुनि भले परि । सर्व गुणें आगळा ॥1॥
 नेघे मोल धुतो फुका। पाप वरच्यावरि देखा । करी साधका । शुद्ध सरते तिहीं लोकीं ॥ध्रु.॥
 मुखसंवदणी सांगते । अवघें सांटविलें तेथें । जिव्हा साबण निरुतें । दोष काढी जन्माचे ॥2॥
 तया ठाव यमपुरीं । वास करणें अघोरीं । त्यासी दंडण करी । तुका ह्मणे न्हाणी ते ॥3॥

4190
 प्रपंचाची पीडा सोसिती अघोरी । जया क्षणभरी नाम नये ॥1॥
 नाम नाठविती आत्मया रामाचें । धिग जिणें त्याचें भवा मूळ ॥ध्रु.॥
 मूळ ते पापाचें आचरण तयाचें । नाहीं राघवाचें स्मरण त्या ॥2॥
 स्मरण भजन नावडे जयासी । आंदणीया दासी यमदूतां॥3॥
 चिंतन रामाचें न करी तो दोषी । एकांत तयासीं बोलों नये ॥4॥
 नये त्याचा संग धरूं ह्मणे तुका । धरितां पातका वांटेकरी ॥5॥

4191
 अथॉविण पाठांतर कासया करावें । व्यर्थ चि मरावें घोकूनियां ॥1॥
 घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनियां ॥2॥
 तुका ह्मणे ज्याला अथाअ आहे भेटी । नाहीं तरी गोष्टी बोलों नका ॥3॥

4192
 बसतां चोरापाशीं तैसी होय बुिद्ध । देखतां चि चिंधी मन धांवे ॥1॥
 व्यभिचा†यापासीं बैसतां क्षणभरी । देखतां चि नारी मन धांवे ॥ध्रु.॥
 प्रपंचाचा छंद टाकूनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥2॥
 सांडुनियां देइप संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥23॥
 तुका ह्मणे तुला सांगतों मी एक । रुिक्मणीनायक मुखीं गावा ॥4॥

4193
 मस्तकीं सहावें ठांकियासी जाण । तेव्हां देवपण भोगावें गा ॥1॥
 आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ॥ध्रु.॥
 सद्ग‍ुसेवन तें चि अमृतपान । करुनी प्राशन बैसावें गा ॥2॥
 आपुल्या मस्तकीं पडोत डोंगर । सुखाचें माहेर टाकुं नये ॥3॥
 तुका ह्मणे आतां सांगूं तुला किती । जिण्याची फजीती करूं नये ॥4॥

4194
 स्वामिसेवा गोड । माते बाळकाचें कोड ॥1॥
 जेंजें मागावें भातुकें । तेंतें पुरवी कौतुकें ॥ध्रु.॥
 खेळविलें कोडें । हरुषें बोले कीं बोबडें ॥2॥
 तुका ह्मणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥3॥

4195
 तुझें नाम पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥1॥
 दाहां नये विसां नये । पंनासां साटां नये ॥ध्रु.॥
 शां नये सहस्रा नये। लक्षकोडीलागीं नये ॥2॥
 तुका ह्मणे पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥3॥

4196
 संतांपायीं विन्मुख जाला । तो जरि संगति मागों आला ॥1॥
 तरि त्याहुनि दुरी जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥ध्रु.॥
 आत्मचर्चा नाहीं जेथें । अगी लावुनि द्यावी तेथें ॥2॥
 तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥3॥

4197
 हिरा ठेवितां काळें गाहाण । मोल न तुटे दुकाळीं जाण ॥1॥
 तैसे संतजन पाहीं । विनटले श्रीहरिपायीं ॥2॥
 तुका ह्मणे तैसे भH । तयांसी जन हें निंदित ॥3॥

4198
 परिसें गे सुनेबाइऩ । नको वेचूं दूध दहीं ॥1॥
 आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥
 ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥2॥
 माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥3॥
 वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥4॥
 उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥5॥
 भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥6॥
 भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥7॥
 सून ह्मणे बहुत निकें । तुह्मी यात्रेसि जावें सुखें ॥8॥
 सासूबाइऩ स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥9॥
 सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥10॥
 सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे॥11॥
 अतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं॥12॥
 मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥13॥
 तुका ह्मणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥14॥

4199
 एक ते गाढव मनुष्याचे वेष । हालविती पुस पुढें दाढी ॥1॥
 निंदा हें भोजन जेवण तयांसी । जोडी घरीं रासी पातकांच्या ॥2॥
 तुका ह्मणे सुखें बैसोनियां खाती । कुंभपाकीं होती नर्कवासी ॥3॥

4200
 मागत्याची टाळाटाळी । झिंझ्या वोढूनि कपाळीं॥1॥
 ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥ध्रु.॥
 नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥2॥
 तुका ह्मणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला॥3॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.