रूप पालटू शिक्षणाचे/सहाध्यायदिन
ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षणाचे उद्दिष्ट राष्ट्रघडणीसाठी व्यक्तिविकास' हे आहे.
इथे मानवतेबद्दल आस्था निर्माण करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणून मानले
आहे. राष्ट्रहिताबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी सर्व बौद्धिक विषयांच्या
(पाठ्यक्रमातील विषयांच्या) अभ्यासातून राष्ट्राच्या मध्यवर्ती प्रश्नांची जाण येणे
गरजेचे आहे. केवळ जाण येणे पुरेसे नसून हे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न
करण्याची प्रेरणा शिक्षणातून मिळायला हवी.
ही प्रेरणा मिळवण्यासाठी पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमाची चौकट ओलांडून
अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात असे नजरेला आणून देणे, शिकण्यासाठी
संधी उपलब्ध करून देणे हा या अभ्यासक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. प्रबोधिनीचा
विद्यार्थी हा समाजाभिमुख असायला हवा. त्यासाठी प्रत्यक्ष समाजाचे दर्शन होणे
गरजेचे आहे. असे दर्शन नैमित्तिक का होईना पण व्हावे म्हणून हा उपक्रम योजला
आहे.
हेतू
विद्याथ्र्यांना विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देणे हा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा
भाग आहे, असे म्हणता येईल. परंतु अनेकदा प्रचलित शिक्षणाच्या घट्ट चौकटीत
इच्छा असूनही अनेक अनुभव आपण विद्याथ्र्यांना देऊ शकत नाही. शाळेच्या बाहेर,
घरी अथवा समाजात वावरताना विद्यार्थी अनेक अनुभवांना कळत-नकळत सामोरे
जात असतात. परंतु हे अनुभव त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेले नसतात. अशा
अनुभवांचे नंतर विश्लेषण केले जात नाही. त्यामुळे या अनुभवांना पूर्णाशाने अध्ययन
अनुभव म्हणता येईलच असे नाही. संवेदनशील मुलांमुलींच्या बाबतीत मात्र असे
अनुभव प्रेरणादायी, शिकवणारे असू शकतात.
शिक्षकाला चौकटीबाहेर जाऊन जर असे अनुभव देण्याची इच्छा असेल तर
शाळेच्या वेळापत्रकात त्याला वेळ उपलब्ध असला पाहिजे. या हेतूने प्रबोधिनीत
सहाध्यायदिन राखून ठेवले आहेत. शिक्षणातील अनेक उपक्रमांप्रमाणेच हा उपक्रमही
स्वाभाविकरीत्या अभ्यासक्रमाचा भाग बनून गेला तर त्यासाठी वेळापत्रकात वेगळी
व्यवस्था करण्याचे कारणच उरणार नाही. औपचारिक सहाध्यायदिनाचे अनौपचारिक
सहअध्ययनात रूपांतर होणे हा यशस्वी शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा निकष ठरू
शकतो.
(२०) रूप पालटू शिक्षणाचे सहाध्यायदिनाचा उपक्रम आखण्यापूर्वी शिक्षकाच्या मनात त्याच्या हेतूंबद्दल स्पष्ट
जाणीव असली पाहिजे.
* सहाध्यायदिनाच्या उपक्रमातून विद्याथ्र्यांना गट म्हणून त्यांच्या सभोवतीच्या
वास्तव परिस्थितीशी आंतरक्रिया करण्याची संधी उपलब्ध होत असते.
१) गटांतर्गत आंतरक्रिया
२) गट व परिसरातील नैसर्गिक संस्था यांतील आंतरक्रिया
३) गट व परिसरातील मानवनिर्मित संस्था (Artificial systems)
यांतील आंतरक्रिया
४) गट व समाजातील विविध व्यक्तीयांमधील आंतरक्रिया.
अशा अनेक प्रकारच्या आंतरक्रिया प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पातळ्यांवर (बौद्धिक,
मानसिक स्तरावरील) मुक्तपणे घडू देणे हा सहाध्यायदिनाचा एक हेतू आहे.
* विद्यार्थ्यांना अनुभवांना मुक्तपणे सामोरे जाऊ दिले तर त्या अनुभवांची उत्कटता
वाढते. त्यामुळे मनाची संवेदनशीलता वाढवणे हाही या उपक्रमामागचा मुख्य हेतू असणे
जरूरीचे आहे. यातून जाणीवेची जागृती व विकास यांना सुरुवात होईल.
* सहाध्यायदिनातून मुलांमुलींना विविध प्रेरणा मिळाव्यात.
* विद्याथ्र्यांच्या शालेय अभ्यासक्रमात अनेक विषय मर्यादित स्वरूपात अथवा
मूलभूत पातळीवर येतात. या विषयांचा व्यावहारिक जगाशी संबंध जोडणे हेही
सहाध्यायदिनाच्या निमित्ताने करता येते.
* एकाच विषयाचा विविधांगी अभ्यास प्रभावीरीत्या करण्यासाठी गटाने
अभ्यास करणे हे साधन उपयुक्त ठरते. हा विश्वास निर्माण करणे, अशा अभ्यासाची
तंत्रे, पद्धती, यांचा मुलांना परिचय होणे असाही एक हेतू सहाध्यायदिनाच्या उपक्रमातून
साध्य होऊ शकतो.
* गटाशी जुळवून घेता येणे.
सहाध्यायदिन उद्दिष्टे
वर उल्लेख केलेल्या हेतूंच्या पूर्ततेसाठी सहाध्यायदिनाचा उपक्रम आखला पाहिजे.
हा उपक्रम ठरविण्यापूर्वी तो उपक्रम कोणत्या उद्दिष्टांसाठी आखणार आहोत अशी एक
अथवा अनेक उद्दिष्टे आधी मांडली पाहिजेत. पुढे काही उद्दिष्टे नमुन्यादाखल दिली
आहेत.
उदा. :- ग्रामीण जीवनाचा परिचय
१) ग्रामीण अर्थरचनेचा परिचय
२) ग्रामीण समाजजीवनाचा परिचय
रूप पालटू शिक्षणाचे(२१)
४) ग्रामीण चालीरीतींचा परिचय
अशी नेमकी उद्दिष्टे, उपउद्दिष्टे मांडता येतील. याप्रमाणेच पुढील प्रकाराने
उद्दिष्टांचे वर्गीकरण करता येईल. उपउद्दिष्टे मांडता येतील.
१) औद्योगिक क्षेत्रातील घडामोडींची जाणीव
२) पर्यावरणातील घटक, समस्या इ. चा परिचय
३) नैसर्गिक संपत्तीचा परिचय
४) सांस्कृतिक परंपरांचा परिचय
५) विकासवाटांचा परिचय
६) सामाजिक समस्यांचा परिचय
७) सामाजिक कार्यक्रमात सहभाग
८) आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव
९) इतिहासाचा परिचय
१०) कलाकृतीचा रसास्वाद
११) कलाकृतीची निर्मिती / निर्मिती प्रक्रियेची ओळख
सहाध्यायदिन उपक्रम
एकदा सहाध्यायदिनाचे प्रधान उद्दिष्ट निश्चित झाले व त्यातील उपउद्दिष्टे मांडून झाली
की त्याला समर्पक एक अथवा अनेक उपक्रम शिक्षक आपल्या अनुभवांतून निवडू
शकतो. असे काही उपक्रम खाली सुचवले आहेत.
१. संस्था भेटी -(मुख्यत: पुण्याच्या परिसरातील संस्था सुचवल्या आहेत.)
१) कारखाने - अ) मोठे उद्योग ब) मध्यम उद्योग क) लघुउद्योग ड) शेतीवर
आधारित व पूरक उद्योग ई) वीजनिर्मिती
२) संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था - NCL पाषाण, पुणे विद्यापीठ, BAIF
उरळीकांचन, वेधशाळा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी, रेशीम
संशोधन संस्था, Automotive Research Institute, ARDE, ERDL, IUCCA,
GMRT, MACS, EMRC, FTI, NDA, CWPRS, भारत इतिहास संशोधन मंडळ,
डेक्कन कॉलेज, भांडारकर प्राच्य संस्था, इंजिनीअरिंग कॉलेज,
३) सामाजिक संस्था - ज्ञान प्रबोधिनी, पाणी पंचायत, मुक्तांगण, बालग्राम,
वनराई, राळेगणसिद्धी, विज्ञानाश्रम, उद्योगधाम
(२२) रूप पालटू शिक्षणाचे ४) शासकीय संस्था - जलशुद्धीकरण केंद्र, पुणे महापालिका, जिल्हा परिषद,
शासकीय कार्यालये, पोलीस मुख्यालय, न्यायालय, पुणे टेलिफोन, कारागृह, GPO,
कृषिउत्पन्न बाजार समिती, रुग्णालये (ससून, जहांगीर इ.)
५) संग्रहालये- राजा केळकर संग्रहालय, संधिपाद प्राणी संग्रहालय, सर्पोद्यान,
महात्मा फुले संग्रहालय इ.
२. समूह अभ्यास - १) परिसंस्थेचा (Ecosystem) अभ्यास २) धरणे, पाझर
तलाव इ. ३) वनस्पती, प्राणी, दगड इ. जमा करणे व त्यांचा अभ्यास करणे ४)
स्वत:च्या गावाचा परिचय ५) पक्षीनिरीक्षण ६) आकाशदर्शन ७) नदीच्या पात्राचा ।
प्रणालीचा अभ्यास
३. समाजाचा अभ्यास- १) ग्रामीण भागाचे सर्वेक्षण २) झोपडपट्टयांचे सर्वेक्षण
३) लघुउद्योगांचे सर्वेक्षण ४) एखाद्या प्रश्नाच्या / विषयाच्या अनुषंगाने सर्वेक्षण
४. व्यक्तींशी संवाद - १) कवी / लेखक / शास्त्रज्ञ / सामाजिक कार्यकर्ते / नेते |
प्रशासकीय अधिकारी | खेळाडू यांच्याशी गप्पा व त्यांतून परिस्थितीची जाणीव २)
एकत्रितरीत्या गटाने लेखन करणे ३) एखाद्या विषयावर परिसंवाद-चर्चा ४) व्याख्याने
ऐकणे व त्यावर चर्चा ५) व्यावसायिकांच्या मुलाखती घेणे ६) अन्य प्रांतीय ।
अन्य भाषिक यांच्या मुलाखती घेणे.
५. कृतियुक्त उपक्रम - १) हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णसेवा करणे २) शेतात काम
करणे, ३) कारखान्यात काम करणे ४) कारागिरांबरोबर काम करणे
५) दिवसभराचे श्रमकार्य करणे ६) पथनाट्ये सादर करणे ७) नव्या भाषेची प्राथमिक
कौशल्ये शिकणे ८) नवी कौशल्ये शिकणे.
६. कलाकृतीचा आस्वाद - १) समूहात चित्रपट / नाटक पाहणे व त्यावर चर्चा २)
एकत्र पुस्तक वाचणे व चर्चा ३) एकत्र प्रदर्शन पाहणे व चर्चा ४) प्राचीन शिल्प पाहणे,
चर्चा व अभ्यास
वर सुचविलेले अथवा अन्य उपक्रम सहाध्यायदिनासाठी योजता येतील.
सहाध्यायदिन पूर्वतयारी
सहाध्यायदिनाच्या यशस्वितेत शिक्षक व विद्याथ्र्यांच्या मनापासूनच्या
सहभागाचा मोठा वाटा असतो. हा उत्कट सहभाग बौद्धिक, मानसिक व प्रत्यक्ष कृतीच्या
रूपाने व्यक्त होत असतो. असा सहभाग वाढण्यासाठी सहाध्यायदिनातील काही
भागाचे पूर्वनियोजन चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.
रूप पालटू शिक्षणाचे(२३)
मार्गाने त्या विषयावरील पुरेशी माहिती गोळा केलेली असावी.
२) उपक्रमाशी संबंधित व्यक्तींशी पुरेसा आधी सविस्तर व स्पष्ट पत्रव्यवहार झालेला
असावा. या पत्रव्यवहारात सहाध्यायदिनाचे हेतू, उद्दिष्टे व रूपरेषा थोडक्यात मांडल्यास
या उपक्रमाच्या वेगळेपणाची जाणीव संबंधित व्यक्तींना होऊन त्यांचे अधिक सहकार्य
मिळू शकेल.
३) शिक्षकाने अथवा त्या विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीने जर त्या विषयाच्या परिचयाचे
एखादे व्याख्यान सहाध्यायदिनाच्या आधी दिले तर मुलांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट
होतील. हे व्याख्यान मुलाची त्या विषयातील उत्सुकता वाढवेल इतकेच मर्यादित
स्वरूपाचे असावे.
४) काही विद्यार्थ्यांनी त्या विषयावरील काही थोडे वाचन केलेले असावे. त्यावर
वर्गात चर्चा झालेली असावी. या चर्चेत मुख्यत: सहाध्यायदिनाच्या दिवशी आपण
कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळवणार आहोत असे काही प्रश्न पुढे यावेत.
५) शक्य असेल तर विद्यार्थ्यांच्या वह्यांमधे या प्रश्नांची, शंकांची, मुद्यांची नोंद
असावी; ज्यामुळे सहाध्यायदिनाच्या वेळी या चर्चेचा संदर्भ ताजा राहील.
६) आवश्यक असेल तर शिक्षकाने हा उपक्रम जेथे योजला आहे त्या जागेस पूर्वी
भेट देणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे येऊ शकणाच्या संभाव्य अडचणींची कल्पना येऊ
शकेल.
७) सहाध्यायदिनाच्या दिवशी जे साहित्य आवश्यक आहे त्याची यादी करून ते
साहित्य मुलांच्या मदतीने पुरेसे आधी मिळवून ठेवणे आवश्यक आहे.
८) ज्या उपक्रमात मुलाखती घ्यायच्या असतील, सर्वेक्षण करायचे असेल तेथे
मुलांकडून प्रश्नावल्या तयार करून घ्याव्या लागतील.
९) सहाध्यायदिनाच्या दिवशी जर शिक्षकांच्या जोडीने त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती
मुलांबरोबर त्या उपक्रमात सहभागी होऊ शकली तर मुलांना परिपूर्ण माहिती मिळणे
शक्य होईल. पण शक्यतो ही भूमिकाही शिक्षकानेच करावी.
१०) पूर्वतयारीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांना प्रेरित करणे हाच होय.
त्यासाठी वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात
सहाध्यायदिन उपक्रमासंदर्भात संवाद निर्माण झाला पाहिजे.
११) जेथे आवश्यक असेल तेथे वर्गाची छोट्या गटांमधे विभागणी करून गटप्रमुख
नेमावेत. त्या त्या गटांना विशिष्ट उद्दिष्टे द्यावीत. पूर्वतयारीच्या कामांची विभागणी करून
(२४) रूप पालटू शिक्षणाचे पूर्वतयारीच्या कामांत मुलांना सहभागी करून घ्यावे.
१२) सहाध्यायदिनात ज्या विषयाचे अध्ययन झाले असेल त्याचे टिपण वर्गाने सादर
करावयाचे आहे अशी पूर्वकल्पना मुलांना देऊन ठेवावी.
सहाध्यायदिनाच्या वेळी
प्रत्यक्ष सहाध्यायदिनाच्या वेळी जर पूर्वतयारी व्यवस्थित झाली असेल तर मुले
उपक्रमात बुडून जातात. या वेळी शिक्षकांनी अभ्यासविषयासंदर्भात व विद्यार्थ्यांची
निरीक्षणे नोंदवून ठेवावीत. विचार करायाला लावणारे प्रश्न निर्माण करावेत. प्रश्नांची
उत्तरे द्यावीत. मुले व इतर व्यक्ती यांतील दुवा बनावे.
या वेळात शिक्षकाने शिक्षकाची भूमिका कमी व प्रेरकाची भूमिका अधिक
करावी. शक्य तेथे स्वत: प्रकाशचित्रे काढून ठेवावीत म्हणजे मग नंतर चर्चेच्या वेळी
याचा उपयोग होतो.
सहाध्यायदिनानंतर
सहाध्यायदिनानंतर त्याचे अनुधावन केले नाही तर घेतलेले सर्व श्रम वायाच
जातील. त्यामुळे नियोजनातच या मागोव्याची योजना आखलेली असावी. असा मागोवा
अनेक पद्धतींनी घेता येईल.
१) विद्याथ्र्यांनी सहाध्यायदिनाच्या वेळी घेतलेल्या अनुभवांवर मुक्तलेखन करावे.
२) सहाध्यायदिनाच्या उपक्रमांची जी उद्दिष्टे शिक्षकांनी ठरवली असतील त्याच्या
आधारे मुद्दे काढून मुलांनी लेखन करावे.
३) उद्दिष्टांच्या आधारे प्रश्नावली तयार करून ती मुलांकडून भरून घ्यावी. व तिचे
विश्लेषण करून त्या आधारे वर्गात चर्चा घ्यावी.
४) त्या दिवशी घेतलेल्या विशेष अनुभवांवर, जाणवलेल्या प्रश्नांवर, शिकलेल्या
कौशल्यांवर, घेतलेल्या माहितीवर वर्गात चर्चा व्हावी, घ्यावी.
५) वर्गाची छोट्या गटांत विभागणी करून प्रत्येक गटाला त्या दिवशीच्या अनुभवातील
अनुभव वाटून देऊन मग त्या गटाने त्याच्या आधारे छोटे टिपण लिहावे. ह्या टिपणांचे सर्वांसमोर
वाचन, निवेदन व्हावे. त्या अनुषंगाने प्रतिक्रिया देत चर्चा व्हावी.
६) विद्यार्थ्यांनी जर त्या दिवशी काही प्रश्नावल्या भरून घेतल्या असतील तर त्याचे
विश्लेषण करून त्या आधारे निष्कर्ष काढावा. या सा-याचा अहवाल तयार करावा.
७) अशा उपक्रमांतून काही नवे उपक्रम सुचले तर ते करण्याचा आग्रह धरावा.
त्यासाठी नजीकच्या काळात मुलांना संधी उपलब्ध करून द्यावी.
८) काही विद्यार्थ्यांना त्या विषयांतील अधिक वाचण्यासाठी, पाहण्यासाठी प्रेरित
करावे.
रूप पालटू शिक्षणाचे(२५)
प्रतिवृत्त लिहावे. त्यांत पुढील मुद्दांचा समावेश असावा.
१) तांत्रिक माहिती
२) उद्दिष्टे
३) त्या दिवशीचा कार्यक्रम
४) शिक्षकाने केलेली विशेष निरीक्षणे
५) कोणती उद्दिष्टे साध्य झाली / साध्य झाली नाहीत ? का ?
६) नवीन काही प्रश्न जाणवले व मनात आले का ?
७) एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा लक्षात आला का ?
८) अभ्यासाची एखादी नवी पद्धती, मनुष्य स्वभावाचा नवा पैलू, नवे क्षेत्र, नवी
साधने लक्षात आली का ?
९) मूळ योजनेत आलेल्या अडचणी, त्यांवर केलेले उपाय
१०) पुढच्या काळात या प्रकारचा सहाध्यायदिन यशस्वी करण्यासाठीच्या
सूचना
११) वर्गात घेतलेल्या मागोव्याचा सारांश व मुलांच्या प्रतिक्रिया
(२६) रूप पालटू शिक्षणाचे