वाग्वैजयंती/अर्पण पत्रिका
<poem>
सत् -- चित्-हृत्-महत् आनंद-पदवी-प्रदान-वदान्या ॥1॥ प्रीतीची पवित्रता, चिरंतनाची चरित्रता, सृष्टीची सचित्रता, विश्वाची विविधता, अनंताची अगाधता, ईश्वराचे अस्तित्व या सर्वांच्या अचल ऐक्याची प्रत्यक्ष निदर्शना ॥2॥
भूतकालांतली भावजीवना, वर्तमानांतली वरतराशा, भवितव्यांतली भाग्यदेवी ॥3॥
हृदयाची स्फूर्ति, इच्छेची पूर्ति, मांगल्याची किर्ति श्री हृदयशारदा ही सर्वस्वाने अर्पिलेली 'वाग्वैजयंती' सदैव कंठांत धारण करो !
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |