सप्ताह-पारायण पध्दति

कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन " मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान्‌ श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.

सोमवार - अध्याय १ व २ मंगळवार - अध्याय ३ व ४ बुधवार - अध्याय ५ व ६ गुरुवार - अध्याय ७ व ८ शुक्रवार - अध्याय ९ व १० शनिवार - अध्याय ११ व १२ रविवार - अध्याय १२ व १४ रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा (जमल्यास रोज जप करावा)

शिवमानसपूजा

श्रीगणेशाय नम: ॥

रत्‍नै: कल्पितमासनंहिमजलै: स्नानं च दिव्यांबर । नानारत्‍नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् ।
जातीचंपकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा । दीपं देव दयानिधे पशुपते ह्रत्कल्पितं गृह्यताम् ॥ १ ॥

सौवर्णे मणिखण्डरत्‍नरचिते पात्रं घृतं पायसं । भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रंभाफलं पायसम् ।
शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं । तांबूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ॥ २ ॥

छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं । वीणाभेरिमृदंग काहलकलागीतं च नृत्यं तथा ।
साष्टांग प्रणति: स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया । संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ॥ ३ ॥

आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं । पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थित: ।
संचार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्राणि सर्वा गिरो । यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् ॥ ४ ॥

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा । श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम् ।
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व । जयजय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॥ ५ ॥

इति श्रीशिवमानसपूजा समाप्त ॥

</poem>

  हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.