सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १५०१ ते १६००
<poem> मायादि तृणांत सहजचि जाहलें । यास्तव हें स्वभावेंचि उद्भवलें । यया नामरूपीं उगेंचि कल्पिले । प्रकार दोन ॥१॥येक स्वाभाविक आणि दुसरें । ईक्षणें निर्मिलेंसे ईश्र्वरें । दोन्ही मायासामर्थ्य परि निमित्तमात्रें । जाण त्या हेतूचें ॥२॥मायास्फूरण जाहलें सहज । तेथें स्मरणास्मरण दोन्ही बीज । स्मरण तें कळणें ज्ञान चोज ं अस्मरण न कळणें अज्ञान एवं विद्या अविद्या सहज जाहलिया । त्यांत सहजीं पडणें आपसया । प्रतिबिंबा नामें दोहींचिया । जिवेश्र्वर दोनी ॥४॥इतुकें सहज जाहलें निर्माण । हें स्वाभाविक बोलावें वचन । पुढें सहजचि परी कल्पावें भिन्न । कीं ईशें निर्मिलें ॥५॥विद्या प्रतिबिंबित ईश्र्वर । सर्वज्ञ ज्ञानाभास चतुर । तया ईक्षणमात्रें नाना प्रकार । होते जाहले ॥६॥प्रथम गुण शक्तीसहित । सत्त्वगुण तोचि ज्ञानशक्ति विख्यात । क्रियाशक्ति रजोगुणयुक्त । द्रव्याशक्ति तमोगुण ॥७॥तमोगुणाची द्रव्यशक्ति । तेचि पंचभूतें स्पष्ट दिसती । जयांचे पंचविषय बोलिजेती । अनुक्रमेंकडूनी ॥८॥आकाश वायु तेज आप भूमि । हीं पांच भूतें सविषय नामीं । शब्द स्पर्श रूप रस गंधानुक्रमीं । हे पंचविषय पांचांचे हेचि मुख्य पंचमहाभूतें । यांपासून तीं भौतिकें समस्तें । जे करून केलीं पंचीकृतें । तीं निरोपिलीं मागां ॥१५१०॥अवघियां मिळून चारी खाणी । पांचवी मानसिकाची उभवणी । इतुकींही भौतिकात्मक खाणी । भूतेंविण पदार्थ नसे कल्पनेनें सहज जाहलें तें मानसिक सहज उद्भवलें । जारापासून जे जन्मले । ते जरायुज ॥१२॥अंडापासून जे जे होत । ते ते अंडज बोलिजेत । स्वेदापासून जे जे निर्मित । ते ते स्वेदज ॥१३॥उद्भिजाचे प्रकार दोन । एक वायूपासून होती निर्माण । दुसरे वृक्षादि तृणांत संपूर्ण । स्थावर बोलिजे ॥१४॥स्थावरात्मक ते न चालती । भूमींत समूळ रोविले असती । तेथें प्राण किंचित् न वाहती । म्हणोनि जड ॥१५॥येर उरले ते जडचि असोनी । प्राणास्तव चालती खाती म्हणोनी । जंगम ऐसें बोलिजे वाणी । एवं प्रकार दोन जडाचे एवं इतुकें हें दृश्य ब्रह्मांड । त्यांत सान थोर नानापिंड । सर्वही नामरूपात्मक झाड । मायामूळाचें ॥१७॥इतुकियासी आधार एक । अधिष्ठान ब्रह्म निश्चयात्मक । सर्वीं अस्ति भाति प्रियात्मक । ज्यावरी नामरूपें दिसतीं जैसें एक आकाश निश्चळ । त्यांत सान थोर घट सकळ । मडकीं रांजण बोळकीं परळ । अथवा नानाविध पात्रें ॥१९॥तैसें परब्रह्म जें निघोट । त्यामाजीं ब्रह्मांड हा मठ । तया मठीं नाना पिंड घट । दाट ठेविले ॥१५२०॥कित्येक जळें असती भरले । ते ते पिंड जंगम बोलिले । कित्येक कोरडे असती ठेविले । ते सूक्ष्माविण स्थावर ॥२१॥कोरडे घटीं जलाकाश न दिसे । परी व्यापकपणें आकाश असे । सूक्ष्मावीण जीवेश नसे । परी ब्रह्म असे स्थावरीं ॥२२॥आहे दिसे आणि चांगुलें । हे अस्ति भाति प्रिय संचलें । यया अधिष्ठानीं रूप तें आकार आलें । नाम ठेविलें ओळखीसी आतां सजल घट ते जंगम । जे जे सप्राण उत्तमाधम । त्यांत अस्ति भाति प्रिय परम । आणि सूक्ष्मासह जीवेश ॥२४॥सुवर्णादि घट धातूंचे । तैसे उत्तमोत्तम पिंड देवाचे । मध्यम मानव जेवीं खापराचे । शेणादिकांचे कीटक ॥२५॥ऐसे घटपिंड चिदाकाशीं । मांडिले असती एकरसीं । त्यांत वास्तव्य ज्ञानक्रिया दोहींसी । सत्त्वरजात्मक ॥२६॥देहमात्र साकार जितुका । तमोगुण द्रव्यशक्तीचा तितुका । या सर्वांमाजीं संघ हा आसिका । असे जीवेशांसह ॥२७॥इतुकें वेगळालें पाहणें नलगे । एका देहाचें पहावें अंगें । सर्वही माया अविद्यादि सोंगें । अनुभवा येती ॥२८॥जेवीं घट उदंड गगनीं असती । तितुके भिन्न पहावे न लगती । एका घटाची कळतां रीती । सर्व कळले ॥२९॥तैसेंचि जयासी वाटे विचारावे । तेणें आपुले देही पहावें । सर्व पदार्थमात्र अनुभवावे । मग सर्वों आणावे प्रत्यया ॥३०॥घटामाजीं जैसें जल । तैशी सूक्ष्मदेहाची चळवळ । जयाचीं सत्रा तत्त्वें सकळ । परी कोश तीन ॥३१॥उगे चंचळपणें वावरती । तें पंचप्राण नखशिख वाहती । तेणें आधारें पांच क्रिया उमटती । बाह्य कर्मेंद्रियांच्या ॥३२॥वाचेचें बोलणें पणि देत घेत । पाद चाले उपस्थ रति भोगित । गुदेंद्रिय मळमूत्रविसर्ग करित । हे क्रियाशक्ति प्राणाची एवं दहा प्रकार क्रियेचे । प्राण कर्मेंद्रिये प्राणमयाचे । ऐसेच ज्ञानशक्ति मनोमयाचे । सहा प्रकार ॥३४॥चंचळपणीं वावरावें । परी पदार्थमात्र ओळखावे । निश्चयेंविण संशयीं पडावें । तेंचि मन ॥३५॥तेंचि पांचा द्वारे निघोनी । बाह्यविषयीं पडे जाउनी । ज्ञानेंद्रिय नाम त्या द्वारा लागुनी । श्रोत्रत्वक् चक्षु जिव्हा घ्राण ॥३६॥ऐकणें स्पर्शणें पहाणें । रस कळे गंध घेणें । हे पांचही ओळखावे मनें । परी संशय न फिटे ॥३७॥एवं ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हें मनोमयकोशाचें लक्षण । हें प्राणमयाचे अंतरीं जाण । त्याहून सूक्ष्म असे ॥३८॥जैशी मनासी ज्ञानशक्ति । तैशीच बुद्धीसी ज्ञानस्फूर्ति । परी संशयरूप मनाची व्यक्ति । बुद्धि निश्चय करी ॥३९॥या बुद्धीसीही ज्ञानेंद्रियद्वारा । जाणें असे शब्दादि व्यापारा । म्हणोनि तेचि पांच साहाकारा । बुद्धीसी असती ॥४०॥तस्मात् पांचही ज्ञानेंद्रिय । सहावी बुद्धि जे करी निश्चय । हाचि जाणावा विज्ञानमय । ज्ञानशक्तीरूप ॥४१॥एवं प्राण मन विज्ञान । हें लिंगदेहाचे कोश तीन । ज्ञान क्रिया शक्ति दोन । असती गुणांच्या ॥४२॥एवं कोशत्रयात्मक सूक्ष्म । सत्रा तत्त्वांचा अनुक्रम । स्थूलदेहामाजीं संभ्रम । घटीं जेवीं पाणी ॥४३॥आर्द्र चंचल जेवीं पाणी । तेवीं विहार प्राणालागुनी । झळके पाणी तेवीं मन विज्ञानीं । ज्ञानशक्ति असे ॥४४॥त्यांत कांहींसा झावळपणा । तेवीं संशयरूपता असे मना । केवळ झळझळ तेवीं विज्ञाना । निश्चयात्मकता ॥४५॥असो ऐसे मन बुद्धि दोन । त्यांत मुख्यत्वें वसती गुण तीन । जें मागां सांगितलें लक्षण । घोर मूढ शांतवृत्ति ॥४६॥एवं स्थूलादि गुणांपर्यंत । स्वाभाविक परी इशानिर्मित सांगितले घट सजलयुक्त । स्थूल सूक्ष्म दोन्ही ॥४७॥आतां ईश जीवाचे उत्पत्तीपूर्वी । जे स्फूर्तिरूप तत्त्वें स्वभावीं । तेही वृत्तीमाजीं पहावी । सूक्ष्मदृष्टी ॥४८॥मुख्य अहंब्रह्मास्मि स्फुरण । जे कां मूळमायेचें लक्षण । तेंही सहजत्वें आठवण । होतसे पिंडीं ॥४९॥तेचि आठवण निर्विकल्प । सर्वदां होतसे आपेआप । परी ते न कळे झडकरी संकल्प । होतां बहिर्मुख होय ॥१५५०॥इकडे आठवण तिकडे नेणीव । हे दोन्ही विद्या अविद्येचे स्वभाव ।आवरण विक्षेप जयेतें नांव । ज्ञानाज्ञान हेंचि मुख्य संकल्पाविण वृत्ति । स्वाभाविक स्फुरे सजगति । तयामाजीं ज्ञानाभास उमटती । जीवेश दोन्ही ॥५२॥विद्याप्रतिबिंबित तो ईश । अस्पष्टपणें प्रेरी जीवास । अविद्या प्रतिबिंबित अनेश । तोही अस्पष्ट ॥५३॥पुढें जेंव्हां संकल्पासहित । मनबुद्धीचे विकार उमटत । ते समयीं जीव स्पष्ट दिसत । यापूर्वीं अस्पष्ट ॥५४॥असो एक स्फुरणरूप मूळमाया । आणि विद्या अविद्या कन्या तिचिया । त्यांत प्रतिबिंबरूप जें नाम तया । जीवेश दोन जैसें पाणी झऱ्यांतून उसळे । तैशी मूळमायेची स्फूर्ति चंचळे । स्वतां पाणी श्र्वेत पाहतां कळे । तेवीं विद्या स्फूर्तीची श्र्वेतपणा असोनि आच्छादिला । नसोनि काळेपणा उमटला । तैसा अविद्या नेणिवेसी जाहला । ठाव विद्यारूप असोनी मुख्य पाणियाचे पाझरीं । आकाश प्रतिभासेना झडकरी । अथवा श्र्वेत काळेपणाही माझारीं । जलाकाश स्पष्ट नव्हे ॥५८॥तैसें मूळ स्फुरणीं जीवेश असती । परी पाहणाराचे अनुभवा न येती । विद्या अविद्येंतही अनुमानिजेती । कीं जल तेथें प्रतिबिंब ॥५९॥स्पष्ट जेव्हां जल स्थिरावलें । तेव्हां आकाश स्पष्ट दिसे बिंबलें । तैसें संकल्प होतां दिसों लागलें । जीवाचें रूप ॥६०॥मूळीं स्फुरणचि असतां चंचळ । परी तें कळेना निवळ । मा त्यांतील प्रतिबिंब सकळ । कोण पाहे ॥६१॥तेचि प्रकृतिपुरुष दोन्ही । ओळखावीं चंचळ जाणीव निवडुनी । त्या दोहींचे परिणाम होउनी । जाहले विद्या ईशादि चंचळपणे जो स्फूर्तीचा । विद्या अविद्या हा परिणाम तिचा । तैसाचि परिणाम ज्ञानाभासाचा । जीवेश दोन्ही ॥६३॥तोचि जडपणा अस्पष्ट होता । स्पष्ट जाला प्राणा आंतौता । इकडे जीवेशाची जे प्रकाशता । बुद्धींत स्पष्ट जाहली प्राण जड असून वावरती । त्यामुळें चंचळ ऐसे दिसती । परी ते जाणती ना कल्पांतीं । म्हणून ते जड ॥६५॥तैसेचि मनबुद्धि हे चंचळ खरे । त्यांत जाणीव दिसे साचाकोरें । परी ते जीवाचे भासकत्वें सारे । विषय निवडिती जैसें पाणी दिसे झळझळित । परी आकाश बिंबतां दिसत । तैसें मनबुद्धि परप्रकाशित । स्वतां चंचळत्वें जड ॥६७॥असो घटजलाचेनि पडिपाडें । देहीं सूक्ष्मदेह निवडे । जलाकाशापरी प्रतिबिंब पडे । जीवेशाचें सूक्ष्मीं ॥६८॥भिंतीसहित ब्रह्मांड मठ । त्यांत उत्तमाधम पिंड घट । घटीं जल जैसें तैसें स्पष्ट । सत्रा कळांचें सूक्ष्म ॥६९॥जल पातळ वोलें चंचळ । तैसा हा प्राणमयकोश सकळ । प्रतिबिंबासहित पाण्याची झळझळ । तैसे जीवासहित संकल्प श्वेतपणा तैशी विद्या । काळाभास तैशी अविद्या । पाझर तैशी मूळमाया । एवं दृष्टांतीं सर्व साम्य ॥७॥पाझरीं किंवा श्र्वेतकाळेपणीं । जलाकाश दिसेना नयनीं । तैशी माया कीं विद्या अविद्या दोन्ही । स्पष्ट नसती जीवेश त्यांत बुद्धीमाजीं जीवत्व एकलें । चिदाभासरूपें स्पष्ट जाहलें । जैसें जलामाजीं प्रतिबिंबलें । सनक्षत्र आकाश ॥७३॥तो चिदाभास वृृत्तीसहित । इंद्रियद्वारा । विषंयांकार होत । जैशा घटछिद्रांतून झळझळित । मठाच्या भिंती ॥७४॥ऐसें स्फुरणादिदेहांत मिथ्याभूत । सांगितलें जड चंचळ समस्त । चिदाभास जो उमटला त्यांत । तोही सद्दष्टांत सांगितला ॥७५॥मिथ्याभूत इतुकेंही जाहलें । तितुकें सद्दष्टांत सांगितलें । आता सत्य परब्रह्म जें संचलें । तें आत्मत्वही देहीं ॥७६॥जैसें मुख्य गगन सर्व मठासी । अंतर्बार्ह्य व्यापून अलिप्तत्वेंसी । घट जल आणि जलाकाशाशीं । व्यापकत्वें संचलें ॥७७॥तैसें ब्रह्मात्मत्व सघन । मायेसी ईशादि अंततृण । इतुकेंही ब्रह्मांड संपूर्ण । व्यापून असे ॥७८॥ब्रह्मांडी जितुके देह सान थोर । आदिकरून हरिहर । या इतुक्या अंतर्बाह्य निर्विकार । व्यापून असे ॥७९॥स्थूलदेहीं सूक्ष्मशरीरीं । जे पंचीकृत अपंचीकृताची परी । तिसरें कारण जे स्फूर्ति निर्धारी । विद्या अविद्यात्मक ॥८०॥त्यांत जीवेश जे प्रतिबिंबित । एवं सकळ धर्म धर्मीसहित । व्यापूनियां असे अनंत । गगन जेवीं सर्व घटीं ॥८१॥ऐसिया अनंताची व्यापकता । जे सचिद्घन सर्वीं परिपूर्णता । ते पुढील पदीं विस्तारता । अन्वयें बोलिजे ॥८२॥परी प्रस्तुत यया पदामाझारीं । जितुकीं मायादि तृणांत सारीं । रूप नाम जितुकें निर्धारी । स्थूल कीं सूक्ष्म ॥८३॥इतुक्याहि नामरूपांहून । भिन्न असे ब्रह्मात्मा पूर्ण । अंतबाह्य जेवीं गगन । परी विलक्षण घटादिकां ॥८४॥स्थूलदेह हा अन्नमय । ज्याची अन्नीं उत्पत्ति स्थिति लय । जेवीं घट सर्वही मृण्मय । तेवींच साकार जितुका ॥८५॥त्यांत सूक्ष्मदेह सत्रा कळांचा । जो त्रिकोशात्मक दृष्टांत जलाचा । प्राण मन विज्ञानमय साचा । जया प्रेरिता ईश आणि प्रतिबिंबरूप जीव । बुद्धीपासून प्रगट स्वभाव । या इतुकियामाजींही स्वयमेव । असून ब्रह्मात्मा वेगळा ॥८७॥हें असो देहद्वयाचें कारण । जें सहजत्वें जाहलें निर्माण । त्यांतही परब्रह्म परिपूर्ण । व्यापून भिन्न सर्वां ॥८८॥विद्याअविद्यामूळमायास्फूर्ति । त्यांत जीवेशही अस्पष्ट प्रतिबिंबती । तया कारणा आनंदमयकोश म्हणती । जेथें सुखैकगती जीवा ॥८९॥एवं अन्नमय स्थूल देहे । प्राणमय मनोमय विज्ञानमय कोशत्रय हे । आनंदमय कारण पाहे । जीवेशासह ॥१५९०॥इतुकेही एकेक देहाआंत । असती स्थूल सूक्ष्म जीवासहित । तितुकेही व्यापून अनंत । सर्वां विलक्षण ॥९१॥आकाश घटीं जलीं जलाकाशीं । व्यापून भिन्न जैसें सर्वांशी । तेवीं स्थूल सूक्ष्म कारण जीवेशीं । व्यापून आत्मा विलक्षण निर्माण तितुकेंवेगळालें । धर्मही भिन्न भिन्न उमटले । तया धर्मधर्मीसहित व्यापिलें । परी नव्हे त्या त्या ऐसें ॥९३॥मिथ्याचे धर्म जे जे अनेक । ते ते आधी करूं रूपक । मग सर्वों विलक्षण केवीं व्यापक । आपेआप कळे ॥९४॥मुख्य परब्रह्म अनंत । केवढें किती नव्हें अंत । तयामाजीं एकदेशी होत । स्फूर्ति रज्जुसर्पापरी ॥९५॥तयेचा स्वभावचि चंचळ । उमटे आटे जेवीं मृगजळ । परी उत्पत्तीसी हेतु सकळ । तेचि एक असे ॥९६॥जल जैसें किंचितही असतां । गगन प्रतिभास दिसे आंतौता । तेवीं वृत्ति निर्विकारेंही स्फुरतां । सत्याचें प्रतिबिंब पडे असो स्फूर्तीचें जें चंचळपण । तेथें सहज विद्या अविद्या होती दोन । अविद्येनें करावें आवरण । हा धर्मचि तिचा ॥९८॥पाणी काळेपणें जरी असे । परी प्रतिबिंब त्यामाजीं दिसे । अविद्येमाजीं प्रतिबिंब तैसें । नेणीव रूप स्फूर्ति ॥९९॥कळणियासी विद्या म्हणावी । तेणें पहावें दिसेल जें स्वभावीं । मग यथार्थ कीं अन्यथा भावी ॥१६००॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |