सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १४०१ ते १५००

<poem> ज्याच्या भयें सूर्य चंद्र चालती । ज्याच्या भयें वायुप्राण वाहती । ज्याच्या भयें अग्नीसी ज्योति । मृत्यु धांवे ज्याच्या भयें ॥१॥भूमीतें धारण द्रवत्व आपीं । काळही युगादि क्षण मापी । ब्रह्मा विष्णु शिव प्रतापी । जयाच्या भयें ॥२॥ऐसा अंतर्यामीं एकला । अंतरीं नियामकत्वें राहिला । सर्व नियंतियां करूं लागला । नियंतृत्व ॥३॥सर्वांचें ज्या ज्या रीतीं होणार । त्या त्याचा प्रेरक निर्धार । त्यावाचून तृणही साचार । पडिलें न हाले ॥४॥ऐसा नियंता सर्वांमाजी । अलिप्तत्वें राहून सहजीं । प्रेरणा करी होणार जी जी । ब्रह्मादि कीटकांत ॥५॥स्फूर्ति विद्याविद्या ज्ञानाज्ञान । मन बुद्धि इंद्रियें प्राण । हें ब्रह्मादि कीटकांत देहीं समान । असे जयापरी ॥६॥तैसेंचि बुद्धींत प्रतिबिंब जयाचें । तो जीव जीवन करी जडाचें । वृत्तींत भासकत्व तया ईशाचें । नाम ईशान शक्तीस्तव ईशन म्हणजे प्रेरणा करावी । होणारा ऐसा बुद्धी योजावी । त्या रीतीं जीवें सुखदुःखें भोगावीं । पराधीनत्वें ॥८॥स्वतंत्रपणें प्रेरणा करी । परी कर्तृत्वाचा अभिमान न धरी । म्हणून अलिप्त निरहंकारी । बंधन न पावे ॥९॥जीवें तरी कांही न करितां । मीच होय या कर्माचा कर्ता । वळें मस्तकीं घेऊन अहंता । बंधनीं पडे ॥१४१०॥ईश विद्यागुणें सर्वज्ञ जाहला । जीव अविद्यागुणें किंचिज्ज्ञत्व पावला । ईश प्रवर्तवीतसे गुणाला । जीव जाहला गुणाधीन ॥११॥ईश आवरणी विक्षेप शक्तीतें । स्वाधीन ठेऊन वर्तवी सर्वांतें । जीव आवरणविक्षेपें गुंते । भ्रांत होउनी ॥१२॥तिहीं अवस्थांत भ्रमे जीव । तें तें तादात्म्य घेऊन सर्व । ईश त्यागून तो तो भाव । अवस्थातीत असे ॥१३॥बुद्धिपासून जीव विषयांत । साभिमान घेऊन विहरत । नुसधी वृत्ति जे निर्विकल्प स्फुरत । त्यांत वसे संचाराविण ईशें प्रेरणा मात्र करावी । जीवें ते ते मस्तकीं घ्यावी । यया उभयानें सृष्टि आघवी । व्यापिली असे ॥१५॥प्रतिबिंबा तरी एकरूपता । परी कर्म भिन्न भिन्न तत्त्वतां । येक भोक्ता येक नियंता । यास्तव भेद जाहला ॥१६॥असो हे दोन्ही सर्वां शरीरीं । असती ब्रह्मादि पिपीलिकांवरी । जीव बद्धता अभिमानें वरी । ईश मूक्तत्वें वसे ॥१७॥उभय सर्वों म्हणतां वस्ती । येथें कोणी कल्पना करिती । कीं निरहंकारी ईश स्वयंज्योति । देहावेगळा राहे ॥१८॥तरी देहावेगळी स्फूर्ति असेना । प्रतिबिंब तो वृत्तीवीण पडेना । तस्मात् देहावीण जे करणें कल्पना । ते न संभवे सहसा आणिक शंका कीं वृत्तींत बिंबलें । वृत्तीवीण स्थळ रितें पडलें । ईश तो सर्वव्यापी शास्त्र बोले । या विरोधा उत्तर देऊं ईशसत्ता सर्वत्रीं असे । परी स्वतां ईश वृत्तींत वसे । जेवीं सार्वभौम राजधानी राहत असे । आज्ञा सर्व जगती ॥२१॥मागुती म्हणतील येकत्र असतां । अन्य स्थळीं उगीच चाले सत्ता । तरी एकचि राजधानी साकारता । विष्णूची कां न म्हणावी ॥२२॥कीटकांत अन्य देहीं जीव । राहे परी ईशाचा अभाव । विष्णूचे साकारीं ईश स्वयमेव । असे अभाव जीवाचा ॥२३॥तरी पहा कीटका माझारीं । वृत्तीची स्फू र्ति नसे निर्धारी । वृत्ति असतां प्रतिबिंबता खरी । कैशी न ये बिंबा ॥२४॥विष्णूचे अंतरीं काय बुद्धि नसे । म्हणून जीवाचें प्रतिबिंब न दिसे । बुद्धीच नसतां व्यापारही कैसे । होतील देहाचे ॥२५॥बुद्धि तेथें जीवाचें प्रतिबिंब । वृत्ति तेथें ईशाचें डिंब । जडीं मात्र नसती आदिस्तंब । वृत्ति बुद्धि अभावी ॥२६॥तस्मात् साकार तितुका जडाविण । उत्तमाधम सप्राण । तयामाजीं वृत्ति बुद्धि दोन । असती निश्चयें ॥२७॥मग असो साकार शिवादिकांचा । अथवा देह कीटकाचा । वृत्ति या उद्भव दोहींचा । तेथें जीवेश असती ॥२८॥जैसें सूर्याचे तळवटीं । जळ भरोन ठेविलें घटीं । त्यांत प्रतिबिंब पडेलच उठाउठी । मग सान थोर कीं बहुत ॥२९॥तैसें ब्रह्मादि कीटकांत जितुकें । साकार सुबुद्धि वृत्ति तितुकें । त्यामाजीं जीवेश हे निके । आभासरूप भासती ॥३०॥येथेंही म्हणतील कोणी । कीं घटीं येक प्रतिबिंबा उभवणी । येथें प्रतिंपिडीं आभासती दोन्ही । कैसें तें अवधारा उथळ जळीं स्पष्ट दिसतें । सखोल जळींचें दिसेना तें । आंतचे आंतचि झळफळितें । सूक्ष्म दृष्टीनें दिसे ॥३२॥तैसें बुद्धिचें रूप उथळ । तेथें जीवत्व दिसे टळटळ । वृत्तीचें रूप सूक्ष्म केवळ । म्हणून प्रतिबिंब अस्पष्ट ॥३३॥तेंही सूक्ष्म दृष्टीनें दिसे । कार्यावरून अनुमाना येतसे । बुद्धि विकल्पाहून जीवाचें जैसें । तैसें प्रेर्य प्रेरक समजावें ॥३४॥प्रेर्य तो हा जीव वावरे । तेव्हां प्रेरिला असे ईश्र्वरें । यया जीवत्वाचेनि अनुकारें । ईशही असे ऐसा ॥३५॥ती वृत्ति अनुभवावी बुद्धीवीण । त्यांस ईश होय भासमान । बुद्धीच्या योगें वृत्तीचें अभान । मा ईश कळे कैसा ॥३६॥प्रेरक सामर्थ्याहून पहावा । बोलता शंका वाटेल जीवा । कीं विष्णु सामर्थ्यवान स्वभावा । तेथें ईशत्व प्रत्यया ये ॥३७॥तैसे सामर्थ्य कीटकांत नसे । तरी ईशत्व तेथें कैसें असे । या आक्षेपीं बोलिजे अल्पसें । अवधारावें ॥३८॥विष्णूचें सामर्थ्य जें दिसतें । तें तें जीवाचें जाणावें समस्तें । ईश सामर्थ्य न दिसे आहे तें । प्रेरणात्मक ॥३९॥सिंहामाजीं हत्ती विदारी । मांजर होऊन उंदीर मारी । हे उपाधीस्तव उंच नीच परी । परंतु जीवधर्म ॥१४४०॥तैसे विष्णूच्या देही सामर्थ्य मोठें । कीटका तृण उचलितां नुठे । परी तें जीवाचें कर्म गोमटें । दोहीं ठायीं ॥४१॥ईशाची कर्मचि असेना । उगीच जीवाची करी प्रेरणा । म्हणून ईश्र्वर स्थूल दृष्टी दिसेना । जीवत्व दिसे ॥४२॥तस्मात् ब्रह्मादि कीटकांत देहीं । जीवेश असती निःसंदेही । येक दिसे येक न दिसे पाही । स्पष्टास्पष्ट म्हणोनी ॥४३॥हीं वचनें मानिती अप्रमाण । तरी या अर्था बहुत प्रमाण । गीतेमाजीं भगवान । अर्जुना सांगे ॥४४॥ईश्र्वर हा यंत्रारूढ होऊन । हृदयीं सर्वां स्वतां राहून । सर्व भूतांतें स्वमायेकडून । प्रेरणा करी ॥४५॥ऐसेंचि वृत्तींत शिव असे यासी । श्रुति प्रमाण निश्चयेंसी । माया आणि अविद्या ऐशी । आपुल्या आभासीं निर्मी दोघां माया म्हणजे विद्यात्मकवृत्ति । अविद्या तेचि नेणीव स्फूर्ति । हे दोन्ही येकरूप असती बुद्धि उद्भवेना तंव ॥४७॥बुद्धि उद्भवतां बुद्धींत । जीवत्व प्रवृत्तीकडे येत । म्हणून स्पष्टत्वें दिसूं लागत । ईश नोव्हे तैसा ॥४८॥विद्यास्फूर्तींत ईश्र्वर । ये बुद्धीसी विक्षेप करणार । बुद्धींत न येती निमित्तमात्र । असती म्हणोनी ॥४९॥अविद्यात्मक जीव उपादान । विद्यात्मक ईश निमित्तकारण । जैसें कुल्लाळ मृत्तिका दोन । घटकार्या असती ॥५०॥घटामाजीं मृत्तिका येत । तेवीं उपादानत्वें जीव बुद्धींत । कुल्लाळ घटाहून भिन्न राहत । तेवीं भिन्न राहे ईश ॥५१॥विद्या जरी बुद्धींत प्रवेशे । परी ईशत्व न ये जीवसहवासें । अथवा विद्यासह ईश प्रतिभासे । तरी तो परिणाम ॥५२॥प्रेरणाकार्य ईशासी जोंवरी । ईशही सरूप सनाम तोंवरी । तें कार्य नसतां नाम ईश्र्वरीं । कोठें उरे ॥५३॥बुद्धीमाजीं जरी येता । प्रेरणाकार्या होय त्यागिता । तैसाचि सुषुप्तिकाळ होतां । ईश सकार्य नाम सांडी ॥५४॥जीव जैसा अज्ञानगर्भी उरे । तैसेंचि आनंदकोशीं ईशत्व स्थिरे । विज्ञानात्मा जीवा नाम वारे । प्रज्ञानात्मा ईश ॥५५॥हे दोन्ही कारणात्मा शुद्ध । त्यांतचि मिळून राहती अभेद । जेव्हां प्रवृत्तीचा उभारा विशद । तेव्हां दोघे उद्भवती ॥५६॥जीवाच्या प्रारब्धदशेचा उभारा । तेव्हां बुद्धियोगें ये जागरा । तयाचा प्रेरक ईश हा खरा । तितुक्या विक्षेपकाळीं ॥५७॥पुन्हा बुद्धीचे तरंग नाना । होत असती जे क्षणाक्षणां । तेही ईश्र्वराची प्रेरणा । परी ते विकार जीवाचे ॥५८॥तूं म्हणसी तो अंतर्यामीं । ओळखीस न ये अनुक्रमीं । तरी तो अतिसूक्ष्म सुखधामीं । आहाच पाहतां न कळे ॥५९॥पटामाजीं तंतु ओळखितां । प्रतीतीस येत असे तत्त्वतां । परी तंतूचे अंतरीं अंशु असतां । स्थूळदृष्टी दिसेना ॥६०॥तैसा बुद्धीचा आभास कळों येतो । परी विद्याप्रतिबिंबीं कळेना तो । तोही सूक्ष्म अनुभवा कळतो । अंशु सूक्ष्मदृष्टी जेवीं पहा पहा बुद्धीविण जीव । जो नुसधा अविद्यात्मक भाव । तयाचाही नव्हे अनुभव । बहिर्मुखत्वें ॥६२॥बुद्धिअभावीं जीव दिसेना । मा ईश कैसा ये अनुमाना । न कळे म्हणून न करावी कल्पना । जीवेश अभावाची ॥६३॥बुद्धि उद्भवे आणि नासे । परी विद्याअविद्यात्मक वृत्ति न नासे । त्या दोहींमाजीं असताचि असे । जीवत्व ईशत्व ॥६४॥तस्मात् जयासी पहावें वाटे । तेणें अंतर्मुख व्हावें नेटे । विशेष बुद्धीचा तरंग नुठे । तेव्हां वृत्ति अनुभवावी ॥६५॥या वृत्तींत कळणें न कळणें । दोन्हीही असती समानें । तेचि विद्याअविद्येचीं लक्षणें । आवरण विक्षेरूपें ॥६६॥जया अधिष्ठानीं वृत्तिं । उद्भवली तया होती नेणती । जाणूं लागे चंचल स्फूर्ति । सहित कार्य जें जें ॥६७॥स्फूर्तिसी जाणे तेचि विद्या । येर न जाणे ते अविद्या । ह्या दोन्हीं समजाच्या आद्या । सूक्ष्मदृष्टी ॥६८॥यांत चिद्रूप ज्ञानाऐसें । ज्ञान स्फूरे जे मिथ्या आभासें । तेंचि जीवेश जाणावें अभ्सासें । तेव्हां कळती ॥६९॥परी त्यांतही मुख्य बिंबात्मा । सामान्यत्वें ज्ञानघन आत्मा । तोचि जाणावा कारणात्मा । त्याहून भिन्न हे दोन्ही ॥७०॥तो ब्रह्मप्रत्यगात्मा ज्ञानघन । ब्रह्मादि तृणांत अविच्छिन्न । जो स्वप्रकाशें भासवी संपूर्ण । आणि लयही जाणे ॥७१॥जो या श्र्लोकीं निरोपिला । रूपादिसह बुद्धि व्यापाराला । बुद्धि आणि निर्विकल्प वृत्तीला । सहज प्रकाशी ॥७२॥अविद्याविद्या जीवशीव । निर्माण तितुकें प्रकाशी सर्व । याहून प्रतिबिंबित जो स्वभाव । जीवेशांचा भिन्न ॥७३॥जैसा सूर्य भिंती अंगणें घरें । घट जळ प्रतिबिंबादि सारें ।एकदांचि प्रकाशी साचोकारें । तैसा आत्मा प्रकाशी ॥७४॥घटजळीं जो बिंबला । तो सूर्याहून वेगळा जाहला । तैसा आभासरूपें वृत्तींत उमटला । तो स्वरूपाहून भिन्न ॥७५॥वृत्तीचा उगाच चंचळपणा । त्यांत जाणिवेची बिंबित लक्षणा । येक चिद्रुपाचा व्यापकपणा । एवं दोन्हीही सत्यमिथ्या सत्य तो व्यापक बिंबात्मा । मिथ्या तो प्रतिबिंब अनात्मा । हे दोन्ही जो निवडी महात्मा । विचारदृष्टीनें ॥७७॥मिथ्यात्वें मिथ्याचा करी त्याग । सत्य तें सत्य होय अंगें । परी दोन्हीही समजावें अध्यंग । सत्य आणि आभास ॥७८॥सूर्यदृष्टांती जळीं व्यापकता । नसे म्हणून न ये सभ्यता । परी सत्यमिथ्या चिदाभासता । निवडून गेली ॥७९॥आतां वृत्तींतचि येक प्रतिबिंब । दुसरें व्यापकत्वें चिद्रुप स्वयंभ । हें स्पष्ट कळावें सुलभ । ऐसा दृष्टांत देऊं ॥१४८०॥घटीं जल घालितां भासत । आकाशापरी आभास दिसत । दुसरें शुद्ध गगन सर्व घटांत । न दिसतां व्यापून असे ॥८१॥व्यापलें तें जला आदि अंती । आहे तैसें असे निश्चितीं । तैस स्फूर्तींत व्यापक जो चिन्मूर्ति । वृत्ति अभावीं सत्य ॥८२॥जलाभास जल तोंवरी दिसे । जल नसतां भासकता नासे । तेवीं वृत्तींत प्रतिबिंबरूप भासे । तें नासे वृत्तीसर्वे ॥८३॥जें वृत्तिबुद्धींत प्रतिबिंबलें । चिद्रूपा ऐसे उगेंच भासलें । तया मिथ्यासी नाम ठेविलें । जीवेश दोन ॥८४॥येक विकल्प दोष गुणाचा । करितो जीव बुद्धिगत साचा । दुजा प्रेरकजीवाचे कर्माचा । नुसते वृत्तीचा आभास ॥८५॥असो जीवें केलें तें जीवनिर्मित । ईशें केलें तें ईश्र्वरद्वैत इतुकेंही कार्यरूप जगत । आणि जीवेश कारण ॥८६॥इतुकियाही दृश्यभासाहून । स्वप्रकाश ब्रह्म आत्मा ज्ञानघन । वेगळा असे सर्वात असून । निर्विकारें असंग ॥८७॥जैसें घटजळीं असोन गगन । सर्वांवेगळें व्यापकपण । जळाचे विकार अनान । न स्पर्शती तया ॥८८॥तैसेंचि सर्व जग जीवेशसाहित । चंचळ जड दृश्य भास समस्त । इतुकियांमाजींही चित्प्रभा व्याप्त । परी वेगळी सर्वांहूनी तेंचि आतां पुढील श्र्लोकीं । विवेचना कीजे निकी । येथें सावधान असावें साधकीं । यया निरूपणीं ॥१४९०॥सर्व मागील आलोढून आलें । निरूपण जितुकें होऊन गेलें । सर्व पदार्थमात्र निवडले । तिनुकाही अनुवाद येथें ॥९१॥तस्मात् अतितर सावधान । सांग घडत असे विवेचन । अनात्मजात निरसून । आत्मत्वें आत्मा भेटे ॥९२॥रुपाच्च गुणदोषाभ्यां विविक्ता केवलाचितिः । सैवानुवर्तते रुप रसदीनां विकल्पने ॥८॥रूपाहून गुणदोषांहूनी । वेगळी चित्प्रभा सर्वां भासउनी । तेचि व्यापक असे सर्वांलागुनी । रूपरसादि विकल्पासह रूपाहून वेगळे म्हणितलें । ईशनिर्मित तितुकेंही आलें । रूप येक उपलक्षण केलें । परी ईश द्वैताहुनीं भिन्न ॥९४॥गुणदोष म्हणजे जीवें केलें । जितुकें कल्पून भोग्या आणिलें । तितुकियाहूनही चिद्रूप संचलें । विकारलें नाहीं ॥९५॥तेंचि व्यापून सर्वा असे । पदार्थमात्र त्याहून न दिसे । घटीं कीं जलीं आकाश जैसें । तेवीं रसादि विकल्पीं ॥९६॥हेंचि आता प्रांजळ करूं । पदार्थमात्र विवेचनें विवरूं । ध्वनितार्थें कळावया निर्धारू । व्यतिरेक अन्वयाचा ॥९७॥रूप म्हणजे आदिकरून । पंचविषयात्मक संपूर्ण । या पांचांपरता पदार्थ अन्य । त्रिभुवनीं नाहीं ॥९८॥रूप तितुकें ईशनिर्मित । जडचंचलादि समस्त । एक रूपाचा करितां संकेत । नाम वेगळे घेणें नको ॥९९॥नामरूप तितुकी माया । आदिकरून तृणांत कार्या । व्यापून चित्प्रभा जे अद्वया । सर्वां ऐशी नव्हे ॥१५००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.