सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या २५०१ ते २६००

<poem> तैसे हे माया ईशादि तृणांत । सत्यत्वें नसोनि जाहले समस्त । यासि प्रेरणा निर्विकारत्वें होत । ब्रह्मात्मयाची ॥१॥परी यासी स्वतां चेष्ठवीना । ना न चेष्टवी हेंही असेना ।हेंचि उद्भवून पावतें अवसाना । तया अधिष्ठान मात्र ॥सर्पविकारा जेवीं दोरी । तेवीं सर्वां आधार निर्विकारी ।मग प्रेरी अथवा न प्रेरी । परी आळ अधिष्ठानीं ॥३॥ऐसिया हेतु श्रुति जाणे । ब्रह्मात्मया प्रेक्षक म्हणे ।येऱ्हवीं पहातां प्रेरणा न होणें । निज परब्रम्हीं ॥४॥हेंही जग जया सत्य वाटलें । तयासी श्रुति उगीच बोले ।कीं हें परमात्मसत्तें वर्तलें । तया स्मरा अखंडिता ॥५॥जया साधका मिथ्या कळतां । जाहलेंचि नाहीं वाटे चित्ता ।तेव्हां प्रेरकत्वाची वार्ता । मिथ्या होय ॥६॥म्हणोनि श्रुति निःशंक बोलली । परी अंतरीं सारांशता भिन्न भाविली ।कैशीं ही भाविकें समजाविलीं । परी यथार्थ नव्हे ॥७॥यथार्थ विकारें जो प्रेरक । हा ईश्र्वराचाचि धर्म एक ।कारण कीं ईक्षणादि शक्ति अनेक । असती विक्षेपादि ॥८॥यासीही श्रुति बहु प्रमाण । कीं प्रेरक सर्वज्ञ ईशान ।आणि युक्ति अनुभवेंही कडून । ईशेंविण प्रेरण नव्हे ॥९॥जयाच्या भीतीनें वायु वाहे । हे श्रुति ईश्र्वरा प्रमाण आहे ।बुद्धीचा प्रेरक गायत्री म्हणताहे । ब्रह्म परमात्मा ॥ब्रह्मात्मा प्रेरक जें म्हणितलें । हें उगें सहजत्वें बोलिलें ।ईश्र्वराचे भीतीनें म्हणतां जाहलें । विकाररूप प्रेरण ॥११॥या सर्वांसी जे भीति होय । ते सामर्थ्याविणें म्हणों नये ।सामर्थ्य तेंचि विकारी जेणें भय । पावती सर्व ॥१२॥तें सामर्थ्य ईश्र्वरींच असे । ब्रह्मीं विकाराचें नांव नसे ।हें विचारें पहावें मानसें । विचारवंतीं ॥१३॥तस्मात् ईशाचें प्रेरण तें विकारी । ब्रह्मात्मा प्रेरक निर्विकारी ।हें दृष्टांताचिये अनुकारी । स्पष्ट कळे तो ऐका ॥१४॥जैशी रहाटमाळा लोकीं करिती । तेणें पाणी येतसें वरुती ।तयासी चक्रें बहुत असतीं । ते दाटिती एकमेकां ॥१५॥परी ते वृषभ लावितां चाले । नातरी निवांत राहे उगलें ।तो बैलही न चाले पहिले । हाकणाराविण ॥१६॥ऐसे वृषभ आणि पुरुष हाकितां । आणि रहाटमाळेची सामग्री समस्ता । एका असती भूमीवरुता ।तिच्या आधारें चालती ॥१७॥हा दृष्टांत पाहतां विचारून । दाष्ट्रांताचें होय विवेचन । अर्थात् विकारी निर्विकारी कोण । कळेल स्पष्ट ॥१८॥देहादि प्राण बुद्धि स्फूर्ति । हे एक एकांचे दाट असती । जैशी का रहाटमाळेची स्थिति तेवीं कळासिली ठाईं ठाईं यासी जीव हा वृषभ जुंपिला । साभिमानें खांदा वाहे उगला ।तेणें चालतसे देहयंत्रमाला । सुखदुःख पाणी उफाळे हाकिता पुरुष तो इश्र्वर ।वर्तवीत प्रारब्धानुकार । हाचि जीवासी बलात्कार । विक्षेपशक्ति चाबुकें ॥२१॥असो राहाटमाळा वृषभ नर । येका असती भूमीवर ।तेवीं देहादि जीव आणि ईश्र्वर । ब्रह्मात्माधिष्ठानीं ॥२२॥भूमि निर्विकारें आधार सहज । तेवीं ब्रह्म परमात्मा अचोज ।तेथें प्रेरणेचें कैचें व्याज । सर्वाधार मात्र ॥२३॥बैलासी हांकितां पुरुष ईश्र्वर । विक्षेपशक्ति चाबुकाचा मार ।तेणें भयें चाले हें जगयंत्र । तस्मात् ईश प्रेरक खरा ॥२४॥ऐसें विचारून खरें पाहतां । विरोधाची नसे वार्ता । आतां सावधान असावें रविदत्ता । चालिला प्रसंग निरोपूं ॥२५॥पंचभूतें पंचयोनीचीं शरीरें । त्यांत पंचप्राण दशइंद्रिय सारे ।मन बुद्धि विषयांत वावरे । हे जड चंचळपणें ॥२६॥विद्या अविद्या ईश्र्वर जीव । पांचवी माया स्फूर्ति स्ययमेव ।एवं हीं बत्तीस तत्त्वें सर्व । क्षणक्षणां अन्यथा होती ॥२७॥ईशाचि प्रेरकत्त्वें विकारी । क्षणक्षणें होत अन्यथा परी ।मा जीवादि देहांत तों सार्री । हे तों अन्यथा मुळींचे ॥२८॥असो हे सारे अन्यथा होती । क्षणक्षणां विकारें पालटती ।परी सर्वांत अनुस्यूत जे चिती । अन्यथा नव्हे ॥२९॥जैसें आकाश घटीं मठीं व्यापून । किंचित् अन्यथा न पावे चलन ।तैसेंचि ब्रह्म परिपूर्ण सच्चिद्घन । सर्वत्रीं परी अन्यथा नव्हे ॥३०॥जरी ब्रह्मादि कीटकापर्यंत । कोठें अज्ञान कोठें ज्ञान स्फुरत ।परी ब्रह्म आत्मा अन्यथा भूत । कधीं नव्हे सहसा ॥३१॥नाना देहामध्यें राहून । सूक्ष्मासी होय वर्तन । त्याचा जीव हा धरी अभिमान । प्रेरकपण ईशाचे ॥३२॥साभिमान येथवरी घेतला । कीं आपणचि देह होऊन बैसला ।बळें कल्पिलें पापपुण्याला । मीच कर्ता म्हणोनी तेणेंचि वारंवार उपजे मरे ।नाना योनीचीं पावुनि शरीरें । उंच नीच स्वर्ग नरक अपारें ।भोगी अनंत कल्प ॥३४॥आधींच अज्ञानें अन्यथा जाहलें । वरी अन्यथात्वें भ्रमूं लागलें ।कोठें सान थोर कीं वाईट चांगुलें । परी अन्यथा क्षणक्षणां ॥३५॥इतुकेही अन्यथात्व पावती । परी सर्वत्रीं व्याप्त जें चिती । अन्यथा नव्हेचि कल्पांतीं । आदि अंतीं कां मध्यें ॥३६॥अज्ञानकालीं जें निजरूप । अन्यथा विकारी नव्हे अल्प । मा जो जाणेल स्वकीय स्वरूप । तेथें अन्यथा कैंचें ॥३७॥अज्ञानी अन्यथा जाहलें नाहीं । परी वाउगेंचि मानिती सर्वही ।कीं मीच वर्तणूक जें कांहीं । अन्यथा होय माझी ॥३८॥मी हा पुण्य पाप करितसें । तें भोगिलेंचि भोगीन आपैसें ।ऐसिये अभिमानाचे ध्यासें । भोगणेंचि लागे ॥३९॥ऐसा हा अज्ञानाचा जल्प । हाही तोंवरीच संताप । जोंवरी ब्रह्मात्मा सच्चिद्घन । अपरोक्षें न कळे ॥२५४०॥तोंवरीच मी जीव मज बंधन । मीच पावे जन्ममरण । जोंवरी ब्रह्मात्मा सच्चिद्घन । अपरोक्षें न कळे ॥४१॥तोंवरीच षड्विकार बाधती । क्षणक्षणां अन्यथा होती ।जोंवरी ब्रह्मात्मा सच्चिनमूर्ति । अपरोक्षें न कळे ॥४२॥तोंवरीच तूं एक मी एक । माझें तुझें नानात्व सकळिक । जोंवरी ब्रह्मात्मा आपण येक । अपरोक्षें न कळे ॥४३॥तोंवरीच हे जग सत्य वाटे । ब्रह्मादि कीटकांत सान मोठें ।जोंवरी ब्रह्मात्मा घनदाटे । अपरोक्षें न कळे ॥४४॥तोंवरीच दारापुत्र धनादि । विषय लालचीनें संपादी ।जोंवरी ब्रह्मात्मा आनादि । अपरोक्षें न कळे ॥४५॥तोंवरीच अंकित कर्म धर्माचा । वर्ण आश्रम कीं देव वेदाचा ।जोंवरी ब्रह्मात्मा अभिन्न साचा । अपरोक्षें न कळे ॥४६॥तोंवरीच स्वजन मोहिती । उपजीवना परतंत्र करिती । जोंवरी ब्रह्मात्मा स्वानंदमूर्ति । अपरोक्षें न कळे ॥४७॥तोंवरीच सुखदुःखाचा शीण । पापपुण्य हे बागुल दोन । जोंवरी ब्रह्मात्मा सघन । अपरोक्षें न कळे ॥४८॥तोंवरीच उत्तम अधम गति । अधोर्ध्व स्वर्ग नरक भासती ।जोंवरी ब्रह्म परमात्मा निश्चिती । अपरोक्षें न कळे ॥४९॥तोंवरीच स्वामिसेवकभाव । मी भक्त तूं अससी देव ।जोंवरी ब्रह्मात्मा स्वानुभव । अपरोक्षें न कळे ॥२५५०॥तोंवरीच देवदानव मानवादिक । स्त्री पुरुष कीं नपूंसक ।जोंवरी ब्रह्मात्मा निश्चयात्मक । अपरोक्षें न कळे ॥५१॥तोंवरीच शब्दाची खटपट । शास्त्रीय लौकिकाचे बोभाट ।जोंवरी ब्रह्मात्मा निघोट । अपरोक्षें न कळे ॥५२॥तोंवरीच मी कर्ता भोक्ता सकळां । ध्याता ज्ञाता अनुभविता वेगळा ।जोंवरी ब्रह्मात्मा स्वलीळा अपरोक्षें न कळे ॥५३॥तोंवरीच किंचिज्ज्ञ हा जीव । ईशा सर्वज्ञपणाचा भाव । जोंवरी ब्रह्मात्मा स्वयमेव । अपरोक्षें न कळे ॥५४॥तोंवरीच जीव हा भा्रमक । ईश्र्वर असे यासी प्रेरक ।जोंवरी ब्रह्मात्मा उभयीं एक । अपरोक्षें न कळे ॥५५॥तोंवरी संचित प्रारब्ध क्रियमाण । ईश करी बलात्कारें प्रेरण ।जोंवरी ब्रह्म परमात्मा आपण । अपरोक्षें न कळे ॥५६॥तोंवरीच बंध मोक्ष हे वार्ता । सिद्ध साधक कीं मुमुक्षुता ।जोंवरी ब्रह्म परमात्मा तत्वता । अपरोक्षें न कळे ॥५७॥तोंवरीच गुरुशिष्य हे दोन । श्रवण मनन निदिध्यासन ।जोंवरी ब्रह्म आत्मा सघन । अपरोक्षें न कळे ॥५८॥असो ऐसे कोठवरी बोलावें । द्वैत तोंवरीच हें आघवें ।जोंवरी ब्रह्म आत्मा स्वानुभवें । अपरोक्षें न कळे ॥५९॥ऐसा अपरोक्ष उत्तमाधिकारी । गुरु शास्त्रविचाराचे अनुकारीं ।विवेचनें पावला निःसंशय अंतरीं समाधि । उत्थानरहित ब्रह्मात्मा अपरोक्ष पहिलाचि असे । आजि नवा कवणा करणें नसे । परी वाउगेंचि अज्ञानें लाविलें पिसें । भिनत्वदेहबुद्धीचें चित्प्रभा जे अनेकधा बोलिली । आणि हे ईशादि जड बत्तीस उद्भवली । हे दोन्ही येकचि म्हणून भाविलीं येकत्र जाहली नसतां ॥६२॥हेंचि चिद्ग्रंथीचें रूप । एकचि जाहले दोरी सर्प । परी हा वाउगाचि आरोप । अज्ञानकार्य ॥६३॥ऐशिया ग्रंथीचें भेदन । जो करी विचारें निःसंशय पूर्ण ।तोचि उत्तम अधिकारी आपण । पुन्हा ग्रंथी पडो नेदी ग्रंथी म्हणजे पुन्हां जडासी ।चिद्रूपता न येचि बुद्धीसी । आणि चिद्रूप ब्रह्म जें अविनाशि । तें जडसें न वाटे ॥६५॥चिद्रूप ब्रह्म तेंचि आपण । येर हे बत्तीस आपणाहून भिन्न ।निवडिले तया स्वप्नींहि मीपण । येऊं नेदी सहसा ॥६६॥जरी देहादिकांचे व्यापार होती । परी असंग आपण अचळस्थिती ।हेचि सहज समाधि निश्चिती । समाधि उत्थानरहित भलतिये अवस्थेमाझारी । असंग आपण निर्धारी । ईशादि तृणांत हे सारी ।मिथ्या परोक्ष ॥६८॥देह जन्मला आपण जन्मेना । देहा ऐसा आपण असेना ।देह वाढतां आपण वाढेना । स्वयें चिद्रूप आत्मा ॥६९॥देह तरुण भोगी । आपण असंग विषयालागीं । देह क्षीण होता न होय प्रसंगीं । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७०॥देह मरतां आपण न मरे । देहायेवढा नोव्हे साचोकारे ।तरी होईल कैसा जडआकारें । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७१॥देह चालतां आपण चालेना । देह बोलता आपण बोलेना ।देतां घेतां न देई घेईना । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७२॥रति भोगितां आपण अभोक्ता । असंगचि स्वयें विसर्ग करिता ।भलतिया क्रियेमाजी समस्ता । स्वयें चिद्रूप आत्मा कर्ण ऐके आपण ऐकेना । स्पर्श घेतां आपण स्पर्शेना । डोळा देखतां आपण देखेना ।स्वयें चिद्रूप आत्मा ॥७४॥जिव्हा रसज्ञ आपण अजिव्ह । घ्राण घेतां आपण स्यमेव ।आपण असंग अगंध सदैव । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७६॥चित्त चिंतिता अचिंत्य आपण । अहंकाराचे न घे अहंपण ।बुद्धि निश्चयामाजी परिपूर्ण । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७७॥मन संकल्पा जरी निर्के । परी न पडे कदा संशयात्मकें ।आपण परिपूर्ण निश्चयात्मकें । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७८॥हें असो संघ हा जागृत । सर्व क्रिया असती होत ।परी आपण जागा ना व्यापारत । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७९॥ब्रह्मादि तृणांत सर्वां पाहे । परी सत्यत्व किंचितही न लाहे ।सर्वाधिष्ठान आहे तें आहे । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८०॥उंच नीच कीं सान थोर । हा नव्हेचि किमपि उद्रार । येकत्वें परिपूर्ण अपार । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८१॥ऐसा जागृतीमाजी देह हा क्रीडे । परी कर्तेपणाची न जोडे ।तरी सुखदुःख भोग कवणा आतुडे । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८२॥वाउगें मनन करितां क्षणीं । कीं स्वप्नभासातें देखोनी ।भिन्न पाहे सर्व आपणाहूनी । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८३॥गाढ जरी झोंप लागतां । नेणिवेची नसे वार्ता । सर्व काळ देखणा तत्त्वतां । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८४॥तैसेंचि समाधिकाळीं आपणा । येऊं नेदी ध्यातृध्याना ।ध्येयरूपचि अनुभवाविना । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८५॥एवं जागृतीमाजीं मी माझिया । स्पर्शो नेदी विश्र्वाभिमानिया ।एकरूप पाहतसे अद्वयां । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८६॥ध्यासेंही कर्तृत्वा नातळे । भोक्तेपणाही न उफाळे । तैजस ठायींचा ठाईं गळे । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८७॥सुप्तींत किंवा समाधींत । भिन्नत्वाची नेणेचि मात ।प्राज्ञ अभिमानाचा होता निःपात। स्वयें चिद्रूप आत्मा ॥८८॥ऐसा निजांगें ब्रह्म जाहला । संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला । द्वैताचा कांटाचि उपटिला । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८९॥स्फूर्तीपासून देहापर्यंत । मी म्हणोन स्वप्नींही नातळत । तेवींच ब्रह्मादि तृणांत । सत्यत्वें नाढळती ॥२५९०॥ब्रह्मचि सत्य तोचि आपण । या सर्वांसि नुद्भवेचि मीपण ।तरी सत्यत्व कैचें जरी भासमान । मृगजळापरी जग एवं सत्य तें मिथ्या न होय ।मिथ्यालागीं सत्यत्व न ये ।अहंकारादि देहांत न जाय । कदा मीपणें ॥९२॥हेचि सहज समाधीची स्थिती । उत्थानचि नव्हे कल्पांतीं ।संशय ग्रासून सहजगति । आठवावीण ब्रह्म अंगें ॥९३॥ब्रह्मींचें अभाव असावें । तरी तया अविद्या अज्ञान म्हणावे ।अविद्येविण जीवासी रूप नव्हे । तरी साभिमान कैंचा अज्ञान जातां ज्ञानहि मावळे । नुसधें विज्ञान ब्रह्मचि निवळे । तस्मात् विद्येसहित ईशत्व गळे ।प्रेरकत्व त्यागूनी ऐसे कारणरूपें जीवेश गेले । कार्यरूपें देहादि उरले । तया स्फूर्ति मात्रें जीवें स्फुरविलें ।परी साभिमान मेला ॥देह इंद्रिय प्राण बुद्धि मन । आणि स्फूर्तीही तया असे कारण ।परी अज्ञान गेलेंचि निपटून । आतां उरती मृगजळवत् ॥९७॥याची क्रियाही प्रारब्धवशें । तिहीं अवस्थेची होतसे ।परी कवणेंकाळींही न उमसे । ययासी मीपण ॥९८॥तेवींच ब्रह्मादि तृणांत जग । ज्ञान जाहलियाचि दिसती मग ।वरी सत्यता न येचि असंग । आस्ति भाति प्रिय ब्रह्म ॥९९॥ऐसा निश्चयचि होऊन गेला । उत्थान नव्हे तिहीं अवस्थेला ।जग सत्यत्वा की देहाचे मीपणाला । न स्पर्शे ब्रह्मात्माहूनी ॥२६००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.