सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या ७०१ ते ८००

<poem> प्रियत्वही गेलें स्वप्नभासा । इकडे अप्रियता उरे सहसा । एवं असज्जडदुःखरूप जैसा । परोक्ष कोणी ॥१॥तोचि आपण असता जरी । तरी कां त्यागिता परोक्षापरी । तस्मात् आपण आत्मा निर्विकारी । हा अनात्मा देह ॥२॥आतां स्वप्नभासासी जें आलें । अस्ति भाति प्रियत्व उमटलें । कीं मी हा आणि म्यां । देखिले कल्पित विषय ॥३॥हाचि मी आणि भास विषया । देखत असें काळीं यया । आणि प्रियरूपही मानिलें तया । सूक्ष्मदेहासी ॥४॥तरी हेंही असज्जड दुःखात्मक । ऐसा करणें जरी विवेक । तरी हाचि न्याय निश्चयात्म स्थूलापरी पहावा ॥५॥जैसा स्थूल नाहीं स्वप्नमाझारीं । तेवींच सुप्तींत निमती सत्रा सारीं । जया संघासी बोलती उत्तरीं । सूक्ष्मदेह भासरूप सुत्पौतु तल्लये बोधः शुद्धो जाड्यं प्रकाशते ॥सुप्तीच्या ठाईं तया देहाचा । लय होतसे समूळ साचा । नुसधी नेणीव उरे तयाचा । शुद्ध बोधें प्रकाश करी ॥७॥सुप्ती म्हणजे लागतां झोप । किंचित् दुजें नुरे अल्प । एक नेणीव मात्र असद्रूप । उरे कारण ॥८॥जया अज्ञानास्तव । देहद्वया आलें रूपनांव । तोचि याचा विश्रांतिठाव तेथेंचि विश्रामती ॥९॥जैसा श्येनपक्षी विहार करी । दशदिशीं आहारादि सारी । शिणतां नीडीं प्रवेशे माघारीं । पक्ष संकोचोनी ॥७१०॥तैसा सूक्ष्म देहासहित । जीव हा जागर स्वप्नीं क्रीडत । तेथें खसदुःखें शीण पावत । तेव्हां विश्रांति घ्यावी वाटे ॥११॥मग ज्ञान क्रियाशक्ति दोन्ही । मनबुद्धींत आकर्षोनी । विषय दशदिशा उपेक्षुनी । कारणाकडे फिरे ॥१२॥मनामाजीं इंद्रियें येतां । शून्य पडे विषया समस्ता । आणि देहही पडे निचेष्टिता । मृत्युप्राय ॥१३॥प्राण मात्र जडत्वें वावरती । तेणें मृत्यूची नव्हे भ्रांति । हा निजेला ऐसें म्हणती । पाहूनि लोक ॥१४॥परी मीं हा निजलों असें । निद्रिस्त जाणेना अल्पसें । प्राणही वावरती जैसे । तेंही न स्मरे ॥१५॥मन बुद्धि एकत्र जाली । किंचित जरी कल्पना स्फुरली । तरी ते स्वप्नभासाची भुली । तेही निभेल यांत ॥१६॥एखादी वेळे स्वप्न होतें । केव्हां जागृति सरतां गाढ होतें । कल्पित विषयाही समस्तातें । उपेक्षून बुद्धि ॥१७॥ते बुद्धि वृत्ती अज्ञानीं मिळे । किंचित न स्मरे सुखदुःख सोहळे । मी अज्ञान हेंही न कळे । जाड्य मात्र उरे ॥१८॥ऐशी गाढ सुषुप्ती जालिया । अभाव होतसे देहद्वया । जागृति स्वप्नकाळीं तया । निःशेष निमती ॥१९॥मनादि वृत्ति कीं ज्ञानेंद्रिय । प्राण कीं देह ना क्रर्मेंदिय । प्रत्यक्ष कीं भासरूप विषय । हे सर्वही मावळती ॥७२०॥नुसती जाड्यता जे नेणीव । उरे होऊन सर्व अभाव । ऐसिये समयीं तो स्वयमेव । आत्माचि एक ॥२१॥दुजेवीण आनंदघन । सच्चिद्रूप आत्मा पूर्ण । परी नेणीव न फिटे कारण । म्हणोन ते झोंप ॥२२॥पहिली नेणीव जे आपुली । तेचि देहद्वया कारण जाली । त्या देहद्वयाची उपाधि सरली । परी नेणीव न फिटे ॥२३॥जैसें तृणादि वरचील नासलें । परी भूमिपोटीं बीज उरलें । तेणेंचि वार्षिक विरूढलें । पूर्ववत् जैसें ॥२४॥अथवा वृक्षस्थें डोळे झाकितां । जळीं पडिला न दिसे तत्वतां । परी तें मिथ्यात्वें न कळतां । उघडितां मानी मी पडिलों तैशी नेणीव मात्र बीजरूपें । उरली सेविना संकल्पें । म्हणोनि उत्थानीं पूर्वरूपें । अम्यथात्वें उठे ॥२६॥जागृति स्वप्नीं जरी ज्ञान । पदार्थभासाचें विपरीत भान । परी तें निजात्मयाचें अज्ञान । न फिटे वृत्तीचें ॥२७॥तेविं स्मरणरूप विशेष वृत्ति । उभय व्यापारी क्रीडत होती । तेचि लयकाळीं नेणीव पुढती । सामान्यत्वें उरे ॥२८॥उरे ते अमुकसी आहे । ऐसा आहेपणा न लाहे । परी अनुमानें जाणावी कीं राहे । कार्य उत्पत्तीमुळें ॥२९॥असो ऐशी जे मूढवृत्ति । उरली जे जाड्यता तयेप्रति । अस्ति भाति प्रियरूप निश्चिंतीं । सहजगति आले ॥७३०॥जाड्यता आहे आणि भासे । आवडीही तेथेंचि वसतसे । देहद्वय होती फांसें । निस्तत्त्वपणें ॥३१॥निस्तत्त्व म्हणजे नाहींपणा । नाहीं तें कदां असेना । त्यांची आवडी तरी होय कोणा । वंध्यापुत्रापरी ॥३२॥भ्रमें आहे होतें वाटलें । मंदांधकारीं सर्प उमटले । ते गाढ अंधारीं निमाले । तेवीं सुप्तींत देहद्वय ॥३३॥स्थूलदेह तो जागृतीसहित । निमाला असे स्वप्नांत । तें स्वप्नही नासुनि जात । सुषुप्तीमाजीं ॥३४॥असज्जड अप्रियता । देहद्वयाची अकृत्रिमता । जरी हे अस्तिभातित्वें । असतां तरी नासती कासया ॥३५॥अस्तित्त्व होते तें जाऊनी । निस्तत्त्व आलें दोहींलागुनी । चिद्रूप प्रिय तींही मावळुनी । जड दुःख आलें ॥३६॥नेणिवेसी आली अस्तिता । तेथेंचि वसिन्नली चिद्रूपता । आणि स्वकीयत्वें प्रियता । तेथेंचि आली ॥३७॥आतां तेंचि अस्तित्वादि नेणिवेचें । कैसें तें पुढें निरोपिजे साचें । प्रस्तुत ज्ञान सुप्तींत जें नवचे । तेंचि आधीं साधूं ॥३८॥बोधः शुद्धो जाड्यं प्रकाशते ॥४॥जे का सामान्यत्वें ज्ञान । शुद्ध म्हणिजे नेणिवेवीण । जाड्यता नेणिवे तें आपण । प्रकाशीत असे ॥३९॥तें शुद्ध ज्ञान आत्मयाचें । तें पुढें विवरून कळे साचें । प्रस्तुत ठाईं या सुषुप्तीचें । ज्ञान कैसें ऐके ॥४०॥सुप्तींकाळी वृत्तीचा लय । जाणिला असे प्रकाशें स्वयें । जरी जाणिला नसता तो समय । उत्थानीं न स्मरतां ॥४१॥आतां जेधवा असे स्मरला । कीं लय अमुक वेळ होता जाला । तस्मात् तो अनुभव घेतला । तेंव्हा आता स्मरे ॥४२॥विशेष वृत्तीचें स्मरण नव्हतें । परी सामान्यत्वें जाणे नेणिवेतें । आतां विशेषत्वें पाहिलें त्यातें । तेव्हां जाणिलें म्हणोनि ॥४३॥जैसा स्वसुखी पुरुष कोणी एक । बैसला निवांत सकौतुक । तया पुढून जातां लोक । परी तो विशेषें देखेना ॥४४॥आपुले एश्र्वर्यसुखें कोंदला । हा अमुक वृत्तीसी नाहीं कळला । नेत्र उघडून पाहे तयाला । सामान्य गती ॥४५॥मागून येणारे तया पुसिलें । कीं या मार्गीं अमुकसें गेले । तंव तो स्मरून यया बोले । कीं गेलेंसें वाटे ॥४६॥सामान्यत्वें देखिलें होतें । तें स्मरून सांगतसें तयातें । जरी तेणें पाहिलेंचि नसतें । तरी सांगता काय ॥४७॥तस्मात् अनुभविला विषय आठवी । नानूभूताचि स्मृति न व्हावी । हें सत्यसत्य अन्यथा न घडावी । युक्ति न्यायाची हें अनुमान परी सत्य असे । नदीसी पूर जेव्हां आलासे । तेव्हां उगमीं पर्जन्य पडिलासे । यांत संदेह नाहीं ॥४९॥तैसा ज्ञानाचा अनुभव । झोंपेंत घेतला स्वयमेव । म्हणून आतां करी आठव । तया समयाचा ॥७५०॥लय सामान्यत्वें देखिला । होता तो उत्थानीं आठविला । तस्मात् नेणिवेचा अनुभव घेतला । शुद्ध साक्षिज्ञानें ॥५१॥म्हणसी सर्वांचा होता । साक्षीचा लय होय त्या सहिता । तरी साक्षीच्या लयाचा पाहता । असे कोण साक्षी ॥५२॥असाक्षी कीं लय मानूं नये । हें सत्य यथान्यायें । मागुतीं म्हणसी कीं सर्वांचा क्षय । जालया साक्षी कोण ॥५३॥तरी पाहे शुद्ध साक्षी ज्ञान । सर्वांचा लय पाहे आपण । तस्मात् सर्वांचा लय जो होणें । हे अन्यथा नव्हे ॥५४॥जैसा सर्वांचा लय साक्षी जाणे । म्हणून सत्य सत्य सर्वां लय होणें । तैसा साक्षीचा लय पाहिला कोणें । हें बोले विचारूनी म्हणसी सर्वांचा लय अनुमानिला । तेवींच अनुमानाचा साक्षी निमाला तरी जैसा सामान्य साक्षी उरला तैसा उरे कोण दीप नेत्र दोन्ही मिळतां । पदार्था देखतसे समस्तां । त्यांतील दीप जरी मावळता । तरी डोळा देखे अंधार ॥५७॥अंधार नेत्रें देखिला । म्हणोनि सत्य दीपाचा लय जाला । तैसा डोळा जरी असे गेला । तो देखिला कोण ॥५८॥तथापि लय जो साक्षीचा । मानिसी अनुमानें साचा । तरी साक्षी जो अनुमानिला । साक्षीचा । तो हाच कीं दुजा ॥५९॥डोळिया लय डोळा देखे । कीं दुजा डोळा लया ओळखे । तेवीं साक्षीचा लय साक्षी निरखे । कीं चिद्रूप दुसरें ॥७६०॥साक्षीचा लय साक्षीनें देखिला । तरी आपणा देखतां आपण मेला । कीं डोळाचि पाहे डोळा गेला । हा तो असंभव ॥६१॥दुसरिया ज्ञानें हें ज्ञान । निमालें म्हणतां तें ज्ञान कोण । डोळा गेला तो पाहे अन्य । डोळियानें तो डोळा कोणता ॥६२॥तस्मात् ज्ञानही दुसरें नाहीं । कीं ज्ञान लया होय गाही । डोळाचि दुसरा नसे कांहीं । कीं डोळा गेला देखे ॥६३॥ऐसिया विरोधामुळें पाहतां । साक्षीचा लय नसे मानितां । म्हणोनि साक्षीज्ञान असे तत्त्वतां । लयकाळीं लयसाक्षी ॥६४॥मागुतीं म्हणसी कीं लय नव्हे साक्षीचा । परीं अनुभव कां नसे तयाचातरी सांग बापा अनुभव नेणिवेचा । कोण घेतला हे म्यां नेणीव असे पाहिली । म्हणसी जरी ऐसिया बोली । तरी नेणीव जे तुवां देखली । आपुली कीं पराची सांग ॥६६॥हा अन्य गृहस्थ असे निजला । जडत्वें घोरतसे उगला । तरी त्याचा तुला अनुभव जाला । कैसा तो नकळे ॥६७॥अरे पराचें जागें असतां मन । काय कल्पितें न कळे पाहून । मा निजेल्याचें नेणिवेचें ज्ञान । तुज जालें हा असंभव ॥६८॥आतां म्हणसी नेणीव आपुली । झोपेमाजीं प्रत्यक्ष पाहिली । तरी पाहे पाहे गोष्ट साधली । आमुच्या पक्षाची ॥६९॥तुवां वृत्ति समूळ नसतां । आपुली नेणीव पाहिली म्हणतां । अनुभवून कीं होसी बोलतां । हा अनुभविता साक्षी ॥७०॥अरे ऐसा टळटळीत अनुभव । लय साक्षी हा स्वयमेव । तयासी कोठें असे नेणीव । नेणिवेचा प्रकाशक ॥७१॥लय काळींही जया ज्ञानाचा । नाश नाहीं प्रकाशाचा । जागृतीं स्वप्नीं तो अभाव तयाचा । नाहींच नाहीं ॥७२॥एवं तिहीं काळींही नासेना । हेंचि सद्रूपत्व असे ज्ञाना । सद्रूप तेंचि चिद्रूप आपणा । आत्मयाचें सिद्ध ॥७३॥जैसें सद्रूप चिद्रूप आत्मयाचें । असे तें निरोपिलें वाचें । आतां तिचें लक्षण कां साचें । तें प्रियत्व बोलिजे ॥७४॥मागें मिथ्यात्मा गौणात्मा । निषेधून जो कां मुख्यात्मा । तो आवडता प्रत्यगात्मा । अव्यभिचारें बोलिला ॥७५॥तोचि आत्मा सुषुप्तीमाजीं । सुखरूप जैसा असे सहजीं । तोचि बोलिजे जेथें दुजी । अनुभववृत्ति नसे ॥७६॥जागृतिमाजीं सुखःदुख होणें । तें एका संकल्पाच्या गुणें । तेवींच स्वप्नींही सुखःदुख देणें । संकल्पमात्रें ॥७७॥झोपेंत संकल्पचि निमतां । सुखःदुखाची नुरे वार्ता । तस्मात् सुखःदुखेंचि नसतां । तत्त्वतां निजसुख ॥७८॥जें सुख वृत्तींत उपत्न्न होणें । तयासी नाश होय श्रुति म्हणे । जें उद्भवेना असे सहजपणें । या नांव निजसुख ॥७९॥तया सुखासी घेईना वृत्ति । म्हणून नोहेचि अनुभूति । परी अनुभाव्यरूपी चिन्मूर्ति । आहे तैसा असे ॥७८०॥आहेपणा तेंचि चिद्रूप ज्ञान । तोचि आत्मा आनंदघन । हीं तिन्हीही ब्रह्मलक्षणें । एकत्र असती ॥८१॥येथें रविदत्ता मानिसी ऐसें । की जडासी सुखःदुखही नसे । आणि आहेपणा तो तेथें वसे । तरी असे जडत्वीं सुख ॥८२॥काष्ठ पाषाण मृत्तिका । येथेंचि आनंद असे निका । तरी याचें उत्तर ऐका । बोलिजेत असे ॥८३॥जडीं सुखदुःखाचा अभाव । म्हणणें हाचि कीं असंभव । जें जें उत्पन्न जालें रूपनांव । जड कीं चेतनविकार ॥८४॥विकारी म्हणजे उत्पन्न जालें । जालें ते वाईट कीं चांगुलें । तयासी सुखदुःख नाहीं वाटलें । परी सुखदुःखरूप ॥८५॥फोडिती तोडिती फेंकिती । एक स्थानीं ठेऊन पूजिती । हीं काय तेथें तुज न दिसती । सुखें आणि दुःखें ॥८६॥तथापि सुखदुःखें तेणें । अनुभविलीं नाहींत मानिसी मनें । तरी निजसुखही असे कवणें । रीतीं तेथें ॥८७॥तेथें सुख आहे तें तुज कैसें । कळलें तें सांग पां आपैसें । तेथें हर्ष किंवा ग्लानि दिसे । अनुमानाजोगें ॥८८॥म्हणसी निजेलिया कोणतें चिन्ह । कीं सुख आहे करावा अनुमान । तरी पाहें त्याचें मुख विकासमान । हर्ष खेद नसतां ॥८९॥तस्मात् सुषुप्तीमाजीं निजानंद । वृत्तिवीण सुखाचा कंद । जरी नसतांही हर्ष खेद । सुख तेथें नसे ॥७९०॥तथापि सुख आहेच म्हणसी । तरी कोण पावे तयासुखासी । मिळणी होतां सुख समरसीं । जीव हा सुखी होय ॥९१॥हा अनुभव सर्वत्रांचा । सुखींच विश्रामती साचा । उत्थानीं बोलताती वाचा । कीं काय हो सुखी होतों ॥९२॥जरी कोणें बळें उठविलें । तें वैरियापरी वाटतें जालें । आहा महत्सुख होतें तें गेलें । तेव्हां तळमळी ॥९३॥उठलिया क्षणभरी । त्या सुखाचि येतसे लहरी । पुढें मग येतसे जागरीं । हळूहळू व्यापारा ॥९४॥आहेपणा तेथें सुख असे । मानिलें जें तुवां मानसें । परी जेथें विकार हा उमसे । सुखदुःखाचा ॥९५॥तेथें आनंद हा लोपत । सुखदुःखेंचि होऊनि निभ्रांत । मग असो कोणतीही वस्तुजात । जड कीं चेतन ॥९६॥जैसें विकार सुषुप्तीमाजीं । सुखःदुखरूप नसती दुजी । केवळ निजसुखचि सहजीं । असे तैसें आहे ॥९०॥अणीक येक करिसी कल्पना । शय्यादि असती सुखसाधना । परी ते आरंभी मात्र वृत्तीचे ग्रहणा । होय कीं मी एक सुखी परी गाढ जेव्हां झोंप लागली । मग त्या सर्वां वृत्ति विसरली । एक निजसुख मिळणी जाली । तेव्हां शय्यादि सुख कैचें हे असे मृदु अस्तरणें । झोंप येतां कठिणही न म्हणे । जेथें पाहिजे तेथें पडणें । विश्रांति घ्यावया ॥८००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.