श्रीग्रामायन
प्रकाशक मुद्रक © सर्व हक्क
दिलीप माजगावकर दिलीप माजगावकर लेखकाधीन
राजहंस प्रकाशन साप्ताहिक मुद्रण
१०२५ सदाशिव पेठ १०२५ सदाशिव पेठ पहिली आवृत्ती
पुणे ४११ ०३० पुणे ४११ ०३० १ जुलै १९७४
________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________
द्वितीय आवृत्ती
१ जून १९८३
□
मुखपृष्ठ मूल्य महाराष्ट्र राज्य
सुमती चक्रवर्ती पंचवीस रुपये वाङमयनिर्मिती
पुरस्कार
प्रास्ताविक
गेली दहा-बारा वर्षे ग्रामीण भागात मी खूप हिंडलोफिरलो.
विशेषतः जेथे नवनिर्माणाचे काही काम घडले, चळवळी झाल्या ते
भाग, तेथील बदल मी जवळून पाहिले. काही ठिकाणी थोडेफार
प्रत्यक्ष कामही केले. त्या त्या वेळी जसजशी मनःस्थिती होती
तसतसे काही लिखाणही केले. कधी अंतर्मुख होऊन. कधी बहिर्मुख
वृत्तीने. त्यामुळे काही लिखाण स्वैर, चिंतनात्मक तर काही लेखवजा
असे झाले. कधी मुलाखती घेतल्या, मित्रांशी पत्ररूप संवाद केले. या
सर्वांचा हा संग्रह आहे.
आपल्या अर्थव्यवस्थेविषयी, एकूणच राष्ट्रीय नियोजनाविषयी काही नवे विचार-
मंथन देशात सुरू आहे; नसल्यास व्हायला तरी हवे आहे.
मला आपले वाटून गेले की, ही वेळ अशा स्वरूपाचा संग्रह
प्रकाशित करायला बरी आहे. नाहीतर इतकी वर्षे हाताशी स्वतःची
प्रकाशनसंस्था असूनही, मी हा संग्रह पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा विचार
कधी केलेला नव्हता.
आज शहरे वाढताहेत. ग्रामीण भागाचे अखंड, अहर्निश शोषण सुरू आहे.
अर्थव्यवस्थेचा समतोल यामुळे ढळला आहे. हे थांबले नाही
तर ! जे प्राचीनकाळी कार्थेजचे, अथेन्सचे झाले
किवा मोहोंजोदोरोचे झाले, ते उद्या आपलेही होईल. सोन्याची द्वारकाही जेथे
बुडाली तेथे आपला मुंबई-कलकत्ता संस्कृतीचा उसना बडिवार
किती काळ टिकणार !
कितीही वैभवशाली, दैदिप्यमान, पुढारलेल्या वगैरे असल्या तरी
केवळ शहरी संस्कृतींचा समूळ विनाश हा अटळ असतो. ग्रामीण
आणि नागर या दोन संस्कृतींचा समन्वय, एक विशिष्ट तोल ज्या
समाजांनी साधला तेच समाज टिकले, पराभवाच्या राखेतूनही पुन्ः
पुनः वर उठले. बाकीचे इतिहासजमा झाले.
आपल्यालाही असे इतिहासजमा व्हायचे नसेल तर हा सध्याचा
ढळलेला तोल लवकर सावरून घ्यायला हवा. खेडेगाव हा आपला,
भारतीय समाजाचा, किंबहुना सर्वच पौर्वात्य देशांचा तोलबिंदू आहे,
हे नीट ओळखायला हवे.
हा तोलबिंदू पकडता यावा या प्रेरणेतून झालेले हे सर्व लिखाण आहे.
१० जून १९७४ श्री. ग. माजगावकर
पुस्तकाची ही दुसरी आवृती.
काही बदल नाहीत.
शेवटी दिलेले पुस्तकावरचे
दोन विशेष अभिप्राय एवढी
काय ती नवीन भर.
श्री. ग. मा.
अनुक्रम
वडिलांस अर्पण
ज्यांनी मला मनसोक्त भटकू दिले......