गंगाजल









गंगाजल




इरावती कर्वे





देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. पुणे



पहिली आवृत्ती - १९७६
दुसरी आवृत्ती - १९७७
तिसरी आवृत्ती - २००५
चौथी आवृत्ती - २००९
पाचवी आवृत्ती - २०१५



संस्थापक
रा. ज. देशमुख
डॉ. सुलोचना देशमुख

प्रकाशक
देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.,
पुणे ४११ ०३०,

© सर्व हक्क जाई निंबकर यांच्याकडे आहेत.

मुखपृष्ठ
रवी पांडे

किंमत :
१५०/- रुपये

अक्षर रचना
श्री. सुरेश माने
गोकुळनगर, कोंढवा रोड, पुणे ४८.

मुद्रक :
श्री जे प्रिंटर्स प्रा. लि.
१४१६, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०.

अनुक्रम
१. बॉय-फ्रेण्ड? ११
२. देवळाविना गाव १५
३. दुसरे मामंजी १९
४. एक रात्र? की युगानुयुगे? ३८
५. आई सापडली! ४३
६. पाच कविता ५३
७. व्यक्तिस्वातंत्र्य आणि बंधमुक्तता ६३
८. पुनर्जन्माचा विनतोड पुरावा ७१
९. जुन्याच समस्या, नवे उपाय ७६
१०. एकाकी ८५
११. लोक आत्मचरित्र का लिहितात? ९०
१२. किंकाळी ९६
१३. उकल १०३
१४. ते सर्व तूच आहेस १०४
'थोडे' मैत्रिणीसंबंधी १२७
प्रस्तावना १३३


 एके ठिकाणी एक नवी वस्ती घडत होती.वसाहतीच्या एका अंगाला काही न बांधलेली अशी एक मोकळी जागा शिल्लक होती; एक दिवस तेथेही पाया खणला गेला. बाकीच्या घरांसारखा तो दिसला नाही. पाहता-पाहता एक लहानसे देऊळ उभे राहिले.

 ह्या नव्या वस्तीला देऊळ!

 "एक तमीळ म्हण आठवली." मी ती म्हण परत म्हणून दाखविली, आणि तिचे शब्दश: भाषांतर केले, देवळाविना गावात घर असू नये: “कोण जुन्या काळचा मनुष्य होता कोण जाणे! पण त्याला वाटले की, ज्या गावात देऊळ नाही, तिथे आपली धडगत नाही. ज्या जुन्या काळी ही म्हण झाली असेल, त्या वेळीतरी देवाळाशिवाय गाव असण्याची शक्यता नव्हती.

 "देऊळ हे एक श्रद्धास्थान आहे.आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे.ज्या गावात ते नसेल, ते एक श्रद्धा नसलेले, कोठच्याही त-हेच्या सामुदायिक आकांक्षा नसलेले ठिकाण असते. म्हणून तेथे राहू नये, असे भाष्य या म्हणीवर करावे लागेल."

 "देवळामध्ये अरूपाला रूप दिलेले असते.अनादीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते; प्रसंगी अनंताचे विसर्जनही करितात. आपण जे नाही, पण ज्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे, असे काहीतरी सत म्हणून आहे.आपल्या आर्ततेत त्या सतला आपण निरनिराळे रूप देतो; तोच देव"

हा ललित-निबंध कधी एकीकडे झुकला म्हणजे वैचारिक होतो, दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ जातो. पण तो कथेसारखा दिसला, तरी कथा नसतो. ते एक चिंतनशील मनाने कथेच्या आविर्भावात केलेले भाष्यच असते.. वेगवेगळ्या पातळ्यांवरून, वेगवेगळ्या दिशेने सतत चिंतन करणारे आणि जीवनाचा अर्थ लावणारे अखंड प्रवासी, भटके मन, युगानुयुगांच्या आठवणी साठवीत सतत प्रवास करीत आहे. या प्रवासात ठिकठिकाणी टिपलेले सौंदर्य हा ह्या प्रवाशाच्या संवेदनक्षम मनाचा एक विभ्रम आहे.

- नरहर कुरुंदकर


देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.